Latest Marathi News Update, 30 November 2023: राज्यात मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण असा आरक्षणाचा वाद चालू असताना दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर चालू असलेल्या आमदार अपात्रता सुनावणीचीही जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. त्यातच दत्ता दळवींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत केलेल्या विधानामुळे त्यांना अटक करण्यात आल्यानंतर त्यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये राजकारण सुरू झालं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Today’s Breaking News Updates: महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा वाद चिघळला.
पिंपरी : पक्षातील फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एके काळी बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरावर लक्ष केंद्रित केले असताना आता मध्यवर्ती कार्यालयेही समोरासमोर असणार आहेत. दोन्ही गटांच्या कार्यालयांमध्ये केवळ पुणे-मुंबई महामार्ग असणार आहे. यामुळे दोन्ही गटातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
ठाणे : दिवा रेल्वे स्थानकातून दिवा ते सीएसएमटी ही उपनगरीय रेल्वेगाडी सुरू व्हावी या मागणीसाठी बुधवारी दिवा रेल्वे स्थानकात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. दिवा रेल्वे स्थानकातून प्रवास करताना प्रवाशांना रेल्वेगाड्यांमध्ये प्रवेश करणे शक्य होत नाही. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून येथील नागरिक दिवा स्थानकातून रेल्वेगाडी सुरू करावी अशी मागणी करत आहेत.
धाराशिव – धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण लागू करून त्याची अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांकरिता हजारो धनगर समाजबांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरूवारी धडक मोर्चा काढला. पिवळे झेंडे, पिवळ्या टोप्या आणि धनगर आरक्षणासंबंधी विविध घोषणाफलके हातात घेवून हजारो समाजाबांधव मोर्चात सहभागी झाले होते.
जिल्ह्यातील धनगर समाजाच्या वतीने धडक मोर्चा काढून एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीची मागणी मागील अनेक वर्षांपासून दुर्लक्षित केली जात आहे. प्रत्येक निवडणुकीत सत्ताधार्यांकडून आरक्षणाचे आश्वासन दिले जाते. मात्र प्रत्यक्षात कोणताही ठोस निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे समाज दिवसेंदिवस मागास होत चालला आहे. समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एसटी प्रवर्गाचे आरक्षण लागू करण्यात यावे, व एसटी प्रवर्गाला लागू असलेल्या सर्व योजनांचा लाभ धनगर समाजाला देण्यात यावा. धनगड आणि धनगर हे एकच असून शब्दाचा खेळ सरकारने बंद करावा, अशा प्रतिक्रिया मोर्चेकर्यांकडून व्यक्त होत होत्या.
आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेले पिवळ वादळाची लेडीज क्लब येथून मोर्चाची सुरूवात झाली हा भव्य मोर्चा संत गाडगेबाबा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, लहुजी वस्ताद साळवे चौक आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.धनगर समाजातील अहिल्या देवींच्या वारसा असलेल्या मुलींच्या हस्ते जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. या मोर्चासाठी धाराशिव जिल्ह्यातील धनगर समाज बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर यावेळी धनगर समाजातील अनेक वक्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
मोर्चात मेंढरे, धनगरी ढोल, भांडार्याची उधळण करत मोर्चाची सुरूवात करण्यात आली. धनगर समाजाला आरक्षण द्यावे, यासह घोषणाबाजी करत हा मोर्चा काढण्यात आला. धनगर आरक्षणाचा मुद्दा निकालात काढण्याची मागणी धनगर समाजाने केली आहे. अन्यथा धनगर समाजाच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असा इशारा धनगर समाजाच्यावतीने देण्यात आला. मोर्चादरम्यान जिल्हा विधीज्ञ मंडळासह विविध समाज संघटनांनी मोर्चेकर्यांना लेखी समर्थन दर्शविले. राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता करण्यात आली.
डोंबिवली – कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील पलावा सिटी भागात मंगळवारी एम. डी. या अंमली पदार्थाच्या विक्रीसाठी आलेल्या दोनजणांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पाच लाखांहून अधिक किमतीची एम. डी. पावडर पोलिसांनी जप्त केली आहे.
सोन्याच्या मालकांचा शोध लागत नसल्याने हे सोने पोलिसांच्या मुद्देमाल कक्षात पडून आहे.
तारापुर जवळील कुडण येथे एका सात वर्षीय शाळकरी मुलावर बिबट्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे.
आंबेडकर यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
नाशिक – ज्या आदिवासी बांधवांना स्वतःचे घर नाही, त्यांना दोन वर्षात हक्काचे घर देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री डाॅ. विजयकुमार गावित यांनी दिली. शहरातील महाकवी कालिदास कलामंदिरात आदिवासी विकास विभागामार्फत आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आदिवासी सेवक आणि आदिवासी सेवा संस्था यांना २०१९ ते २०२२ या चार वर्षांच्या राज्य पुरस्कारांचे मंत्री डॉ. गावित यांच्या हस्ते वितरण करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
संजय राऊतांनी राहत इंदौरींचा ‘तो’ शेर केला पोस्ट, तर्क-वितर्कांना उधाण!
https://t.co/mpAsnBzmtI
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 30, 2023
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपा आणि आरएसएसवर सडकून टीका केली. “आरएसएस-भाजपाच्या १० वर्षांमधील सत्तेचा हिशोब मांडायला सुरुवात केली पाहिजे”, असं म्हणत त्यांनी ३५ हजार कोटी रुपयांची लूट झाल्याचा आरोप केला. ते बुधवारी (२९ नोव्हेंबर) वंचितच्या सांगलीतील ‘सत्ता संपादन सभेत’ बोलत होते.
वंचित बहुजन आघाडीच्या सांगलीमधील सभेत मंचावर महाराष्ट्रातील सर्वच महापुरुषांची प्रतिमा ठेवण्यात आल्या. यात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले यांच्यासह टिपू सुलतान यांचीही प्रतिमा ठेवण्यात आली. या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करताना पोलिसांनी टिपू सुलतान यांच्या प्रतिमेला हार घालू नये, असं प्रकाश आंबेडकरांना सांगितलं. त्यावर आंबेडकरांनी बुधवारी (२९ नोव्हेंबर) वंचितच्या ‘सत्ता संपादन सभेत’ पोलिसांना इशारा दिला.
नागपूर : खासदार सांस्कृतिक महोत्सवामध्ये गुरुवारी प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी तीन हजार किलोची खिचडी तयार केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतील खासदार सांस्कृतिक महोत्सव नागपुरात ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात सुरु आहे.
पनवेल : कळंबोली येथे ट्रेलरच्या चाकाखाली झोपलेल्या व्यक्तीला चिरडून ठार केल्याची घटना सोमवारी दुपारी दिड वाजता घडली. या घटनेमुळे पुन्हा एकदा रस्त्यावर आणि गाडी रस्त्याकडेला उभी करुन झोपणा-या चालकांच्या सूरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नाशिकच्या येवला भागात नुकसानाची पाहणी करण्यासाठी आज छगन भुजबळांचा दौरा आयोजित करण्यात आला होता. त्यानुसार ते दौऱ्यासाठी निघालेही. मात्र, काही मराठा संघटनांनी छगन भुजबळांच्या दौऱ्याला विरोध दर्शवला. काही ठिकाणी भुजबळांच्या ताफ्याला काळे झेंडेही दाखवण्यात आले. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळांनी दौरा अर्धवट सोडून दोन गावांमध्ये भेट न देताच परत फिरल्याचं सांगितलं जात आहे.
नागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरू होत आहे. या अधिवेशानासाठी तारांकित प्रश्नांचा पाऊसही पडत असून विधानपरिषदेत आतापर्यंत १८०० वर प्रश्न दाखल झाल्याची माहिती आहे, तर गुरुवारपासून लक्षवेधी सूचना स्वीकारण्यात येणार आहेत.
नागपूर: खुल्या प्रवर्गातील अर्थिक दुर्बल घटकातील सर्व युवक युवतीच्या शैक्षणिक उन्नतीसाठी राज्यशासनाची महाराष्ट्र संशोधन व उन्नती व प्रशिक्षण प्रबोधनी (अमृत संस्था) २०१९ ला सुरू करण्यात आली. एक संचालक व तीन कर्मचारी हे साखर संकुल शिवाजीनगर पुणे येथे छोट्या एका खोलीत ही अमृत स्वायत्त संस्था काम करते. फक्त कागदोपत्री ही संस्था काम करत आहे का अशी शंका वाटावी अशी परिस्थिती आहे.
नागपूर : सातत्याने अपघातांमुळे चर्चेत असलेल्या समृद्धी महामार्गावर दिवाळीत सर्वाधिक वाहनांनी प्रवास केल्याची माहिती पुढे येत आहे. ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये दिवाळीच्या काळात पहिल्या २१ दिवसांमध्ये या महामार्गावर तब्बल १.१६ लाख जास्त वाहने धावली.
सर्वेक्षनानंतर फेरीवाल्यांच्या जागा निश्चित होतील आणि अतिक्रमण तसेच वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळेल असा विश्वास पालिकेने व्यक्त केला आहे.
