Maharashtra Politics Updates : राज्यात मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवसेनेने (उद्धव ठाकरे) मुंबई पालिकेत स्वबळाचा नारा दिला आहे. तर, उर्वरित शहरात महाविकास आघाडीतून लढणार असल्याची भूमिका संजय राऊतांनी व्यक्त केली. तर दुसरीकडे बाबा सिद्दीकींच्या हत्याप्रकरणात त्यांचा मुलगा झिशान सिद्दिकी यांनी गंभीर आरोप केले आहेत. बाबा सिद्दीकींनी शेवटच्या अर्धा तास आधी भाजपाच्या मोहित कंबोज यांच्याशी संवाद साधला होता, असा गौप्यस्फोट केला. तर, या प्रकरणात त्यांनी शिवसेनेचे (उद्धव ठाकरे)पक्षाचे नेते अनिल परब यांचंही नाव घेतलं आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळी दिशा मिळण्याची शक्यता आहे. पुण्यानंतर आता कोल्हापूरातही गुलेन बॅरी सिंड्रोमचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहे. सोलापुरात काल एका संशयिताचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने गंभीर पावलं उचलली आहेत. यासह राज्यातील इतर घडामोडी वाचा.
सिंहगड रस्ता परिसरातील विहिरीतील दूषित पाण्यामुळेच पुण्यात जीबीएस; आरोग्यमंत्री आबिटकर यांची कबुली
पुणे : नांदेड परिसरात विहिरीतील दूषित पाण्यामुळेच गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) चे रुग्ण वाढल्याचे दिसून येत आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सोमवारी दिली.
पुणे : पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमची (जीबीएस) रुग्णसंख्या वाढत आहे. या रुग्णांवरील उपचार महागडे असल्याने त्यांच्यावर महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना आणि महापालिकेच्या शहरी गरीब योजनेतून उपचार केले जातील. खासगी रुग्णालयांनी रुग्णांना उपचाराचे दर जास्त आकारू नयेत, यासाठी त्यांच्यावर नियंत्रण ठेवले जाईल, अशी घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सोमवारी केली.
पुणे : नदीपात्राची निळी रेषा, लाल रेषा बदलणार?
पुणे : ‘शहरातून वाहणाऱ्या मुळा-मुठा नदीच्या निळ्या तसेच लाल पूररेषांच्या पुनरावलोकनासाठी जलसंपदा विभागाने महाराष्ट्र इंजिनिअर्स रिसर्च इन्स्टीट्यूट (मेरी) कडे अभ्यास करण्याचे काम दिले होते. ‘मेरी’ ने याबाबतचा अहवाल जलसंपदा विभागाकडे दिला आहे.
जीबीएस रुग्णांना मिळणार मोफत ‘इम्युनोग्लोब्यूलिन’ इंजेक्शन, कोणी केली घोषणा?
पुणे : गेल्या काही दिवसांपासून शहरात वाढत असलेली ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’ (जीबीएस) च्या रुग्णांची संख्या पाहता महापालिकेने महत्वाचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात जीबीएस च्या रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. या आजाराचे खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना महापालिकेच्या ‘शहरी गरीब योजने’अंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतची मदत देखील केली जाणार आहे.
बिबट्याच्या कातडीची तस्करी;आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यवधींची किंमत…
अकोला : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोट्यवधींची किंमत असलेल्या बिबट्याच्या कातडीची तस्करी करतांना तीन आरोपींना अकोट तालुक्यातील जंगलातून पकडण्यात आले. केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) पुणे येथील पथकाने सोमवारी रात्री ही कारवाई केली.
राज्यात सोयाबीन खरेदीमध्ये सहा जिल्ह्यांच्या उद्दिष्टांना कात्री
अकोला : राज्यात हंगाम २०२४-२५ मधील सोयाबीन हमीभावावर खरेदीची योजना राबवली जात आहे. या योजनेंतर्गत राज्यातील सहा जिल्ह्यांचे उद्दिष्ट घटवून जास्त प्रतिसाद मिळालेल्या सहा जिल्ह्यांच्या उद्दिष्टामध्ये वाढ केली आहे. ३१ जानेवारीपर्यंत त्याची मुदत आहे.
माघी गणेशोत्सवासाठी शहर सज्ज, दोन हजारहून अधिक गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना
ठाणे : भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सवाप्रमाणेच माघ महिन्यातील गणेश जयंती देखील गेल्या काही वर्षांपासून धूमधडाक्यात साजरी केली जात आहे. यंदा ठाणे जिल्ह्यात २ हजार ४१९ गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना १ फेब्रुवारीला होणार आहे. यामध्ये १५८ सार्वजनिक तर २ हजार २६१ खाजगी गणेशमुर्ती आहेत.
नवी मुंबई : रस्ते अपघातांमध्ये वर्षभरात २८७ मृत
नवी मुंबईतील रस्ते अपघातांमध्ये वर्षभरात २८७ जणांचा मृत्यू झाला असून २९७ जण जखमी झाले आहेत. त्यामुळे भविष्यात अपघातांवर नियंत्रण मिळविणे आणि अपघातांची संख्या कमी करणे हे नवी मुंबई पोलिसांसह प्रादेशिक परिवहन विभागांच्या अधिकाऱ्यांसमोरच आव्हान आहे.
महापालिका आयुक्तांकडून झाडाझडती क्रीडा संकुलाच्या कंत्राटदाराला नोटीस, बदल्यांच्या निर्णयालाही स्थगिती
उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर मनिषा आव्हाने यांनी गेल्या आठवड्यात विविध प्रकल्पांची झाडाझडती घेतली. यात व्हिटीसी मैदानात सुरू असलेल्या क्रीडा संकुलाच्या रखडलेल्या कामावरून त्यांनी संबंधित कंत्राटदाराला नोटीस दिली आहे
उरणमध्ये फ्लेमिंगो नव्या पाणथळींच्या शोधात
उरण : जैवविविधतेने नटलेल्या व पक्षी निरीक्षणाचे ठिकाण असलेल्या उरणमध्ये हजारोंच्या संख्येने परदेशी पक्षी येऊ लागले आहेत. मात्र येथील पाणथळी वर मातीचा भराव करून बुजविण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे आंतरभरती प्रवाह बंद झाल्याने उरणच्या अनेक पाणथळी कोरडया झाल्या आहेत. परिणामी अनेक पक्षी आता नव्या पाणथळींच्या शोधत आहेत.
आज स्थानिक स्वराज्य संस्थांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Maharashtra Live News : ठाण्यातील हायपरसिटी मॉलमध्ये भीषण अग्नितांडव; अग्नीशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल
#WATCH | Thane, Maharashtra | A massive fire breaks out at the Hypercity Mall in Kasarvadavali area. Fire tenders present at the spot to douse off the fire. pic.twitter.com/RNQRwVteX9
— ANI (@ANI) January 28, 2025