Maharashtra Politics LIVE Updates : प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानवर मध्यरात्री २ ते अडीचच्या समुरास चाकूने हल्ला झाला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून लीलावती रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याला सहा ठिकाणी जखमा झाल्याचं वृत्त आहे. यासाठी त्याच्यावर आता उपचार सुरू आहेत. या हल्ल्यामुळे बॉलिवूड विश्व हादरलं असून, गेल्या काही दिवसांपासून वांद्रे येथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सातत्याने निर्माण होत असल्याने अनेक कलाकारांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे, कृषिक प्रदर्शनाच्या निमित्ताने अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार आहेत. तसंच, वाल्मिक कराडप्रकरणी राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. वाल्मिक कराड समर्थकांनीही त्यांच्या सुटकेसाठी आंदोलन सुरूच ठेवले आहे. यासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी पाहुयात.
Marathi Live News Update Today : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा
हल्ल्यामध्ये जखमी झालेला सैफ अली खान लिलावती रुग्णालयात दाखल आहे. त्याला रुग्णालयात पाहण्याकरता सारा अली खान आणि इब्राहिम खान लिलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत.
चंद्रपूरच्या ध्येयवेड्या तरुणांनी स्थापन केली ‘बस टॅप करो’ कंपनी
चंद्रपूर : येथील ध्येयवेड्या तरुणांनी ‘बस टॅप करो’ या नावाने कंपनी स्थापन करून ‘एनएफसी बिझनेस कार्ड्स’च्या माध्यमातून ‘नेटवर्क मार्केटिंग’चे चित्रच पालटले. त्यांनी एका ‘क्लिक’वर संपूर्ण प्रतिष्ठान, आस्थापना, व्यवसायाची संपूर्ण माहिती उपलब्ध करून दिली आहे.
विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता! किमान तापमानात वाढ
नागपूर : राज्यातील अधिकांश भागात थंडीचा जोर हळूहळू ओसरू लागला आहे. विदर्भातदेखील किमान तापमानात चढउतार होत आहे. थंडी जाणवत असली तरीही गेल्या काही दिवसांपासून किमान तापमान दहा अंश सेल्सिअसपेक्षा अधिकच आहे.
नागपूर : विस्कटलेल्या १६ हजार ८४३ कुटुंबियांना पोलिसांचा ‘भरोसा’
नागपूर : कुटुंबात झालेले वाद, प्रेमप्रकरण, अनैतिक संबंध कौटुंबिक हिंसाचार आणि वैवाहिक जीवनात आलेल्या अडीअडचणी सोडविण्यासाठी स्थापन झालेल्या भरोसा सेलमध्ये गेल्या आठ वर्षांत १६ हजार ८४३ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी १५ हजारांवर तक्रारी यशस्वीपणे सोडविण्यात आल्या. तर दुभंगलेल्या ७ हजार १७२ दाम्पत्यांचा विस्कळीत झालेला संसार भरोसा सेलने पुन्हा रुळावर आणला आहे.
Sharad Pawar : सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया; गृहमंत्र्यांकडे बोट दाखवत म्हणाले…
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेत्रा सैफ अली खानवर मध्यरात्री दोन ते अडीचच्या सुमारास जीवघेणा हल्ला झाला. घरात चोरी करण्याच्या उद्देशाने शिरलेल्या व्यक्तीने त्याच्यावर चाकू हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सैफला तत्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याची प्रकृती आता स्थिर असून तो सध्या डॉक्टरांच्या निगराणीखाली आहे. त्याच्या मणक्याला गंभीर दुखापत झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. दरम्यान, या हल्ल्यानंतर बॉलिवूडसह राजकीय नेत्यांकडूनही प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. आता राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही या प्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त केली असून या प्रकरणात राज्य सरकारने गांभीर्याने लक्ष घालण्याची विनंती केली आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.
१०० वर्ष जुने नागपूरचे रेल्वेस्थानक अनेक स्थित्यंतरांचे साक्षीदार!
नागपूर : नागपूर मध्यवर्ती रेल्वेस्थानकाच्या इमारतीला १०० वर्षे झाली असून या शंभर वर्षांच्या काळात हे स्थानक स्वातंत्र्य चळवळ, कामगार चळवळ यासह अनेक स्थित्यंतराचे साक्षीदार ठरले आहे. या ब्रिटिशकालीन रेल्वेस्थानकावरून अनेक मोठ्या नेत्यांनी प्रवास केला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्थानक भेटीचीही येथे नोंद आहे.
उरण: चिरनेरच्या सेंद्रिय गोड वालांना हवे भौगोलिक मानांकन
उरण : सेंद्रिय खत आणि नैसर्गिक पद्धतीने पिकणाऱ्या चविष्ट आणि गोड वालांना भौगोलिक मानांकन मिळावे अशी मागणी चिरनेरच्या शेतकऱ्यांनी केली आहे. यासाठी चार वर्षांपूर्वी कृषी विभागाकडून हा प्रस्ताव देण्यात आला आहे. मात्र त्याची दखल घेण्यात येत नसल्यामुळे शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
नवी मुंबई: कोल्डप्ले संगीत कार्यक्रमामुळे तीन दिवस अवजड वाहन प्रवेशबंदी
नवी मुंबई : नवी मुंबईत प्रथमच जागतिक कीर्तीच्या ‘कोल्डप्ले’ या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १८ ते २१ जानेवारी दरम्यान होणाऱ्या या कार्यक्रमाला अनेक महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार असून जागतिक कीर्तीच्या कलावंतांचा सहभाग या कार्यक्रमात असणार आहे.