मुंबई : कुर्ला येथील एल.बी.एल. मार्गावर वाहतुकीचे नियमन करणाऱ्या वाहतूक पोलिसाला मोटारगाडीने धडक दिली असून या अपघातात वाहतूक पोलिसाच्या पायाचे हाड मोडले. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मोटरगाडीचालकाला पोलिसाने थांबण्याचा इशारा केला होता. मात्र मोटरगाडीचा वेग वाढवून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या चालकाने पोलिसाला धडक दिली.
मुंबई : मुंबईच्या सांस्कृतिक आणि रंगभूमीवरील इतिहासाची गौरवशाली परंपरा अनुभवत शतकी वाटचाल पूर्ण केलेले दामोदर नाट्यगृह पुनर्बांधणीच्या कामासाठी १ नोव्हेंबरपासून बंद करण्यात आले आहे. नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीच्या नावाखाली ते जमीनदोस्त करण्याचा डाव सोशल सर्व्हिस लीगने केला असल्याचा आरोप करीत सहकारी मनोरंजन मंडळाने गुरुवारी सकाळी आंदोलन केले.
नवी मुंबई : रविवारी रात्री नेरुळ येथे अनधिकृत फेरीवाल्यांच्या आपसातील भांडणात हकनाक एका रुग्णवाहिका चालकाची निर्घृण हत्या झाल्या नंतरही मनपाला जाग आली नाही. मात्र कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनीच पुढाकार घेत पूर्ण नेरुळ मध्ये पहाटे तीन पर्यंत अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केली.
राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत काम करणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे ३५ दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू आहे.
छगन भुजबळ अवकाळीमुळे झालेल्या नुकसानाच्या पाहणीसाठी येवला दौऱ्यावर असून तिथे मराठा संघटनांनी भुजबळांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले.
दोन डिसेंबरपासून राज्यभरात किमान तापमानात घट होऊन थंडी वाढण्याची शक्यता आहे.
४ डिसेंबर नौदलदिनाच्या निमित्ताने पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्यदिव्य पुतळ्याच अनावरण होणार आहे. तसेच या निमित्ताने राजकोट किल्ला परिसर सुशोभीकरण कामकाज देखील पूर्णत्वास आलं आहे – निलेश राणे
४ डिसेंबर नौदलदिनाच्या निमित्ताने पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्यदिव्य पुतळ्याच अनावरण होणार आहे. तसेच या निमित्ताने राजकोट किल्ला परिसर सुशोभीकरण कामकाज देखील पूर्णत्वास आलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे… pic.twitter.com/PHTSRtK4sG
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 30, 2023
नागपूर : उपराजधानीत वाहतूक नियम मोडण्याची ऑटोरिक्षा चालकांमध्ये स्पर्धा सुरू असल्याचे चित्र आहे. गेल्या चार वर्षांची स्थिती बघता प्रत्येक वर्षी शहरात नियम मोडणाऱ्या ऑटोरिक्षांची संख्या वाढत असल्याचे माहितीच्या अधिकारातून पुढे आले आहे. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर हे गृह शहर आहे.
चंद्रपूर: एसटी महामंडळाने बसेसच्या तिकिटात ५० टक्के सवलत देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली. २७ मार्चपासून या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील महिलांचा एसटीचा प्रवास वाढला आहे.
चंद्रपूर विभागातून अवघ्या सात महिन्यांत तब्बल ६६ लाख ३५ हजार महिलांनी प्रवास केला, यातून महामंडळ मालामाल झाले असून, तब्बल ३३ कोटी ४१ लाखांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.
चंद्रपूर विभागात चंद्रपूर, चिमूर, राजुरा, वरोरा असे चार आगार येतात. ब्रह्मपुरी आगाराचा गडचिरोली जिल्ह्यात समावेश आहे. या चारही आगारांत महिला सन्मान योजनेचा महिलांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. सकाळपासून सांयकाळपर्यंत कोणतीही बस बघितल्यास महिला प्रवाशांची संख्या लक्षणीय दिसून येत आहे. याउलट खासगी बसेसचे प्रवासी कमी झाले असल्याचे दिसून येत आहे.
योजना सुरू झाल्यापासून नोव्हेंबर महिन्यापर्यंत चंद्रपूर विभागातून ६६ लाख ३५ हजार महिलांनी प्रवास केला. यातून महामंडळ मालामाल झाले असून, तब्बल ३३ कोटी ४१ लाखांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.
ठाणे शहरात दिवाळी पासून आगीच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. दिवाळी नंतरही या घटनांचे प्रमाण कायम असल्याचे दिसत आहे.
जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत आणि त्यानंतर तयार केलेल्या अहवालात ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
राज्य शासनाने २०११ रोजी वसई विरार महापालिकेतून २९ गावे वगळली होती.
Today’s Breaking News Updates: दत्ता दळवींच्या अटकेनंतर महाराष्ट्रात सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप.