Marathi Batmya,01 December 2022 : भाजपाचे आमदार तथा मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्यातील सुटकेशी केली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवरायांबद्दल केलेले वादग्रस्त टिप्पणी प्रकरण अद्याप ताजे असताना लोढा यांनी केलेल्या या तुलनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे. संभाजी ब्रिगेडनेदेखील भाजपा तसेच लोढा यांचा निषेध व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे यापुढे शिवरायांचा अवमान केला तर गुद्द्यांशिवाय पर्याय नाही, असा थेट इशाराच संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राज्यात करोनाचं संकट असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर राहूनच कामकाज पाहिलं. मात्र, त्यावरून भाजपाकडून सातत्याने उद्धव ठाकरेंना लक्ष्य करण्यात येत होतं. यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतल्या नेस्को मैदानात झालेल्या पक्षाच्या पदाधिकारी मेळाव्यात उद्धव ठाकरेंवर खोचक शब्दांत टीका केली होती. त्यावर उद्धव ठाकरेंनी लगावलेल्या टोल्यावर आता पुन्हा एकदा राज ठाकरेंनी प्रतिटोला लगावला आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे.

वाचा राज्यभरातील विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी एकाच क्लिकवर

Live Updates

Marathi Batmya Live Today : वाचा राज्यभरातील विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी एकाच क्लिकवर

18:00 (IST) 1 Dec 2022
संघ मुख्यालय परिसरात बॉम्बस्फोट करण्याची धमकी, निनावी पत्राने खळबळ

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय परिसरात बॉम्बस्फोट करणार असून पोलीस आयुक्तांमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी हा बॉम्बस्फोट हाणून पाडावा,’ अशी धमकी देणारे निनावी पत्र सक्करदरा पोलिसांना मिळाले. त्यामुळे खळबळ उडाली आहे. धमकीपत्र गांभीर्याने घेत सक्करदरा पोलिसांनी सचिन कुलकर्णी नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. कुलकर्णी हा महापारेषणमध्ये अतिरिक्त कार्यकारी अभियंता आहे.

सविस्तर वाचा

17:31 (IST) 1 Dec 2022
मुंबईकरांची वाशी टोल नाक्यापुढे वाहतूक कोंडीतून सुटका

नागरिकांची वाहतूक कोंडीतून काही अंशी सुटका करण्यासाठी मुंबईत अनेक भागात युद्धपातळीवर मेट्रोची कामे सुरू आहेत. याचा परिणाम शहरातील वाहतुकीवर होत असून या कामामुळे अनेक भागात वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे. शीव-पनवेल मार्गावरील चेंबूर, देवनार आणि मानखुर्द परिसरातही गेल्या चार वर्षांपासून ‘मेट्रो २ बी’चे काम सुरू आहे.

सविस्तर वाचा

17:21 (IST) 1 Dec 2022
मालेगाव बॉम्बस्फोट खटला: साध्वी प्रज्ञासिंहसह दोन आरोपींकडून दोषमुक्तीची याचिका मागे

मालेगाव येथे २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्यात २०० हून अधिक साक्षीदारांचे साक्षीपुरावे नोंदवण्यात आले आहेत. खटल्याच्या या टप्प्यावर प्रकरणातून दोषमुक्त करण्याच्या याचिकेवर सुनावणी घेतली जावी का? या उच्च न्यायालयाने केलेल्या विचारणेनंतर खटल्यातील आरोपी खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि समीर कुलकर्णी यांनी दोषमुक्तीच्या मागणीसाठी केलेली याचिका गुरुवारी मागे घेतली.

सविस्तर बातमी

16:46 (IST) 1 Dec 2022
अशा पळविल्या मोटारगाड्या…; साकिनाका आणि मेघवाडी पोलिसांनी दोघांना केली अटक

विश्वासाने दिलेल्या तीन महागड्या मोटरगाड्या घेऊन पळून गेल्याप्रकरणी दोघांना साकिनाका आणि मेघवाडी पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. समीर जलालउद्दीन कादरी व सुशांत पुजारी डोंगरे अशी या दोघांची नावे आहेत. ६२ वर्षांचे शिवराम दत्तू रामबाडे हे जोगेश्वरी येथे राहतात. ते बेस्टमधून चालक म्हणून निवृत्त झाले होते. २०१५ साली त्यांनी ट्रॅव्हल्स व्यवसायासाठी एक स्विफ्ट कार खरेदी केली होती.

सविस्तर वाचा

16:01 (IST) 1 Dec 2022
पुणे: प्रादेशिक परिवहन कार्यालयातील महिला अधिकाऱ्याला धक्काबुक्की; पसार झालेला आरोपी दोन महिन्यांनी अटकेत

बेकायदा प्रवासी वाहतूक प्रकरणात प्रादेशिक परिवहन कार्यालयातील महिला अधिकाऱ्याला धक्काबुक्की करुन पसार झालेल्या एकाला अटक करण्यात आली. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी गेले दोन महिने पोलिसांना गुंगारा देत होता.

सविस्तर वाचा

16:00 (IST) 1 Dec 2022
पुणे:राज्यकर्ते म्हणजे रेड्यांची अवलाद; सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली

गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांकडून वादग्रस्त विधाने केली जात आहेत. त्यात आता सदाभाऊ खोत यांचीही भर पडली आहे. राज्यकर्ते म्हणजे रेड्यांची अवलाद असतात. राज्यकर्त्यांना बोलायला लावायचे असेल तर आपल्याला ज्ञानेश्वरांसारखे त्या रेड्याच्या पाठीवर हात ठेवावा लागेल, असे विधान खोत यांनी गुरुवारी केले. 

सविस्तर वाचा

15:19 (IST) 1 Dec 2022
वाघाने केली चक्क वनखात्याची तिजोरी रिकामी…

तुम्ही आमच्या घरात आलात ना, मग आम्ही जायचे कुठे? आता आम्हीही तुमच्या घरात येणार. जंगलातल्या वाघाची अधिवासासाठी चाललेली ही लढाई आणि त्यातून मग माणसासोबत झालेल्या संघर्षाचा उडालेला भडका आजतागायत शांत झालेला नाही. याउलट तो वाढतच गेला. यात कधी वाघांचा बळी गेला, तर माणसांना मारले म्हणून त्याला कायमचे गजाआड व्हावे लागले.

सविस्तर वाचा

15:11 (IST) 1 Dec 2022
राणा दाम्पत्याच्या नावे वॉरंट

मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा करून राणा दाम्पत्याने कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी  गुन्हा दाखल केला होता. त्याप्रकरणी राणा दाम्पत्य सध्या जामिनावर बाहेर आहेत. मात्र जामीन मंजूर करताना न्यायालयाने त्यांना महत्त्वाच्या सुनावणीच्या वेळी उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते.

सविस्तर वाचा

14:49 (IST) 1 Dec 2022
मुंबईतील मालाडध्ये सर्वाधिक १८ तलाव

मुंबईतील सर्वाधिक लोकसंख्या असलेला परिसर अशी मालाडची ख्याती असून मालाड परिसराला आणखी एका गोष्टीमुळे विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मालाड परिसरात एक, दोन नाही तर तब्बल १८ तलाव असून या तलावांच्या सुशोभिकरणासाठी आता मुंबई महानगरपालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. राज्य सरकारने हे तलाव महानगरपालिकेकडे हस्तांतरित करावे अशी मागणी करणारे पत्र भाजपच्या माजी नगरसेवकाने उपनगर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना पाठविले आहे.

सविस्तर वाचा

14:41 (IST) 1 Dec 2022
पुणे: आंतरतारकीय हवामानाचा शास्त्रज्ञांकडून वेध

अवकाशातील इलेक्ट्रॉन घनतेचा अभ्यास केल्यावर आंतरतारकीय हवामानाचा वेध घेता येतो. त्यासाठीचा विदा भारतीय पल्सार टायमिंग ॲरेतर्फे द ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ ऑस्ट्रेलियाच्या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध करण्यात आला .

सविस्तर वाचा

14:26 (IST) 1 Dec 2022
उदयनराजेंच्या भूमिकेने सर्वपक्षीय बुचकळ्यात !

