Maharashtra Politics Updates : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच डावोस दौरा करत जागतिक आर्थिक परिषदेत सहभाग नोंदवला होता. मुख्यमंत्र्यांनी या परिषदेत जगभरातील अनेक कंपन्यांशी करार करत मोठी राज्यात मोठी गुंतवणूक आणली आले. याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. दुसरीकडे गेल्या महिन्याभरापासून राज्यात बीड जिल्ह्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख त्यांचे हत्येचे प्रकरण गाजत आहे. दरम्यान वाल्मिक कराडवर तो या हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप होत आहे. त्याचबरोबर कराडबाबत अनेक धक्कादायक गोष्टीही समोर येत आहेत. त्यावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. राज्यात सुमारे तीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. नव्या सरकारच्या स्थापनेनंतर न्यायालयात यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मुंबईत गेल्या आठवड्यात सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला होता. यातील हल्लेखोराला आता पोलिसांनी अटक केली असून, प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. यासह राज्यातील राजकीय आणि इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
दरम्यान आज २४ जानेवारी २०२५ रोजी पेट्रोल व डिझेलचे नवे दर जाहीर झाले आहेत. देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOL) कंपन्यांकडून इंधनाच्या किमतीचे दर सकाळी सहा वाजता जाहीर केले जातात.
वाणगाव, डहाणू रोडदरम्यान शनिवार, रविवारी ब्लॉक, पश्चिम रेल्वेवरील काही रेल्वेगाड्या रद्द
मुंबई : पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाच्या वाणगाव - डहाणू रोड रेल्वे स्थानकांदरम्यान उड्डाणपुलाच्या पायाभूत कामानिमित्त शनिवारी सकाळी १०.३० ते ११.३० आणि रविवारी सकाळी ९.५० ते १०.५० या वेळेत ब्लाॅक घेण्यात येणार आहे. या ब्लाॅकमुळे पश्चिम रेल्वेवरील काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात येणार आहेत. तर, इतर रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होईल.
रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्यासह वाहतूक सहायक नेमण्याविषयी चर्चा, आयुक्तांसह अधिकाऱ्यांची बैठक
नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रामकुंड परिसरातील अतिक्रमण हटवण्यात यावे, शहरात वाहतूक पोलिसांना मदतीसाठी १८० सहायक नियुक्त करण्यात यावेत, या मागण्या महानगरपालिकेतील कार्यालयात वाहतूक व्यवस्थेविषयी आयोजित बैठकीत करण्यात आल्या.
भंडारा स्फोटात आठ कामगारांचा मृत्यू, प्रशासनाकडून चार जणांची नावे जाहीर
भंडारा जिल्ह्यातील जवाहर नगर आयुध निर्माणीतील स्फोटात आठ कामगार मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये दिली.
टोरेस गैरव्यवहार प्रकरण : ईडीने २१ कोटी रुपये असलेली बँक खाती गोठवली, संशयीत कागदपत्रे, डिजिटल पुरावे जप्त
मुंबई : टोरेस गैरव्यवहार प्रकरणात सक्त वसुल संचलनालयाने (ईडी) मोठ्या प्रमाणात संशयीत कागदपत्रे, डिजिटल पुरावे जप्त केले आहेत. तसेच, मे. प्लाटीनम हेर्न प्रा. लि.(टोरेस ज्वेलरी) आणि त्याच्या सहयोगी संस्थांच्या नावावर असलेली बँक खाती गोठवण्यात आली आहेत. त्यात २१ कोटी ७५ लाख रुपये असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
‘प्री वेडिंग शूट’च्या आमिषाने चेन्नईतील छायाचित्रकाराची फसवणूक, महागड्या कॅमेऱ्यांसह १३ लाखांचे साहित्य चोरीला
पुणे :‘प्री वेडिंग शूट’च्या आमिषाने चेन्नईतील एका छायाचित्रकार तरुणाची फसवणूक करण्यात आली. पुणे आणि गोव्यात छायाचित्र काढण्याचे आमिष दाखवून छायाचित्रकाराला पुण्यात बोलावून घेतले.पुणे स्टेशन परिसरातील एका लाॅजमधून तीन कॅमेरे, लेन्स, तसेच अन्य साहित्य असा १२ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन चोरटे पसार झाले.
बदलापूरहून थेट मुंबई, नवी मुंबई काही मिनिटात, एक्सेस कंट्रोल महामार्गाच्या प्रकल्प आराखड्यासाठी निविदा मागवल्या
ठाणे : एमएमआरमधील मुंबई, नवी मुंबई या शहरांपर्यंत जाण्यासाठी सध्या डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या शहरांतील प्रवाशांना मोठा वळसा घालून जावा लागतो. हा वेळखाऊ प्रवास लवकरच थांबणार असून बदलापूरहून थेट मुंबई, नवी मुंबई गाठण्यासाठी प्रस्तावित असलेल्या एक्सेस कंट्रोल मार्गाच्या उभारणीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएने निविदा मागवल्या आहेत.
स्फोट झालेल्या ‘त्या’ आयुध निर्माणीच्या जंगलातील वन्यप्राणी…
भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर येथील आयुध निर्माण कंपनीत झालेल्या स्फोटानंतर त्या परिसरात असलेल्या बिबट्यासह इतर वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित झाला आहे.
एसटीची भाडेवाढ दरवर्षी होणे गरजेचे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
ठाणे : गेल्या अनेक वर्षांपासून एसटीची भाडेवाढ झाली नव्हती ती भाडेवाढ गुरुवारी प्राधिकरणाच्या बैठकीत मंजूर करण्यात आली. याबैठकीत लोकप्रतिनिधींचा सहभाग नसल्यामुळे अद्याप माझ्याकडे एसटी भाडेवाढीची अधिकृत फाईल आलेली नाही. परंतू, १४.९७ टक्के भाडेवाढ करण्यात आली अशी माहिती परिवहन खात्याचे प्रधान सचिव यांच्याकडून मिळाली.
भुजबळांना जवळ बोलावले अन्... अमित शाह यांच्या 'त्या' कृतीची राज्यात चर्चा
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील अजंग गावी ते वेंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड अॅग्रो प्रोसेसिंग लिमिटेडने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला ते उपस्थित होते. यावेळी अमित शाह यांनी राष्ट्रवादीचे माजी मंत्री छगन भुजबळ यांना बोलावून शेजारच्या खुर्चीवर बसण्याची विनंती केली. यानंतर मंत्रीपद न मिळाल्याने नाराज असलेल्या भुजबळ भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत.
महापालिकेच्या घंटागाडीने वृद्धाला फरफटत नेले, अपघातात वृद्धाचा मृत्यू
ठाणे : दिवा येथील संतोष नगर भागात ठाणे महापालिकेच्या घंटागाडीने ७४ वर्षीय व्यक्तीला फरफटत नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सिताराम थोटम असे मृताचे नाव असून या प्रकरणाची नोंद मुंब्रा पोलीस ठाण्यात केली जात आहे.
एसटी स्थानकात प्रवाशांकडील मोबाइल चोरणारा गजाआड; ४३ मोबाइल संच जप्त
स्वारगेट एसटी स्थानकात प्रवाशांचे मोबाइल चोरणाऱ्या चोरट्याला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. चोरलेल्या मोबाइलची खरेदी करणाऱ्या दुकानदारालाही पोलिसांनी अटक केली.
डोंबिवली एमआयडीसीत झाड कोसळून रिक्षा चालकाचा मृत्यू
डोंबिवली : येथील एमआयडीसीत गुरुवारी दुपारी एक गुलमोहराचे झाड धावत्या रिक्षेवर कोसळले. या अपघातात रिक्षा चालक गंभीर जखमी झाला. त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. रस्ते कामे, सततच्या खोदाईमुळे एमआयडीसीतील जुनाट झाडांची मुळे सैल झाली आहेत.
पुणे : धर्मांतर करण्यासाठी महिलेला डांबून ठेवून बलात्कार; विमानतळ पोलिसांकडून महिलेसह तिघांना अटक
धर्मांतर करण्यासाठी एका ३२ वर्षीय महिलेला धमकावून तिला एका घरात डांबून ठेवण्यात आले. महिलेला धमकावून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी एका महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.
पुण्यातील लष्कर भागात भिक्षेकऱ्याची मारहाण करुन हत्या
लष्कर भागात भिक्षेकऱ्याला मारहाण करुन करुन त्याचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. खून झालेल्या भिक्षेकऱ्याची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी एकाविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सविस्तर वाचा
नागपूर : खळबळजनक! संपूर्ण कुटुंबच ‘डिजिटल अरेस्ट’मध्ये, तब्बल ६५ लाख…
नागपूर : नागपुरात संपूर्ण कुटुंबालाच ‘डिजिटल अरेस्ट’मध्ये ठेवत ६५ लाखांचा गंडा घालण्यात आल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. कुटुंबाला सीम कार्ड मनी लॉंड्रिंग घोटाळ्यात सहभागी असल्याची भिती दाखविण्यात आली होती.
जिल्हाधिकारी कार्यालयातही आता ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष’
मुंबई : गंभीर आजारांवरील उपचारांसाठी गरजू नागरिकांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून अत्यावश्यक आर्थिक मदत पुरवली जाते. जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ व पैशाचा अपव्यय टाळेल.
मौजमजेसाठी दुचाकी चोरणारा अल्पवयीन ताब्यात
पुणे : मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या अल्पवयीनाला वानवडी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. अल्पवयीन मुलाने दुचाकी चोरीचे गुन्हे केले होते. तो वानवडी भागातील जयसिंगराव ससाणे उद्यानाजवळ थांबल्याची गस्त घालणारे पीलीस कर्मचारी गोपाळ मदने आणि यतीन भोसले यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला सापळा लावून ताब्यात घेतले. चैाकशीत त्याने दुचाकी चोरीची कबुली दिली. अल्पवयीनाने मौजमजेसाठी दुचाकी चोरीचे गुन्हे केले. त्याने वानवडी आणि पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी परिसरातून दुचाकी चोरल्याचे तपासात उघडकीस आले. वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजीत आदमाने, उपनिरीक्षक धनाजी टोणे, पोलीस कर्मचारी दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, सर्फराज देशमुख, अमोल गायकवाड यांनी ही कारवाई केली.
भंडारा आयुध निर्माण कंपनीत स्फोट; जखमींची नावे समोर
भंडारा जिल्ह्यातील ऑर्डिनन्स फॅक्टरीमधील स्फोटाच्या घटना घडली असून, संपूर्ण परिसर स्फोटामुळे हादरला आहे. जवाहरनगर येथील आयुध निर्माण कंपनीमध्ये झालेल्या स्फोटातील काही जखमींची नावे समोर आली आहेत. यामध्ये संजय राऊत (वय ५९), नरेंद्र वंजारी (वय ५५), राजेश बडवाईक (वय ३३), सुनीलकुमार यादव (वय २४), जयदीप बॅनर्जी (वय ४२), मनोज मेश्राम (वय ५९) यांचा समावेश आहे. यातील काहींवर भंडारा येथील लक्ष रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर चंद्रशेखर गोस्वामी(वय ५९) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ते ज्युनियर वर्स मॅनेजर म्हणून कार्यरत होते.
गोवंडी शताब्दी रुग्णालयातील अपुऱ्या सुविधांविरोधात उपोषण
मुंबई : गोवंडी परिसरातील मुंबई महानगरपालिकेच्या शताब्दी रुग्णालयात गेल्या अनेक महिन्यांपासून नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. याबाबत अनेक वेळा तक्रारी केल्यानंतरही त्याकडे पालिका दुर्लक्ष करीत असल्याने काही स्थानिक रहिवाशांनी शुक्रवारी सकाळपासून येथे लाक्षणिक उपोषण सुरू केले.
मोघरपाडा कारशेडची कोंडी फोडण्याचे प्रयत्न सुरु; शेतकऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत जिल्हा प्रशासनाकडून पुनर्रच्चार
घोडबंदर येथील मोघरपाडा भागात मेट्रोसाठी कारशेड उभारण्याकरीता जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा जोरदार हालचाली सुरू केल्या असून त्यासाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत जिल्हा प्रशासनाने बाधित शेतकऱ्यांना साडेबारा ते साडेेबावीस टक्के मोबदला देण्याबाबतचा पुनर्रच्चार केला. सविस्तर वाचा
मराठी ग्रंथ संग्रहालयाचे ‘ग्रंथयान’ बंद होण्याच्या मार्गावर; पर्यायी म्हणून घरपोच सेवा उपलब्ध
एकीकडे मराठी पंधवडा दिवस साजरा होत असतानाच, दुसरीकडे शहरात वाचकांची भूक भागवणारे मराठी ग्रंथ संग्रहालयाचे ग्रंथयान बंद होण्याच्या मार्गावर आहे. देखभालीचा खर्च परवडत नसल्यासह ग्रंथयानाला पूर्णवेळ चालक उपलब्ध होत नाहिये, त्यामुळे हे ग्रंथयान बंद करण्याचा निर्णय मराठी ग्रंथ संग्रहालयाने घेतला आहे. सविस्तर वाचा
‘एनआयव्ही’च्या तपासणीतून अखेर दुर्मीळ ‘जीबीएस’ विकाराचे मूळ कारण उघड; कशामुळे धोका जाणून घ्या…
पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमची (जीबीएस) बाधा कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी हा जीवाणू आणि नोरोव्हायरस या विषाणूमुळे झाल्याचे उघड झाले आहे. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने केलेल्या रुग्णांच्या नमुन्यांच्या तपासणीत हे निष्पन्न झाले आहे. सविस्तर वाचा
सेट परीक्षा लांबणीवर, आता कधी होणार परीक्षा?
विद्यापीठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात सहायक प्राध्यापकांसाठी अनिवार्य असलेल्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षेच्या (सेट) तारखेत बदल करण्यात आला आहे. सविस्तर वाचा
महाबँकेत मराठी भाषेचा वापर करा, का केली मनसेने ही मागणी ?
बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखांतून आवश्यक सेवा मराठी भाषेतून उपलब्ध करून मुद्रित अर्जांचे नमुने मराठी भाषेमध्ये उपलब्ध द्यावे; तसेच खातेदारांशी संवाद साधताना बँकेतील कर्मचाऱ्यांनी मराठी भाषेचा वापर करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) केली आहे. सविस्तर वाचा
एसटी स्थानकात प्रवाशांकडील मोबाइल चोरणारा गजाआड; ४३ मोबाइल संच जप्त
स्वारगेट एसटी स्थानकात प्रवाशांचे मोबाइल चोरणाऱ्या चोरट्याला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. चोरलेल्या मोबाइलची खरेदी करणाऱ्या दुकानदारालाही पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ७ लाख ४३ हजारांचे ४३ मोबाइल, लॅपटॉप असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सविस्तर वाचा
सैफ हल्ला प्रकरण : आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ
अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद उर्फ विजय दास (३०) याच्या पोलीस कोठडीत वांद्रे न्यायालयाने वाढ केली आहे. न्यायालयाने आरोपीला २९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
उल्हासनगरमधील माणेरे गावातील हुक्का पार्लर चालकावर गुन्हा
कल्याण : उल्हासनगर जवळील माणेरे गावात विठ्ठलवाडी पोलिसांनी अचानक छापा मारून बेकायदा हुक्का पार्लर चालविणाऱ्या चालकासह या पार्लरमध्ये हुक्का सेवन करण्यासाठी आलेल्या २३ ते २६ वयोगटातील ग्राहकांवर गुन्हा दाखल केला. बुधवारी रात्री बारा वाजण्याच्या दरम्यान विठ्ठलवाडी पोलिसांनी ही कारवाई केली.
सोन्याचे दर नवीन उच्चांकीवर… हे आहे आजचे दर…
नागपूरसह देशभरात सोन्याच्या दरात सातत्याने बदल होतांना दिसत आहे. नववर्षात सोन्याचे दर वाढण्याची गती वाढल्याने प्रथमच हे दर नवीन उच्चांकीवर पोहचले आहे.
कराड: गॅस वाहिन्यांच्या साठ्याला भीषण आग; लाखोंचे नुकसान
कराड : पुणे- बंगळूरू महामार्गावर गोटे (ता. कराड) गावच्या हद्दीत मोकळ्या जागेवर केलेल्या गॅस वाहिन्यांच्या साठ्याला अचानक लागलेल्या भीषण आगीत रिकाम्या गॅस वाहिन्या जळून खाक होत लाखो रुपयांचे नुकसान. झाले. नजीक असलेल्या ट्रान्सफॉर्मरच्या विद्युत तारांवर वानराने उडी मारल्याने शॉर्टसर्किट होऊन ही आग लागली. यामुळे हवेत धुरांचे मोठमोठे लोट उसळले होते.
दरम्यान, जळालेल्या पाईपच्या ढिगाशेजारी मोठे दोन जनरेटर या आगीतून वाचले आहेत. कराड नगरपालिका व कृष्णा हॉस्पिटलच्या अग्निशमन बंबांनी वेळीच आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला. लाखो रुपयांचे आणखी होणारे नुकसान वाचले.
गुढे-पाचगणी, येवती उपसा जलसिंचन योजनांना मंजुरी; सांगली, साताऱ्यातील १०५ गावांना फायदा
सांगली : गुढे-पाचगणी आणि येवती या दोन उपसा जलसिंचन योजनांना तत्त्वत: मंजुरी मिळाली असून याचा लाभ सांगली जिल्ह्यातील शिराळा व सातारा जिल्ह्यातील कराड, पाटण या तीन तालुक्यांतील १०५ गावांना होणार आहे. या योजनेच्या सर्व्हेक्षणसाठी शासनाकडून १ कोटी ६५ लाख ४४ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून दि. २८ जानेवारीपासून खुंदलापूर (ता शिराळा) येथून या योजनेचे स्थळ पाहणीला सुरुवात करण्याचा निर्णय कोल्हापूर सिंचन भवन येथे बैठकीत घेण्यात आला.
अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे व श्रमिक मुक्ती दलाचे डॉ. भारत पाटणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीस कार्यकारी अभियंता डी.डी.शिंदे, शिराळा पंचायत समितीचे माजी सभापती हणमंतराव पाटील, पाणी संघर्ष चळवळीचे निमंत्रक वसंत पाटील, सखाराम पाटील, सचिन मोरे, संदीप पाटील, संतोष गोटल, तानाजी पाटील भुरभुशी, पांडुरंग डांगे, प्रकाश काळे, विनायक पाटील आदी उपस्थित होते.