Mumbai News Today: महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने राजकीय उलथापालथ होताना दिसत आहे. दरम्यान, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे. निवडणुका जिंकण्यासाठी राम मंदिराच्या उद्घाटनानंतर भाजपाकडून देशात दंगली घडवल्या जातील, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. यावर आता राजकीय मंडळींकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. दुसरीकडे, शरद पवारांचे अत्यंत विश्वास सहकारी दिलीप वळसे पाटील यांनीच शरद पवारांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. शरद पवार यांना एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री होता आलं नाही. आपल्याकडं शरद पवारांसारखे उत्तुंग नेते असताना आपले फक्त ६० ते ७० आमदार निवडून येतात, अशी टीका दिलीप वळसे-पाटील यांनी केली. यावरही राजकीय नेते प्रतिक्रिया देत आहेत. शिवाय गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसानं दडी मारली आहे. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. यासह राज्यातील अनेक महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra Latest News Today: महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक आणि हवामानासंदर्भातील ताज्या घडामोडी वाचा!
यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिला व राहुल गांधी यांच्या भेटीमुळे चर्चेत आलेल्या कलावती यांनी रविवारी काँग्रेसच्या कार्यक्रमात सहभागी होत केंद्रीय मंत्री अमित शहा यांना खडे बोल सुनावले. सविस्तर वाचा
मुंबई – प्लास्टिकच्या पिशव्या व वस्तूंविरोधातील थंडावलेल्या कारवाईला आता पुन्हा एकदा वेग येणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनेनुसार मुंबई महापालिकेने पुन्हा या कारवाईसाठी पथके तयार केली आहेत. या पथकात पोलीस आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यांचाही समावेश राहणार असून सोमवारी २१ ऑगस्टपासून दंडात्मक कारवाईला सुरुवात होणार आहे. या कारवाईत ग्राहकांवरही पथकाची नजर राहणार आहे.
????
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 21, 2023
?8.15am JST | ?4.45am IST
21-8-2023 ?Narita International Airport, Japan.
Landed in the ‘Land of the Rising Sun’ Japan, a while ago!
काही वेळापूर्वी ‘द लॅंड ऑफ राइजिंग सन’ जपान येथे पोहोचलो.
कुछ क्षण पहले ‘द लॅंड ऑफ राइजिंग सन’ जापान में आगमन।@IndianEmbTokyo… pic.twitter.com/vr4Hk44QsZ
शहीदांची आष्टी म्हणून इतिहासात अजरामर झालेल्या आष्टीत दरवर्षी नागपंचमीस शहीद दिन साजरा केल्या जातो. या पावन भूमीचे जतन करण्याहेतूने या क्रांतीस्थळास स्फूर्ती स्थळाचा दर्जा मिळावा म्हणून अनेक वर्षापासून प्रयत्न सुरू होते. सविस्तर वाचा…
यशोमती ठाकूर आणि प्रणिती शिंदे या दोन्ही आमदारांना काँग्रेस कार्यकारी समितीत मिळालेले स्थान किंवा वर्षा गायकवाड यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी झालेली नियुक्ती यातून काँग्रेसने राज्यातील महिला नेत्यांकडे महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे.
अमरावती: देशभरात टोमॅटोंपाठोपाठ कांद्याच्या दरामध्येही वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्र सरकारने शनिवारी कांदा निर्यातीवर ३१ डिसेंबरपर्यंत ४० टक्के शुल्क लादण्याचा निर्णय घेतला.
चंद्रपूर: भाजप मुख्यमंत्री पदावरून नकळत दूर करेल याची कल्पना एकनाथ शिंदे यांना आहे. त्यामुळे ते झोपेत स्वप्नात देखील मुख्यमंत्री पदाची खुर्ची पकडुन झोपतात, असा टोला राज्याचे विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी लावला.
नागपूर: शहरालगत असलेल्या झुडपी जंगल क्षेत्रात मानवी वस्तीचा हस्तक्षेप अधिक वाढल्याने साप निघण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे.
पुणे : येरवड्यात टोळक्याने कोयते उगारून दहशत माजविल्याची घटना घडली. तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
नागपूर: तलाठी भरतीची परीक्षा १७ ऑगस्ट पासून सकाळी सुरू झाली. मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पेपर फुटल्याची चर्चा राज्यभर सुरू आहे.
वर्धा : गावातील लोकांना दोन वाणी चांगलेच परिचयाचे असतात. एक किराणा माल विकणारा वाणी तर दुसरा शेतात धुडगूस घालणारा वाणी. उधारीत थोडीफार लूट करणारा वाणी बरा, पण शेतातील पिकाची नासधूस करणारा वाणी पिटाळून लावलेला बरा, अशी मानसिकता असते. सर्वांना परिचित असा हा किडा वाणी किंवा पैसा म्हणून ओळखल्या जातो. त्याला मिलीपिड असे शास्त्रीय नाव आहे.
पुणे : अल्पवयीन मुलाला धमकावून त्याच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी एका तरुणीविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अल्पवयीन मुलाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार एका २८ वर्षीय तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तरुणीविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोस्को) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपूर : भारतीय जनता पक्षाच्या महिला नेत्या सना खान यांना तथाकथित पती अमित शाहू हा महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील अनेक राजकीय नेत्यांकडे आणि पदाधिकाऱ्यांकडे शारीरिक संबंधासाठी पाठवत होता. त्यांच्या शारीरिक संबंधाच्या चित्रफिती आणि अश्लील छायाचित्र काढण्यात येत होते. अश्लील चित्रफितीचा धाक दाखवून अमित लाखो रुपये उकळत होता, असा आरोप ठेवत मानकापूर पोलीस ठाण्यात नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रपूर : आगामी लोकसभा निवडणुकीत ओबीसी व दलित समाजाची मते भाजपाकडे आकर्षित करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘घर चलो अभियाना’ची सुरुवात रिपाइंचे ज्येष्ठ नेते व्ही.डी. मेश्राम व कुणबी समाजाचे अध्यक्ष ॲड. पुरुषोत्तम सातपुते यांच्या घरून केली.
अकोला : सापांविषयीचा गैरसमज, अंधविश्वास दूर होऊन त्यांच्या रक्षणासह समाजात जनजागृती करण्याचे अनमोल कार्य अकोल्यातील ज्येष्ठ सर्पमित्र बाळ काळणे गत अडीच दशकांपासून करीत आहेत.
मुंबई : अंधेरी (पश्चिम) ते मंडाले मेट्रो २ ब मार्गिकेतील महत्त्वाचा आणि आव्हानात्मक टप्पा अखेर नुकताच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) यशस्वीपणे पूर्ण केला आहे. मेट्रो २ ब मार्गिका चेंबूरनाका येथे मोनोरेल मार्गिकेला ओलांडून पुढे जाणार आहे. तेव्हा मोनोरेल मार्गिका ओलांडून मेट्रो मार्गिका पुढे नेण्यासाठीच्या १५७ टनाच्या गर्डरची (तुळई) यशस्वी उभारणी करण्यात आली आहे.
राजनांदगाव जिल्ह्यात एका महिला आमदारावर चाकूहल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित महिला आमदार रविवारी एका भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला गेल्या होत्या. दरम्यान, व्यासपीठावर अचानक आलेल्या एका युवकाने त्यांच्यावर चाकुने हल्ला केला.
राम मंदिराच्या उद्घाटनानंतर दंगली घडवल्या जातील, असं वक्तव्य महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. यावरून ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी भारतीय जनता पार्टीवर गंभीर आरोप केला आहे.
“वळसे-पाटील जे काही बोलले, त्याबद्दल काही वाईट वाटत नाही. पण शरद पवारांसाठी मात्र खूप वाईट वाटलं. अनेकांना सर्व काही देऊनही शरद पवार मात्र कायमच रीते राहिले. बरं झालं शरद पवारांविषयी यांच्या मनातील विष बाहेर पडत आहे. हे महाराष्ट्र विसरणार नाही. क्षमा करणार नाही. आंबेगाव त्यांना नक्की धडा शिकवेल”, असं जितेंद्र आव्हाड ट्वीटमध्ये म्हणाले.