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात उतरलेले खासदार उदयनराजे भोसले यांनी या लढाईत अन्य सर्वच पक्षांनी सोयीस्कर मौन बाळगल्याचा आरोप करत हा लढा स्वकेंद्री केला आहे.

सविस्तर वाचा

14:25 (IST) 1 Dec 2022
वादग्रस्त ‘उद्योगी’ सुरेश धस !

महसूल राज्यमंत्री म्हणून काम करताना भाजपचे नेते सुरेश धस यांनी आष्टी तालुक्यातील अनेक देवस्थानाच्या जमिनीची विक्री केली. जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात पत्नी व इतर नातेवाईकही यांनाही सहभागी करून घेतले. त्यासाठी देवस्थानांच्या विश्वस्त नोंदणी बदलासाठी त्यांनी दबाव आणले, असा व्यक्तिश: आरोप असणाऱ्या याचिकेत गुन्हा दाखल करण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला.

सविस्तर वाचा

14:24 (IST) 1 Dec 2022
बंटी शेळके- आंदोलनातून जडणघडण

लोकहितासाठी संघर्ष करण्याचा वडिलांकडून मिळालेला वारसा पुढे नेत व पुढे राजकारणात प्रवेश करून युवक काँग्रेसचा एक सामान्य कार्यकर्ता ते संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस अशी वाटचाल करणारे काँग्रेस नेते बंटी शेळके पक्षाचे नागपुरातील तरुण नेतृत्व म्हणून मागील काही वर्षांत नावारूपास आले आहे.

सविस्तर वाचा

14:22 (IST) 1 Dec 2022
राज्यपाल कोश्यारी यांना विशिष्ट वक्तव्य करण्यापासून न्यायालय रोखू शकते का?

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर महाभियोगाची कारवाई करण्यात यावी यासाठी केलेली याचिका जनहित याचिका कशी ? तसेच राज्यपालांना विशिष्ट वक्तव्य करण्यापासून रोखले जाऊ शकते का ? असा प्रश्न उच्च न्यायालयाने गुरुवारी याचिककर्त्याना केला. कांदिवलीस्थित दीपक जगदेव यांनी ही याचिका केली आहे. मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती अभय अहुजा यांच्या खंडपीठासमोर वकील नितीन सातपुते यांनी ही याचिका गुरुवारी सादर केली.

सविस्तर वाचा

14:21 (IST) 1 Dec 2022
ठाणे: ठाकरे गटाला पाठिंबा देताच मुलावर आणि माझ्यावर गुन्हा दाखल; राजन राजे यांचा भाजप-शिंदे गटावर आरोप

शिवसेनेत फुट पडल्यानंतर मी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिल्याने माझ्या मुलावर आणि माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा गंभीर आरोप कामगार नेते तसेच धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांनी केला. गुरुवारी त्यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी बेकायदा विहीर बांधकाम आणि पाणी चोरीप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोप फेटाळले.

सविस्तर वाचा

13:12 (IST) 1 Dec 2022
नागपूर: फडणवीस, बावनकुळेंच्या जिल्ह्यातील ग्रा.प. निवडणुकीसाठी भाजपची खास रणनीती

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे यांच्या नागपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका गांभीर्याने घेतल्या असून २३६ पैकी १५० ग्रामपंचायती जिंकण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. यासाठी खास रणनीती तयार करण्यात आली आहे. दोन ग्रामपंचायती साठी एक नेता असे नियोजन करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा

13:11 (IST) 1 Dec 2022
आधी गळा आवळला, मग विटांनी ठेचून खून; चिप्सचं आमिष दाखवून राजस्थानात ९ वर्षीय मुलीला संपवलं

राजस्थानच्या श्री गंगानगर जिल्ह्यामधून एक क्रृर घटना समोर आली आहे. नऊ वर्षीय मुलीचा गळा आवळून खून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पीडितेचा जागीच मृत्यू व्हावा, यासाठी तिच्या डोक्यावर विटांनी मारहाण केल्याचंही तपासात पुढे आलं आहे. खुनाआधी पीडितेवर बलात्कार झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

