Maharashtra Politics LIVE Updates : सोमवारी दुपारी तानाजी सावंत यांच्या मुलाच्या अपहरणाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळाली. मात्र, नंतर हे अपहरण नसून त्यांचे पुत्र ऋषीकेश सावंत यांचा शोध लागल्याचं समोर आलं. पण आता या सर्व घडामोडींवर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात सुरू केलेल्या काही योजना बंद करण्याचा किंवा त्यांचा निधी कमी करण्याचा प्रयत्न विद्यमान सरकारकडून चालू असल्याची चर्चा सुरू आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Marathi News Live Update Today: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर
पावसाळ्यापूर्वी तीन पूल वाहतुकीस खुले; अंधेरीतील गोखले पुलासह विक्रोळी, कर्नाक पूलही पूर्णत्वाच्या मार्गावर
अंधेरीतील गोपाळकृष्ण गोखले पूल, विक्रोळी पूल, कर्नाक पूल या रेल्वे रूळांवरील उड्डाणपुलांचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून ते वाहतुकीस खुले करण्याचे उद्दीष्ट मुंबई महानगरपालिकेने ठेवले आहे. सविस्तर वाचा…
‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिकांवरील प्रवासी संख्या १५ कोटी पार; दैनंदिन प्रवासी संख्या २ लाख ६० हजारावर
‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ मार्गिकांवरील एकूण प्रवासी संख्या १५ कोटी पार गेली आहे. सद्यस्थितीत या दोन्ही मेट्रो मार्गिकांवरून प्रतिदिन दोन लाख ६० हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. सविस्तर वाचा…
शिरुर तालुक्यातून इयत्ता १२ वीच्या परीक्षेस ५३२२ विद्यार्थी,
विद्यार्थ्यांच्या आयुष्यात महत्वाची मानली जाणा- या इयत्ता बारावीच्या परीक्षेस आज पासुन सुरुवात झाली शिरुर तालुक्यातील ७ केंद्रावरुन ५३२२ विद्यार्थी यंदा बारावीची परीक्षा देत आहे . शिरुर शहरा तील दोन केंद्रासह न्हावरा , मांडवगण फराटा , तळेगाव, ,व पिंपळे जगताप , जातेगाव या केंद्रावर आज पासुन परीक्षेला सुरुवात झाली आज परीक्षेच्या पहिल्या दिवस असल्याने अनेक पालक आपल्या पाल्याना परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी आले होते .
अखेर संक्रमण शिबिरार्थींच्या बायोमेट्रीक सर्वेक्षणास सुरुवात, पहिल्या दिवशी १९५ संक्रमण शिबिरार्थींंचे सर्वेक्षण पूर्ण
मुंबई : म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारितीली मुंबईमधील संक्रमण शिबिरातील संक्रमण शिबिरार्थींच्या २०२१ पासून रखडलेल्या बायोमेट्रीक सर्वेक्षणाला अखेर सोमवारपासून सुरुवात झाली. चेंबूरमधील सहकार नगर संक्रमण शिबिरापासून या बायोमेट्रीक सर्वेक्षणास सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी १९५ संक्रमण शिबिरार्थींचे बायोमेट्रीक सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले.
डोंबिवलीत सावरकर रस्ता, नेहरू रस्त्यावर गळक्या जलवाहिनींचे ओहोळ
डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील सर्वाधिक वर्दळीच्या सावरकर रस्ता आणि नेहरू रस्त्यावर ठाकुर्ली उड्डाण पुलाजवळ भूमिगत जलवाहिन्यांना गळती लागली आहे. काही ठिकाणी भूमिगत सांडपाणी वाहून नेणाऱ्या चेंबरमधून पाणी सीमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर वाहून येत आहे. दररोज चोवीस तास हे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने पादचारी, प्रवाशांची गैरसोय होत आहे. सावरकर रस्ता हा पूर्व भागातील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे.
Rohit Pawar on Ranveer Allahbadia: “कॉमेडीमध्ये अलिकडे डार्क ह्युमरच्या नावाखाली…”
कॉमेडीमध्ये अलीकडे डार्क ह्युमरच्या नावाखाली अभद्र व विक्षिप्त गोष्टी बोलण्याचा ट्रेंड येत आहे. दुर्दैवाने तरुणांचाही त्याला मोठा प्रतिसाद मिळत असल्याने विक्षिप्त लोकांची हिंमत अजूनच वाढत आहे. परिणामी इलाहाबादीसारखी लोक अतिशय खालच्या पातळीला जाऊन बोलत आहेत, अशा प्रवृत्तीला वेळीच आवर घालण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी इलाहाबादिवर कारवाई करणार असल्याचे सांगितले असले तरी इलाहाबादीचे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी असलेल्या ओळखी तसेच लोकसभा निवडणुकीवेळेस भाजपला केलेले सहकार्य बघता त्याच्यावर कारवाई होईल की नाही? याबाबत साशंकता आहे. असं असलं तरी मुख्यमंत्री त्याच्यावर कारवाई करून ही साशंकता दूर करतील, ही अपेक्षा! – रोहित पवार
अमिताभ बच्चनची कंपनी वर्ध्यात उद्योग सूरू करणार ? अश्या झाल्या घडामोडी.
