Marathi News Live Update : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले असताना महाराष्ट्रातील जागावाटप रखडले आहेत. महाविकास आघाडीतील जागावाटपाची चर्चा वंचित बहुजन आघाडीला किती जागा द्याव्यात, यावरून रखडली आहे. तर महायुतीमध्ये शिंदे गट आणि अजित पवार यांच्या गटाला किती जागा सोडाव्यात, यावर अंतिम निर्णय झालेला नाही. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले असून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कालपासून बैठका घेतल्या आहेत. आज यावर अंतिम निर्णय होतो का? हे पाहावे लागेल
Maharashtra Breaking News Live 06 March 2024
सांगली : भरदिवसा जतमधील गर्दीचे ठिकाण असलेल्या सोलनकर चौकामध्ये एका तरूणाचा तलवारीने हल्ला करून खून करण्यात आल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. हल्ल्यानंतर संशयितांनी पलायन केले असून पोलीस संशयिताबाबत माहिती संकलित करत आहेत.
गुहागर-विजापूर या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या सोलनकर चौकामध्ये ऐन गर्दीच्यावेळी अविनाश कांबळे (वय 28 रा. विठ्ठलनगर) याच्यावर संशयितांनी तलवारीने वार केले. या हल्ल्यात तरूण गंभीर जखमी होउन खाली पडला. वैद्यकीय मदत मिळण्यापुर्वीच त्याचा मृत्यू झाला. भरदिवसा झालेल्या या गंभीर घटनेनंतर जत शहरात खळबळ माजली असून मृत तरूण विठ्ठलनगरमधील रहिवासी आहे.
अमरावती : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपूर येथील स्वागत प्रवेशद्वाराला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यास गावातील एका गटाने विरोध दर्शविल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नाशिक : महाशिवरात्रीनिमित्त श्री त्र्यंबकेश्वर देवस्थानतर्फे जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे. शुक्रवार आणि शनिवारी महाशिवरात्र निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी पहाटे चारपासून शनिवारी रात्री नऊपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले राहणार आहे.
धुळे : हिंदू-मुस्लिम विवाह पूर्वीपासून होत आले आहेत. अलीकडे मात्र लव्ह जिहादच्या नावावर वाद उकरले जात असून प्रत्यक्षात एकही तक्रार दाखल नाही, असा दावा समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.
महाविकास आघाडीमधील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात जागावाटपाची चर्चा करण्यासाठी वरळीच्या फोर सीझन हॉटेलमध्ये बैठक संपन्न झाली. या बैठकीनंतर माध्यमांना माहिती देताना संजय राऊत म्हणाले की, जागावाटपाबाबत अतिशय सकारात्मक अशी चर्चा झाली आहे. आमच्यात मतभेद नाहीत. लवकरच जागावाटपाचा अंतिम निर्णय जाहीर केला जाईल, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
बुलढाणा : शीर्षक वाचून (डाक विभाग कर्मचारी सोडून) कुणीही बुचकळ्यात पडणार हे उघड आहे. पण हे सत्य असून तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर, पोस्टमन दादाला भेटल तरी चालेल बरं का..
भंडारा : जातीच्या गणितांवर निवडणूक होऊ नये, असे कितीही म्हटले जात असले तरी प्रत्यक्ष निवडणुकीत ‘जातकारण’ येतेच. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातही आता ‘जातकारण’तापले आहे. तेली आणि पोवार समाजाच्या नेत्यांनी या मतदारसंघात आता पक्षाचा नाही तर जातीचा उमेदवार हवा, अशी मागणी केली आहे. यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीसमोर पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नागाळा पार्क येथील सृष्टी शिंदे या २१ वर्षीय तरुणीचा भटक्या कुत्र्याच्या चाव्याने रेबीज होऊन दुर्दैवी मृत्यू झाला.
राज्याच्या शेवटच्या टोकावर महाराष्ट्र – तेलंगणा सीमेवर असलेल्या अतिदुर्गम जीवती तालुक्यातील गोंडगुडा (धोंडाअर्जुनी) येथे चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थिनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहले आहे. हे पत्र समाजमाध्यमावर व्हायरल झाल्याने या चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींची राज्यभर चर्चा सुरू आहे. सविस्तर वाचा
दोन शाळकरी मुलांमध्ये झालेल्या वादात मुलांना समज दिल्याच्या कारणावरून चिखलीतील एका शाळेच्या मुख्याध्यापकास २०१८ मध्ये बेदम मारहाण केली होती. या आरोपीस बुलढाणा प्रमुख व जिल्हा न्यायालयाने एक वर्ष सश्रम करावास व दोन हजार दंडाची शिक्षा सुनावली.
आपल्या विविध मागण्यांसाठी तीन दिवसांपासून उपोषण करणाऱ्या तब्बल ५० जणांच्या आंदोलनाकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भूमी हक्क परिषदेच्या पुढाकाराने ४ फेब्रुवारी पासून उपोषण सुरू करण्यात आले आहे. आहे. सविस्तर वाचा…
काटई-बदलापूर रस्त्यावरील खोणी गाव हद्दीत एका विकासकाच्या निर्माणाधिन इमारतीत बनावट लोणी तयार करून ते अमूल कंपनीच्या नावाने विकण्याचा प्रयत्न करत असलेल्या दोन जणांना कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी अटक केली. सविस्तर वाचा…
देश १० वर्षात विकला. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये नेले. किती वर्ष गांधी परिवाराच्या नावाने खडे फोडणार, असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना केला आहे. सविस्तर वाचा…
महाविकास आघाडीमधील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचे जागावाटपावर एकमत झालेलं नाही. १५ जागांवर आणखी एकमत होणे बाकी आहे, अशी माहिती प्रकाश आंबडेकर यांनी माध्यमांना दिली.
नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतर्फे जय्यत तयारी सुरु झाली आहे. मनसेच्या १८ व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्ताने प्रचाराचे रणशिंग फुंकले जाणार आहे.
वर्धा : अपघात होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे रस्त्यावर मोकाट जनावरांची वाढती वर्दळ हे पण असल्याचे सांगितले जाते. रात्री मोकाट पशुचे रस्त्यावर फिरणे वाहनचालकांना गोंधळात टाकते. आणि अपघात घडतात, असे परिवहन खाते आकडेवारी देत स्पष्ट करते.
पुणे : मैत्रिणीला मॉडेलिंगसाठी नेल्याने सराइताने एका तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना टिळक रस्ता परिसरात घडली. याप्रकरणी सराइतासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
नाशिक : शहरातील बेकायदेशीरपणे केली जाणारी भूसंपादन प्रक्रिया स्थगित करावी, गंगापूर रस्ता भागातील अडीच एकर शैक्षणिक भूखंडावरील आरक्षणही बदलले जात असल्याने त्यास स्थगिती देऊन या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करावी. अशी मागणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
कुलाबा-वांद्रे-सीप्झ भुयारी मेट्रो ३ मार्गिकेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अखंडित मोबाईल सेवा पुरविण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) ने पुढाकार घेतला आहे.
लोकलने प्रवास करणाऱ्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी नाहूर रेल्वे स्थानक दरम्यान घडली आहे.
मुंबई : पत्नीला विमानतळावर पोहोचण्यासाठी उशीर झाल्यामुळे विमानात बॉम्ब असल्याचा दूरध्वनी करणाऱ्याला बंगळुरू येथून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. मुंबई-बंगळुरू विमानात बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली होती.
नागपूर : एका बेरोजगार तरुणीला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून जंगलात नेऊन बलात्कार केला. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी रोशन मेश्रामविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली.
नागपूर : शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकांची मदत घेतली जात आहे. सामान्य नागरिकांच्या सहकार्याने गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्यावर भर दिला जाईल. भविष्यात शहराची ‘क्राईम कॅपिटल’ नव्हे तर ‘स्मार्ट सिटी’ म्हणून नागपूर शहराची ओळख निर्माण करण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी दिले.
दिवसेंदिवस कल्याण रेल्वे स्थानका बाहेर प्रवाशांना लुटण्याच्या घटना वाढत आहेत. याविषयी प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
एका बांधकाम व्यवसायिकाच्या अटकेनंतर हे प्रकरण उडकीस आले असून त्याची व्याप्ती लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास आता ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
ठाणे शहरातील वाहतुक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला प्रकल्प वडाळा-घाटकोपर-कासारवडवली या मेट्रो चार मार्गिकेचे काम डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
कोकणभूमी प्रतिष्ठान व जंजिरा ऍडव्हेंचर टुरिस्ट ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने राजपुरी खाडीत रंगल्या शिडाच्या बोटींच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.
ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्ते नुतनीकरणानंतर सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्तीचे कामे प्रशासनाने हाती घेतली होती. यासाठी राज्य शासनाने कोट्यावधी रुपयांचा निधी पालिकेला देऊ केला आहे.
नायगाव पूर्वेच्या भागात जूचंद्र उड्डाणपूल तयार करण्याचे काम सुरू आहे. परंतु या कामाच्या संथगतीचा फटका नागरिकांना बसत असल्याचे दिसून येत आहे.
मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील पहिल्या टप्प्यात ९४५ पोलीस पदांची भरती केल्यानंतर आता दुसर्या टप्प्यात १ हजार ८२ पदे भरली जाणार आहे.