Supreme Court Hearing on Maharashtra Political Crisis 01 November 2022 : राज्यातील सत्तासंघर्ष, शिवसेनेतील फूट आणि आमदारांची अपात्रता आदी मुद्दय़ांवर सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठापुढे आज सुनावणी होणार होती.  न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह यांचा या घटनापीठात समावेश होता. मात्र आता ही सुनावणी चार आठवड्यानंतर होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

याशिवाय मुंबईत आजपासून (१ नोव्हेंबर) चारचाकी वाहनांमध्ये सीटबेल्ट सक्तीचा असणार आहे. आजपासून मुंबईत चारचाकी वाहनामधून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला सीट बेल्ट लावावा लागणार आहे. वाहतूक पोलिसांचा हा नियम सर्वांसाठी चारचाकी वाहनधारकांसह प्रवाशांसाठी बंधनकारक करण्यात आला आहे.

‘लम्पी’ रोगाची साथ आटोक्यात आणण्यासाठी विषाणूच्या जनुकीय बदलाची माहिती घेतली जाणार असून त्यासाठी जनावरांचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे लसीकरण झालेल्या जनावरांची रोगप्रतिकार शक्ती किती वाढली याचेही मूल्यमापन केले जाणार आहे.

यासह राज्यभरातील विविध क्षेत्रातील घडामोडी सविस्तर वाचा फक्त एकाच क्लिकरवर

Live Updates

Maharashtra  News Updates : यासह राज्यभरातील विविध क्षेत्रातील घडामोडी सविस्तर वाचा फक्त एकाच क्लिकरवर

20:22 (IST) 1 Nov 2022
पुणे: नोव्हेंबरची थंडी आटोक्यात; ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाची शक्यता

महाराष्ट्रसह देशातील बहुतांश भागात नोव्हेंबर महिन्यात किमान तापमान सरासरीच्या बरोबरीने किंवा सरासरीपुढे राहण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे नोव्हेंबरची थंडी आटोक्यातच राहणार आहे. डिसेंबरपासून मात्र थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरमध्ये अनेक भागांत अंशतः ढगाळ वातावरण राहणार असून, तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचाही अंदाज आहे.

सविस्तर वाचा

20:03 (IST) 1 Nov 2022
टायर फुटल्याने चारचाकी झाडाला धडकली; यवतमाळच्या डॉ. सुरेखा बरलोटा यांचा मृत्यू

यवतमाळ येथील मानसिक रोगतज्ज्ञ डॉ. पीयूष बरलोटा यांच्या वाहनाला तेलंगणामध्ये हैदराबाद ते निर्मल मार्गावर अपघात झाला. या अपघातात डॉ. पीयूष बरलोटा यांच्या पत्नी प्रसूती रोगतज्ज्ञ डॉ. सुरेखा बरलोटा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना आज, मंगळवारी दुपारी घडली.

सविस्तर वाचा

19:37 (IST) 1 Nov 2022
‘ये डर मुझे अच्छा लगा, आय…’, फलक चोरीवरून सुषमा अंधारेंची जोरदार टोलेबाजी

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे महाप्रबोधन यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी जळगावात येण्याआधीच त्यांच्या कार्यक्रमाचे फलक (बॅनर) चोरी गेल्याचा प्रकार घडला. यावर सुषमा अंधारे यांनी जोरदार टोलेबाजी केली. “ये डर मुझे अच्छा लगा, आय एन्जॉय. मी या सर्व गोष्टींचा आनंद घेत आहे, मला मजा येत आहे,” अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारेंनी व्यक्त केली. त्या मंगळवारी (१ नोव्हेंबर) महाप्रबोधन यात्रेसाठी जळगावात आल्या असताना पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

सविस्तर बातमी…

18:26 (IST) 1 Nov 2022
अमरावती : राष्ट्रीय महामार्गावर एसटी बसला आग, बसचालकाच्या प्रसंगावधानामुळे ३५ प्रवासी सुखरूप

अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पिंपळविहीर या गावानजीक एसटी बसला आग लागल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. बसचालकाने प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या कडेला थांबवली. बसमधील सर्व ३५ प्रवासी सुखरूप असून बस जळून खाक झाली.

सविस्तर वाचा…

18:21 (IST) 1 Nov 2022
कोपरखैरणेत पार्किंगचा बोजवारा, खेळाच्या मैदानावर वाहनांचे अतिक्रमण

नवी मुंबई शहरात विशेषतः कोपरखैरणे विभागात पार्किंगची समस्या जटील होत आहे. सिडको वसाहतीती तोकडे रस्ते, रेल्वे स्थानक वगळता एकही असे सुसज्ज वाहनतळ नाही. त्यामुळे कोपरखैरणेत पार्किंगचा पुरता बोजवारा उडत आहे.

सविस्तर वाचा…

15:56 (IST) 1 Nov 2022
नवी मुंबईकरांनो पाण्याचा वापर जपून करा, गतवर्षीपेक्षा मोरबे धरणात कमी पाणीसाठा

गतवर्षी मोरबे धरण १०० टक्के भरले होते. यंदा परतीच्या पावसाने महाराष्ट्रभर तडाखा दिला असून नवी मुंबई शहरातही परतीचा पाऊस झाला पण मोरबे धरण परिसरात मात्र पावसाने पाठ फिरवली .गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा पूर्ण भरले नसून नवी मुंबईकरांना वर्षभर पाणीपुरवठा होण्यासाठी पाण्याचा वापर जपूनच करावा लागणार आहे.

सविस्तर वाचा…

15:51 (IST) 1 Nov 2022
जळगाव: “मी जर तीन महिन्यांचं बाळ, तर मला…” सुषमा अंधारे यांचा गुलाबराव पाटील यांना टोला

मी जर तीन महिन्यांचं बाळ, तर बाळाला काहीही करायचा अधिकार आहे. गुलाबभाऊ मला तीन महिन्यांचे बाळ म्हणत असतील तर बाळ जसा सर्व खोड्या करतो, त्या करण्याचा मला सर्व अधिकार आहे, असा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना हाणला.

सविस्तर वाचा बातमी

15:31 (IST) 1 Nov 2022
कळंबोलीत लाखो लीटर पिण्याच्या पाण्याची नासाडी

पावसाळा संपला असला तरी पनवेल मुंब्रा महामार्गावरील कळंबोली लोखंडबाजाराच्या प्रवेशव्दारावर गेले काही दिवस रस्त्यावर पाणी तुंबले असून शेकडो वाहने यातून ये-जा करत आहेत. महामार्गालगत असणा-या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (एमजेपी) जलवाहिनीतून अर्धा किलोमीटर अंतरावरून हे पिण्याचे पाणी रस्त्यावर येत असून गेल्या अनेक महिन्यांपासून पाण्याचा अपव्यय सूरु आहे.

सविस्तर वाचा…

15:01 (IST) 1 Nov 2022
निवडणूक होणार आहे…हाच अंधेरी पूर्व पोटनिवडणूकतील प्रचाराचा प्रमुख मुद्दा

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात काहिशी एकतर्फी निवडणूक होत असली तरी उमेदवारांनी मतदारांच्या भेटीगाठी घेऊन प्रचारासाठी मेहेनत घेतली आहे. मात्र, तेथील राजकीय घडामोडींनंतर उमेदवाराच्या प्रचारापेक्षा निवडणूक होणार आहे… याच बाबीचा प्रचार उमेदवारांना प्राधान्याने करावा लागला आहे.

सविस्तर वाचा…

15:00 (IST) 1 Nov 2022
मुंबई ट्रान्सहार्बर प्रकल्पातील एक महत्त्वाचा टप्पा पार; २४०० टनाच्या डेकची यशस्वी उभारणी

मुंबई पारबंदर प्रकल्पातील (शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू) सर्वात मोठ्या, तब्बल २४०० मेट्रिक टन वजनाच्या ऑर्थोट्रॉपिक स्टील डेकची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) यशस्वीपणे उभारणी करण्यात आली आहे. हा डेक ५-६ बोइंग विमानाइतका जड आहे.

सविस्तर वाचा…

14:53 (IST) 1 Nov 2022
डोंबिवली: खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने भागशाळा मैदानातील कोकण महोत्सवाची परवानगी रद्द, म्हणाले “मैदानाचा वापर…”

डोंबिवली पश्चिमेतील भागशाळा मैदानात कोकण महोत्सव भरविण्यास नागरिकांचा कठोर विरोध असल्याची गंभीर दखल ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मंगळवारी घेतली. नागरिकांच्या मागणीवरुन खा. शिंदे यांनी पालिका प्रशासनाला तातडीने प्रस्तावित कोकण महोत्सवाची परवानगी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती खासदार डॉ. शिंदे यांचे स्वीय साहाय्यक अभिजीत दरेकर यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

सविस्तर वाचा

14:25 (IST) 1 Nov 2022
पुण्यात पोस्टर वॉर!; उद्धव ठाकरे गटाकडून शिंदे गटाला पोस्टरद्वारे प्रत्युत्तर

'उद्धवचा वाटा,महाराष्ट्राचा घाटा' अशा आशयाचे फलक लावत प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यास माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच जबाबदार असल्याच्या बाळासाहेबांची शिवसेनेच्या टीकेला उद्धव ठाकरे समर्थकांनी पोस्टरद्वारेच प्रत्युत्तर दिले आहे. 'राज्याबाहेर गेलेल्या प्रकल्पांमध्ये मिळत नव्हता वाटा म्हणूनच गद्दारांनीच केलाय राज्यातील तरूणांचा घाटा' अशा आशयाचा फलक ठाकरे समर्थकांनी शुक्रवार पेठेत लावला आहे.