वर्धा : एखाद्या समूहास प्रसिद्ध व्यक्तीचे नाव जुळले की पुढे तीच त्या समूहाची कायमची ओळख बनते. मग त्या व्यक्तीचा संबंधित समूहाशी संबंध असो की नसो. आता ईथे तसेच आहे. फार्मास्यूटिकल म्हणजे औषधी निर्माण क्षेत्रातील दिग्गज कंपनी म्हणून आयपीसीए या कंपनीची ओळख आहे. या इंडियन फार्मास्यु्टिकल कंबाईन असोसिएशन लिमिटेड कंपनीची मालकी विख्यात अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याकडे होती.
“त्या” महिलांची ‘जिवाची मुंबई- श्रमाची आनंदवारी’
नागपूर : घरात अठराविश्वे दारिद्र्य… घरातील पुरुषांना व्यसन… परिस्थितीशी संघर्ष करत आणि आयुष्यभर काबाडकष्ट करून जीवनात समाधान शोधणाऱ्या घरगुती महिला कामगार आयुष्यात पहिल्यांदा विमानाच्या पायऱ्या चढणार आहेत. आयुष्यात कधी त्यांनी रेल्वेने देखील प्रवास केला नाही, पण ‘जिवाची मुंबई- श्रमाची आनंदवारी’ करण्यासाठी त्या विमानाने रवाना झाल्या आहेत. रसिकाश्रय ही यवतमाळ येथील सामाजिक कार्यात अग्रेसर संस्थेकडून हा उपक्रम राबवला जात आहे.
मासुंदा तलावाला दुरवस्थेचा विळखा, नागरिकांना अस्वच्छतेचा त्रास
ठाणे : तलावांचे शहर म्हणुन प्रसिद्ध असणाऱ्या ठाणे शहरातील मुख्य तलाव परिसरातच घाणीचे साम्राज्य असल्याचे पहायला मिळत आहे. मासुंदा तलाव परिसरात सध्या उंदरांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढल्याने तलावाजवळ असलेल्या पाणपोईची दुरवस्था झाली आहे. तसेच नागरिकांसाठी बसण्यासाठी ठेवलेले सिमेंटचे बाकडे तुटलेल्या अवस्थेत असून त्यांची देखभाल केली जात नसल्याचे चित्र आहे.
धान खरेदीत शेतकऱ्यांकडून बोगस कागदपत्रे सादर ? रक्कम अदा न करण्याचे व्यवस्थापकीय संचालकांचे आदेश, ठाणे, पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दणका
ठाणे : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळमार्फत आधारभूत किंमत योजनेंतर्गत आदिवासी क्षेत्रात यंदाच्या मोसमाची धान खरेदी सुरु करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी एनईएमएल पोर्टलवर नोंदणी करताना सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करुनच धान विक्रीची रक्कम अदा केली जाणार आहे. मात्र ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील आदिवासी उपयोजना क्षेत्रामधील ४५ टक्के शेतकऱ्यांनी सादर केलेली कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्याने धान विक्रीची रक्कम थांबविण्याचे आदेश आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी दिले आहेत.
ठाण्यातील तीन हात नाक्याचा रस्ता निमुळता बांधकामांमुळे एक मार्गिका अरुंद तर, दुसरी मार्गिका रुंद अरुंद मार्गिकेमुळे होतेय वाहतूक कोंडी
ठाणे : तीन हात नाका भागातून मुलूंडच्या दिशेने जाणाऱ्या मार्गाच्या मध्यभागी मेट्रोची मार्गिका उभारण्यात आलेली असली तरी ठाण्याहून मुलुंडच्या दिशेने जाणारी मार्गिका अरुंद तर, मुलुंडहून ठाण्याकडे येणारी मार्गिका रुंद दिसत आहे. मुलुंड दिशेने जाणाऱ्या मार्गिकेलगत बांधकामे आणि बेकायदा टपऱ्या असून यामुळे ही मार्गिका निमळुती झाल्याने येथे कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून भविष्यात ही समस्या आणखी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत.
ठाण्यातील महामार्गावरील दुभाजकामधील वृक्षांवर काँक्रीटचा थर, काँक्रीट थरामुळे हरित पट्टा धोक्यात येण्याची चिन्हे
ठाणे : ठाणे महापालिकेच्या नवीन मुख्यालय इमारतीसाठी ६३१ वृक्ष तोडण्याचा तर दोन हजार ९७ वृक्षांचे दुसऱ्या ठिकाणी पुनर्रोपण करण्याचा प्रस्ताव वादग्रस्त ठरला असतानाच, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अखत्यारीत असलेला ठाणे शहरातून जाणाऱ्या द्रुतगती महामार्गावरील नितीन कंपनी उड्डाण पुलाच्या पायथ्याशी असलेल्या दुभाजकांमध्ये काँक्रीटचे ढिगारे ठेवण्यात आले आहेत. हा काँक्रीटच्या थर तेथील झाडांच्या मुळावर येऊन हा हरित पट्टा धोक्यात येण्याची चिन्हे आहेत.
टेमघर प्रकल्प बाधितांचा प्रस्ताव मंजुरीसाठी लाच घेणाऱ्या लिपिक महिलेसह दोघे गजआड, शिरुर उपविभागीय कार्यालयात ‘एसीबी’ची कारवाई
पुणे : टेमघर प्रकल्प बाधितांचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी एक लाख ६० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या शिरुर उपविभागीय कार्यालायातील लिपिक महिलेसह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले.याप्रकरणी शिरुर उपविभागीय कार्यालयातील लिपिक सुजाता मनोहर बडदे, तानाजी श्रीपती मारणे (वय ४६, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गु्न्हा दाखल करण्यात आला.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी विशेष रेल्वे, कसा आहे मार्ग आणि वेळ ?
पुणे : दिल्ली यथे आयोजित करण्यात आलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पुणे ते दिल्ली आणि दिल्ली ते पुणे अशी रेल्वे गाडी धावणार आहे, अशी माहिती मध्ये रेल्वे पुणे विभागाकडून पत्रकाद्वारे देण्यात आली.
रस्ता साफ करणाऱ्या यंत्रणांचीच ‘धूळधाण’
नागरी समस्या अलीकडच्या काळात उग्र रूप धारण करत आहेत. अनेकदा तक्रारी होतात, पण समस्या ‘जैसे थे’ राहते. नागरिकांच्या या समस्यांना प्रातिनिधिक व्यासपीठ देऊन त्यांचे गाऱ्हाणे या व्यासपीठावर मांडणारा ‘लोकसत्ता’चा हा पुढाकार…एकीकडे शहरातील वायुप्रदूषण कमी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका शहरभर पाणी फवारणारी मोटार फिरवत असताना दुसरीकडे मात्र रस्ते साफ करणारे सफाई वाहन (रोड स्वीपर) धूळच धूळ उडवत असल्याचे दिसून येते
Rohit Pawar on Eknath Shinde: आपत्ती व्यवस्थापनात नगर विकास मंत्र्यांचाच समावेश नाही? – रोहित पवारांनी उपस्थित केला मुद्दा
सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे तासाभराच्या पावसात तुडुंब भरणारी पुणे व मुंबई सारखी कोटीपर्यंत लोकसंख्या असणारी शहरे तसेच शहरी भागात आपत्तींची वाढलेली संख्या यामुळे आपत्ती व्यवस्थापनात नगरविकास खात्याचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. असं असतानाही राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात सदस्य म्हणून उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे साहेबांचा समावेश नसणे ही बाब आश्चर्यकित करणारी आहे. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात शिंदे साहेबांचा समावेश मुद्दाम टाळला की इतर कारणांमुळे टाळला हे अंदाज असूनही सांगता येणार नाही. परंतु आपत्ती व्यवस्थापनात नगर विकास खात्याचाच समावेश नसेल तर आपत्ती व्यवस्थापनात त्रुटी राहण्याचा धोका उद्भवू शकतो. तरी राजकारण बाजूला ठेवून आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात नगरविकास मंत्र्यांचा समावेश होईल ही अपेक्षा – रोहित पवार
सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे तासाभराच्या पावसात तुडुंब भरणारी पुणे व मुंबई सारखी कोटीपर्यंत लोकसंख्या असणारी शहरे तसेच शहरी भागात आपत्तींची वाढलेली संख्या यामुळे आपत्ती व्यवस्थापनात नगरविकास खात्याचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. असं असतानाही राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 11, 2025
Eknath Shinde: शिंदेंच्या काळातील योजनांना कात्री? आर्थिक संतुलनासाठी सरकारचा विचार
वित्तीय तूट वाढत असल्याने काही लोकप्रिय घोषणांवरील खर्च कमी करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांचे धोरण आहे.
SanjayRaut on Tanaji Sawant Son: “धनिकांची मुलं बँकॉकला पळून जातात आणि…”
महाराष्ट्रात खंडणी, अपहरण, पलायन अशी प्रकरणे रोज घडत आहेत. पण श्रीमंतांची, धनिकांची मुलं स्वतःच्या चार्टर प्लेनने बँकॉकला पळून जातात आणि गरिबांची मुलं परिस्थितीला गांजून बेरजगारी, महागाई बेघर अवस्थेला कंटाळून भरगच्च रेल्वेतून फलाटावरून कुठेतरी निघून जातात. हा शेवटी त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे. त्यावर फार राजकीय चर्चा करू नये – संजय राऊत</p>
फडणवीस म्हणाले, "उद्धव ठाकरे हे काही आमचे शत्रू नाहीत". (PC : Devendra Fadnavis X)