Sanjay Raut Arrest Maharashtra News : टीकेनंतर एकनाथ शिंदे उद्यानाच्या नावात बदल, सर्व घडामोंडीची माहिती एका क्लिकवर…: सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांची १५ तास चौकशी केल्यानंतर त्यांना अटक केली आहे. राऊत यांना न्यायालयात हजर केलं असता, त्यांना ४ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. राऊतांना अटक केल्याप्रकरणी राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. महाराष्ट्र आणि मराठी माणसांबाबत केलेल्या अवमानकारक वक्तव्याबाबत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माफी मागितली आहे. त्यांनी सोमवारी प्रसिद्धपत्रक जारी करत माफीनामाच सादर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील हडपसर भागात महापालिकेच्या जागेवर उभारण्यात आलेल्या ‘एकनाथ शिंदे उद्याना’चे उद्घाटन करणार आहेत. स्वत:च्या नावाचं उद्यान आणि स्वत:च उद्घाटक असल्याने पुण्यातील ‘एकनाथ शिंदे उद्यान’ वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. राज्यातील आणि देशातील अशाच प्रमुख राजकीय घडामोडी आणि विविध अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर…

Live Updates

Maharashtra News Today 02 August 2022 : महाराष्ट्रातील सर्व प्रमुख अपडेट एका क्लिकवर…

10:01 (IST) 2 Aug 2022
संजय राऊतांच्या घरी सापडलेल्या नोटांवर तुमचं नाव, प्रश्न ऐकताच एकनाथ शिंदे म्हणाले, “माझी चौकशी…”

पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शिवसेना खासदार संजय राऊत यांना रविवारी रात्री उशिरा अटक केली. संजय राऊत यांना सोमवारी विशेष ‘ईडी’ न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता त्यांना ४ ऑगस्टपर्यंत ‘ईडी’ कोठडी सुनावण्यात आली. तपासादरम्यान संजय राऊत यांच्या घऱी साडे अकरा लाखांची रक्कम सापडली होती. ज्यामधील १० लाखांच्या नोटांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख आहे. यावर एकनाथ शिंदे यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

सविस्तर बातमी

09:57 (IST) 2 Aug 2022
‘मंदीची शक्यताच नाही’ म्हणणाऱ्या निर्मला सीतारामन यांना घरचा आहेर

भारतामध्ये मंदीची स्थिती निर्माण होणार नाही़. महागाईमुळे आर्थिक विकासाची गतीही कमी होणार नाही. उलट महागाई नियंत्रणात ठेवली जाईल, असा दावा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी लोकसभेत महागाईवरील चर्चेला उत्तर देताना केला आहे. चर्चेदरम्यान, संतप्त झालेल्या काँग्रेसच्या सदस्यांनी लोकसभेत सभात्याग केला. एकीकडे विरोधक निर्मला सीतारामन यांच्यावर टीका करत असताना भाजपाचे खासदार सुब्रहमण्यम स्वामी यांनीही घऱचा आहेर दिला आहे.

सविस्तर बातमी

09:38 (IST) 2 Aug 2022
शेकापसमोर अस्तित्वाचे आव्हान ; अमृत महोत्सवात नव्या समीकरणांची चाचपणी

अलिबाग : शेतकरी कामगार पक्ष आज ७५ वर्षे पूर्ण करीत आहे. या वाटचालीत पक्षाने अनेक चढ-उतार पाहिले आहेत. एकेकाळी राज्याचे विरोधी पक्षनेतेपद भूषवणारा हा पक्ष अलीकडच्या काळात रसातळाला गेला आहे. पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या रायगड जिल्ह्यात शेकापचा एकही आमदार गेल्या निवडणुकीत निवडून आलेला नाही. त्यामुळे आगामी काळात पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी पक्षाला व्यापक प्रयत्न करावे लागणार आहेत. त्याचबरोबर नव्या राजकीय समीकरणांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. सविस्तर बातमी

09:37 (IST) 2 Aug 2022
मालेगाव जिल्हा निर्मितीविषयी पुन्हा केवळ सकारात्मकतेचा सूर ; एकनाथ शिंदेही मळलेल्या वाटेनेच पुढे

गेल्या चार दशकात मालेगाव जिल्हा निर्मितीचे गाजर दाखविण्याचे काम सर्वच प्रमुख पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी केले असून त्यात आता महिन्याभरापूर्वी मुख्यमंत्रीपदावर स्थानापन्न झालेले एकनाथ शिंदे यांची भर पडली आहे. शनिवारी त्यांनी केलेल्या मालेगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा जिल्हा निर्मितीची जोरदार हवा निर्माण केली गेली. शिंदे हे जणू काही औपचारिक घोषणा करण्यासाठीच मालेगावला येत असल्याचे एकंदरीत चित्र उभे केले गेले. प्रत्यक्षात जिल्ह्याच्या मागणीबद्दल राज्य शासन सकारात्मक असल्याचे सांगत लवकरच मागणी पूर्णत्वास जाईल, अशी मोघम स्वरूपातील ग्वाही देण्यावरच मुख्यमंत्र्यांचा भर राहिला. सविस्तर बातमी

09:36 (IST) 2 Aug 2022
ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस ; दक्षिण कोकण, पूर्व विदर्भात मात्र पाऊस कमी; देशात १०६ टक्के पावसाचा अंदाज

मोसमी पावसाच्या ऑगस्ट-सप्टेंबर या दोन महिन्यांच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यात देशात सरासरीच्या तुलनेत १०६ टक्क्यांपर्यंत पाऊस होईल, असा अंदाज सोमवारी भारतीय हवामान शास्त्र विभागाने जाहीर केला. प्रामुख्याने दक्षिण कोकण आणि पूर्व विदर्भातील काही भाग वगळता राज्यात सर्वत्र या दोन महिन्यांत सरासरीच्या तुलनेत अधिक पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. दक्षिण भारत आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सविस्तर बातमी

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा अवमान केल्याप्रकरणी सोमवारी प्रसिद्धीपत्रक जारी करत माफी मागितली आहे.