Mumbai News Today: महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने राजकीय उलथापालथ होताना दिसत आहे. दरम्यान, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे. निवडणुका जिंकण्यासाठी राम मंदिराच्या उद्घाटनानंतर भाजपाकडून देशात दंगली घडवल्या जातील, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. यावर आता राजकीय मंडळींकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. दुसरीकडे, शरद पवारांचे अत्यंत विश्वास सहकारी दिलीप वळसे पाटील यांनीच शरद पवारांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. शरद पवार यांना एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री होता आलं नाही. आपल्याकडं शरद पवारांसारखे उत्तुंग नेते असताना आपले फक्त ६० ते ७० आमदार निवडून येतात, अशी टीका दिलीप वळसे-पाटील यांनी केली. यावरही राजकीय नेते प्रतिक्रिया देत आहेत. शिवाय गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसानं दडी मारली आहे. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. यासह राज्यातील अनेक महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर…
Maharashtra Latest News Today: महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक आणि हवामानासंदर्भातील ताज्या घडामोडी वाचा!
समाजमाध्यमातील मजकूर, ध्वनिचित्रफितीस दर्शक पसंती (व्हयुज) मिळवून दिल्यास चांगले पैसे मिळतात, असे सांगून तरुणीला जाळ्यात ओढले. सुरुवातीला तरुणीला चोरट्यांनी काही पैसे दिले.
गोळीबाराच्या घटनेनंतर आरोपी तेथून पसार झाला आहे. हल्लेखोर आणि हत्येमागचे कारण अद्याप समजू शकले नाही.
पुणे : बिबट्याची शिकार करून अवयव खडकवासला धरणालगत मांडवी बुद्रुक येथील फार्महाऊसमध्ये लपवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वन विभागाने छापा टाकून बिबट्याच्या नखांसह पंजा जप्त केला आहे.
धुळे शहरातील पारोळा रोड परिसरातील 'पंजाबी सॉ मिल' येथे पहाटेच्या सुमारास अज्ञातांनी दरोडा टाकला आहे. दरोडेखोरांनी मिल मालकाच्या डोक्याला बंदूक लावून आणि शस्त्रांचा धाक दाखवून हा दरोडा टाकला आहे. याप्रकरणी 'पंजाबी सॉ मिल'चे मालक विनोद भसीन यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
सांगली: शिराळा येथे आज नागप्रतिमेची पूजा करून नागपंचमी साजरी करण्यात आली. या सणाच्या निमित्ताने शिराळा व परिसरात जिवंत सर्पाची हाताळणी होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी वन विभागाने १२ फिरती गस्ती पथके तैनात केली होती.
सांगली : शर्यतीसाठी कायम उपलब्ध असावी यासाठी घोडींचा प्रजनन मार्गच तांब्याच्या तारेने शिवण्याचे तीन धक्कादायक प्रकार सांगलीत उघडकीस आले असून या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे : राज्यात तलाठी पदासाठीच्या भरती प्रक्रियेतील परीक्षा १७ ऑगस्टपासून सुरू झाली. ही परीक्षा १४ सप्टेंबरपर्यंत असणार आहे. मात्र सोमवारी अनेक जिल्ह्यांत सकाळच्या सत्रातील परीक्षा केंद्रावर ‘सर्व्हर’ बंद पडल्याने परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली.
अमरावती : राज्यभरात तलाठी भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन परीक्षा सुरु आहे. परंतु अमरावतीमध्ये सोमवारी या परीक्षेच्या दरम्यान परीक्षार्थींची चांगलाच गोंधळ उडाला. सकाळी ९ ते ११ या परीक्षेची वेळ असताना देखील सर्व्हर डाऊनमुळे वेळेत परीक्षा सुरु होऊ शकली नाही.
डोंबिवली: येथील एका शुभ मंगल कार्यालयातील विशेष कक्षातील एका पिशवीतील ७० हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज चोरणाऱ्या मालाड, नालासोपारा येथील दोन मेकअप आर्टिस्टना रामनगर पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे.
नागपूर : अपघाताच्या घटनांमुळे वादग्रस्त ठरलेला नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग सध्या वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आहे. तरुण-तरुणी समाजमाध्यमांवर टाकण्यासाठी समृद्धी महामार्गावर ‘रिल्स’ तयार करीत आहेत. मात्र आता असे करणे त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. त्यांना यासाठी तरुंगवासही भोगावा लागू शकतो.