'पुणे विमानतळाचा व्यावसायिकदृष्ट्या विस्तार महत्त्वाचा’,कोणी केली मागणी ?
पुणे : पुणे विमानतळाचा दिवसेंदिवस होणारा विस्तार आणि आंतरराष्ट्रीय विमानांना प्रवाशांकडून मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हवाई वाहतुकीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.
शाळेतील रोखपाल महिलेकडून १६ लाखांचा अपहार; लोणी काळभोर पोलिसांकडून गुन्हा दाखल
पुणे : शाळेतील रोखपाल महिलेने १६ लाख ६९ हजार रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी रोखपाल महिलेविरुद्ध लाेणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.याबाबत शाळेच्या संचालकांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शाळेतील रोखपाल महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे: आंतरराष्ट्रीय वाहनचालक परवाने काढणाऱ्यांमध्ये वाढ
पुणे : परदेशात वाहन चालविण्यासाठी आवश्यक असलेला आंतराष्ट्रीय वाहन चालक परवाना काढणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे समोर आले आहे. गेल्या तीन वर्षांत १३ हजारांहून अधिक पुणेकरांना असे परवाने देण्यात आले आहेत.
Saif Ali Khan Attacked : सैफ अली खानवर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया, डॉक्टर म्हणाले; “आम्ही…”
अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करण्यात आला आहे. पहाटे २ ते अडीचच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत सैफ अली खान जखमी झाला असून त्याच्यावर वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सैफ अली खान त्याच्या घरी असताना त्याच्या घरात एक अज्ञात व्यक्ती शिरला. त्या व्यक्तीने सैफच्या घरी काम करणाऱ्या गृहसेविकेसह वाद घातला. त्यानंतर सैफ अली खान मधे पडला. सैफवर या अज्ञात इसमाने वार केले. या घटनेत सैफ अली खानला सहा जखमा झाल्या आहेत. वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. IANS ने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. ही शस्त्रक्रिया अडीच तास सुरु होती.
Saif Ali Khan Attack Live Updates :
सैफच्या घरातील तीन कर्मचाऱ्यांची चौकशी
मुंबई पोलिसांकडून तपासाला वेग
पोलीस आणि गुन्हे शाखेचं पथक घटनास्थळी दाखल
सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी त्याच्या टीमने दिली अधिकृत प्रतिक्रिया
दरोडेखोराबरोबर झालेल्या झटापटीत सैफला दुखापत झाली आहे. या घटनेबाबत सैफ अली खानच्या वतीने त्याच्या टीमने अधिकृत निवेदन दिलं आहे.
सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांची पहिली प्रतिक्रिया
सैफ अली खान याच्यावर मुंबईतील वांद्रे (पश्चिम) येथील घरात हल्ला झाला. सैफवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
पती सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याबद्दल करीना कपूरची पहिली प्रतिक्रिया
सैफ अली खानवर दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यावर त्याची पत्नी अभिनेत्री करीना कपूरने प्रतिक्रिया दिली आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा
VIDEO : अजित पवार व्यासपीठावर असताना सुप्रिया सुळे अन् पंकजा मुंडेंची गळाभेट, सुनेत्रा पवार येताच…; व्यासपीठावर नेमकं काय घडलं?
राजकीय टीका-टिप्पणी आणि आरोप-प्रत्यारोप करणाऱ्या विरोधकांमध्ये चांगले मैत्रीचे संबंध असल्याचे अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत. राष्ट्रावादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपाच्या आमदार पंकजा मुंडे यांच्यातील राजकीय वैर अवघ्या राज्याला माहितेय. बीड प्रकरणात या दोघींनीही एकमेकींविरोधात भूमिका घेतली. मात्र, बारामतीतील एका कार्यक्रमात एकमेकींना पाहिल्यावर दोघींनी कडकडून मिठी मारली. हस्तांदोलन केलं, क्षणभर गप्पाही मारल्या. हे सर्व खुल्या व्यासपीठावर झालं, जे अनेकांच्या कॅमेऱ्यातही कैद झालं.
Maharashtra News LIVE Updates : "सैफ अली खान यांनी पंधरा दिवसांपूर्वीच मोदींची भेट घेतली होती, अन् आता...", संजय राऊतांचं विधान चर्चेत
पंधरा दिवसांपूर्वी सैफ अली खान सहकुटुंब मोदींना भेटायला गेले होते. मोदींबरोबर १ तास व्यतीत केला होता. त्यानंतर १५ दिवसांत त्यांच्यावर हल्ला झाला. राज्यात कोणीही सुरक्षित नाही, महिलांना रस्त्यांवर फिरणं मुश्किल झालंय. ९० टक्के पोलीस आमदारांच्या सुरक्षेसाठी आहेत. साधा उपशाखाप्रमुख फोडला तरीही त्याला दोन गनर दिले जातात, असे यांचे निकष आहेत - संजय राऊत</p>
Marathi Live News Update Today : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा