Marathi News Updates, 10 October 2024 : महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपली आहे. राज्यातील वेगवेगळे पक्ष निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. काही दिवसांत निवडणूक जाहीर होईल. ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे राज्यभर दौरे चालू आहेत. हे नेते ठिकठिकाणी मेळावे घेत आहेत. यासंबंधीच्या बातम्यांवर आपलं लक्ष असेल. लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार राज्यात फिरत आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील पक्षबांधणी करण्यात व्यस्त आहेत. या सर्व राजकीय घडामोडींवर आणि राज्यातील सामाजिक घडामोडींवर आपलं लक्ष असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Maharashtra Breaking News Live Today, 10 October 2024 : राज्यासह देशभरातील बातम्या वाचा एकाच क्लिकवर

12:42 (IST) 10 Oct 2024
वरळीत आदित्य विरुद्ध अमित ठाकरे सामना रंगणार? संजय राऊत अमित शाह व सुनेत्रा पवारांचा उल्लेख करत म्हणाले…

महायुती मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांना वरळी मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरवणार असल्याची चर्चा रंगत आहे. त्यावर शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले, आदित्य ठाकरे कसे डॅमेज होतील यासाठी कोणीही कितीही प्रयत्न केले तरी शिवसेना त्याला भीक घालत नाही. खरंतर ते निर्णय अमित शाह किंवा नरेंद्र मोदी घेतात. कोणी कुठे लढायचं? महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला त्रास देण्यासाठी किंवा त्यांच्या विरोधामध्ये काय करता येईल याचे निर्णय दिल्लीत होतात. मात्र मी ठामपणे सांगतो की वरळीत पुन्हा आदित्य ठाकरे निवडून येतील. मोठ्या मताधिक्क्याने ते पुन्हा विधानसभेत जातील. बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंविरुद्ध सुनेत्रा पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय अजित पवारांनी घेतलेला नसावा. तो निर्णय अमित शाहांनी घेतला होता.

12:02 (IST) 10 Oct 2024
रतन टाटा प्रभावित झालेल्या नाशिकच्या नेहरू वनोद्यान प्रकल्पाकडे मनपाचे दुर्लक्ष

नाशिक : ‘नाशिकचे पंडित जवाहरलाल नेहरू वन उद्यान अर्थात बॉटनिकल गार्डन प्रकल्प खूप चांगला आणि नाविन्यपूर्ण आहे. अशी भावना ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी व्यक्त केली होती.

सविस्तर वाचा…

11:48 (IST) 10 Oct 2024
पुणे पोर्श अपघात : आरोपीला निबंध लिहायला सांगणाऱ्या बाल न्याय मंडळाचे दोन अधिकारी बडतर्फ

पुणे पोर्श अपघातप्रकरणी अल्पवयीन आरोपीला ३०० शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा देणाऱ्या बाल न्याय मंडळाच्या दोन अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. सत्तेचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून राज्य सरकारने पुण्यतील बाल न्याय मंडळाच्या दोन राज्य-नियुक्त सदस्यांची हकालपट्टी केली आहे. या अधिकऱ्यांनी आरोपीला ३०० शब्दांचा निबंध लिही आणि पोलिसांसह दोन आठवडे काम कर अशी अट घालत जामीन मंजूर केला.

11:31 (IST) 10 Oct 2024
रतन टाटांनी संघ मुख्यालयाला दिली होती भेट, टाटांच्या निधनावर सरसंघचालकांना दु:ख, म्हणाले……?

नागपूर: टाटा समूहाचे तत्कालीन अध्यक्ष रतन टाटा यांच्या निधनाचे दुःख सर्वांनाच झाले असून अनेक जण त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत.

सविस्तर वाचा…

11:29 (IST) 10 Oct 2024
जुहू येथील घर रिकामे करण्याच्या ईडीच्या नोटीसीविरोधात शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा उच्च न्यायालयात

मुंबई : बिटकॉइन फसवणुकीशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात जुहू येथील बंगला आणि पवना येथील फार्महाऊस रिकामे करण्याबाबत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बजावलेल्या नोटिशीला अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा व्यावसायिक पती राज कुंद्रा यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

वाचा सविस्तर…

11:28 (IST) 10 Oct 2024
शाळेच्या आवारात मुलावर अत्याचार, अनैसर्गिक कृत्य प्रकरणी शाळकरी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : लष्कर भागातील एका शाळेच्या आवारात मुलावर अत्याचार करण्यात आले. मुलाशी अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी शाळकरी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत मुलाने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार शाळकरी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

वाचा सविस्तर…

11:27 (IST) 10 Oct 2024
आजच्या राजकारणात आहे फक्त स्वार्थ… त्यात समाजकारण कुठे आहे?

लोकांपुढे भाषण करताना नेते मंडळी ८० टक्के समाजकारण अन् २० टक्के राजकारण असा आदर्श उद्घोष करतात.पण प्रत्यक्षात मात्र हे प्रमाण उलटे असते. म्हणजे ही मंडळी ८०- ९० टक्के राजकारण करतात अन् १५-२० टक्के समाजकारण करतात. एकदा आपण यांना निवडून दिले की यांचे समाजकारण संपते अन् राजकारण सुरू होते.

वाचा सविस्तर…

11:27 (IST) 10 Oct 2024
बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कार प्रकरणात ४० गावांतील सराइतांची चौकशी

पुणे : बोपदेव घाटात तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील ४० गावे, वाड्या, वस्तींवरील ४५० सराइतांची चौकशी केली. पुणे जिल्ह्यातील घाट, तसेच टेकड्यांच्या परिसरात लूटमार, विनयभंग, बलात्कार असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराइतांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली.

वाचा सविस्तर…

11:08 (IST) 10 Oct 2024
“गुजरातमध्ये वीज महाराष्ट्रापेक्षा ५० टक्क्यांनी स्वस्त”, आव्हाडांचा महायुती सरकारवर संताप

“गुजरातमध्ये महाराष्ट्रापेक्षा ५० टक्के स्वस्तात वीज पुरवली जात आहे. वीजेची बिलं भरून महाराष्ट्रातील जनतेचं कंबरडं मोडलं तरी सरकारला काळजी नाही”, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्यातील महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे.

पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला धनंजय मुंडे लावणार हजेरी; बहीण-भाऊ पहिल्यांदाच भगवान भक्तीगडावर एकत्र येणार

विधानसभेची निवडूक तोंडावर आल्यामुळे राज्यात अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच नेते आपल्या पक्ष संघटनेचा आढावा घेत निवडणुकीची रणनीती आखत आहेत. यातच आता दसरा जवळ आल्यामुळे राज्याच्या राजकारणात मुंबई, नागपूर, बीड अशा ठिकाणी दसरा मेळावे होत असतात. त्यामुळे दसरा मेळाव्यांची राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा असते. यामध्ये बीडमध्ये संत भगवान बाबा यांची जन्मभूमी असलेल्या सावरगाव घाट याठिकाणी पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होत असतो. पण यावेळी या दसरा मेळाव्याला पहिल्यांदाच बहीण-भाऊ अर्थात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे एकत्र उपस्थित राहणार आहेत. धनंजय मुंडे यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. त्यामुळे या दसरा मेळाव्याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

“चलो भगवान भक्तीगड…! आपला दसरा, आपली परंपरा…! ही परंपरा जोपासत आपल्याशी संवाद साधून विचारांचे सोने लुटायला या वर्षी प्रथमच मीही येतोय, भगवान भक्तीगडावर सावरगाव घाट येथे. या विजयादशमीला संत भगवानबाबांचे आशीर्वाद घ्यायला मी येतोय, तुम्हीही या…!”, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.