Mumbai Maharashtra News Update : पाडवा मेळाव्यानिमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांची लोकसभेबाबतची भूमिका जाहीर केली. त्यानुसार, त्यांनी फक्त नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दर्शवला आहे. यावरून अनेक आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राज ठाकरेंच्या भूमिकेचं स्वागत करणारे अनेक नेते असून, त्यांच्या भूमिका विरोध दर्शवणारेही अनेक आहेत. दरम्यान, दुसरीकडे भाजपाकडून आज उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अद्यापही जाहीर झाला नसून या ठिकाणाहून शिंदे गटाला संधी मिळते की भाजपाकडून उमेदवार जाहीर केला जातोय, हे पाहावं लागणार आहे. यासह राज्यातील विविध महत्त्वाचे अपडेट्स जाणून घेऊया.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra Breaking News Updates 10 April 2024 : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा!
वादळी वारा देखील सुटल्याने अनेक भागातील झाडे उन्मळून पडली. त्यामुळे विविध भागातील वीज पुरवठा खंडित झाला.
महायुतीचे रामटेक लोकसभा मतदारसंघात उमेदवार राजू पारवे यांची प्रचार सभा कन्हान येथे आज आयोजित करण्यात आली.
नागपूर : महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसचे नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी टाकले आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासमोर एक शब्दही नाना बोलू शकत नाही. त्यांच्यामुळे काँग्रेसच्या अनेक जागा शिवसेनेला गेल्या. यामुळे अनेकांमध्ये नाराजी आहे. ज्या नेत्याने कधीही नेतृत्व केले नाही, जो कधी लोकांमध्ये गेला नाही अशा लोकांना मोठी पदे दिली तर अशीच अवस्था होणार, अशी खरमरीत टीका अलीकडेच भाजपवासी झालेले खासदार अशोक चव्हाण यांनी केली.
नागपूर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच बार्टी आपल्या विविध उपक्रमांनी कायमच चर्चेत असते. डॉ. बाबासाहेब आबेडकर यांची १४ एप्रिलला जयंती आहे. बार्टीच्या वतीने बाबासाहेबांची जयंती दरवर्षी साजरी केली जाते. तसेच विविध उपक्रमांचे आयोजनही केले जाते. मात्र, यंदा बार्टीच्या वतीने थेट लंडन येथे बाबासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बार्टीने दोन दिवस भीमजयंतीच्या औचित्यांनी आंतरराष्ट्रीय परिषद लंडन येथे ठेवली आहे.
चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी अब की बार ४०० पारचा नारा देत असले तरी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा व मोदी यांना २०० पेक्षा अधिक जागा जिंकता येणार नाही. त्यामुळे मोदी यांना पंतप्रधान देखील होता येणार नाही, असे मत काँग्रेसचे राज्यसभेचे माजी खासदार तथा ज्येष्ठ संपादक कुमार केतकर यांनी व्यक्त केले.
पुणे : देशभरात लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाली असून आपल्या राज्यात देखील प्रचाराला सुरुवात झाली आहे. मात्र अद्याप ही महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून चर्चा सुरू आहे. या दोन्ही आघाड्यांमध्ये अनेक जागा वाटपावरुन पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज आहेत.
कल्याण : सर्वाधिक वर्दळीच्या शिळफाटा रस्त्यावरील पलावा चौकातील उड्डाण पूल लवकर बांधून पूर्ण व्हावा म्हणून प्रवासी मागील पाच वर्षापासून शासनाकडे, स्थानिक लोकप्रतिनिधी, मंत्री यांच्याकडे मागणी करत आहेत.
मी खोलात गेलो तर त्यांना पळता भुई थोडी होईल, असा इशारा ठाकरे गटाचे माजी खासदार उन्मेष पाटील यांनी दिला आहे.
