Maharashtra News Today : राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला झाला आहे. मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यांना झोडपून काढलं आहे. मुंबईतही १० ऑगस्टपर्यंत सतर्कतेचा इशारा दिला आहे. या कालावधीत मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान आज आज पुणे आणि मध्य महाराष्ट्रातही पावसाचा रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
दरम्यान, महागाई, बेरोजगारी, अग्निपथ योजना, जीवनावश्यक वस्तुंवरील जीएसटी इत्यादींच्या मुद्य्यांवरून केंद्र सरकार विरोधात ठाणे शहरात काँग्रेसकडून आज (सोमवार) दुपारी ‘जन आंदोलन’ करण्यात येणार आहे. “देशात वाढती महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ, ढासळलेली अर्थव्यवस्था, अग्निपथ योजनेद्वारे तरुणांचे खच्चीकरण, जीएसटी करामुळे सर्वसामान्य जनता होरपळून निघालेली आहे. या सर्वाचा विरोध करण्यासाठी आज दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ काँग्रेस जनआंदोलन करणार आहे.”, असे ठाणे काँग्रेसचे सरचिटणीस सचिन शिंदे यांनी कळविले आहे. हा विषयही दिवसभर चर्चेत असणार आहे.
महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि कलाविषयक घडामोडींचा आढावा एकाच ठिकाणी…
Maharashtra Latest News Updates, 08 August 2022 : राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय; मुंबईसह राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता
मुंबई : खासगी हिल स्टेशन म्हणून लवासा विकसित करण्यासाठी जमीन खरेदीला विकास आयुक्तांनी (उद्योग) दिलेली विशेष परवानगी रद्द करावी, तसेच परवानगी मनमानी, अवाजवी, राजकीय पक्षपातीपणा, गैरप्रकार म्हणून घोषित करण्याची मागणी करणारी याचिका निकाली काढण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयानेही याचिकेची दखल घेऊन राज्य सरकार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळेंसह अन्य प्रतिवाद्यांना नोटीस बजावून सहा आठवड्यांत याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. सविस्तर बातमी
पुणे : विवाह नोंदणी संकेतस्थळावर झालेल्या ओळखीतून एकाने तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीने तरुणीची १४ लाख रुपयांची फसवणूक केली असून त्याच्या विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर बातमी
इस्लामिक स्टेट (IS) चा सक्रिय सदस्य असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या आरोपीला दिल्ली न्यायालयाने १६ ऑगस्टपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे. मोहसीन अहमद असं या आरोपीचं नाव असून तो बिहारमधील पाटणा येथील रहिवासी आहे. आरोपी मोहसीन अहमद याला एनआयएने शनिवारी बाटला हाऊस येथून अटक केली होती. सोमवारी त्याला दिल्ली न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने १६ ऑगस्टपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे. सविस्तर बातमी
पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे स्वराज्य महोत्सव आणि हर घर तिरंगा कार्यक्रमांतर्गत युवा संकल्प अभियान राबवले जाणार आहे. या अभियानाअंतर्गत हातात ध्वज घेतलेल्या व्यक्तींच्या विश्वविक्रमासह ७५ विविध उपक्रम करण्यात येणार असून, या अभियानाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी (९ ऑगस्ट) दुपारी दोन वाजता करण्यात येणार आहे.
ब्रम्हपुरी तालुक्यातील बेलगाव मुरपार जंगलातील शेतशिवारात वाघाने मुलाच्या डोळ्यासमोर वडिलांचा बळी घेतला. ही घटना सोमवार, ८ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडली. दुर्योधन जयराम ठाकरे (४९) असे मृताचे नाव आहे.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ठाणे महापालिका, ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटना आणि ठाणे पोलिसांच्या सहकार्याने १४ ऑगस्टला १० किमी जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा पाचपाखाडी येथील ठाणे महापालिका भवन येथून सुरू होणार असून त्याच ठिकाणी समाप्त होणार आहे.
शेतातून परत येत असताना पती-पत्नी तलावाच्या सांडव्यात पाय घसरून पडले व पुरात वाहत गेले. यात दोघांचाही मृत्यू झाला. सुभाष राऊत (५५) व सुरेखा राऊत (५२) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना राळेगाव तालुक्यातील वरूड जहांगीर येथे आज सोमवारी घडली.
बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाच्या बाहेरील मोकळ्या वनक्षेत्रातील नाल्यात आज (सोमवार) बिबट्याचे दोन ते तीन दिवसाचे पिल्लू पाण्यात बुडालेल्या अवस्थेत आढळले. त्याचा पंचनामा करुन गोरेवाडा प्रकल्पातील वन्यप्राणी बचाव केंद्रात शवविच्छेदनासाठी आणले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुजीत कोलंगथ, डॉ. मयूर पावशे यांनी शवविच्छेदन केले. त्यात पिलाचा मृत्यू बुडून झाल्याचे स्पष्ट झाले. वाचा सविस्तर बातमी…
भाजपच्या हुकूमशाही कारभाराला देशातील जनता कंटाळली असून त्यांचा हा कारभार जास्त दिवस चालणार नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी केली आहे. तीन सदस्यीय प्रभागरचना झालेली असताना जाणीवपूर्वक चार सदस्यीय प्रभाग करून संभ्रमावस्था निर्माण केली जात आहे . मात्र, राष्ट्रवादीला फरक पडणार नाही, असेही त्या म्हणाल्या.
देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना १९४२ च्या चिमूर स्वातंत्र्य लढ्यात युवा स्वयंसेवक बालाजी रायपुरकर शहीद झाल्याचा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ‘आरएसएस ॲन्ड फ्रिडम स्ट्रगल’ या पत्रकात केला आहे. सध्या हे पत्रक समाज माध्यमावर सार्वत्रिक झाले आहे. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा देशाच्या स्वातंत्र्यालाच विरोध होता, हा इतिहास आहे.
तिकीट दरातील कपात आणि गर्दीतील प्रवास टाळण्यासाठी मध्य रेल्वेवरील वातानुकूलित लोकलला प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळू लागला आहे. डोंबिवली आणि ठाणे स्थानकांतून प्रवास करणारे प्रवासी मोठ्या संख्येने वातानुकूलीत लोकलला पसंती देत असून फेब्रुवारी ते जुलै २०२२ या सहा महिन्यांत दोन्ही स्थानकांमध्ये एक लाख ७९ हजार २४१ तिकीटांची विक्री झाली. गेल्या मे महिन्यात वातानुकूलीत लोकलला पसंती मिळणाऱ्या स्थानकांमध्ये डोंबिवलीबरोबर सीएसएमटी स्थानकाचा समावेश होता. मात्र आता ठाणे स्थानकाने आघाडी घेतली असून त्यापाठोपाठ कल्याण स्थानकातूनही वातानुकूलीत लोकलमधून प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. वाचा सविस्तर बातमी…
डोंबिवली पूर्वेतील टिळक पुतळा ते पाथर्ली नाका दरम्यानच्या मंजुनाथ शाळा परिसरातील रस्त्यावर उभ्या करुन ठेवण्यात आलेल्या एका बुलेटला सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता अचानक आग लागली. आगीत बुलेट जळून खाक झाली. आग लागताच जवळच्या एका दुकानदाराने बादल्यांमधून पाणी ओतून आग विझवण्याचा प्रयत्न केला.
मागील काही दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने रविवारी रात्रीपासून विदर्भात जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे वर्धा, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोलीत पुन्हा पूरस्थिती उद्भवल्याचे चित्र आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून अनेक मार्गावरील वाहतूक ठप्प पडली. वाचा सविस्तर बातमी…
गेल्या चाळीस दिवसांमध्ये राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकलेला नाही. सर्व कारभार सचिवांमार्फत सुरू आहे. महाराष्ट्र बेवारस वाटतो आहे, राज्यात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना कुणाचा धाक राहिलेला नाही, त्यामुळेच महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, असा आरोप माजी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला.
भंडारा जिल्ह्यातील लाखनी पोलीस ठाण्याअंतर्गत एका गावात महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात कर्तव्यात कसूर करणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्यासह दोघांना निलंबित करण्यात आले. एका महिला कर्मचाऱ्याची तडकाफडकी पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आज (सोमवार) नागपुरात प्रसारमाध्यमांना दिली. वाचा सविस्तर बातमी…
नीति आयोगाच्या नियामक परिषदेच्या रविवारी झालेल्या बैठकीमधील एक फोटो सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. या बैठकीला उपस्थित असणाऱ्या सर्व मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नीति आयोगाच्या अधिकाऱ्यांचा हा फोटो असून या फोटोत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अगदी शेवटच्या रांगेत उभे असल्याचं दिसत आहे. याच मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आक्षेप नोंदवल्यानंतर आता शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी हा फोटो आणि त्यासंदर्भात सुरु असणाऱ्या मान-अपमानाच्या चर्चांवर मत व्यक्त केलं आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त…
मुख्यमंत्री शिंदे नीति आयोगाच्या फोटोत शेवटच्या रांगेत : उदय सामंत म्हणतात, "…ते कोणाला दिसलं नाही हे आपलं दुर्दैव"https://t.co/4Mku73pSbx
— LoksattaLive (@LoksattaLive) August 8, 2022
जाणून घ्या प्रकरणावर उदय सामंत नेमकं काय म्हणालेत#EknathShinde #eknathshindeCM #NitiAayog
महागाईविरोधात काँग्रेसने दिल्लीत केलेल्या आंदोलनावरुन शिवसेनेनं सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि राहुल गांधींचं कौतुक केलं आहे. महागाईविरोधातील आंदोलनामध्ये काँग्रेस रस्त्यावर उतरली मात्र इतर विरोधी पक्ष कुठे आहेत असा प्रश्न शिवसेनेनं विचारला आहे. त्याचप्रमाणे या आंदोलनाला चिरडण्यासाठी त्याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही शिवसेनेनं टीका केली आहे. महागाईसारख्या प्रश्नांवर विरोधकांनी एकत्र आलं पाहिजे असं म्हणतानाच विरोधकांमधील मतभेद हीच भाजपाची ताकद असल्याचं शिवसेनेनं म्हटलंय. येथे वाचा सविस्तर वृत्त…
शिवसेनेकडून काँग्रेसचं तोंड भरुन कौतुक; अमित शाहांना ‘त्या’ वक्तव्यावरुन केलं लक्ष्य तर गांधी कुटुंबाचा उल्लेख करत म्हणाले…https://t.co/z4X21HehK3

“लोकशाहीत निषेध करण्यासाठी काळे कपडे, काळे झेंडे, काळा इतिहास ही प्रतिके आहेत. दक्षिणेतील देवांना तर…"#Shivsena #Congress #ED
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाट भाग आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कायम आहे. पुढील तीन दिवस, गुरुवारपर्यंत असाच पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत गेल्या शुक्रवारपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यानंतर हळूहळू पावसाचा जोर वाढत गेला.
शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात ‘टीईटी’मध्ये घोटाळा झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली. पण याच प्रकरणात शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यानंतर विरोधक आक्रमक झाले असून पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर प्रदेश अध्यक्षा विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी ईडी सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अब्दुल सत्तारांना शिक्षणमंत्री करावं, अशी मागणी करीत जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. वाचा सविस्तर बातमी…
नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (एनटीए) वतीने घेण्यात आलेल्या ‘जेईई मेन्स सत्र २’ च्या परीक्षेत येथील महर्षी पब्लिक स्कूलचा विद्यार्थी श्रेणिक मोहन साकला हा शंभर टक्के गुण मिळवून राज्यात अव्वल आला आहे. या परिक्षेत देशभरातून २४ विद्यार्थी अव्वल आले असून त्यात श्रेणिकचा समावेश आहे. ‘जेईई मेन्स सत्र २’ ची परीक्षा २५ ते ३० जुलैदरम्यान घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल ‘एनटीए’ने आज जाहीर केला.
सध्याचे मुख्यमंत्री तात्पुरते असून, हे सरकार कोसळणार आहे असा दावा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. राज्यात सरकार आहे की नाही हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन लोकांच्या जम्बो कॅबिनेटमध्ये खरा मुख्यमंत्री कोण हेच कळत नाही अशी टीकाही त्यांनी केली. मातोश्रीबाहेर आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत काही समर्थकांनी युवासेनेत प्रवेश केला. यावेळी संवाद साधताना त्यांनी राज्य सरकारच्या कारभारावर ताशेऱे ओढले.
दारू पिताना झालेल्या किरकोळ भांडणावरून एकाने मित्राचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना हडपसर भागात घडली. गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अनिल राजू सासी (वय ३३, रा. इंदिरानगर वसाहत) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी प्रवीण नामदेव नाईक (वय ४१, केशवनगर, मुंढवा) याला अटक करण्यात आला आहे.
संकेत मिलिंद गोवेकर (वय २२, रा. कोरेगाव, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. गोवेकरच्या विरोधात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. तो कात्रज तलावाजवळ थांबला अशून त्याच्याकडे पिस्तुल असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याची झडती घेण्यात आली.
पुणे, पिंपरी-चिंचवड, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, जिल्हा परिषद आणि अन्य स्थानिक स्वराज्या संस्थांच्या अधिपत्याखाली असलेल्या जिल्ह्यातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने त्याविरोधात पुणे, पिंपरी आणि जिल्ह्यातील अनेक संघटनांनी एकत्र येत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
केंद्र सरकारने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात ‘घरोघरी तिरंगा’ अभियानाचे आयोजन केले आहे. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत या अभियानाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे आदेश महामंडळाने जारी केले आहेत. या दिवशी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय सणाला साजेसा पेहेराव या काळात करावा, असेही महामंडळाने आदेशात नमुद केले आहे.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त मंगळवार, ९ ऑगस्ट रोजी आरे वसाहतीमध्ये मिरवणूक काढण्यात येणार आहे. आरे वसाहतीमधील युनिट क्रमांक ५, आरे मार्केट येथून सकाळी १०.३० वाजता या मिरवणुकीला सुरुवात होईल आणि बिरसा मुंडा चौक येथे ही मिरवणूक संपेल. यावेळी नृत्य, गीत, संगीताच्या माध्यमातून मुंबईकरांना संदेश देण्यात येणार आहे.
कल्याण पश्चिमेतील चिकणघर येथील संपदा रुग्णालया जवळील दोन बंद घरांच्या दरवाजांचे कडीकोयंडे तोडून चोरट्यांनी चार लाख ३६ हजार रुपयांचा ऐवज शनिवारी चोरुन नेला. यामध्ये एका वकिलाच्या घराचा समावेश आहे. कल्याण मधील चिकणघर हा सर्वाधिक वर्दळीचा भाग आहे. या परिसरात चोऱट्यांचा वावर वाढल्याने परिसरातील रहिवासी चिंताग्रस्त झाले आहेत.
मोबाईलला चार्जिंग करण्यासाठी चार्जर घेतला म्हणून ३८ वर्षीय व्यक्तीने त्याच्या थोरल्या भावावर चाकू हल्ला केल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला आहे. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. मोडक सागर, मध्य वैतरणा, भातसा आणि तुलसी धरणात १०० मि.मी.हून अधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे सातही तलावांतील पाणीसाठा ९२ टक्क्यांच्या पुढे गेला आहे. गेल्या आठ दिवसात १ लाख दशलक्ष लीटर पाणीसाठा वाढला आहे. वाचा सविस्तर बातमी…
एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पांडुरंगराव गुरमे यांनी रविवारी युरोपमधील इस्टोनियाची राजधानी टॅलिनमध्ये झालेल्या ट्रायथलॉन स्पर्धातला ‘आयर्नमॅन’ हा बहुमान मिळविला. वाचा सविस्तर बातमी…
महागाई, बेरोजगारी, अग्निपथ योजना, जीवनावश्यक वस्तुंवरील जीएसटी इत्यादींच्या मुद्य्यांवरून केंद्र सरकार विरोधात ठाणे शहरात काँग्रेसकडून आज (सोमवार) दुपारी ‘जन आंदोलन’ करण्यात येणार आहे.