Maharashtra Politics LIVE Updates : सोमवारी दुपारी तानाजी सावंत यांच्या मुलाच्या अपहरणाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळाली. मात्र, नंतर हे अपहरण नसून त्यांचे पुत्र ऋषीकेश सावंत यांचा शोध लागल्याचं समोर आलं. पण आता या सर्व घडामोडींवर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात सुरू केलेल्या काही योजना बंद करण्याचा किंवा त्यांचा निधी कमी करण्याचा प्रयत्न विद्यमान सरकारकडून चालू असल्याची चर्चा सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Live Updates

Marathi News Live Update Today: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

16:34 (IST) 11 Feb 2025

पुणे: ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर तरुणाची लूट

पुणे: शहरात लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ससून रुग्णालय परिसर, तसेच वारजे भागात पादचाऱ्यांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांना लुटण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी बंडगार्डन आणि वारजे पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सविस्तर वाचा

16:23 (IST) 11 Feb 2025

बारावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी घडला हा प्रकार, इंग्रजीच्या पेपरला उपराजधानितील विद्यार्थी…

नागपूर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आयोजित बारावीच्या परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात झाली. उपराजधानीत सुरू असलेल्या विविध विकासकामांचा फटका विद्यार्थ्यांना बसला व अनेकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागला.

सविस्तर वाचा…

15:31 (IST) 11 Feb 2025

खुद्द शिक्षण राज्यमंत्रीच परीक्षा केंद्रावर

बुलढाणा : सहा महत्वाच्या खात्याचे राज्यमंत्री असलेले पंकज भोयर यांनी शेगांव येथील ज्ञानेश्वर मस्कुजी बुरुंगले कला व विज्ञान कनिष् महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्राला अचानक भेट देऊन परीक्षा प्रक्रियेची पाहणी केली.आजपासून इयत्ता बारावीची परीक्षा सुरु झाली असून राज्यभरात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे.

सविस्तर वाचा…

15:18 (IST) 11 Feb 2025

रिक्षा, टॅक्सीच्या मीटर रिकॅलिब्रेशनचा प्रश्न सुटेना

मुंबई : मुंबईत टॅक्सी आणि रिक्षांचे सुधारित भाडे लागू होऊन ११ दिवस उलटले तरीही मीटरचे रिकॅलिब्रेशन अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे चालक आणि प्रवाशांमध्ये टॅक्सी, रिक्षाच्या भाड्यावरून वाद होऊ लागले आहेत.

सविस्तर वाचा…

15:15 (IST) 11 Feb 2025

Ranveer Allahabadia Issue in Loksabha: लोकसभेत रणवीर अलाहाबादियाबाबत शिवसेना खासदाराचा प्रश्न

मी आज संसदेत सोशल मीडिया, पॉडकास्ट आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर चुकीच्या पद्धतीने भारतीय संस्कृतीवर घाला घालण्याचे प्रयत्न चालू आहेत, त्याला आवर घालण्यासाठी कायदा झाला पाहिजे यावर मी बोलत आहे. काल रणवीर अलाहाबादियासारख्या इन्फ्लुएन्सरनं आई-वडिलांच्या संदर्भात अनेक चुकीची विधानं केली. आपल्या संस्कृतीवर घाला घालण्याचं काम ही मंडळी करत आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मवर लोकशाहीच्या नावावर चुकीच्या पद्धतीने विषय दाखवायचे. देव-देवतांच्या बाबतीत चुकीच्या पद्धतीने बोलायचं. याला कारण ओटीटी प्लॅटफॉर्मवर कोणताही सेन्सॉर नाहीये. त्यांना दिशा नाहीये. त्यांच्या कंटेंटवर कुणाचीही देखरेख नाहीये. याकडे केंद्र सरकारने लक्ष द्यायला हवं. सेन्सॉर लावायला हवं. ओटीटी प्लॅटफॉर्म, पॉडकास्टर्स यांच्यासाठी कठोर कायदा बनवायला हवा. त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला हवा – नरेश म्हस्के, खासदार, शिवसेना शिंदे गट

