Maharashtra Political News Update, 30 June 2023 : राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत गौप्यस्फोट केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांबरोबर बैठक झाल्यानंतर सरकार स्थापनेचा निर्णय झाल्याचा दावा फडणवीसांनी केला. यानंतर पवारांनी आमचा पाठिंबा होता, तर दोन दिवसात सरकार का पडलं असा प्रतिसवाल केला. यावरून आता मविआ आणि भाजपा-शिंदे गटात शाब्दिक युद्ध सुरू आहे. दुसरीकडे केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याची आणि शिंदे गटाच्या काही नेत्यांना संधी मिळणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे त्या पार्श्वभूमीवरही राजकीय घडामोडींना वेग आलेला दिसत आहे. एकूणच राज्यातील राजकारणासह दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींच्या अपडेट्स एका क्लिकवर…

Live Updates

Marathi News Today : राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणासह दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींच्या अपडेट्स एका क्लिकवर…

14:03 (IST) 30 Jun 2023
रस्त्यांमध्ये लोंबकळणारी तोरणे, पताका दुचाकीस्वारांसाठी घातक; महापालिकेचे दुर्लक्ष

नागपूर : राजकीय, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने रस्त्यावरील विद्युत खांबांवर नायलॉनच्या दोरीत आलेली कागदी तोरणे, पताका कार्यक्रमानंतर काढली जात नाहीत. पावसाळ्यात ती लोंबकळत असून त्याला अडकून दुचाकीस्वारांना अपघात होण्याचा धोका आहे.

वाचा सविस्तर…

13:47 (IST) 30 Jun 2023
वृक्षांची कत्तल वा पुनर्रोपणाच्या सुनावणीसाठी आक्षेप आणि सूचना ऑनलाईन पद्धतीनेच, मुंबई महानगरपालिकेचा उद्यान विभाग अद्याप ‘करोना काळातच’

मुंबई : करोना संसर्गाची तिसरी लाट ओसरून बराच कालावधी लोटला असून मुंबईसह सर्वत्र दैनंदिन कारभार सुरळीत सुरू झाला आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेचा उद्यान विभाग आजही करोनाकाळातील अटी – शर्तींमध्येच रमला आहे.

सविस्तर वाचा…

13:35 (IST) 30 Jun 2023
प्रस्तावित Rope Way चा विषय आता जिल्हाधिकाऱ्यांकडे; वनमंत्र्यांच्या भूमिकेविषयी पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी

नाशिक: अंजनेरी येथील प्रस्तावित रोप वे विषयाचा चेंडू गुरुवारी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविल्याने पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

सविस्तर वाचा…

13:33 (IST) 30 Jun 2023
नाशिक : महसूल विभागातील लाचखोरी चर्चेत; डॉ. नीलेश अपार चौकशीचा तपास अकोल्यापर्यंत विस्तारणार

नाशिक – अकृषिक परवानगी न घेतल्याने बंद केलेली कंपनी पुन्हा सुरू करण्यासाठी ५० लाखांची लाच मागून तडजोडीअंती ४० लाखांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याच्या प्रकरणात दिंडोरीचे उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने चौकशी करण्यात आली.

सविस्तर वाचा…

13:22 (IST) 30 Jun 2023
शिंदे गट आणि भाजपमधील बेबनाव जनतेसमोर आला, शिंदे – फडणवीस सरकारची वर्षपूर्ती

मुंबई : शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदे हे भाजपच्या मदतीने मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले त्याला आज एक वर्ष पूर्ण झाले. शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रिपद सोपविल्याची भाजप नेत्यांमधील सल सततच जाणवली. भाजपच्या आक्रमक भूमिकेनंतर मुख्यमंत्री पुत्राचा राजीनाम्याचा इशारा तर जाहिरातीतून कुरापत काढल्याने भाजपची जाहीर नाराजी यातून शिंदे गट आणि भाजपमधील बेबनाव जनतेसमोर आला आहे.

सविस्तर वाचा…

13:12 (IST) 30 Jun 2023
नवजात शिशुंची दूध पेढी कमी संकलनामुळे संकटात; जिल्हा रुग्णालयासमोर आव्हान

नाशिक: नवजात शिशुसाठी आईचे दूध हे अमृत ठरते. बालकांच्या आरोग्यासाठी आईच्या दुधात पोषणमूल्य असतांना बऱ्याचदा या संजीवनीपासून बालकांना मुकावे लागते.

सविस्तर वाचा…

13:06 (IST) 30 Jun 2023
भाजपाचे महासंपर्क अभियान : पुण्यातील केरळी नागरिकांशी परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन साधणार उद्या संवाद

पुणे : भारतीय जनता पक्षाच्या महासंपर्क अभियानाच्या निमित्ताने दक्षिण भारतीय आणि विशेषतः पुण्यातील केरळी नागरिकांशी संवाद साधण्यासाठी परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन शनिवारी पुण्यात येणार आहेत. औंध येथील पंडित भीमसेन जोशी सभागृहात सायंकाळी हा स्नेहमीलनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

सविस्तर वाचा…

12:59 (IST) 30 Jun 2023
सांगली: दांपत्याची आत्महत्त्या

सांगली: तासगाव तालुक्यातील येळावी येथे तरुण दांपत्याने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडली.

सविस्तर वाचा…

12:58 (IST) 30 Jun 2023
‘MBA’ची प्रवेश प्रक्रिया सुरू; अर्जासाठी ‘ही’ आहे शेवटची मुदत

वर्धा: सीईटी कक्षाने एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी ७ जुलै पर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे.

सविस्तर वाचा…

12:57 (IST) 30 Jun 2023
NEET परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशाचे धडे मिळणार; अकोल्यात वैद्यकीय प्रवेशपूर्व मार्गदर्शन

अकोला: नीट परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेचे धडे देण्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा….

12:57 (IST) 30 Jun 2023
जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम; २६ जुलैपर्यंत करा अर्ज

पुणे: जिल्ह्यात जात पडताळणी समितीमार्फत २६ जुलैपर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा पुणे जिल्हा जात पडताळणी समिती अध्यक्ष डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी दिली.

सविस्तर वाचा…

12:55 (IST) 30 Jun 2023
गोंदिया : भाजी बाजारात चक्क ३० हजार रुपयांच्या टोमॅटोची चोरी

गोंदिया : भाजी बाजारात गुरुवारी रात्री चिल्लर विक्री करिता खरेदी करून ठेवलेला २० कॅरेट टोमॅटो आणि इलेक्ट्रॉनिक्स वजन काटा याची चोरी झाली आहे.

वाचा सविस्तर…

12:54 (IST) 30 Jun 2023
नागपूर : ५० रुपयांच्या नादात गमावले ३ लाख; सायबर गुन्हेगाराने दुकानदाराला गंडविले

नागपूर : ऑनलाईन टास्कमधून ५० रुपये मिळविण्याच्या नादात एका दुकानदाराने चक्क ३ लाख रुपये गमावले. एका लाईकसाठी ५० रुपये मिळतील असे आमिष सायबर गुन्हेगाराने दिले होते.

वाचा सविस्तर…

12:53 (IST) 30 Jun 2023
बांधकाम पूर्ण झालेले नसताना लोकार्पण हा जनतेचा अपमान; अतुल खोब्रागडेंच्या नेतृत्वाखाली सिनियर सिटीझन फोरमची निदर्शने

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘कन्व्हेंशन सेंटर’चे बांधकाम पूर्ण झालेले नसताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले असा आरोप करत अतुल खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखाली सिनियर सिटीझन फोरमने गुरुवारी निदर्शने केली.

वाचा सविस्तर…

<a href="https://www.facebook.com/LoksattaLive?__cft__%5B0%5D=AZWnizku-igESwjN_tW2Zx2iq738I5fa11dSCUpI8bAH_2Z_NX3a_K5J3Ib-J5dQ1ik9QO3avwAfYk841n9vWszZt58SoTBMNOgIR9J56bCcGur1W0J9-a8BU1qldOYSUEU&__tn__=H-R?age”>

12:46 (IST) 30 Jun 2023
राज्यातील सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी? देवेंद्र फडणवीसांनी केलं जाहीर, म्हणाले…

राज्याचे अनेक प्रश्न असतात. त्यासंदर्भात दिल्लीला जाऊन भेट घ्यावी लागते, त्याचा पाठपुरावा करावा लागतो. अनेकवेळा त्यासंदर्भातील बैठकाही असतात. आम्हाला मंत्रिमंडळ विस्तारही करायचा आहेच. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याबाबत निर्णय घेतीलच. मला वाटतं जुलै महिन्यात आम्ही विस्तार करू.

– देवेंद्र फडणवीस (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र)

12:44 (IST) 30 Jun 2023
मेट्रोमुळे पुण्याला पूरस्थितीचा धोका? पाटबंधारे विभागाकडून पाहणी सुरू

पुणे : मुठा नदीपात्रात मेट्रोच्या कामासाठी अनेक ठिकाणी मुरूम आणि मातीचे भराव टाकण्यात आले आहेत. याचबरोबर नदीपात्रात मेट्रोच्या कामाचे साहित्य मोठ्या प्रमाणात पडून आहे. पावसाळ्याआधी नदीपात्र मोकळे न केल्यास गंभीर पूरस्थिती उद्भवण्याचा धोका आहे.

सविस्तर वाचा…

12:42 (IST) 30 Jun 2023
पुणे : ‘बीआरटी’ मार्ग बंद करण्यावरून ‘राष्ट्रवादी’च्या खासदार-आमदारांमध्ये विसंवाद

पुणे : नगर ररस्त्यावरील बीआरटी मार्ग काढण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि खासदार यांच्यातील विसंवाद पुढे आला आहे. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील टिंगरे यांच्या पाठपुराव्यानंतर महापालिका प्रशासनाने नगर रस्ता बीआरटी मार्ग काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या राज्यसभेच्या खासदार ॲड. वंदना चव्हाण यांनी या निर्णयाला विरोध दर्शविला आहे.

सविस्तर वाचा…

12:40 (IST) 30 Jun 2023
जळगाव : पोलीस वाहनावर चिंचेचे झाड कोसळून सहायक निरीक्षकांसह कर्मचार्‍याचा मृत्यू, एरंडोल तालुक्यातील दुर्घटना

जळगाव – एरंडोल- मेहुणबारे (ता. चाळीसगाव) येथे तपासासाठी गेलेल्या आर्थिक गुन्हे शाखेच्या शासकीय वाहनावर जीर्ण झालेले चिंचेचे झाड कोसळल्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेच्या सहायक पोलीस निरीक्षकासह एका पोलीस कर्मचार्‍याचा जागीच मृत्यू झाला, तर तीन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले.

सविस्तर वाचा..

12:40 (IST) 30 Jun 2023
शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी नियोजन करावे; धुळे जिल्हाधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांना सूचना

धुळे – शासन आपल्या दारी अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत १० जुलै रोजी धुळे येथे कार्यक्रम नियोजित असून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक विभागाने नियोजन करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केली आहे.

सविस्तर वाचा…

12:39 (IST) 30 Jun 2023
राज्य सरकारने वर्षभरात पुण्याला काय दिले? घोषणांचा सुकाळ, अंमलबजावणीचा दुष्काळ!

पुणे : भाजपा-शिवसेना शिंदे गटाचे सरकार सत्तेवर येऊन आज (३० जून) वर्ष झाले. सत्तांतरानंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहरातील नागरिकांना वर्षभरात काय मिळाले, असा प्रश्न दोन्ही शहरांतील नागरिकांना पडला आहे. घोषणांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दुष्काळ, अशी स्थिती दोन्ही शहरांची झाली आहे.

सविस्तर वाचा..

12:38 (IST) 30 Jun 2023
मुंबई : पडझडीच्या घटनांमध्ये दीड वर्षाच्या बालकासह दोघांचा मृत्यू

मुंबई : मुंबईत गुरुवारी झालेल्या पडझडीच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला. दहिसरमधील दुर्घटनेत एका दीड वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला, तर कांदिवली येथे एका ३५ वर्षाच्या तरुणाला प्राण गमवावे लागले.

सविस्तर वाचा..

12:37 (IST) 30 Jun 2023
विश्लेषण : ‘डब्बा ट्रेडिंग’ म्हणजे काय? त्यावर कायदेशीर बंदी का?

समाजमाध्यमांवरील उपयोजनांचा (अ‍ॅप्लिकेशन्स) वापर करून शेअर मार्केटमधील निर्देशांकाच्या चढउतारावर डब्बा ट्रेडिंगचा बेकायदा उद्योग करणारी साखळी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उघडकीस आणली असून याप्रकरणी तीन शेअर दलालांना अटक करण्यात आली. आरोपींकडे सापडलेल्या नोंदींवरून त्यांनी मूडी एक्सचेंज नावाच्या अ‍ॅपद्वारे डब्बा ट्रेडिंगची सोय केली होती. हे अ‍ॅप गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. मार्च ते जून या चार महिन्यांच्या कालावधीत सुमारे ४,६७२ कोटी रुपयांची उलाढाल केल्याचे निष्पन्न झाले आहे. डब्बा ट्रेडिंग हे बेकायदेशीर अजून त्यासाठी शिक्षेची तरतूद देखील करण्यात आली आहे. डब्बा ट्रेडिंगमुळे सरकारचा महसूल बुडतोच मात्र त्याद्वारे सामान्य गुंतवणूकदारांची देखील मोठी फसवणूक शक्य आहे. राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात एनएसईने गुंतवणूकदारांना 'डब्बा ट्रेडिंग' आणि त्या संबंधित व्यापाऱ्यांपासून दूर राहण्यासाठी वेळोवेळी सूचना केली आहे.

सविस्तर वाचा…

12:35 (IST) 30 Jun 2023
विश्लेषण : काळ्या बिबट्यांची संख्या का वाढत आहे विदर्भातील व्याघ्रप्रकल्पांत?

काळ्या बिबट्यांचे आकर्षण वाढतेय, कारण त्यांची संख्याही वाढत चालली आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प खरे तर वाघांसाठी प्रसिद्ध, पण येथेही चार काळे बिबटे आहेत. पर्यटकांना वाघांइतकीच उत्सुकता या बिबट्यांबाबतही आहे. पेंच व्याघ्रप्रकल्पातही काळ्या बिबट्या आढला होता आणि अलीकडेच काही महिन्यांपूर्वी नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पात या बिबट्याची शिकार करण्यात आली. मात्र, गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात या काळ्या बिबट्यांनी पर्यटकांना ओढ लावली आहे.

सविस्तर वाचा…

12:33 (IST) 30 Jun 2023
“मुलीला कोयता हल्ल्यातून वाचवलं याचा अभिमान, पण धाकधुकही, कारण…”, लेशपाल जवळगेच्या वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले…

पुण्यात भरदिवसा एका माथेफिरूने एकतर्फी प्रेमातून तरुणीवर कोयत्याने हल्ला केला. यावेळी अनेकांनी बघ्याची भूमिका घेतलेली असताना लेशपाल जवळगे या तरुणाने हल्लेखोराला रोखत तरुणीचा जीव वाचवला. यानंतर त्याचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. अशातच आता लेशपालचे वडील चांगदेव जवळगे यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली. यात त्यांनी मुलाने त्या तरूणीचा जीव वाचवला याचा अभिमान वाटतो, मात्र मनात त्याला काही व्हायला नको अशी धाकधुकही असल्याची भावना व्यक्त केली. ते आढेगावमध्ये एका स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.

सविस्तर वाचा…

12:32 (IST) 30 Jun 2023
विश्लेषण : कृत्रिम स्वीटनरमुळे होतो कर्करोग? जागतिक आरोग्य संघटनेकडून लवकरच बंदी?

काही अन्नपदार्थांमध्ये साखरेला पर्याय म्हणून ‘ॲस्पारटेम’ हा रासायनिक पदार्थ वापरला जातो. मात्र ॲस्पारटेम या पदार्थामुळे कर्करोग होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) स्वीटनर म्हणून वापरला जाणारा हा पदार्थ कर्करोगकारी पदार्थ म्हणून घोषित करण्याची शक्यता आहे. मुख्यत: शीतपेये, च्युईंगम, आइसक्रीम या पदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या ॲस्पारटेमवर डब्ल्यूएचओ बंदी घालण्याचीही शक्यता आहे.

सविस्तर वाचा…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत गौप्यस्फोट केला. यानंतर त्यावर जोरदार राजकीय प्रतिक्रिया येत आहेत…