जळगाव : एकाच कुटुंबातील सदस्य वेगवेगळ्या राजकीय पक्षांत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहावयास मिळत आहे. राज्यातील दिग्गज नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटातून स्वगृही भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांची कन्या तथा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा अॅड. रोहिणी खडसे- खेवलकर यांनी आपल्या फेसबुक पानावर असलेले एकनाथ खडसे यांचे छायाचित्र हटविले आहे
पिंपरी : चिंचवड शहरातील आयटी हब हिंजवडी आणि उच्चभ्रू असलेल्या वाकड परिसरात गेल्या तीन दिवसांपासून स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करणाऱ्या चालक, मालकांवर गुन्हा दाखल करत आठ महिलांची सुटका करण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला यश आल आहे.
अलिबाग- पुणे आणि रायगड जिल्ह्यांना जोडणारा वरंध घाटाच्या दुपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या कामासाठी दोन महिन्यांसाठी हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे, त्यामुळे वाहनचालकांनी ताम्हणी घाट अथवा आंबेनळी घाट या पर्यायी मार्गांचा वापर करावा यासाठीची वाहतुक अधिसुचना रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे.
कल्याण : एकाच पक्षातील असूनही मागील दोन वर्षात एकमेकांचे तोंड न पाहणारे, एकमेकांच्या कार्यक्रमात न जाणारे भाजपचे नेते, केंद्रीय मंत्री कपील पाटील आणि मुरबाड मतदारसंघाचे भाजप आमदार किसन कथोरे यांचा समझोता झाला आहे. तरीही स्थानिक पातळीवर जे राजकीय वातावरण आहे. त्याची माहिती आपण भाजपच्या श्रेष्ठींना देणार आहोत. अशी माहिती आमदार किसन कथोरेअं यांनी दिली आहे.
अकोला : लोकसभेच्या रिंगणात भाजपने ‘सेल्फ’ गोल केला. भाजपला मनसेने दिलेल्या पाठिंब्यामुळे उत्तर भारतीयांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज येथे केली. सांगलीचे विशाल पाटील वंचितच्या संपर्कात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नागपूर : जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष आणि काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे यांचे जातवैधता प्रमाणपत्र जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीने रद्द ठरविले होते. यामुळे त्यांचा रामटेक लोकसभा निवडणुकीतील अर्ज रद्द करण्यात आला होता. या विरोधात त्यानी न्यायालयात दाद मागितली होती. यावर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जातवैधता प्रमाणपत्र समितीच्या निर्णयाला स्थगिती दिली होती, मात्र निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास नकार दिला. यानंतर बर्वे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. मात्र सर्वोच्च न्यायालयातून बर्वे यांना दिलासा मिळाला नाही.
पनवेल : गुढीपाडवा नववर्षाचा पहिल्या दिवशी करंजाडेवासियांच्या सदनिकेच्या नळांमध्ये पिण्याचे पाणी आले नसल्याने करंजाडेवासियांनी पाणी पुरवठा करणाऱ्या यंत्रणेबद्दल संताप व्यक्त केला. करंजाडे वसाहतीमधील सेक्टर ४ मधील मेघना शिवम गृहनिर्माण संस्थेमध्ये मंगळवारी सायंकाळी वसाहतीमधील अनेक गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन नेमके काय करता येईल याविषयी बैठक घेतली.
राजीवनयन राहुलकुमार बजाज आणि ऋषभ फॅमिली ट्रस्टने या जमिनीसाठी देऊ केलेली ५० कोटी रुपयांची रक्कम व्याजाशिवाय परत करण्याचे आदेशही न्यायालयाने ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशनला दिले.
मतदानाच्या दिवशी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच मतदारांना मदत करण्यासाठी इयत्ता नववी ते १२ वीमधील विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येणार आहे.
उरण : एमएमआरडीएच्या विकास प्राधिकरण नेमण्याचा शासनाच्या अधिसूचनेला रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल आणि पेण तालुक्यांतील १२४ गावांतील २० हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी हरकती नोंदविल्या आहेत. यासंदर्भात अंतिम तारीख सरली असली तरी हरकती नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नवी मुंबई : मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्र तसेच गोव्याला जोडणाऱ्या शीव-पनवेल महामार्गावर स्थानिक गुंड खासगी बसचालकांकडून बळजबरीने हप्तेवसुली करत आहेत. मात्र वेळेवर प्रवाशांना पोहचवणे अनिवार्य असल्याने बसचालक पोलिसांकडे तक्रार करत नाहीत. मात्र हे प्रकार जास्त वाढल्याने वाहतूक संघटनांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे.
पिंपरी : पोलीस चारित्र्य पडताळणीचे बनावट प्रमाणपत्र तयार करणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. सुरक्षारक्षक, कामगारांना ५०० रुपयात प्रमाणपत्र तयार करुन दिली जात होती. ५१ बनावट प्रमाणपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
पालघर: वसई विभागात अधिराज्य गाजविणारे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत नेहमीच सत्ताधारी पक्षांबरोबर राहून परिसराचा विकास साधण्याचा प्रयत्न केला. या वेळी वेगळी भूमिका घेत उमेदवार उभे करण्याचे ठाकूर यांनी जाहीर केले असून, मित्र पक्षांनीच आपल्याला मदत करावी अशी साद घातली आहे.
नागपूर : ताडोबाच्या जंगलात वाघीण तिच्या बछड्यासह पाण्यात डुंबतानाचा असाच एक सुंदर व्हिडिओ समोर आला आहे. पीयूष आकरे, असीम भगत व नितीन बारापात्रे यांनी हे दृश्य कॅमेऱ्यात कैद केले आहे.
नागपूर : सक्करदरा पुलाची लांबी जास्त असल्यामुळे शहरातून बाहेर जाणारी वाहने अतिवेगाने पुलावरून धावतात. त्यामुळे या पुलावर आतापर्यंत बरेच अपघात घडले असून नागरिक अपघाताच्या भीतीच्या सावटाखाली असल्याचे जाणवते. विशेष म्हणजे, मागील सव्वा वर्षात येथे १३ अपघात घडले आहे.
वर्धा : कार्यालय व प्रचार यंत्रणा याबाबत बऱ्याच पुढे असलेल्या भाजप उमेदवार रामदास तडस यांच्या तुलनेत महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांना मात्र कार्यालयाची विवंचना लागली आहे. अद्याप त्यांचे अधिकृत कार्यालय झालेले नाही. निवास म्हणून त्यांनी हिमालय विश्व परिसरात घर घेतले. पण ते दूरवर व संपर्काच्या सोयीचे नसल्याच्या तक्रारी झाल्यात. म्हणून मग नव्याने कार्यालय शोधू लागले आहे.
भंडारा : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की, नाना पटोले यांच्या गाडीचा पुरता चक्काचूर झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण याच अपघातावरुन काँग्रेसने भाजपावर गंभीर आरोप केले आहेत.
वायव्य मुंबईमध्ये असलेल्या विमानतळामुळे या परिसराला वेगळी ओळख मिळाली असली तरी आसपासच्या परिसरातील रहिवाशांना फनेल झोनचा मोठा अडसर सोसावा लागत आहे.
आमच्या निशाणीवर लढा असं आम्हाला सांगितलं, असं राज ठाकरे म्हणाले. त्यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राज ठाकरेंनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी, असा आग्रह नव्हता. ते एका पक्षाचे अध्यक्ष आहेत, तेही असं मान्य करणार नाहीत – चंद्रशेखर बावनकुळे
लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी यंत्रणा प्रयत्नशील आहे.
जिल्ह्यातील नऊ तालुक्यांत पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. या भागातील २१९ गावे, ४७७ वाड्यांना २३८ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.
आपल्यावर अंडी फेकली, शिवीगाळ केली व दंगा घालून मारहाण केली, असा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आला आहे.