सविस्तर बातमी वाचा…

13:10 (IST) 1 Dec 2022
Gujarat Election: “मोदी गेले म्हणजे…”; रवींद्र जडेजानं शेअर केला बाळासाहेब ठाकरेंचा VIDEO

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आज पहिल्या टप्प्याचं मतदान सुरू आहे. या मतदानाच्या काही तासांपूर्वी क्रिकेटर रवींद्र जडेजानं दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. “गुजराती लोकांनो अजूनही वेळ आहे, समजून घ्या”, असं कॅप्शन जडेजाने या व्हिडीओला दिलं आहे. या जुन्या व्हिडीओत बाळासाहेब ठाकरे नरेंद्र मोदींवर भाष्य करताना दिसत आहेत.

सविस्तर बातमी वाचा…

13:08 (IST) 1 Dec 2022
नागपूर: भाजपच्या माजी आमदाराला मिळालेले पुरस्कार, सन्मान चिन्हे पदपथावर विक्रीला

पदपथावर ठेवलेल्या पुरस्कारामध्ये प्रा. सोलेंना मिळालेल्या पुरस्कार अथवा सन्‍मानामध्ये गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाने पाचव्या वर्धापन दिनानिमित्त दिलेल्या सन्मान चिन्हासह आमदार बंटी भागडीया यांनी आयोजित केलेल्या शहीद स्मृती दिनाच्या कार्यक्रमातील सन्‍मान चिन्ह, लोकमान्य सांस्कृतिक क्रीडा मंडळ रेशीमबागने दिलेले भारत मातेच्या छायाचित्राचे स्मृति चिन्ह, विदर्भ हिंदी साहित्य संघाचा प्रेरणा पुंज सन्मान, सरसंघचालक गोळवळकर गुरुजी यांचे छायाचित्र असलेले स्मृतिचिन्हही रामदास पेठ येथील फुटपाथवर भंगारात पडलेले होते.

सविस्तर वाचा

13:08 (IST) 1 Dec 2022
आर्थिक अडचणीत असताना ब्रिटन सरकारच्या खर्चावरुन वाद, ऋषी सुनक यांच्या बागेतील शिल्पासाठी खर्च केले तब्बल…

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या ‘१० डाऊनिंग स्ट्रीट’ येथील बागेत ठेवण्यात आलेल्या तांब्याच्या शिल्पावरुन नवा वाद निर्माण झाला आहे. एका प्रसिद्ध ब्रिटिश कलाकाराचे हे शिल्प ब्रिटन सरकारने करदात्यांचे १३ कोटी खर्चून विकत घेतले आहे.

सविस्तर बातमी वाचा…

13:07 (IST) 1 Dec 2022
Video: गुजरातमधील ‘मिनी आफ्रिका’ पहिल्यांदा करणार मतदान; पारंपरिक नृत्य करत व्यक्त केला आनंद

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान करण्यात येत आहे. हा दिवस गुजरातमधील जांबूर या गावासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. ‘मिनी आफ्रिका’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गावातील लोक आज पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. त्यांच्यासाठी खास आदिवासी मतदान केंद्रची उभारणी करण्यात आली आहे.

सविस्तर बातमी वाचा…

13:05 (IST) 1 Dec 2022
“आमची बाजू संवैधानिक”, सीमा प्रश्नावरील सुनावणीवर बसवराज बोम्मईंची प्रतिक्रिया, म्हणाले, “महाराष्ट्राचा अर्ज…”

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीपूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. “आमच्या राज्याची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. महाराष्ट्राचा अर्ज ग्राह्य धरला जाऊ शकत नाही, असा युक्तीवाद आमच्या वकिलांनी केला आहे. आमची बाजू संवैधानिक आणि कायदेशीर आहे”, असे बसवराज बोम्मई यांनी म्हटले आहे.

सविस्तर बातमी वाचा…

13:00 (IST) 1 Dec 2022
नागपूर: ‘त्या’ चालकांवर कारवाईबाबत ‘एसटी’ महामंडळ गोंधळलेले!

नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा येथे झालेल्या चाचणी परीक्षेदरम्यान उपस्थित काही उमेदवारांनी नाव न टाकण्याच्या अटीवर सांगितले, की पैसे देऊन पात्र ठरलेल्या उमेदवारांना एसटी बस योग्यरित्या मागे घेता येत नसल्याचे चित्र होते. त्याच्या काही नोंदीही चौकशी समितीकडून घेण्यात आल्या. त्यानंतरही येथील योग्यरित्या वाहन चालवता न येणाऱ्या व पात्र ठरलेल्या उमेदवारांचा शोध घेत त्यांच्यावर कारवाईबाबत महामंडळाकडून कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही.

सविस्तर वाचा

12:59 (IST) 1 Dec 2022
देव तारी त्याला कोण मारी! वाघाने दुचाकीवर झडप घेतली अन्…

अहेरी तालुक्यातील रेपनपली आणि कमलापूर परिसरात काही दिवसांपासून वाघाचा वावर असल्याची चर्चा होती. दरम्यान, बुधवारी रात्रीच्या सुमारास सुधीर रंगुवार आपल्या मित्रासह कमलापूर- मोदुमोडगू मार्गावरून दुचाकीने जात असताना झुडपात दडून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर झडप घेतली. यात दुचाकीच्या मागच्या भागाला वाघाचा पंजा लागला.

सविस्तर वाचा

12:56 (IST) 1 Dec 2022
डहाणू जवळील भीषण अपघातात कल्याण मधील एकाच कुटुंबातील तीन जण ठार

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू जवळ भरधाव वेगात असलेल्या एका कारची मालवाहू ट्रकला जोराची धडक बसल्याने कारमधील चार जणांपैकी तीन जण बुधवारी रात्री जागीच ठार झाले. कार गुजरातकडून मुंबई दिशेने येत होती. अपघात ठार झालेले कल्याण मधील एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. एक तरुण अपघातात थोडक्यात बचावला आहे.

सविस्तर वाचा

12:54 (IST) 1 Dec 2022
…अन् ‘ती’ दोन वर्षांनंतर पालकांना भेटली; टाळेबंदीत पश्चिम बंगालमधून हरवलेल्या मुलीची कथा

करोना काळात पश्चिम बंगालमधून हरवलेली १७ वर्षीय मुलगी अकोल्यातील रेल्वेस्थानकावर आढळली होती. तब्बल दोन वर्षांनंतर त्या मुलीची पालकांसोबत भेट घडून आली. बाल कल्याण समिती व जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या प्रयत्नाने पालकांचा शोध घेऊन मुलीला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.

सविस्तर वाचा

12:52 (IST) 1 Dec 2022
“तुम्ही छत्रपतींनाच बेईमान ठरवलंत”, संजय राऊतांची भाजपावर आगपाखड; म्हणाले, “कौन बनेगा करोडपतीसारखं…!”

“उदयनराजेंच्या भावना योग्य ठिकाणी पोहोचल्या” म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सूचक विधान केलं आहे. त्यामुळे राज्यपालांना महाराष्ट्रातून परत बोलावलं जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या एका विधानावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर टीकास्र सोडलं आहे. वाचा सविस्तर बातमी…

12:51 (IST) 1 Dec 2022
CM शिंदेंची शिवरायांशी तुलना करणाऱ्या मंगलप्रभात लोढांविरुद्ध संभाजी ब्रिगेड आक्रमक; म्हणाले, “मूग गिळून…”

भाजपाचे आमदार तथा मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्यातील सुटकेशी केली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवरायांबद्दल केलेले वादग्रस्त टिप्पणी प्रकरण अद्याप ताजे असताना लोढा यांनी केलेल्या या तुलनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे. संभाजी ब्रिगेडनेदेखील भाजपा तसेच लोढा यांचा निषेध व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे यापुढे शिवरायांचा अवमान केला तर गुद्द्यांशिवाय पर्याय नाही, असा थेट इशाराच संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी दिला आहे. वाचा सविस्तर बातमी…

संभाजी ब्रिगेडनेदेखील भाजपा तसेच लोढा यांचा निषेध व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे यापुढे शिवरायांचा अवमान केला तर गुद्द्यांशिवाय पर्याय नाही, असा थेट इशाराच संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी दिला आहे.