नागपूर : जलालखेड्याच्या ठाणेदाराने भरधाव कार चालवून एका दुचाकीस्वाराला धडक दिली. त्यात दुचाकीस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी कोंढाली रोडवर घडली. शांताराम गोविंद चन्ने (४८, शनिवारपेठ, कोंढाली) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. तर मनोज चौधरी असे आरोपी कारचालक पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.
मुंबई : टोमॅटो, कांदा दरवाढीला केंद्र सरकारने हस्तक्षेप करून लगाम घातला असला तरी तूर-उडीद डाळीच्या दरवाढीकडे मात्र साफ दुर्लक्ष केले आहे. राज्य सरकारही स्वस्त डाळ पुरवठ्याबाबत उदासीन असल्याने जनतेला मात्र महागाईला तोंड द्यावे लागत आहे.
पिंपरी : पुण्यात आंतकवाद्यांची मोठी लिंक सापडली आहे. या लिंकमुळे आपल्याला हादरा बसेल. त्याचे धागेदोरे खूप लांबपर्यंत आहेत. ते कुठे-कुठे चालले आहेत, हे मी जाहीरपणे बोलू शकत नसल्याचे सांगत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील गुन्हेगारीबाबत भीतीदायक भाष्य केले.
नागपूर: राष्ट्रीय आदिम कृती समितीची बैठक नुकतीच झाली. याप्रसंगी हलबा जमातीच्या जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्रासह इतरही विषयावर चर्चा झाली. हे प्रश्न सोडवण्यासाठी नागपुरातील हिवाळी अधिवेशनात हलबा जमातीचा मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
पुणे : असियान देशांशी व्यापार वाढविण्यासाठी असियान व्यापार परिषदेचे नुकतेच आयोजन करण्यात आले. या निमित्ताने पुण्यातील भारतीय असियान व्यापार परिषदेच्या कार्यालयाचे उद्धाटन करण्यात आले असून, व्यापार आयुक्तपदी पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक डॉ. सचिन मधुकर काटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेना (शिंदे गट) खासदार प्रतापराव जाधव यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचा मोठा गट महायुतीत सामील होणार असल्याचं म्हटलं आहे. वरिष्ठ लोकांना डावलून विजय वडेट्टीवार यांच्यासारख्या कनिष्ठ (ज्युनिअर) माणसाला विरोधी पक्षनेतेपद दिल्याने काँग्रेसमधील सगळे वरिष्ठ नेते अतिशय अस्वस्थ झाले आहेत. महाराष्ट्रातला काँग्रेस पक्ष मोठ्या प्रमाणात महायुतीत सहभागी होईल, असं वक्तव्य प्रतापराव जाधव यांनी केलं. खासदार जाधवांच्या या वक्तव्यावर काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी प्रतिक्रिया दिली. "गद्दारांना सर्वच गद्दार दिसतात. त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की, काँग्रेसमधील सर्व लोक तुमच्याकडे येतील. गद्दारांना सर्वच गद्दार दिसत असले तरी कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही" असा टोला अतुल लोंढे यांनी लगावला.
पोलीस आयुक्त विनायकुमार चौबे यांची पत्नी सत्कार सोहळ्यासाठी यावी, यासाठी आयोजकांनी प्रयत्न करायला पाहिजे होते;पण प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे त्या उपस्थित नाहीत. यापुढे पोलीस आयुक्तांना पत्नीशिवाय कार्यक्रमाला येण्यासाठी परवानगी नाही, अशी प्रेमळ तंबी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आयुक्तांना दिली. सविस्तर वाचा…
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी रविवारी जाहीर केलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यसमितीत नागपूरचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री नितीन राऊत यांचा समावेश नसल्याने आश्चर्य वर्तवले जात आहे. विशेष म्हणजे राऊत हे खरगे यांचे निकटवर्तीय मानले जातात.
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक स्थगित केल्यामुळे विद्यार्थी संघटनांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. नियोजित वेळापत्रकानुसार आज सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्ज छाननीचा दिवस असल्यामुळे ठाकरे गटाच्या युवा सेनेचे सर्व १० उमेदवार मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट संकुलात दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्जांची छाननी करण्यासाठी त्यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रभारी उपकुलसचिव विकास डवरे यांच्या कार्यालयाला घेराव घेतला आहे.
पिंपरी : महापालिकेच्या हद्दी लगत आणि विकासापासून वंचित असलेल्या हिंजवडी, माण, मारुंजी, जांबे, नेरे, सांगवडे, गहुंजे या सात गावांचा पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात समावेश करण्याची मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. त्यामुळे ही गावे लवकरच पालिकेत येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
धुळे - बंदुकीचा आणि चॉपरचा धाक दाखवून शहरातील एका घरावर सशस्र दरोडा टाकण्यात आला. दरोडेखोरांनी सोन्याच्या दागिन्यांसह लाखो रुपये रोख हिसकावून नेले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धुळे शहरातील पारोळा रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाठीमागे पंजाबी टिंबर मार्ट आहे.
कल्याण: कल्याण परिसरात दहशत निर्माण करुन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारा आणि विविध पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल असलेला खतरनाक गुंड साजीद उर्फ शानू मोहमद अकील शेख (२५, रा. बेतुरकरपाडा, भिकू भय्या चाळ) याला महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अटक करुन त्याला पुणे येथील येरवडा तुरुंगात एक वर्षासाठी स्थानबध्द केले.
कल्याण – प्रवाशांकडून नेहमीच वाढीव भाडे घ्यायचे. कमी भाडे स्वीकारून प्रवासी सेवा द्यायची नाही, अशा इराद्याने कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात काही रिक्षाचालक प्रवासी वाहतूक करतात. यामध्ये प्रवाशांची लूट करतात. रविवारी एका रिक्षाचालकाने प्रवाशाकडून कमी भाडे आकारून त्याला इच्छिच स्थळी पोहोचविले. त्याचा राग येऊन इतर चार रिक्षाचालकांनी कमी भाड्यात प्रवासी सेवा देणाऱ्या एका रिक्षाचालकाला बेदम मारहाण केली.
तलाठी परीक्षेसाठीचं सर्व्हर डाऊन झाल्यामुळे राज्यभरात लाखो विद्यार्थी परीक्षा केंद्राबाहेर उभे आहेत. परीक्षार्थी विद्यार्थ्यांकडून एक हजार रुपये परीक्षा शुल्क घ्यायचं आणि परीक्षेसाठी फक्त चारच केंद्रे उभारायची. यामुळे मुलांना प्रचंड पायपीट करावी लागली आहे. याची या सरकारला लाज वाटायला हवी होती. प्रत्येक जिल्ह्यामध्ये परीक्षा केंद्र उभारली असती तर असा गोंधळ झाला नसता. आजची परिक्षा जर रद्द झाली तर विद्यार्थ्यांच्या राहण्याचा आणि येण्या-जाण्याचा खर्च सरकारने करावा. परिक्षा शुल्काचे पैसे कोणाच्या खात्यात जात आहेत? असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विचारला.
केंद्र सरकारने आठ वर्षापूर्वी नागपूरसाठी घोषित केलेल्या व अद्याप प्रलंबित असलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च इन्सिट्यूट अर्थात ‘नायपर’ (एनआयपीईआर) बाबत नुकत्यात झालेल्या संसदेच्या अधिवेशनात याबाबत केंद्राने काहीच तपशील न दिल्याने इन्स्टिट्यूट नागपूरला होण्याबाबत पुन्हा एकदा अनिश्चितता निर्माण झाली आहे. सविस्तर वाचा
नर्सिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करून रुग्णांची सेवा करू पाहणाऱ्या विद्यार्थिनींचे स्वप्न शहरातील अरोमिरा नर्सिंग कॉलेजमुळे भंग झाले आहे. या महाविद्यालयाने विद्यार्थिनींनीचीच नव्हे तर इंडियन नर्सिंग काऊन्सिलचीही फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती आता समोर येत आहे. सविस्तर वाचा
शाळा-शाळांमधून, वर्गावर्गांतून पिढ्या आणि राष्ट्राचे भविष्य घडवणारा म्हणजे शिक्षक. मात्र, एकविसाव्या शतकात शिक्षकाची ही व्याख्याच बदलल्याचे चित्र आहे. सविस्तर वाचा
नर्सिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करून रुग्णांची सेवा करू पाहणाऱ्या विद्यार्थिनींचे स्वप्न शहरातील अरोमिरा नर्सिंग कॉलेजमुळे भंग झाले आहे. या महाविद्यालयाने विद्यार्थिनींनीचीच नव्हे तर इंडियन नर्सिंग काऊन्सिलचीही फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती आता समोर येत आहे. सविस्तर वाचा
पिंपरी- चिंचवड आणि पुणे परिसरामध्ये ड्रग्सच प्रमाण वाढत आहे. त्यामुळे तरुण मुलं याच्या आहारी जात आहेत. यावर आळा घालण्याचं आवाहन पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेनं जाणारा कंटेनर विरुद्ध बाजुच्या लेनवर पलटी झाल्याने पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे.