Maharashtra Political News Updates, 07 August 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राज्यात घडामोडींना वेग आला आहे. त्याचप्रमाणे, राज्यातील निवडणुकांसंदर्भात दिल्लीतही काही घडामोडी समोर येत आहेत. शरद पवारांची आज दिल्लीत राहुल गांधींसमवेत बैठक होणार असून त्यात राज्यातील निवडणुकांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात एकीकडे अनेक भागांत पावसामुळे पाण्याला उधाण आलेलं असताना दुसरीकडे राजकीय तर्क-वितर्कांनाही उधाण आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Marathi News Live Today, 07 August 2024: विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा…

16:12 (IST) 7 Aug 2024
पैशांसाठी देहव्यापार : ‘त्या’ दाम्पत्याने गरजू विद्यार्थिनी, विवाहित महिलेला हेरले अन्…

नागपूर : एका विद्यार्थिनीसह विवाहितेच्या आर्थिक दुर्बलतेचा फायदा घेत दोघींकडून देहव्यापार करवून घेणाऱ्या दाम्पत्याला गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभाग (एसएसबी) च्या पथकाने अटक केली. सदर येथील हॉटेल दुआ कॉंटीनेंटल हॉटेलवर छापा टाकून देहव्यवसाय उघडकीस आणला. देहव्यवसाय चालविणाऱ्या पती-पत्नीला सदर पोलिसांच्या ताब्यात दिले. अल्का हेडाऊ (२८) आणि इंद्रजित हेडाऊ (३६) रा. गोळीबार चौक, अशी अटकेतील दलालांची नावे आहेत.

वाचा सविस्तर…

15:57 (IST) 7 Aug 2024
नाशिक : माजी नगरसेविकेच्या घरी चोरी, एक कोटीहून अधिक रकमेचे दागिने लंपास

मंगळवारी सायंकाळी उशीरा सरकारवाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

सविस्तर वाचा…

15:19 (IST) 7 Aug 2024
वर्धा : पाणी पुनर्भरणाचा नवा अध्याय; डॉ. सचिन पावडे यांच्या उपकरणास आंतरराष्ट्रीय पेटंट…

वर्धा : भूगर्भातील जलपातळी खोलवर जाण्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे पुनर्भरण होण्यासाठी वैद्यकीय मंचचे डॉ.सचिन पावडे यांनी शोधलेल्या उपकरणास आंतरराष्ट्रीय पेटंट प्राप्त झाले आहे.

वाचा सविस्तर…

15:18 (IST) 7 Aug 2024
Uddhav Thackeray on Modi: … तर बांगलादेशमधील हिंदूंच्या संरक्षणाची जबाबदारी मोदींची – उद्धव ठाकरे

बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत असतील आणि ते खरं असेल तर अधिवेशन चालू आहे.. सर्वपक्षीय बैठक गृहमंत्र्यांनी बोलवली होती. ती फक्त माहिती देण्यासाठी होती का? नुसत्या माहित्या आम्ही तुमच्याकडून घेतच असतो. अजूनही मणिपूर, काश्मीरमध्ये स्थिती बदललेली नाही. बांगलादेशमध्ये तसं काही होत असेल, तर केंद्र सरकारनं तातडीने तिथल्या हिंदूंच्या रक्षणासाठी काहीतरी करायला हवं. जर शेख हसींनांना केंद्र सरकार भारतात आश्रय देत असेल, तर बांगलादेशमधील हिंदूंचं संरक्षण करण्याची जबाबदारी तुमचीच आहे. इंदिरा गांधींनी बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून दिलं होतं. त्याच बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत असतील, तर त्यांचं संरक्षण करण्याचं काम हिंदुस्थानच्या पंतप्रधानांचं आहे – उद्धव ठाकरे</p>

15:15 (IST) 7 Aug 2024
सॅलिसबरी पार्क परिसरात घरफोडी; पावणेदोन लाखांचा ऐवज चोरी

पुणे : सॅलिसबरी पार्क परिसरातील एका सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी दागिने आणि रोकड असा एक लाख ८८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली.याबाबत एकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार सॅलिसबरी पार्कमधील वेस्ट व्ह्यू सोसायटीत राहायला आहेत.