सविस्तर वाचा

14:10 (IST) 1 Nov 2022
VIDEO: जळगावमध्ये मंत्री गुलाबराव पाटलांचं भाषण सुरू असताना अजान सुरू झालं अन्…

राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचं सोमवारी (३१ ऑक्टोबर) भाषण सुरू असतानाच मशिदीवरील भोंग्यावर अजान सुरू झाल्याचा प्रकार घडला. अजान सुरू होताच गुलाबराव पाटलांनी आपलं भाषण थांबवलं. अजान संपल्यानंतर त्यांनी पुन्हा आपलं भाषण सुरू केलं. ते जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात धानोरा येथे १६ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन करण्यासाठी आले असताना बोलत होते.

सविस्तर बातमी…

13:01 (IST) 1 Nov 2022
पुण्यातील लुल्लानगरमधील हॉटेलला आग

पुण्यातील लुल्लानगर भागातील झीके(जहीर खान) हॉटेलला आज(मंगळवार) सकाळी आग लागली आहे. या आग विझवण्यासाठी अग्निशमन विभागाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. वाचा सविस्तर बातमी…

13:00 (IST) 1 Nov 2022
Shivshahi bus caught fire : पुण्यातील शास्त्रीनगर चौकात शिवशाही बसला भीषण आग

पुण्यातीत आज(मंगळवार) आणखी एक आगीची घटना घडली आहे. शहरातली शास्त्रीनगर चौकात एका शिवशाही बसला आग लागल्याची घटना घडली आहे. या अगोदर सकाळी एका हॉटेलला आग लागली होती. सुदैवाने बसमधील सर्व सुखरूप बाहेर पडले होते. भर ररस्त्यात ही बस पेटल्याने एकच खळबळ उडाली होती आणि रस्त्यावर बघ्यांची गर्दी झाली होती. वाचा सविस्तर बातमी…

12:46 (IST) 1 Nov 2022
VIDEO: “राज ठाकरे आमच्यासारखे जिगरबाज, कोणालाही घाबरत नाहीत, एक दिवस…”, शीख व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची लोकप्रियता हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. राज ठाकरेंची आक्रमक भाषण शैली तरुणांमध्ये लोकप्रिय आहे. अनेक तरुण त्यांच्या खमक्या भाषण शैलीच्या प्रेमात असल्याचंही पाहायला मिळतं. मात्र, ही लोकप्रियता केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही, तर राज्याबाहेरही आहे. आता सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओत एक शीख व्यक्ती राज ठाकरेंना धाडसी म्हणत त्यांचं तोंड भरून कौतुक करत आहे. तसेच एक दिवस राज ठाकरेंचं नेतृत्व पुढे येईल, असा आशावादही व्यक्त करत आहे. हा व्हिडीओ मनसेचे उपाध्यक्ष रणजीत शिरोळे यांनी ट्वीट केला आहे.

सविस्तर बातमी…

12:30 (IST) 1 Nov 2022
किरीट सोमय्यांचे पेडणेकरांना खुले आव्हान; म्हणाले, “संजय अंधारी नावाच्या…”

पेडणेकर यांनी वरळी येथील गोमाता जनता एसआरए येथील सदनिका हस्तगत करण्यासाठी सुनिल कदम नावाच्या व्यक्तीला संजय अंधारी असल्याचे दाखवून सदनिका हस्तगत केल्याचा आरोप केला आहे. तसेच संजय अंधारी नावाच्या माणसाला पेडणेकर यांनी हजर करावे, असे खुले आव्हानही सोमय्या यांनी पेडणेकरांना दिले आहे. वाचा सविस्तर

12:29 (IST) 1 Nov 2022
बच्चू कडूंची आज अमरावतीमध्ये बैठक, दिव्यांग व्यक्तीच्या माध्यमातून भूमिका स्पष्ट करणार

बच्चू कडू यांनी रवी राणांसोबतच्या अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र बच्चू कडू आज अमरावतीमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून एका दिव्यांग बांधवाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. बच्चू कडूंनी गुवाहाटीला जाऊन खोके (पैसे) घेतल्याचा आरोप रवी राणांनी केला होता. वाचा सविस्तर

12:28 (IST) 1 Nov 2022
‘आरोपांच्या धसक्यामुळे माझ्या सासूबाईंचं निधन’ किशोरी पेडणेकरांच्या आरोपावर सोमय्यांची प्रतिक्रिया; म्हणाले

किरीट सोमय्या यांच्यामुळे माझ्या सासूबाईंचं निधन झालं असा गंभीर आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. त्यांच्या याच आरोपांवर आता सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी आरोप केलेला नसून घोटाळा समोर आणला आहे, असे सोमय्या म्हणाले आहेत. ते मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत होते. वाचा सविस्तर

12:00 (IST) 1 Nov 2022
मुंबई : अखेर त्या अल्पवयीन मुलाच्या मृतदेहावर पोलिसांकडून अंत्यविधी

बालगृहात हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाचे अखेर मुंबई पोलिसांनी सोमवारी अंत्यविधी केले. गेल्या दोन महिन्यांपासून शिवाजी पार्क पोलीस या मुलाच्या नातेवाईकांचा शोध घेत होते. त्यासाठी दिल्ली, उत्तर प्रदेशासह विविध ठिकाणी जाऊन पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांचा शोध घेतला होता.

सविस्तर वाचा

11:45 (IST) 1 Nov 2022
‘माझ्या एका फोनवर बच्चू कडू गुवाहाटीला’ म्हणणाऱ्या फडणवीसांवर ठाकरे गटाकडून टीका, म्हणाले “अर्थात, म्हणजे…”

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वादावर भाष्य केलं. यावेळी ‘बच्चू कडू हे माझ्या एका फोनवर गुवाहाटीला गेले होते’, अशी माहिती दिली. देवेंद्र फडणवीसांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. याआधी भाजपाने बंडखोरीशी पक्षाचा काही संबध नसल्याचे दावे केल होते. दरम्यान ठाकरे गटही यानंतर आक्रमक झाला असून प्रतिक्रिया देत आहे. ठाकरे गटातील नेते अनिल देसाई यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर भाष्य केलं.

सविस्तर बातमी

11:06 (IST) 1 Nov 2022
राज्यातील सत्ता संघर्ष सुनावणी : दोन्ही बाजूच्या कनिष्ठ वकीलांनी दस्तावेज सादर करायचे आहेत

चार आठवड्यात दोन्ही बाजूच्या कनिष्ठ वकीलांनी बसून दस्तावेज तयार करायचे आहेत आणि मग ते न्यायालयासमोर सादर करायचे आहेत. त्यानंतर न्यायालय तारीख देणार आहे. म्हणजे नाताळच्या सुट्टीच्या अगोदर किंवा नंतर तीन ते चार दिवस हे प्रकरण चालू शकतं.

10:51 (IST) 1 Nov 2022
राज्यातील सत्ता संघर्षावर आता चार आठवड्यानंतर सुनावणी

राज्यातील सत्ता संघर्षावरील सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चार आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे.

10:47 (IST) 1 Nov 2022
सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात झाली

राज्यातील सत्ता संघर्षावरील सुनावणीला सर्वोच्च न्यायलयात सुरुवात झाली आहे. दोन्ही बाजूच्या वकिलांकडून कागदपत्रांचा गोषवारा सादर करण्यासाठी तीन आठवड्यांची मूदत मागितली आहे.

10:40 (IST) 1 Nov 2022
सोलापूर रस्ते अपघातातील मृत वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांकडून ५ लाख रुपये मदत जाहीर

कार्तिकी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांवर काल(सोमवार) काळाने घाला घातला. मिरज-पंढरपूर महामार्गावर जुनोनी येथे पायी दिंडीत कार घुसल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात सात वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. वाचा सविस्तर बातमी…

10:39 (IST) 1 Nov 2022
‘लम्पी’ नियंत्रणासाठी विषाणूतील जनुकीय बदलांची माहिती घेण्याचा निर्णय

‘लम्पी’ रोगाची साथ आटोक्यात आणण्यासाठी विषाणूच्या जनुकीय बदलाची माहिती घेतली जाणार असून त्यासाठी जनावरांचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे लसीकरण झालेल्या जनावरांची रोगप्रतिकार शक्ती किती वाढली याचेही मूल्यमापन केले जाणार आहे. हे दोन्ही अहवाल नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात अपेक्षित आहे. वाचा सविस्तर बातमी…

10:38 (IST) 1 Nov 2022
शिवसेनेतील फूट प्रकरण : घटनापीठापुढे आज सुनावणी

राज्यातील सत्तासंघर्ष, शिवसेनेतील फूट आणि आमदारांची अपात्रता आदी मुद्दय़ांवर सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठापुढे आज सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह यांचा या घटनापीठात समावेश आहे. 

राज्यातील सत्तासंघर्ष, शिवसेनेतील फूट आणि आमदारांची अपात्रता आदी मुद्दय़ांवर सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठापुढे आज सुनावणी होणार आहे.