Maharashtra Breaking News Today, 13 October 2023 : राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भातील याचिकेवर आज, १३ ऑक्टोबरला एकत्र सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार गटातील आमदारांच्या विरोधात अपात्रतेची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर १० ऑक्टोबर सुनावणी पार पडली. तेव्हा सर्वोच्च न्यायालयानं १३ ऑक्टोबरला सुनावणी घेणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर दुसरीकडे राज्यात टोल दरवाढीवरून वातावरण तापलं आहे. दरम्यान, ठाण्यातून मुंबईत येणाऱ्या लहान वाहनांना टोलमाफी करण्याच्या दृष्टीने सरकार गांभीर्याने विचार करत असून यासंदर्भातील चर्चेसाठी सार्वजनिक बांधकाममंत्री (उपक्रम) दादा भुसे, रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांची बैठक राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी आज होणार आहे. त्यामुळे आज निर्णायक चर्चा होण्याची शक्यता आहे. यासह राज्यातील, देशातील इतर महत्त्वाच्या घडामोडी पाहुयात.
Mumbai News in Marathi : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा
निवडणुक आयोगाने यापूर्वी खरी शिवसेना आम्ही आहोत, हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आम्ही सुद्धा आता विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाची वाट बघत आहोत, असे मत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने दसरा, दिवाळी, छठसाठी विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक ०२१३९ सुपरफास्ट स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १९ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर दरम्यान सोमवार आणि गुरुवारी रात्री १२.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी ३.३०० वाजता नागपूर येथे पोहोचेल.
राज्यातील टोल प्रश्नावर मनसेने आंदोलन करताच सरकार राज ठाकरेंच्या घरी जाते हे घटनाबाह्य आहे. शिंदे-फडणवीस-पवार सरकारने सर्व मर्यादा पार केल्या आहेत. राज ठाकरे यांच्या घरी सरकार जाते म्हणजे हे समांतर सरकार चालवल्यासारखे आहे.
पुणे : पालकमंत्री पद गेले म्हणून नाराज होण्याचे कोणतेही कारण नाही. मोठ्या कामासाठी केलेली ही एक छोटी तडजोड आहे, अशी सारवासारव राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री, माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे शुक्रवारी केली.
भाईंदर : मीरा रोडच्या काशिमिरा परिसरातील एका बेकरीत गोळीबार करण्याचा प्रयत्न ऐनवेळी बंदुक लॉक झाल्याने फसला. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली.
कोल्हापूर: घराचा उतारा देण्यासाठी दोन हजाराची लाच स्वीकारताना ग्रामविकास अधिकारी शुक्रवारी पकडला गेला. गोरख दिनकर गिरीगोसावी, (वय ५०, प्रयाग चिखली, ता.करवीर, सद्या रा. कणेरीवाडी,मूळ पुणे जिल्हा) असे त्याचे नाव आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची वापरलेली वाघनखे लंडनहून भारतात आणण्याच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करून राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर-वर्धा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे उपराजधानीत आगमन झाले.
पुणे : अमली पदार्थ तस्कर ललित पाटील आणि त्याचा भाऊ भूषण यांनी अमली पदार्थ विक्रीतून (मेफेड्रोन) मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. पुणे पोलिसांच्या पथकाने पाटील याच्या नाशिक येथील घराची तपासणी केली. तेव्हा मोठ्या प्रमाणावर सोने सापडले.
सांगली : आंध्र प्रदेशात गलाई व्यावसायिकांच्या घरावर दरोडा टाकून १ कोटी ७७ लाख रूपयांच्या सोन्यासह पलायन केलेल्या तिघांच्या टोळीला सांगलीजवळ बुधगाव येथे सांगली पोलीसांनी आंध्र प्रदेश पोलीसांच्या मदतीने शुक्रवारी अटक केली.
प्रेम दुकानात मिळत नाही. त्यांचं प्रेमाचं दुकान लवकरच बंद पडणार आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
जळगाव: निम्न तापी पाडळसरे प्रकल्प जलद गतीने पूर्ण व्हावा, या मागणीसाठी चोपडा तालुक्यातील बुधगाव येथील पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचे युवा कार्यकर्ते उर्वेश साळुंखे यांनी शुक्रवारी झाडावर चढून आंदोलन केले.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री गडकरी यांच्या हस्ते शनिवारी (१४ऑक्टोबर ) स.११ वा झिरो माईल मेट्रो स्टेशन जवळील मानस चौक ते इन्स्टिट्यूट ऑफ सायंस या प्रस्तावित भुयारी मार्गाचे भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
वसई – बॉम्बस्फोट प्रकरणी जामीन मंजूर झालेला ‘हिंदू गोवंश रक्षा समिती’चा कार्यकर्ता वैभव राऊत गुरुवारी रात्री उशिरा नालासोपारा येथील घरी परतला. यावेळी त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. मागील ५ वर्षांपासून तो तुरुंगात होता.
काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी आपण सत्तेत आल्यास माना समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून काढून टाकू, असे विधान केले होते.
पुणे : बारामती लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कोण उमेदवार असेल, हे महत्त्वाचे नाही. बारामती जिंकणे महत्वाचे आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा उमेदवार बारामतीमध्ये असेल तर त्यालाही विजयी केले जाईल, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
मुंबईतील कार्यालयात येऊन राज्यभरातील अनेक महिलांना तक्रार मांडणे अशक्य ठरते. त्यामुळे आयोग आता जिल्हास्तरावर जनसुनावणी घेत आहे, असे चाकणकर यांनी म्हटले आहे.
नवी मुंबई: वाशीतील एपीएमसी फळ मार्केट समोरील रस्ते व पदपथावर फेरीवाले नेहमीच आपले बस्तान मांडून बसतात. मागील आठवड्यात डॉन विक्री करणाऱ्या महिलांनी अतिक्रमण कर्मचारी महिलेला मारहाण केली होती. त्यावेळी संबंधित फेरीवाल्यांवर गुन्हा देखील दाखल झाला होता.
चोर चोरी करताना आपल्या कडे तिसऱ्या डोळ्याची अर्थात सीसीटीव्हीची नजर असल्याचे ओळखतात. त्यावर वेगवेगळे उपाय करून चोरी करतात. अशीच दुचाकीची चोरी कोपरखैरणे सेक्टर १९ येथे झाली.
पुणे : २७ वर्षांनंतर पुण्यामध्ये क्रिकेट विश्वचषकाचे सामने होणार आहेत. १९ ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध बांगलादेश क्रिकेटचा सामना पुण्यातील एमसीए मैदानावर होणार आहे. असं असलं तरी क्रिकेट चाहत्यांमध्ये मात्र नाराजी असून ऑनलाईन तिकीट मिळत नसल्याने अनेक क्रिकेट चाहते गहुंजे क्रिकेट स्टेडियम परिसरात गर्दी करत आहेत.
शासकीय रुग्णालयांतील गोरगरीब रुग्णांच्या मृत्यूंची नैतिक जबाबदारी स्वीकारून आरोग्य मंत्री यांनी आता तरी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी पाटील यांनी केली.
पुण्यासह महाराष्ट्रात १४ ऑक्टोबरच्या संध्याकाळपासून हवामान बदलण्यास सुरुवात होईल. शहर आणि परिसरात ढगाळ वातावरण राहील.
पुणे: विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) पदवीपूर्व स्तरावरील विद्यार्थ्यांना सक्तीच्या कार्यप्रशिक्षणाबाबतच्या (इंटर्नशीप) मार्गदर्शक सूचनांचा मसुदा प्रसिद्ध केला.
नवी मुंबई : रस्त्याच्या दुतर्फा उभी केलेली बेकायदा अवजड वाहने, काही वाहनांच्या कंटेनर्समध्येच सुरू असलेले बेकायदा व्यवसाय, जागोजागी झालेली अतिक्रमणे, पदपथांवर उभारलेल्या अनधिकृत टपऱ्या आणि त्या जोडीला अस्वच्छता, दुर्गंधी, कचऱ्याचे साम्राज्य. तुर्भे परिसरातील मॅफको भागात असलेल्या शीतगृह परिक्षेत्रातील हे दृश्य देशात स्वच्छतेच्या आघाडीवर पहिल्या क्रमांकाचे स्वप्न पाहणाऱ्या नवी मुंबई महापालिका हद्दीतीलच आहे का, असा प्रश्न कुणालाही पडू शकतो.
अजित पवार मुख्यमंत्री होतील अशी खात्री असल्यानेच सुप्रिया सुळेंनी अजित दादांना सर्वप्रथम हार घालण्यासाठी बुकिंग केलं आहे, अशी मार्मिक प्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी दिली.
देशी बनावटीचे अग्निशस्त्र बाळगून असणार्या दोघांना अटक करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यवतमाळ येथे आंबेडकरनगर ते डोर्ली मार्गावर केली.
मुंबई : खासगी गृहप्रकल्पातील इमारतींचा बांधकाम दर्जा राखला जावा, बांधकाम दर्जा सुधारावा यासाठी आता महारेरा आग्रही आहे. त्यामुळेच आता दर्जात्मक बांधकामासाठी आणि बांधकामातील त्रुटी दूर करण्यासाठी महारेराने स्थावर संपदा क्षेत्रातील गुणवत्ता आश्वासन अहवालाचा आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या आराखड्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत सूचना देण्याचे आवाहन महारेराने विकासकांच्या संघटनांना केले आहे.
सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांनी २० मार्चच्या सभेत सर्वांचे समायोजन करण्याची तसेच वेतनवाढ देण्याची हमी दिली होती, असे राज्य संघटक दिलीप उटाणे यांनी म्हटले आहे.
ठाणे : राज्यात २०१४च्या विधानसभेचे निकाल येत असताना ‘सिल्व्हर ओक’ बाहेर पत्रकार परिषदेत राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल, तत्कालीन प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपाला बिनशर्त पाठिंबा असल्याची घोषणा का केली होती, यामागची कारणे आमदार डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्राला सांगावी, असे आव्हान राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिले आहे.
पुणे : यंदा ऑगस्ट, सप्टेंबर पाठोपाठ ऑक्टोबर महिनाही सरासरीपेक्षा उष्ण राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. विदर्भात सर्वाधिक म्हणजे सरासरीपेक्षा २ ते ३ अंश सेल्सिअस जास्त तापमानाची नोंद झाली आहे.
Mumbai News Live in Marathi : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा