Maharashtra Political News Update, 30 June 2023 : राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत गौप्यस्फोट केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांबरोबर बैठक झाल्यानंतर सरकार स्थापनेचा निर्णय झाल्याचा दावा फडणवीसांनी केला. यानंतर पवारांनी आमचा पाठिंबा होता, तर दोन दिवसात सरकार का पडलं असा प्रतिसवाल केला. यावरून आता मविआ आणि भाजपा-शिंदे गटात शाब्दिक युद्ध सुरू आहे. दुसरीकडे केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याची आणि शिंदे गटाच्या काही नेत्यांना संधी मिळणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे त्या पार्श्वभूमीवरही राजकीय घडामोडींना वेग आलेला दिसत आहे. एकूणच राज्यातील राजकारणासह दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींच्या अपडेट्स एका क्लिकवर…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Marathi News Today : राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणासह दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींच्या अपडेट्स एका क्लिकवर…

19:44 (IST) 30 Jun 2023
“…तेव्हा शरद पवारांनी भाजपाबरोबर येऊन सरकार स्थापन केलं”, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल

शरद पवार गुगली टाकली असं म्हणतात. सत्तेसाठी सरकार पाडलं असं म्हणतात. असं असेल तर पवारांनी वसंतदादा पाटील यांचा काळ आठवावा. त्यावेळी शरद पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडत एस काँग्रेस स्थापन केली आणि भाजपाबरोबर येऊन सरकार स्थापन केलं. त्यांच्या पक्षात ५५ खासदार होते. ५५ गेले आणि पाचवर येऊन अडकले होते.

भाजपाने अनेक वर्षे विनासत्ता देशात राजकारण केलं. मी स्वतः २८ वर्षे आमदार, खासदार होतो, पण सरकारमध्ये नव्हतो. आम्हाला सत्तेची बिलकुल लालसा नाही. मात्र, लोकांनी आम्हाला सरकारमध्ये जाण्यासाठी निवडून दिलं असताना आमच्याशी दगाफटका करण्यात आला. ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सरकार स्थापन केलं. आम्ही काहीही चूक केलं नाही. लोकांनी ज्या शिवसेनेला मतदान केलं, त्या शिवसेनेबरोबर आम्ही सरकार स्थापन केलं. त्यामुळे त्यांचं म्हणणं निराशेपोटी आहे.

– रावसाहेब दानवे (केंद्रीय मंत्री)

19:38 (IST) 30 Jun 2023
बाजारात मक्याच्या हंगामाला विलंब

नवी मुंबई: वाशीतील एपीएमसी बाजारात वर्षभर मक्याच्या पिवळ्या कणसांचा हंगाम सुरू असतो. पावसाळा सुरू होताच चवीला उत्तम असलेला गावरान पांढरा मका कणीस दाखल होण्यास सुरुवात होत असते.

सविस्तर वाचा…

19:03 (IST) 30 Jun 2023
उलट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करा; यार्डातील आंदोलनानंतर मनसे आक्रमक

अंबरनाथ: अंबरनाथ रेल्वे यार्डात लोकल प्रवेशावरून प्रवासी आणि रेल्वे प्रशासनात संघर्ष झाल्यानंतर प्रवाशांनी उलट प्रवास करून जागा अडवणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली होती.

सविस्तर वाचा…

18:52 (IST) 30 Jun 2023
गोंदिया: नवेगावबांध जवाहर नवोदय विद्यालयात ग्रामीण विद्यार्थ्यांना डावलले! प्रवेश यादीत शहरातील विद्यार्थ्यांची नावे

गोंदिया: गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध जवाहर नवोदय विद्यालय निवड प्रक्रिया एप्रिल २०२३ मध्ये करण्यात आली असून, त्याची अंतिम यादी नुकतीच प्रसिद्ध झाली.

सविस्तर वाचा…

18:43 (IST) 30 Jun 2023
शंभरावे नाट्यसंमेलन पुढील वर्षी मार्च महिन्यात…

मुंबई: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे १०० वे नाट्यसंमेलन पुढील वर्षी मार्च महिन्यात होणार आहे.

सविस्तर वाचा…

18:20 (IST) 30 Jun 2023
नाशिकचा गुलशनाबाद उल्लेख करण्यामागे खोडसाळ प्रवृत्ती; कारवाईचे पालकमंत्री दादा भुसे यांचे संकेत

नाशिक – बकरी ईदनिमित्त शहरात लागलेल्या एका शुभेच्छा फलकावर नाशिकऐवजी जाणीवपूर्वक झालेला गुलशनाबादचा उल्लेख चुकीचा आहे. कोणी खोडसाळ प्रवृत्ती डोके वर काढत असून संबंधितांवर पोलीस कारवाई करतील, असे पालकमंत्री दादा भुसे यांनी संकेत दिले.

सविस्तर वाचा…

18:11 (IST) 30 Jun 2023
‘गोकुळ’ दूध संघात अनियमितता आढळल्याने कारवाई करण्याचा दुग्धविकास मंत्री विखे पाटील यांचा इशारा

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या लेखापरीक्षणात अनियमितता आढळली आहे. संघाला खुलासा करण्याचे आदेश दिले असून त्याचा अहवाल राज्य सरकारला प्राप्त झालेला नाही. लेखापरीक्षणात अनियमितता स्पष्ट झाल्यानंतर गोकुळ वर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महसूल तथा दूध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिला.

वाचा सविस्तर…

18:07 (IST) 30 Jun 2023
सोलापूर : अक्कलकोटजवळ रस्ते अपघातात सहा भाविकांचा मृत्यू; सात जखमी

सोलापूर : अक्कलकोटजवळ भीषण रस्ते अपघातात दोन वाहनांची धडक बसून सहाजणांचा जागीच मृत्यू झाला. तर सातजण जखमी झाले. दुपारी चारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. देवदर्शन करून कर्नाटकात गावी परत जाताना भाविकांवर काळाने घाला घातला.

सविस्तर वाचा…

17:57 (IST) 30 Jun 2023
गोंदिया : चालकाचा ताबा सुटला अन् वाहन शेतात कोसळले, अपघातात ३३ महिला जखमी

गोंदिया : देवरी तालुक्यातील बोरगाव (डवकी) येथून रोवणीच्या कामासाठी फुक्कीमेटा येथे सुमारे ३३ महिला मजुरांना वाहून नेणाऱ्या पिकअप वाहनाला अपघात झाल्याने महिला मजूर जखमी झाल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास देवरीजवळील डवकी गावाजवळ घडली.

वाचा सविस्तर…

17:52 (IST) 30 Jun 2023
आर्थिक मागास महामंडळास मुंबईत जागा नाही; चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली खंत

वर्धा: आर्थिकदृष्ट्या मागासवर्गासाठी कार्यरत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या मुंबईतील मुख्यालयास राज्याचे उच्च शिक्षण मंत्री तसेच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट दिली.

सविस्तर वाचा…

17:46 (IST) 30 Jun 2023
सोलापूर : ‘त्या’ तरुणांना मुख्यमंत्र्यांकडून प्रत्येकी पाच लाखांचे बक्षीस

सोलापूर : पुण्यातील सदाशिव पेठेत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणीवर एकतर्फी प्रेमातून कोयत्याने हल्ला करणाऱ्या तरुणाला वेळीच पकडून त्या तरुणीचे प्राण वाचविणाऱ्या दोघा तरुणांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

सविस्तर वाचा…

17:30 (IST) 30 Jun 2023
मनमाड पोलिसांकडून ४५ जनावरे ताब्यात

मनमाड: शहरातील पांझण नदीपात्रालगत कत्तलीच्या उद्देशाने बांधण्यात आलेल्या पाच गाई, ३४ बैल अशी ३९ जनावरे तसेच मनमाड-मालेगाव राज्यमार्गावर वाहनातून सहा जनावरे अशी एकूण ४५ जनावरे पोलिसांनी ताब्यात घेतली.

सविस्तर वाचा…

17:23 (IST) 30 Jun 2023
“आमच्या लोकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होत आहे, कारण…”, कृषीमंत्री अब्दुल सत्तारांचं सूचक वक्तव्य

महाराष्ट्रभरातून तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे सर्व जिल्हाधिकारी, कृषी अधिकारी, ग्रामविकासचे सीईओ व पोलीस विभागांना आदेश देण्यात आले. यानुसार ज्या ज्या दुकानात आमचे तलाठी, ग्रामसेवक, कृषीसहाय्यक शासकीय दरापेक्षा अधिक दराने माल विकतात त्यांच्यावर कारवाई होईल. याचे परिणाम लवकरच महाराष्ट्रभर दिसतील.

गेल्या ५० वर्षात कधीही इतके छापे मारले गेले नाहीत. त्यामुळे काही लोक वेगळ्या भावनेने आमच्या लोकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु चार विभाग एकत्र केले. त्यामुळे एखाद्याला सहज बदनाम करता येतं. हे चारही विभाग एकत्र करून उद्यापासून कारवाया सुरू होतील.

अब्दुल सत्तार (कृषीमंत्री)

17:20 (IST) 30 Jun 2023
भारतीय महसूल अधिकारी सचिन सावंत अडचणीत का?

मुंबई : एका खासगी कंपनीच्या प्राप्तिकर रिटर्नशी जोडलेला मोबाईल क्रमांक हा भारतीय महसूल अधिकारी सचिन सावंत यांच्याशी जोडलेला असल्याचे आढळल्याने ते अडचणीत आल्याचा दावा केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) केला आहे.

सविस्तर वाचा…

17:17 (IST) 30 Jun 2023
नौपाडा-कोपरीत गढुळ पाण्याचा पुरवठा; पाणी उकळून आणि गाळून पिण्याचे पालिकेचे आवाहन

ठाणे: येथील नौपाडा, कोपरी, गांधीनगर, हाजुरी आणि लुईसवाडी भागात गढुळ पाण्याचा पुरवठा होत असून या पाण्याला दुर्गंधी येत असल्याने येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सविस्तर वाचा…

17:06 (IST) 30 Jun 2023
Photos : “…म्हणून मी लेशपालला आपल्या घरी निघून ये म्हणालो”, मुलाने तरुणीचा कोयता हल्ल्यात जीव वाचवल्यानंतर वडिलांची प्रतिक्रिया

पुण्यात कोयता हल्ल्यात तरुणीचा जीव वाचवणाऱ्या लेशपालचे वडील चांगदेव जवळगे यांनी पुण्यातील कोयता गँगचा उल्लेख करत मनातील भीती व्यक्त केली. ते नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा…

सविस्तर वाचा…

17:04 (IST) 30 Jun 2023
मोठी बातमी! शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार ठरलं, जाहीर करत उपमुख्यमंत्री म्हणाले…

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. आधी जूनमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होईल, असा दावा शिंदे गटाच्या नेत्यांकडून करण्यात आला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अनेकदा दिल्लीवाऱ्या झाल्या. मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय लांबणीवरच पडला. आता स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार हे जाहीर केलं आहे.

सविस्तर वाचा…

16:50 (IST) 30 Jun 2023
नाशिक : विम्यासाठी वाहनाचा अपघात होऊन मद्यसाठा चोरीस गेल्याचा बनाव; सहा संशयितांसह मुद्देमाल ताब्यात

नाशिक – मद्याच्या कंपनीतून वाहन चालकाने मद्यसाठ्याची परस्पर विक्री करून वाहन पुढे जाताना अपघात होऊन मद्यसाठ्याची तूटफूट झाल्याचा बनाव रचला. त्यातील मद्यसाठा चोरीला गेल्याचे भासवून पोलीस ठाण्यात खोटी तक्रार देऊन मोटार विमा कंपनीकडून आर्थिक मोबदला घेण्याचा बेत आखणाऱ्या सहा संशयितांसह राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ३२ लाख १८ हजार ७२० रुपयांचा चोरी गेलेला मद्यसाठा ताब्यात घेतला.

सविस्तर वाचा..

16:46 (IST) 30 Jun 2023
धुळे आरटीओ कार्यालयासाठी आदिवासींच्या जागेवर अतिक्रमण; मोर्चाव्दारे निषेध

धुळे: प्रादेशिक परिवहन विभागाने परवानगी न घेता आरटीओ कार्यालयासाठी आदिवासींच्या जागेवर अतिक्रमण केल्याचा आरोप करीत शुक्रवारी येथे रिपब्लिकन मजूर कामगार संघटनेतर्फे मोर्चा काढून निषेध करण्यात आला.

सविस्तर वाचा…

16:43 (IST) 30 Jun 2023
अल्पवयीन मुलीचा विनयभंग, बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

दहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबत बिर्याणी विक्रेत्याने अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी (ता.29) बोईसरच्या भैय्या पाडा भागात उघडकीस आला आहे.

वाचा सविस्तर…

16:36 (IST) 30 Jun 2023
पुणे : वानवडीत सोसायटीमध्ये जाऊन टोळक्याची दहशत; रहिवाशांना जीवे मारण्याची धमकी

पुणे : फुटबाॅल खेळताना झालेल्या वादातून टोळक्याने तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना वानवडी भागात घडली. या प्रकरणी सातजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघांना अटक करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा…

15:59 (IST) 30 Jun 2023
पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे साथीच्या आजाराचा धोका! ही घ्या काळजी

नागपूर: राज्याच्या बऱ्याच भागात सातत्याने कमी- अधिक पाऊस पडत आहे.

सविस्तर वाचा…

15:56 (IST) 30 Jun 2023
बनावट वाहन क्रमांक वापरुन फिरणाऱ्या वसईतील चालकाला कल्याणमध्ये अटक

कल्याण: बनावट वाहन क्रमांक वापरुन कल्याण परिसरात फिरून भिवंडीकडे जाणाऱ्या एका वाहन चालकाला बाजारपेठ पोलिसांनी शिताफिने गुरुवारी संध्याकाळी कोनगाव भागातून अटक केली.

सविस्तर वाचा…

15:50 (IST) 30 Jun 2023
विभागीय कार्यालय धुळ्यात होण्यासाठी राजकीय नेत्यांनी पक्षभेद विसरावेत – ठाकरे गटाचे आवाहन

धुळे – विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय धुळ्यात होण्यासाठी धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील नेत्यांनी पक्षीय जोडे बाजूला ठेवावेत, असे आवाहन ठाकरे गटाने केले आहे. शिष्ठमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन भावना व्यक्त केल्या आहेत.

सविस्तर वाचा…

15:34 (IST) 30 Jun 2023
भंडारा जिल्हावासीयांना भुरळ घालणारं एक ‘भुताचे झाड’; जाणून घ्या…

भंडारा : जंगल सफारी करताना अनेक जंगलांमध्ये आपण ‘घोस्ट ट्री’ अर्थात भुताचे झाड बघतो. पांढऱ्या सालीचे आक्राळविक्राळ झाड बघून मनात कुठेतरी भीतीही वाटू लागते. मात्र भंडारा जिल्ह्यात एक असे भुताचे झाड आहे ज्याने अनेकांना चक्क भुरळ घातली आहे. हो, पण हे ‘भुताचे झाड’ म्हणजे एक आगळावेगळा लघुचित्रपट.

सविस्तर वाचा…

15:33 (IST) 30 Jun 2023
नाशिकऐवजी गुलशनाबाद कोणाला प्रिय? शुभेच्छा फलकामुळे चर्चा

नाशिक – बकरी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी शहरातील सारडा सर्कल भागात लागलेल्या फलकावर गुलशनाबादचा उल्लेख असल्याचे समोर आल्याने इतर शहरांप्रमाणे नामांतराचे लोण नाशिकमध्येही आले की काय, अशी चर्चा रंगली आहे. गुलशनाबाद कोणाला प्रिय, असा प्रश्नही केला जात आहे. हा फलक त्वरीत हटविला गेला. यानिमित्ताने गुलशनाबाद या नावामागे दडलेल्या नाशिकच्या इतिहासाला उजाळा मिळाला आहे.

सविस्तर वाचा…

14:55 (IST) 30 Jun 2023
रक्तमिश्रित पाणी नदीपात्रात, मालेगावात आंदोलन

मालेगाव : बकरी ईदनिमित्त कुर्बानी देताना जनावरांची कत्तल उघड्यावर न करता अधिकृत कत्तलखान्यांमध्येच करावी अन्यथा संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस आणि महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आला होता. मात्र या इशाऱ्याला न जुमानता येथे काही ठिकाणी जनावरांची उघड्यावर कत्तल झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

सविस्तर वाचा…

14:43 (IST) 30 Jun 2023
रेल्वे प्रवाशांसाठी खूषखबर! उत्तर भारतात जाण्यासाठी साप्ताहिक सुपरफास्ट गाड्या

पुणे : उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने साप्ताहिक सुपरफास्ट गाड्या सोडण्याची घोषणा केली आहे. पुणे ते झाशी ही साप्ताहिक विशेष गाडी ६ जुलै ते २८ सप्टेंबर या कालावधीत चालविली जाणार आहे.

सविस्तर वाचा..

14:27 (IST) 30 Jun 2023
कपाशीचे लवकर परिपक्व होणारे वाण वापरावे लागणार; कृषी विद्यापीठाकडून पीक नियोजनाच्या शिफारसी

अकोला: खरीप हंगामातील पेरणीवर पाऊस लांबणीचा गंभीर परिणाम झाला आहे. आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांना लवकर परिपक्व होणारे वाण वापरावे लागेल.

सविस्तर वाचा…

14:15 (IST) 30 Jun 2023
मॉडेलिंगची छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देऊन तरुणीवर बलात्कार; नाशिकमधील तरुण अटकेत

पुणे: माॅडेलिंगची छायाचित्रे समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी देऊन तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी एकास अटक केली आहे.

सविस्तर वाचा…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत गौप्यस्फोट केला. यानंतर त्यावर जोरदार राजकीय प्रतिक्रिया येत आहेत…