14:59 (IST) 11 Feb 2025

फडके हौद चौकात झाड कोसळून तीन दुचाकींचे नुकसान; सुदैवाने कोणी जखमी नाही

पुणे : रविवार पेठेतील फडके हौद चौकात मंगळवारी दुपारी झाड कोसळली. झाडाच्या फांद्या तीन दुचाकींवर पडल्या. फांदी पडल्याने तीन दुचाकींचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. फडके हौद गजबलेला परिसर आहे. या भागात रस्त्याच्या कडेला असलेले जुने झाड सकाळी साडेअकराच्या सुमारास काेसळले.

पदपथाजवळ लावलेल्या दुचाकींवर झाडाच्या फांद्या पडल्याने तीन दुचाकींचे नुकसाना झाले. सुदैवाने या घटनेत काेणी जखमी झाले नाही. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या कसबा पेठ अग्निशमन केंद्रातील जवांनानी रस्ता वाहतुकीस खुला करुन दिला. झाडाच्या फांद्या पडल्यानंतर काही काळ फडके हौद परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती.

14:59 (IST) 11 Feb 2025

कल्याणमधील वडवली-अटाळी वळण रस्ते मार्गातील ११८ बांधकामे जमीनदोस्त; टिटवाळा-कल्याणचा प्रवास सुखकर होणार

कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेच्या महत्वाकांक्षी वळण रस्ते मार्गातील गांधारी-वडवली आणि अटाळी मार्गातील ११८ चाळींची बांधकामे पालिकेच्या अ प्रभागाच्या तोडकाम पथकाने भुईसपाट केली. वळण रस्ते मार्गातील महत्वाचा अडथळा दूर झाल्याने मुंंबई महानगर प्रदेश विकास प्राधीकरणाला गांधारी-वडवली-अटाळी हा रखडलेला वळण रस्ता जोडणे शक्य होणार आहे.

सविस्तर वाचा

14:58 (IST) 11 Feb 2025

टाकाऊ वस्तूंपासून कलाकृती उभारत सार्वजनिक जागा केली ‘कचरामुक्त’

पिंपरी :  मोकळ्या जागेवर टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अनोखा उपाय केला आहे. या कर्मचाऱ्यांनी चिंचवड परिसरातील कावळे वखार मोहननगर येथील सार्वजनिक जागेवर खराब झालेले झाडू, बांबूच्या काठ्या तसेच इतर टाकाऊ वस्तूंचा अतिशय कल्पकतेने वापर करून सुंदर कलाकृती उभारली आहे.

सविस्तर वाचा

14:57 (IST) 11 Feb 2025

कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील उड्डाण पुलावर तुळया ठेवण्याची कामे गतिमान

कल्याण – कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ पालिकेतर्फे स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत वलीपीर रस्ता ते मुरबाड रस्ता दरम्यान उड्डाण पूल उभारणीचे काम सुरू आहे. या पुलावर मागील काही दिवसांपासून रात्रीच्या वेळेत तुळया ठेवण्याची कामे सुरू करण्यात आली आहेत.

सविस्तर वाचा

14:57 (IST) 11 Feb 2025

नागपूरकरांवर दुहेरी करभार

नागपूर : नागपूरमध्ये महापालिका आणि नागपूर सुधार प्रन्यास अशा दोन विकास यंत्रणा असल्याने ६२ हजारांवर नासुप्रच्या भूखंडधारकांना दुहेरी कराचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. महापालिका प्रत्येक घरावर मालमत्ता कर आकारणी करते तर नागपूर सुधार प्रन्यास त्यांच्या भूखंडावरील घरे व दुकानांवर भूभाटक (ग्राऊंड रेन्ट) आकारते.

सविस्तर वाचा…

14:38 (IST) 11 Feb 2025

Loksatta impact : राज्यातील ४९६ हवालदारांना पीएसआयपदी बढती, ४२ एपीआय झाले पीआय

नागपूर : राज्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या शेकडो जागा रिक्त असल्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचा ताण पोलीस अधिकाऱ्यांवर वाढला होता. त्यामुळे पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्यातील ४९६ पोलीस हवालदारांना पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती दिली. तसेच राज्यातील ४२ सहायक पोलीस निरीक्षकांनाही पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली.

सविस्तर वाचा…

14:37 (IST) 11 Feb 2025

VIDEO: धगधगत्या निखाऱ्यावरून अनवाणी चालण्याचे अग्निदिव्य, प्राचीन परंपरा नेमकी काय?

अकोला : तप्त, जळत असलेल्या निखाऱ्याला स्पर्श होण्याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. मात्र, मनातील अतूट श्रद्धेपोटी धगधगत्या जळत्या निखाऱ्यावर अनवाणी पावलांनी चालण्याचे अग्निदिव्य भक्तांकडून पार केले जाते. धगधगते गरम निखारे आणि त्यावर चालणारे भाविक हे दृश्य पाहून अंगावर  अक्षरश: काटे येतात.

सविस्तर वाचा

14:20 (IST) 11 Feb 2025

तुमच्या जिल्ह्यातील विकासकामे ठप्प पडणार! कारण काय? जाणून घ्या…

यवतमाळ : राज्यातील कंत्राटदारांची सुमारे २६ हजार कोटी रुपयांची देयके शासनाकडे प्रलंबित आहेत. प्रलंबित निधी मिळण्यासाठी राज्यभरातील कंत्राटदारांनी संघटित होत आंदोलन पुकारले आहे. सोमवारी यवतमाळात झालेल्या बैठकीत, राज्यातील कंत्राटदारांनी प्रलंबित देयके न मिळाल्यास येत्या १ मार्चपासून राज्यात सुरू असलेली सर्वच कामे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

सविस्तर वाचा…

13:51 (IST) 11 Feb 2025

सियामंग गिबन्सची मायदेशी रवाना

मुंबई : मागील आठवड्यात सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर एका प्रवाशाकडून पाच सियामंग गिबन्स जप्त केले होते. यापैकी दोन सियामंग गिबन्सना इंडोनेशियात परत पाठवण्यात आले आहे.

सविस्तर वाचा…

12:59 (IST) 11 Feb 2025

आता बिनधास्त करा प्रेमविवाह! ,सरकार देणार ‘सेफ हाऊस’

जाती-धर्माची बंधने झुगारून प्रेमविवाह करणाऱ्या प्रेमीयुगुलांच्या सुरक्षेसाठी ‘सेफ हाऊस’ तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ‘ऑनर किलिंग’च्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला असून असे ‘सेफ हाऊस’ तयार करण्याचे आदेश गृहमंत्रालयाकडून सर्वच पोलीस आयुक्तालये आणि जिल्हा अधीक्षक कार्यालयांना देण्यात आले आहेत. सविस्तर वाचा…

12:49 (IST) 11 Feb 2025

वादग्रस्त वक्तव्य प्रकरण : यूट्यूबर रणवीर अलाहबादिया व समय रैनाला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले

मुंबई : युट्यूबर रणवीर अलाहबादियाच्या वादग्रस्त टिप्पणीबद्दल मुंबई पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली होती. याप्रकरणी रणवीर व समय रैना दोघांशी मुंबई पोलिसांनी संपर्क साधला असून त्यांना याप्रकरणी चौकशीला उपस्थित राहण्यासाठी सांगितले आहे. याप्रकरणी रणवीरसह अपूर्व मखीजा, समय रैना आणि ‘इंडियाज गॉट लेटेंट’च्या आयोजकांविरुद्ध मुंबई पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती.

सविस्तर वाचा…

12:35 (IST) 11 Feb 2025

संजय दीना पाटील यांची खासदारकी अबाधित, आव्हान याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

मुंबई : लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबई मतदारसंघातून विजयी झालेले शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय दीना पाटील यांच्या खासदारकीला उच्च न्यायालयात आव्हान देणारी निव़डणूक याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. याचिकेच्या गुणवत्तेत न जाता याचिका सुनावणीयोग्य कशी या मुद्यावर याचिकाकर्ते आणि या मतदारसंघातून पराभूत झालेले उमेदवार शहाजी थोरात यांना युक्तिवाद करण्यास सांगण्यात आले होते.

सविस्तर वाचा…

12:21 (IST) 11 Feb 2025

करंजा जेट्टीचा मार्ग मोकळा, नौदलाला कांदळवने कापण्यास उच्च न्यायालयाची परवानगी

मुंबई : छोट्या युद्धनौका आणि प्रवासी बोटींच्या वाहतुकीसाठी उरण येथील करंजा येथे जेट्टी बांधण्यासाठी कांदळवने कापण्यास उच्च न्यायालयाने नौदलाला नुकतीच परवानगी दिली. त्यामुळे, या जेट्टीच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. हा प्रकल्प सार्वजनिक हिताचा आहे आणि किनारा क्षेत्र नियंत्रण नियमावलीअंतर्गत अशा प्रकल्पांना अपवाद म्हणून मंजुरी देण्यात आल्याचे निरीक्षण मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने नोंदवले.

सविस्तर वाचा…

12:14 (IST) 11 Feb 2025

गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यात गैर काय?; कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठीची अट बेकायदा नसल्याचा उच्च न्यायालयाचा निर्वाळा

कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यास त्यांनी त्याबाबतची माहिती जाहीर करावी, अशी अट घालणाऱ्या भारतीय वकील परिषदेने (बीसीआय) काढलेल्या परित्रकात बेकायदेशीर असे काही नसल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने सोमवारी दिला.

सविस्तर वाचा…

12:09 (IST) 11 Feb 2025

धक्कादायक! कार शिकत असताना विहिरीत पडली ,दोन सख्ख्या भावांसह तिघांचा मृत्यू

नागपूर : नवीन घेतलेली कार शिकण्यासाठी दोन सख्खे भाऊ आणि त्यांचा एक मित्र कार घेऊन बुटीबोरीतील बालभारती मैदानावर गेले. कार शिकत असताना अचानक वेग वाढवल्यामुळे कार जमिनीलगत असलेल्या विहिरीत पडली. यामध्ये तिघांचाही बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सोमवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

सविस्तर वाचा…

12:03 (IST) 11 Feb 2025

कुंडलच्या कुस्ती मैदानात गौरव मच्छवाडाची बाजी

कुंडल (ता. पलूस) येथील महाराष्ट्र कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या लढतीत पंजाबच्या गौरव मच्छवाडा याने महाराष्ट्र केसरी हर्षल सदगिर याला हफ्ता डावावर चितपट करत विजय मिळवला. सविस्तर वाचा…

12:02 (IST) 11 Feb 2025

प्रसिद्ध साहित्यिक रा. रं. बोराडे यांचे निधन

ज्येष्ठ साहित्यिक, ग्रामीण कथाकार प्राचार्य रा. रं. बोराडे यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी (११ फेब्रुवारी) सकाळी निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांना मागील आठवड्यातच राज्य शासनाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.

सविस्तर वाचा…

12:01 (IST) 11 Feb 2025

अभ्यासाच्या ताणातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

अभ्यासाच्या ताणामुळे एका विद्यार्थ्याने दुचाकी घेऊन पनवेल शीव महामार्गावर विरुद्ध दिशेने दुचाकी चालवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी रात्री सव्वासात वाजता रोडपाली येथील पुरुषार्थ उड्डाणपुलावर घडली. सविस्तर वाचा…

12:00 (IST) 11 Feb 2025

पुणे-नाशिक जुना द्रुतगती मार्ग हेतुपुरस्सर बदलण्याचा घाट; सर्वपक्षीय लढा उभारण्याची या आमदराची मागणी ?