तक्रारदार १ ऑगस्ट रोजी सदनिका बंद करून कुटुंबीयांसह परगावी गेले होते. चोरट्यांनी मध्यरात्री सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड असा एक लाख ८८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. पोलीस उपनिरीक्षक राहुल जोग तपास करत आहेत.

15:12 (IST) 7 Aug 2024
कडोंमपातील ११८ हेक्टर सरकारी जागेवर अतिक्रमण, कल्याणच्या तहसीलदारांची उच्च न्यायालयात माहिती

मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील राज्य सरकारच्या मालकीच्या ११८.१८ हेक्टर जागेवर अतिक्रमणे असल्याची माहिती कल्याणच्या तहसीलदारांनी उच्च न्यायालयात दिली आहे.

सविस्तर वाचा….

15:10 (IST) 7 Aug 2024
रत्नागिरीत हिट अँड रन; व्हॅगनार गाडीने दोन गाड्यांना ठोकले

रत्नागिरी : मद्यधुंद अवस्थेत तरुणाने दोन गाड्यांना ठोकर मारली. रत्नागिरीतील माळनाका ते सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयादरम्यान “हिट अँड रन”चा हा प्रकार मंगळवार ६ ऑगस्टला रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडला.

सविस्तर वाचा….

14:59 (IST) 7 Aug 2024
महाराष्ट्रातील कांद्याला बांग्लादेशची सीमा ३२ तासानंतर खुली, निर्यातदारांना बँकांचे व्यवहार सुरळीत होण्याची प्रतिक्षा

नाशिक : बांग्लादेशातील हिंसाचारामुळे सीमेवर अडकलेल्या कांद्याच्या मालमोटारींना ३२ तासानंतर प्रवेश मिळण्यास सुरुवात झाल्याने तूर्तास निर्यातीतील अडथळे दूर झाले आहेत. बांग्लादेशातील बँकांकडून शाश्वती (बँक गॅरंटी) घेऊन निर्यातदार कांदा पुरवतात. सध्या तेथील बंद असणाऱ्या बँका दोन-तीन दिवसांत सुरू होतील.

सविस्तर वाचा…

13:47 (IST) 7 Aug 2024
पशुधन योजनेतंर्गत लाभार्थ्याकडे लाच मागणारा पर्यवेक्षकाला पकडले; खेड तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

पुणे : पशुधन योजनेतंर्गत लाभार्थी म्हणून नोंद करण्यासाठी शेतकऱ्याकडून पाच हजारांची लाच घेणाऱ्या खेड तालुक्यातील पशुधन पर्यवेक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले.बंडू बबन देवकर (वय ४३) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पर्यवेक्षकाचे नाव आहे. याबाबत एका शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

सविस्तर वाचा

13:43 (IST) 7 Aug 2024
लोकलमधील अपंग राखीव डब्याला आपत्कालीन पायरीच नाही

कल्याण : मध्य रेल्वेच्या अनेक लोकल डब्यांमधील अपंगांसाठी राखीव असलेल्या डब्यांना आपत्कालीन पायरी नसल्याने लोकलमधून नोकरी आणि अन्य कामांसाठी प्रवास करणाऱ्या अपंगांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अलीकडे सिग्नल बिघाड, ओव्हरहेड वायर तुटणे आणि इतर तांत्रिक कारणांमुळे धावत्या लोकल बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे.

सविस्तर वाचा…

13:29 (IST) 7 Aug 2024
पनवेल : ५४ कोटींच्या अपहारप्रकरणी आणखी एकास अटक

पनवेल : मुंबई महानगर प्रदेश लोखंड व पोलाद बाजार समितीमध्ये जून महिन्यात ५४ कोटी रुपयांचा अपहार उघडकीस आला होता. नवी मुंबई गुन्हे अन्वेषण विभाग २ चे पथक या प्रकरणाचा तपास करत असून आतापर्यंत चौघांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी बाजार समितीमधील सेवानिवृत्त मुख्य लिपिक संजय माधव पाटील याला गुजरात येथून अटक केली.

12:32 (IST) 7 Aug 2024
नागपुरात इतवारीत भीषण आग; तरूणी दगावली, दोघे जखमी

नागपूर : नागपूरच्या इतवारी परिसरातील तींनल चौकातील खापरीपुरा येथील तीन मजली असलेल्या एका इमारतीच्या खालच्या माळावरील अत्तरचे गोदाम असलेला दुकानाला आग लागली यात इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील बाकडे कुटुंबातील तीन लोकांना वाचवण्यात यश आले मात्र त्यांची मुलगी या घटनेत दगावली.

वाचा सविस्तर…

12:32 (IST) 7 Aug 2024
खतगावकर तुतारी फुंकणार?

नांदेड : भाजपाचे ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर यांचा बंडाचा पवित्रा गेल्या आठवड्यातच समोर आला होता. त्यांच्या स्नुषा डॉ. मीनल पाटील खतगावकर यांनी नायगाव विधानसभा मतदारसंघातील आपल्या अपक्ष उमेदवारीचे निशाण धर्माबादजवळच्या पवित्र धार्मिक स्थळी फडकविले. खतगावकर बहुधा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश करतील, अशी चर्चा सुरू झाली आहे.

वाचा सविस्तर…

12:22 (IST) 7 Aug 2024
डोंबिवलीत पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील भगवान काठेनगरमध्ये राहत असलेल्या पत्नीने आपल्या पतीचा मित्रांच्या मदतीन छळ करून, त्याला मानसिक, शारीरिकदृष्ट्या त्रास देऊन त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडले असल्याचे विष्णुनगर पोलिसांनी केलेल्या तपासात उघडकीला आले आहे.

सविस्तर वाचा…

12:20 (IST) 7 Aug 2024
Uddhav Thackeray on Narendra Modi: उद्धव ठाकरेंचा नरेंद्र मोदींना टोला

जे मला औरंगजेब फॅन क्लबचा अध्यक्ष म्हणायचे, त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी जाऊन बांगलादेशमधील हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवून दाखवावे. त्यांच्याकडून काही प्रतिक्रिया आली नाहीये अजून. कालच्या सर्वपक्षीय बैठकीतही पंतप्रधान नव्हते. जर ते युक्रेन आणि रशियाचं युद्ध थांबवू शकतात, तर मग पप्पांना सांगा की बांगलादेशमधले हिंदूंवरचे अत्याचारही थांबवा – उद्धव ठाकरे</p>

11:59 (IST) 7 Aug 2024
Uddhav Thackera on Delhi Visit: अचानक दिल्ली दौरा का? उद्धव ठाकरे म्हणाले…

लोकसभा निवडणुकीनंतर मी दिल्लीत आलो नव्हतो. माझे खासदार मला घरी येऊन भेटतच असतात. त्यांना इथे भेटायचं होतं. इंडिया आघाडीची लोकसभा निवडणुकीनंतर अधिकृत बैठक झाली नाही. इंडिया आघाडीतील नेत्यांना जमेल तसं भेटावं, पुढील वाटचालीवर साधक-बाधक चर्चा करावी असा विचार होता. महाराष्ट्रासह इतर राज्यांच्या निवडणुका होत आहेत. त्यासंदर्भात चर्चा करावी असा माझा हेतू होता – उद्धव ठाकरे</p>

11:59 (IST) 7 Aug 2024
Uddhav Thackeray on Bangladesh Violence: उद्धव ठाकरेंचं बांगलादेशी आंदोलकांना समर्थन!

जनतेचा संयम सुटत चालला आहे. इस्रायलमध्येही लाखो लोक रस्त्यावर उतरले होते. तिथल्या पंतप्रधानांना तर घराबाहेर पडता येत नव्हतं. आता बांगलादेशमध्ये तशी स्थिती झाली. मध्यंतरी श्रीलंकेतही असंच झालं होतं. एकूणच सर्वसामान्य जनता सर्वशक्तीशाली असते. तिच्या सहनशीलतेचा अंत कोणत्याही राज्यकर्त्याने पाहू नये. तो पाहिला तर जनतेचं न्यायालय काय असतं, हे बांगलादेशमधल्या घटनेनं दाखवून दिलं आहे – उद्धव ठाकरे</p>

11:58 (IST) 7 Aug 2024

बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत असतील आणि ते खरं असेल तर अधिवेशन चालू आहे.. सर्वपक्षीय बैठक गृहमंत्र्यांनी बोलवली होती. ती फक्त माहिती देण्यासाठी होती का? नुसत्या माहित्या आम्ही तुमच्याकडून घेतच असतो. अजूनही मणिपूर, काश्मीरमध्ये स्थिती बदललेली नाही. बांगलादेशमध्ये तसं काही होत असेल, तर केंद्र सरकारनं तातडीने तिथल्या हिंदूंच्या रक्षणासाठी काहीतरी करायला हवं. जर शेख हसींनांना केंद्र सरकार भारतात आश्रय देत असेल, तर बांगलादेशमधील हिंदूंचं संरक्षण करण्याची जबाबदारी तुमचीच आहे – उद्धव ठाकरे</p>

11:40 (IST) 7 Aug 2024
नाना पटोले यांच्या विरोधात भाजपला तुल्यबळ उमेदवार सापडेना

भंडारा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेतेमंडळींनी साकोली विधानसभा मतदारसंघ काबीज करण्याचा जणू चंग बांधला आहे. कारण, हा मतदारसंघ एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. मात्र, मागील दशकभरात या मतदारसंघात बरीच उलथापालट झाली. ती पाहता भाजपला साकोलीचा ‘गड’ पुन्हा काबीज करणे कठीणच जाईल अशी चिन्हे आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले येथील आमदार असून त्यांच्याविरोधात तुल्यबळ उमेदवार सापडेना, अशी स्थिती तूर्त भाजपमध्ये आहे.

वाचा सविस्तर…

11:31 (IST) 7 Aug 2024
घोडबंदर घाटात तेल सांडले, ठाणेकर कोंडीत अडकले

ठाणे : घोडबंदर घाटात बुधवारी पहाटे तेल सांडल्याने त्याचा परिणाम सकाळपासून जाणवू लागला आहे. भाईंदर पाडा ते मानपाडा पर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. वाहतूक कोंडीमुळे ठाणेकर हैराण झाले आहेत. घोडबंदरच्या कोंडीतून सुटका केव्हा मिळेल अशी विचारणा नागरिक करत आहेत.

सविस्तर वाचा…

11:30 (IST) 7 Aug 2024
शंभरी गाठलेल्या टोमॅटोच्या दरात मोठी घट, किरकोळ बाजारात ४० ते ५० रुपये किलो

पुणे : किरकोळ बाजारात शंभरी पार केलेल्या टोमॅटोच्या दरात मोठी घट झाल्याने गृहिणींना दिलासा मिळाला आहे. आवक वाढल्याने आठवडाभरात टोमॅटोचे दर निम्माहून कमी झाले आहेत. किरकोळ बाजारात एक किलो टोमॅटोचे दर ४० ते ५० रुपये किलोपर्यंत आहेत.

वाचा सविस्तर…

11:12 (IST) 7 Aug 2024
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चरित्रग्रथांचे प्रकाशन, गडकरी रंगायतन परिसरात मोठे वाहतूक बदल

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे’ या चरित्रग्रथांचे प्रकाशन बुधवारी गडकरी रंगायतन येथे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित राहणार आहेत.

सविस्तर वाचा…

10:37 (IST) 7 Aug 2024
Sushma Andhare on BJP Viral Video: धन्य ते गृहमंत्री, धन्य ते पोलीस कर्मचारी – सुषमा अंधारे

भाजपचा स्थानिक पुढारी तथा मलकापूर जी बुलढाण्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती शिवा तायडे या गावगुंडाकडून शहरातील पोलीस स्टेशन मध्येच महिलेला मारहाण. थोर ते गृहमंत्री.. थोर ते पोलीस कर्मचारी – सुषमा अंधारे

https://x.com/andharesushama/status/1821030674297475193

10:35 (IST) 7 Aug 2024
Rohit Pawar Corruption Claims: रोहित पवारांचं ट्वीट चर्चेत!

6000 कोटींचा ॲम्ब्युलन्स खरेदी घोटाळा, 12000 कोटींचा MSIDC घोटाळा, 10000 कोटींचा MSRDC घोटाळा, 5000 कोटींचा समृध्दी घोटाळा, 80 कोटींचा दुध खरेदी घोटाळा, 200 कोटींचा भोजन पुरवठा घोटाळा, 30 कोटींचा मंत्र्यांचे बंगले बांधण्याचा घोटाळा असे अनेक घोटाळे गेल्या काही दिवसांत उघड केले आहेत. जवळपास 35000 कोटींच्या या घोटाळ्यांची दखल सरकारने घेतली नसली तरी ॲम्ब्युलन्स घोटाळ्याची उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेत याचिका दाखल करून घेतली आहे तर समाजकल्याण विभागाच्या भोजन पुरवठा घोटाळ्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दखल घेतली आहे. या घोटाळ्यांची तक्रार सर्व कागदपत्रे आणि पुराव्यांसह तक्रारी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, लोकपाल तसेच इतर सर्व आवश्यक त्या ठिकाणी केल्या आहेत. सरकारमध्ये नैतिकता असेल तर सरकारने या सर्व घोटाळेबाजांची चौकशी करावी. …पण जेंव्हा कुंपणच शेत खात असेल तर कुंपणाकडून शेतीच्या रक्षणाची अपेक्षा करणेच व्यर्थ असले, तरी जेंव्हा जनतेच्या कोर्टात लढाई होईल तेंव्हा कुंपणच जमीनदोस्त होईल, यात मात्र कुठलीही शंका नाही – रोहित पवार

https://x.com/RRPSpeaks/status/1821049272013369751

10:29 (IST) 7 Aug 2024
Sonia Doohan Joined Congress: सोनिया दूहान यांची पहिली पोस्ट!

दिल्लीत खासदार दीपेंद्र हुड्डा यांच्या निवासस्थानी काँग्रेस पक्षाच्या धोरणांनी प्रभावित झाल्यामुळे हरियाणा काँग्रेस प्रभारी दीपक बावरिया, माजी मुख्यमंत्री भूपिंदर हुड्डा, हरियाणा काँग्रेस प्रदेश अध्यक्ष चौधरी उदयभान यांच्या नेतृत्वार विधानसभेच्या माझ्या सर्व समर्थकांसमवेत आज मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मिशन २०२४ साठी काँग्रेसला मजबुती देण्याचं काम आम्ही करू. येत्या काळात हरियाणाच्या सर्व विधानसभा मतदारसंघांमधून असाच संघर्ष करून जुन्या साथीदारांना पुन्हा काँग्रेसमध्ये आणण्याचं काम चालू राहील. हरियाणा काँग्रेसकडून मला जी काही जबाबदारी दिली जाईल, ती मी पार पाडण्याचं काम करेन – सोनिया दूहान

https://x.com/DoohanSonia/status/1820833312535191659

लोकसभा निवडणूक २०२४

Marathi News Live Today, 07 August 2024: महाराष्ट्रातील सर्व घडामोडींची बित्तंबातमी!