Mumbai Maharashtra News Update : पाडवा मेळाव्यानिमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांची लोकसभेबाबतची भूमिका जाहीर केली. त्यानुसार, त्यांनी फक्त नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दर्शवला आहे. यावरून अनेक आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राज ठाकरेंच्या भूमिकेचं स्वागत करणारे अनेक नेते असून, त्यांच्या भूमिका विरोध दर्शवणारेही अनेक आहेत. दरम्यान, दुसरीकडे भाजपाकडून आज उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अद्यापही जाहीर झाला नसून या ठिकाणाहून शिंदे गटाला संधी मिळते की भाजपाकडून उमेदवार जाहीर केला जातोय, हे पाहावं लागणार आहे. यासह राज्यातील विविध महत्त्वाचे अपडेट्स जाणून घेऊया.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra Breaking News Updates 10 April 2024 : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा!
गेल्या शुक्रवारी ठेकेदाराने रखडलेल्या रस्त्याच्या ३० फूट लांबीच्या काँक्रीट मार्गिकेचे काम पूर्ण केले.
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पवार कुटुंबीयांसाठी प्रतिष्ठेच्या झालेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजिण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मोदींची सभा महायुतीच्या बारामतीसह मावळ, शिरूर आणि पुणे अशा महायुतीच्या सगळ्या उमेदवारांसाठी असेल, असा दावा करण्यात येत आहे.
पुणे : महाविकास आघाडीकडून प्रचाराचे नियोजन करण्यात आले असून, पुण्यात काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचे ‘रोड शो’, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या सहाही विधानसभा मतदारसंघांत सभा आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा घेऊन वातावरण निर्मिती केली जाणार आहे.
एकेकाळी दिवसाला ४५ लाख प्रवासी घेऊन धावणाऱ्या बेस्टचे प्रवासी दिवसेंदिवस कमी होत आहेत.
टिळक पुलाच्या पिलरच्या स्लॅबचा भाग विष्णू निवास इमारतीला खेटून उभारल्याने, भविष्यात येथील रहिवाशांना प्रचंड त्रास सोसावा लागणार आहे.
डोंबिवलीतून मुंबई, ठाणे येथे जाण्यासाठी बहुतांशी प्रवासी, वाहन चालक मोठागाव येथील माणकोली उड्डाण पुलाचा वापर करत आहेत.
मुंबईसह राज्यातील साधारणपणे दोन लाखांपेक्षा अधिक रुग्णांना औषध तुटवड्याला सामोरे जावे लागणार आहे.
ट्रक बाजूला केल्यावरच अर्ध्या एक तासाने वाहतूक सुरळीत होईल असे वाहतूक पोलिसांनी सांगितले.
कल्याण : आई आणि बाळाचे आरोग्य निरोगी असावे या उद्देशातून केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेला गेल्या वर्षभराच्या कालावधीत ठाणे जिल्ह्यात अल्प प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेसाठी ठाणे जिल्ह्यात वर्षभरासाठी ६१ हजार ७६ गर्भवती महिलांचे लक्ष्य निश्चित करण्यात आले होते. प्रत्यक्षात वर्षभरात १६ हजार २५६ गर्भवती महिलांची नोंदणी झाली आहे.
बाळंतपणातील महिला आणि बालकांचा मृत्यूदर कमी करणे आणि सुरक्षित मातृत्वासाठी केंंद्र सरकारतर्फे ही योजना राज्य सरकारच्या माध्यमातून राबविली जाते. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ तालुक्यातील बहुतांशी भाग हा आदिवासी, ग्रामीण आहे. जुन्या रुढींंमुळे अनेक महिला गर्भवती असुनही पोटात दुखू लागले की रुग्णालयात जाण्याऐवजी स्थानिक पातळीवरच्या जादूटोणा, भगत, गवळी यांच्याकडे उपचारासाठी जातात. अशा अनेक महिला राज्य, केंद्र शासनाच्या आरोग्य योजनांसाठी पात्र असुनही त्यांच्यातील अज्ञानामुळे त्या अशा अनेक योजनांपासून वंचित राहतात.
पुणे: साहित्यिक पुस्तकांची पायरसी होण्याचे प्रकार आजवर अनेकदा उघडकीस आले आहेत. मात्र आता राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) तयार केलेल्या शालेय अभ्यासक्रमांच्या पुस्तकांना पायरसीची वाळवी लागल्याचे समोर आले आहे.
पुणे : कौटुंबिक वादातून सहा वर्षांच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या दोन महिलांना फरासखाना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी मुलाची सुखरुप सुटका केली. नझमा बिलाल शेख (वय ४१), रेणू दिलीप राठोड (वय ४१, दोघे रा. ढमढेरे बोळ, बुधवार पेठ) अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. याबाबत एका महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
वाहन चालकांवर दरोडा टाकणार होतो अशी कबूली त्यांनी दिली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज ठाकरेंना कोणी ओळखलंच नाही, कुणाला काही देत असताना त्यांनी अपेक्षा ठेवल्या नाहीत. देशहितासाठी राज ठाकरेंनी भाजपाला पाठिंबा दर्शवला आहे. त्याबदल्यात आम्ही काही मागितला नाही – प्रकाश महाजन