अहिल्यानगरमार्गे पुणे-नाशिक रेल्वे हा पुणे-नाशिक द्रुतगती रेल्वेसाठी पर्यायच असू शकत नाही. या नवीन मार्गामुळे सुमारे ८० किलोमीटर अंतर वाढणार असल्याने प्रवासाचा कालावधी दीड तासांनी वाढेल. सविस्तर वाचा…

12:00 (IST) 11 Feb 2025

पिंपरी: पालिकेच्या उत्पन्नात घट; अर्थसंकल्पात मात्र फुगवटा; कशी आहे आर्थिक स्थिती?

एकेकाळी आशिया खंडातील श्रीमंत महापालिका असा लौकिक असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प दर वर्षी ‘फुगत’ असला, तरी उत्पन्नवाढीचा वेग मात्र कमी असल्याचे पाच वर्षांतील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. सविस्तर वाचा…

11:59 (IST) 11 Feb 2025

‘महाकुंभ’मुळे पुणे रेल्वे ‘मालामाल’; महिनाभरात इतक्या कोटींची केली कमाई

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरु असणाऱ्या ‘महाकुंभ’निमित्त सोडण्यात आलेल्या रेल्वेच्या फेऱ्यातून पुणे रेल्वे विभागाला १० कोटींपेक्षा अधिक उत्पंन्न मिळाले असल्याची माहिती मध्ये रेल्वे पुणे विभागाचे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा यांनी सोमवारी दिली, तर एक लाखापेक्षा जास्त प्रवाशांनी प्रवासाचा लाभ घेतला असल्याचे यावेळी नमूद केले. सविस्तर वाचा…

11:58 (IST) 11 Feb 2025

भारती विद्यापीठ परिसरात अनोळखी व्यक्तीचा खून

भारती विद्यापीठ परिसरात एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत एकाच्या डाेक्यात तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून करण्यात आल्याची घटना घडली. खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटू शकली नाही. खून झालेल्या व्यक्तीचे वय अंदाजे ४५ वर्ष आहे. सविस्तर वाचा…

11:57 (IST) 11 Feb 2025

“एकनाथ शिंदे देव माणूस”, पिंपरीत झळकले फ्लेक्स; त्यांच्या योजना बंद करू नका अशी विनंती करण्यात आली

पिंपरी- चिंचवड: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आपत्ती व्यवस्थापन समितीतून वगळल्यानंतर शिंदेंच्या पक्षातून नाराजी व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या लोकप्रिय ठरलेल्या योजना देखील बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सविस्तर वाचा…

11:57 (IST) 11 Feb 2025

सैफ अली खान हल्ल्यानंतर आता वांद्रे परिसरात वृद्ध महिलेची हत्या

वांद्रे येथील उच्चभ्रू वस्तीतील घरात शिरून अभिनेता सैफ अली खानवर चोराने हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच आता याच परिसरात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. सविस्तर वाचा…

11:56 (IST) 11 Feb 2025

पावसाळ्यापूर्वी तीन पूल वाहतुकीस खुले; अंधेरीतील गोखले पुलासह विक्रोळी, कर्नाक पूलही पूर्णत्वाच्या मार्गावर

अंधेरीतील गोपाळकृष्ण गोखले पूल, विक्रोळी पूल, कर्नाक पूल या रेल्वे रूळांवरील उड्डाणपुलांचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून ते वाहतुकीस खुले करण्याचे उद्दीष्ट मुंबई महानगरपालिकेने ठेवले आहे. सविस्तर वाचा…

फडणवीस म्हणाले, "उद्धव ठाकरे हे काही आमचे शत्रू नाहीत". (PC : Devendra Fadnavis X)

Marathi News Live Update Today: महाराष्ट्रातील सर्व राजकीय घडामोडींचा आढावा