Maharashtra Politics Updates : राज्यात मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवसेनेने (उद्धव ठाकरे) मुंबई पालिकेत स्वबळाचा नारा दिला आहे. तर, उर्वरित शहरात महाविकास आघाडीतून लढणार असल्याची भूमिका संजय राऊतांनी व्यक्त केली. तर दुसरीकडे बाबा सिद्दीकींच्या हत्याप्रकरणात त्यांचा मुलगा झिशान सिद्दिकी यांनी गंभीर आरोप केले आहेत. बाबा सिद्दीकींनी शेवटच्या अर्धा तास आधी भाजपाच्या मोहित कंबोज यांच्याशी संवाद साधला होता, असा गौप्यस्फोट केला. तर, या प्रकरणात त्यांनी शिवसेनेचे (उद्धव ठाकरे)पक्षाचे नेते अनिल परब यांचंही नाव घेतलं आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळी दिशा मिळण्याची शक्यता आहे. पुण्यानंतर आता कोल्हापूरातही गुलेन बॅरी सिंड्रोमचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहे. सोलापुरात काल एका संशयिताचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने गंभीर पावलं उचलली आहेत. यासह राज्यातील इतर घडामोडी वाचा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
कल्याणमध्ये बिर्ला महाविद्यालयातील विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न
कल्याण : येथील पूर्वेतील एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या अंगावर भरधाव वेगातील थार वाहन घालून त्या विद्यार्थ्याच्या जीविताला धोका निर्माण करण्याचा, तसेच अपहरण करण्याचा प्रयत्न सोमवारी दुपारी घडला. याप्रकरणी पीडित विद्यार्थ्याच्या आई, वडिलांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली आहे.
फेरीवालामुक्त परिसर मोहिमेअंतर्गत पालिकेचा कारवाईचा बडगा
मुंबई : मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांमुळे निर्माण झालेल्या समस्या सोडविण्यासाठी महापालिका प्रशासनाने नुकतीच ‘फेरीवालामुक्त परिसर’ मोहीम राबवली. या मोहिमेअंतर्गत महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकांनी मागील सात दिवसांत मुंबईतील विविध भागात कारवाईचा बडगा उगारला.
‘सुरेश धस यांना काय वाटतं त्याच्याशी देणंघेणं नाही’ : अजित पवार
सुरेश धस यांनी म्हटलं होतं की धनंजय मुंडे यांचा राजीनामा मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाही तर अजित पवार यांनी घ्यावा, याबाबत अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले, “सुरेश धस यांना काय वाटतं? त्याच्याशी मला काहीही देणंघेणं नाही. मी महायुतीच्या सरकारमध्ये भाजपाच्या बरोबर आहे. त्यामुळे मी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर चर्चा करत असतो. त्यांच्याशी चर्चा करून महायुतीचं सरकार पुढे चालावं त्यासाठी आम्ही प्रमुख निर्णय घेत असतो. मात्र, असं वेगवेगळ्या पक्षातले खालचे कार्यकर्ते बोलायला लागले तर त्याला काही अर्थ राहणार नाही. भाजपाची जी काही भूमिका असेल ती भूमिका आम्हाला अमित शाह किंवा देवेंद्र फडणवीस हे सांगतील”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ५ फेब्रुवारीला बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत अशी माहिती आमदार सुरेश धस यांनी दिली आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी मतदारसंघात काही विकास कामांसंदर्भातील कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आष्टीत येणार असल्याचंही सुरेश धस यांनी सांगितलं आहे.
डोंबिवलीत सोसायटीत सत्यनारायण पूजा, हळदी कुंकु कार्यक्रमावरून मराठी- अमराठी भाषकांमध्ये वाद
डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील नांदिवली भागात एका गृहसंकुलात सोसायटीत सत्यनारायणाची पूजा आणि हळदी कुंकु कार्यक्रम करण्यावरून मराठी, अमराठी भाषकांमध्ये नेहमीप्रमाणे वाद झाला. मराठी भाषक आपला धार्मिक कार्यक्रम करण्यावर ठाम होते.
मुंबई : पत्नी व मुलाची हत्या करून आत्महत्येचा बनाव रचला, आरोपीला अटक
मुंबई : कांदिवली येथे महिला आणि तिच्या आठ वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला होता. याप्रकरणी महिलेच्या पतीला पोलिसांनी अटक केली. आरोपी शिवशंकर दत्ताने (४०) पत्नी पुष्पावर (३६) विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय घेऊन तिची हत्या केल्याची कबुली दिली.
जवाहर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता कार्यालय गोठविले; थकबाकीमुळे मनपाची कारवाई
नाशिक : धुळे येथील जवाहर गटाच्या वेगवेगळ्या तीन संस्थांकडे मालमत्ताकराच्या दंडासह तब्बल सात कोटीची थकबाकी झाल्याने अखेर धुळे महापालिकेच्या जप्ती पथकाने शहरातील जवाहर वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांचे कार्यालय गोठविले. आमदार कुणाल पाटील यांनी कारवाई बेकायदेशीर असून या संदर्भात महापालिकेविरुद्ध अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
बेकायदा बॅनरबाजी फक्त बघू नका, तक्रारही करा; अंबरनाथ नगरपालिकेचे नागरिकांना आवाहन
अंबरनाथ : गेल्या काही काळात शहरात बॅनरबाजीचे प्रकार वाढले असून त्यामुळे शहर विद्रुपीकरणही होते आहे. राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी यात आघाडीवर आहेत. कोणत्याही परवानगीशिवाय लावण्या जाणाऱ्या या बॅनरवर कारवाई करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत.
बाह्यवळण मार्गावर वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू
पुणे : मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर विरुद्ध दिशेने निघालेल्या दुचाकीस्वार तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली.
सूरज देवेंद्रपंत लांडे (वय २७, रा. शिरजगाव कसबा, ता. चांदूर बाजार, जि. अमरावती) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी वाहनचालकाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रणीत दिलीप गोंडेकर (वय २४, रा. योगानंद पीजी. हिंजवडी फेज एक) याने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ जानेवारी रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास प्रणीत अणि सूरज मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गाने दुचाकीवरुन निघाले होते. चांदणी चौकापासून काही अंतरावर त्यांनी दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबविली. दोघे जण लघुशंकेसाठी गेले. त्यानंतर सूरज दुचाकी घेऊन विरुद्ध दिशेने निघाला. त्या वेळी समोरुन येणाऱ्या भरधाव वाहनाने अंधारात दुचाकीस्वार सूरज याला धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या सूरजचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. पोलीस हवालदार शेलार तपास करत आहेत.
धक्कादायक! गर्भवतीच्या पोटात बाळ आणि… बाळाच्या पोटातही ‘बाळ ‘!! अतिदुर्मिळ प्रकार
बुलढाणा : बुलढाणा<a href=”https://www.loksatta.com/nagpur/buldhana-after-multiple-checks-woman-had-baby-in-her-womb-and-another-in-baby-s-stomach-scm-61-sud-02-4854912/”> शहरांतील प्रसिद्ध प्रसूती तज्ज्ञ प्रसाद राजकुमार अग्रवाल हे स्थानीय शासकीय महिला रुग्णालयाठी सेवा देतात. तपासणीत महिलेच्या गर्भातील बाळच नव्हे तर बाळाच्या पोटातही ‘बाळ ‘असल्याचे दिसून आले. त्यामुळे डॉक्टर प्रसाद अग्रवाल यांनी दोन तीनदा तपासणी केली असता बाळाच्या पोटात बाळ असल्याचे स्पष्ट झाली.
सविस्तर वाचा…
बोर्डाच्या दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या ‘ग्रेस’ गुणांबाबत मोठा निर्णय…
नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेवल्या आहेत. यावर्षी या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या ग्रेस गुणांच्या प्रक्रियेमध्ये बदल करण्यात आला आहे.
आरटीईमध्ये प्रवेश हवा! अद्यापही अर्ज केला नसेल तर ही सूचना वाचा आणि…
नागपूर : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील प्रवेशासाठी राबवण्यात येणाऱ्या ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेला पालकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु अनेक पालकांनी जर आरटीईसाठी अद्यापही अर्ज केला नसेल तर त्यांनाही संधी आहे. नागपूर जिल्ह्यातील आरटीई प्रवेशाची काय स्थिती आहे ती बघुया.नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत २५ हजार ९५४ अर्ज आले आहेत.
Maharashtra Live News : “मुलीला तिचे मित्र-मैत्रिणी काय म्हणत असतील?” आरोप होत असताना धनंजय मुंडे भावनिक!
ज्यावेळी तुमच्यावर व्यक्तिगत खोटे आरोप केले जातात आणि तुम्हाला तिसरी-चौथीत जाणारं लहान मूल असेल. तर त्या मुलीला तिचे मित्र -मैत्रिणी काय म्हणत असतील याचा विचार करा- धनंजय मुंडे</p>
कोल्हापुरातील दोन गावात विधवा प्रथा बंद, भेदभावाला मूठमाती देण्याचा ग्रामसभेचा निर्णय
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील मलकापूर आणि अंबप या दोन ग्रामपंचायतींमध्ये विधवा प्रथा बंद करतानाच त्यांना सन्मान देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. त्यांची लगोलग अंमलबजावणी झाल्याने सन्मानित झालेल्या विधवांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षफुटीचे सत्र सुरू, माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांची काँग्रेसला सोडचिट्ठी
नवी मुंबई</strong> : आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत काँग्रेस पक्षातील महत्त्वाचे पदाधिकारी पक्ष सोडून जात आहेत. नवी मुंबई महापालिकेचे माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त करत रमाकांत म्हात्रे यांनी पक्ष सोडला आहे.
डोंबिवली : डोंबिवलीतील उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व माजी नगरसेवक दीपेश पुंडलिक म्हात्रे यांची कल्याण ग्रामीण, डोंबिवली आणि कळवा-मुंब्रा विधासभा क्षेत्र जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुकांचा विचार करून शिवसेनेने (उध्दव बाळासाहेब ठाकरे) या नियुक्त्या केल्याची शिवसैनिकांमध्ये चर्चा आहे.
तीन वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण करणाऱ्या आईविरोधात गुन्हा
मुंबई : पती बाहेर फिरायला घेऊन जात नसल्याच्या रागातून महिलेने तिच्या तीन वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी घाटकोपर परिसरात घडली. याप्रकरणी पतीने केलेल्या तक्रारीवरून घाटकोपर पोलिसांनी मुलाच्या आईविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस फरार आईचा शोध घेत आहेत.
कल्याणमधील विस्तारित खडकपाडा मेट्रो-५ कामाची लवकरच निविदा प्रक्रिया, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरे विविध विकास कामांमुळे झपाट्याने विकसित होत आहेत. या विकसित मार्गातील आणखी एक महत्वाचा टप्पा म्हणजे कल्याणमधील मेट्रो ५ मार्ग. कल्याण शहरातील खडकपाडा, बिर्ला महाविद्यालय या विस्तारित मेट्रो मार्गाची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी रात्री येथे दिली.
पनवेल : एसटी भाडेवाढी विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आंदोलन
पनवेल येथील राज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) आगारामध्ये ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी भाडेवाढीच्या विरोधात मंगळवारी सकाळी आंदोलन करुन सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिवसैनिकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
पनवेल एसटी आगाराच्या मुख्य प्रवेशव्दारावर मंगळवारी सकाळी काही मिनिटांसाठी जमलेल्या शिवसैनिकांनी घोषणाबाजी देत आगारात प्रवाशांना घेऊन शिरणा-या पाच बस गाड्या रोखण्याचा प्रयत्न केला. पोलीसांनी वेळीच हस्तक्षेप करुन आंदोलनकर्ते शिवसैनिकांना घोषणाबाजीसाठी आगारातील मोकळी जागा उपलब्ध करुन दिली. यावेळी पुरुषांसोबत महिला शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. भाडेवाढ रद्द कऱण्याची मागणी शिवसैनिकांनी यावेळी घोषणाबाजीतून केली. आंदोलनादरम्यान आगार परिसरात वाहतूक कोंडी काही मिनिटे झाली. वाढलेल्या तिकीटदराचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी अनेक पुरुष प्रवाशांनी यावेळी केली.
पालकमंत्र्यांच्या दौऱ्यात भाजपमधील गटबाजी उघड
चंद्रपूर : जिल्ह्यात काँग्रेसप्रमाणेच भाजपलाही गटबाजीचे ग्रहण लागले आहे. पालकमंत्री डॉ. प्रा. अशोक उईके यांच्या पहिल्याच दौऱ्यात ही गटबाजी चव्हाट्यावर आली. माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार समर्थकांनी विश्रामगृह येथे पालकमंत्र्यांचे स्वागत केले, तर आमदार किशोर जोरगेवार यांनी सत्कार सोहळ्याचे आयोजन केले.
राजीनामा विषयावर मी उत्तर देणार नाही. अंजली दमानिया अजित दादांना भेटल्या आहेत. कागदपत्रांसहित त्या त्याना भेटल्या. त्यामुळे या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यावर स्पष्ट उत्तर देतील. ते उत्तर त्यांनीच द्यावं अशी माझी इच्छा आहे – धनंजय मुंडे
विट्याजवळ कारखान्यातून १५ कोटीचा एमडी ड्रग्ज साठा जप्त
सांगली : विट्याजवळ कार्वे औद्योगिक वसाहतीमध्ये एमडी ड्रग्ज तयार करणाऱ्या कारखान्यावर पोलीसांनी छापा टाकून १५ कोटींचा तयार अंमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे. रात्रभर सुरु असणाऱ्या कारवाईची अधिकृत माहिती आज सायंकाळी अक्षिक्षक संदीप घुगे देणार आहेत.
विट्याजवळ असलेल्या एमआयडीसी मधील एमडी ड्रग्ज बनवल्या जाणाऱ्या कारखान्यावर सांगली स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) रात्री छापा टाकला.या कारखान्यातून कोट्यवधी रुपयांचा एमडी ड्रग्जचा साठा ही पकडला असून तयार अंमली पदार्थ १५ किलो असल्याची प्राथमिक माहिती आहे.माऊली इंडस्ट्रीज नावाने केमिकल कंपनी असल्याचे सांगून एमडी ड्रग्ज बनवले जात होते. कारखाना चालवणाऱ्यासह काहीजणांना ताब्यात घेतले असून ड्रग्ज पुरवठा मुंबईला करण्यात येत होता अशी माहिती मिळाली.
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये ठिकठिकाणी अनोखे फलक
मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत अपात्र धारावीकरांचे मुलुंडमध्ये पुनर्वसन करण्यास मुलुंडवासियांचा विरोध आहे. मात्र हा विरोध डावलून राज्य सरकारने नुकतीच मुलुंडमधील मिठागराची ५८.५ एकर जागा धारावीसाठी देली. त्यामुळे काही संतप्त मुलुंडवासियांनी मुलुंडमध्ये ठिकठिकाणी अनोखे फलक लावले आहेत.
झिशान सिद्दिकींच्या जबाबात नाव आल्यानंतर अनिल परबांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले…
संत ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाच्या बैठकीला सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. मी आमदार म्हणून तिथे गेलो होतो. त्यांना मदत करण्याच्या उद्देशाने आम्ही तिथे गेलो होतो. या व्यतिरिक्त माझा कुठेही उल्लेख नाही. २४ ऑक्टोबर २०२४ ला स्टेटमेंट दिलंय, त्यावर पोलिसांनी चौकशी केली असेल. पोलिसांच्या चौकशी अंती जे येतं ते आरोपपत्रात दाखल होतं. पूर्ण तपासाअंती आरोपपत्र दाखल केलंय, पोलिसांना जे तपासात आढळलंय ते लिहिलंय. त्यातही झिशान सिद्दिकींचं समाधान झालं नसेल तर त्यांनी सराकरकडे पुन्हा तक्रार करावी, अजून सत्य लपलं असेल तर तपासलं पाहिजे. पोलीस त्यांचे, सरकार त्यांचं आहे, त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे जावं – अनिल परब</p>
विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात, उपराजधानीतील गजानन विद्यालयाजवळील चौकात…
नागपूर : शहरातील गजबजलेला नवीन सुभेदार लेआऊट चौकात गजानन विद्यालय असून तेथे होणाऱ्या गर्दीमुळे शाळेच्या विद्यार्थ्यांना अपघात होण्याचा धोका संभवतो. शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळी होणाऱ्या गर्दीमुळे येथे दररोज वाहतूक विस्कळीत होते.
Video : सैफ अली खान हल्ला प्रकरणात पकडलेल्या टिटवाळ्यातील संशयित तरूणाच्या मनावर परिणाम? कुटुंबीयांची खंत
अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणाशी आपल्या मुलाचा कोणताही संबंध नसताना केवळ संशयित म्हणून पोलिसांनी त्याला पकडले. याचा जबर मानसिक धक्का आकाश कनोजिया यांना बसला आहे. ते मनोरुग्णासारखे वागत आहेत, अशी माहिती आकाशच्या कुटुंबीयांनी माध्यमांना दिली.
पंतप्रधान आवास योजनेतील खासगी विकासकांना ५० कोटींचा जादा निधी! केंद्रीय गृहनिर्माण विभागाकडून अखेर विचारणा!
मुंबई : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत खासगी विकासकाचा भागीदारी प्रकल्प सुरू होण्याआधीच राज्य आणि केंद्राच्या हिश्श्यापोटी ५० कोटींहून अधिक रकमचे वितरण झाल्याची केंद्र सरकारच्या गृहनिर्माण विभागाने दखल घेतली आहे.
आयुर्वेदिक औषधींच्या जाहिरातीत भ्रामक दावे, २४ हजारांवर….
नागपूर : आयुर्वेद, युनानी आणि तत्सम औषध किंवा इतर उत्पादनाच्या माध्यमातून विविध आजार बरे केले जात असल्याचा दावा करणाऱ्या जाहिराती प्रकाशित केल्या जातात. त्यातून अनेकांची फसवणूक होण्याचे प्रमाण वाढत आहे. गडचिरोलीचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लेखी प्रश्नाच्या माध्यमातून सरकारचे या मुद्याकडे लक्ष वेधले होते.
कल्याण, बदलापूरमध्ये दोन बालकांचा अपघाती मृत्यू
कल्याण : कल्याण पूर्व, बदलापूरमध्ये दोन वेगळ्या घटनांमध्ये दोन बालकांचा अपघाती मृत्यू झाला. एक बालक दोन वर्षाचा तर एक बालक १७ वर्षाचा आहे. कोळसेवाडी, मानपाडा पोलीस ठाण्यात या दोन्ही घटनांची अपघाती मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
भिवंडीतून तीन बांगलादेशींना ताब्यात, बनावट आधारकार्डासह शिधापत्रिका, पॅनकार्ड जप्त
ठाणे : भिवंडी येथील भोईवाडा भागात बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशींना पोलिसांनी ताब्यात घेतले. मागील १५ वर्षांपासून ते भिवंडीत वास्तव्यास असल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. त्यांच्याविरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तिघेही भिवंडी शहरात मजुरी करत होते.