Maharashtra Breaking News Updates, 19 February 2025 : विकिपिडियावर छत्रपती संभाजी महाराजांबाबत करण्यात आलेला वादग्रस्त उल्लेख आणि त्यावर कमाल आर खाननं केलेलं ट्विट यावर सध्या जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनी विकिपिडियावरून संबंधित मजकूर काढण्याबाबत कार्यवाही सुरू केली आहे. दुसरीकडे रणवीर अलाहाबादिया प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू असली, तरी अशा मजकुरावर निर्बंध लागू करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
वसई मेट्रोसाठी सर्वेक्षणाचे काम अखेर सुरू, भाईंदर खाडीतून वसईत येणार मेट्रो
वसई : वसई विरार शहरातील मेट्रो कामासाठी सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम पुढील दिड महिन्यांपर्यत चालणार आहे. ही मेट्रो भाईंदर खाडीतून आणली जाणार आहे.
अहिल्या नगर जिल्ह्यातील कर्जत येथे शिवजयंती मिरवणुकीतून डीजे हद्दपार
कर्जत : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती कर्जत मध्ये मोठ्या उत्साहात आणि विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. यावेळी प्रथमच मिरवणुकी मधून डीजे हद्दपार करण्यात आला आहे.
नांदेड गोळीबार प्रकरणात आणखी दोन जणांना एटीएसने केली अटक
नांदेड : १० फेब्रुवारी रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणात एटीएसच्या पथकाने मंगळवार (दि.१९) पुन्हा दोन आरोपींना अटक केली केली असून, त्यांना न्यायालयाने २४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठड़ी सुनावली आहे.
रेल्वेतून पडून १७ वर्षीय मुलीचा मृत्यू
शहापूर : मध्य रेल्वेच्या वासिंद-आसनगाव स्थानकादरम्यान असलेल्या वेहळोली रेल्वे फाटकाजवळ मंगळवारी सायंकाळी उपनगरीय रेल्वेगाडीतून पडून एका १७ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला.
हत्येप्रकरणी नेपाळी सुरक्षा रक्षकाला आजीवन कारावास
ठाणे : घरामध्ये राहण्यासाठी जागा दिली नाही म्हणून नातेवाईकाची हत्या करणाऱ्या इंद्रमोहन मारमले बुढा (४४) याला ठाणे न्यायालयाने आजीवन कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. २०२१ मध्ये इंद्रमोहन विरोधात ठाणेनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल होता.
ट्रॅक्टरला धडकून कर्नाटक बस खड्ड्यात कोसळून अपघात, २१ जखमी
सांगली : ट्रॅक्टरच्या मागील ट्रॉलीला धडक बसल्याने म्हैसाळजवळ कर्नाटक परिवहन विभागाची एसटी बस ३० फूट खड्ड्यात कोसळून झालेल्या अपघातात चालकासह २१ जण जखमी झाले. बुधवारी सकाळी झालेल्या या अपघातातील जखमींना उपचारासाठी मिरज वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृर्ती स्थिर असल्याचे रूग्णालयातून सांगण्यात आले.
अहिल्यानगर जिल्हा परिषदेत ५८ लाखांचा अपहार; दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा
अहिल्यानगर : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात ५८ लाख २० हजार ५८६ रुपयांचा अपहर केल्याच्या आरोपावरून दोघा कनिष्ठ सहायक पदावरील कर्मचाऱ्यांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मालमत्ता करवसुलीसाठी पालिकेची अंतिम अभय योजना, २४ फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान तीन टप्प्यात विविध सवलती
उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेच्या थकीत मालमत्ता कराच्या थकबाकीचा डोंगर दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे विकास कामांवर परिणाम होतो आहे. त्यामुळे मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी उल्हासनगर पालिका प्रशासनाने २४ फेब्रुवारीपासून १८ मार्च पर्यंत तीन टप्प्यात अभय योजना लागू केली आहे.
बाहेरील साखर कारखान्याला ऊस घालणाऱ्या सभासदांच्या सर्व सवलती बंद करणार, सोमेश्वर साखर कारखानाचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप.
बारामती : कोणताही साखर कारखाना जवळपास १५० दिवस पूर्ण क्षमतेने चालविला पाहिजे, तरच त्यांच्या कार्यक्षमतेचा पूर्ण वापर होतो व सर्वांगाने फायदा सुद्धा होतो, राज्य सरकारने या वर्षी १५ नोव्हेंबरला राज्यातील सर्व साखर कारखाना गाळप करण्यास परवानगी दिल्यामुळे जवळपास पंधरा दिवस आपला साखर कारखाना उशिरा सुरू झालेला आहे.
‘सीसीआय’ची खरेदी बंद होताच कापसाच्या दरात क्विंटलमागे पाचशे रुपयाची घट
परभणी : ‘सीसीआय’च्या स्वॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे कारण सांगून गेल्या आठवड्यापासून सर्वत्र ‘सीसीआय’ची कापूस खरेदी बंद झाल्याने त्याचा शेतकर्यांना मोठा फटका बसला आहे.
तापी नदी पुनर्भरण प्रकल्प : सरकारी अनास्था आणि…
मध्यप्रदेश, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रासाठी सिंचनाच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरू शकणाऱ्या तापी महाकाय पुनर्भरण प्रकल्पाचे (तापी मेगा रिचार्ज) घोंगडे भिजतच आहे. या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल सर्वेक्षण व इतर बाबी पूर्ण करून तयार झाला आहे. सविस्तर वाचा…
रामटेकममधील सेक्स रॅकेटमध्ये रत्नागिरीतील उच्चशिक्षित तरुणी
शहरातील अनेक मोठमोठ्या हॉटेलसह ब्युटी पार्लर, मसाज सेंटर, स्पा सेंटर, पंचकर्म केंद्र आणि युनिसेक्स सलूनमध्ये बिनधास्तपणे देहव्यापार सुरु असतो. मात्र, आता देहव्यापाराचे लोण ग्रामीण भागातही पसरले आहे. सविस्तर वाचा…
आॅरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दुहेरी बोगदा प्रकल्पाला आर्थिक बळ, ७३२६ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) आॅरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दुहेरी बोगदा प्रकल्पासाठी अखेर ७३२६ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाले आहे. यूनियन बँक आॅफ इंडियाच्या लार्ज काॅर्पोरेट शाखेकडून हे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे आता या प्रकल्पाला आर्थिक बळ मिळाले असून प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टीने एमएमआरडीएने एक पाऊल पुढे टाकले आहे.
आगे आगे देखो, होता है क्या? मंत्री संजय राठोड म्हणतात,‘ऑपरेशन टायगर…’
महायुती सरकारकडे सर्वाधिक संख्याबळ असतानाही ‘ऑपरेशन टायगर’ मोहीम सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या संदर्भात पत्रकारांनी राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांना छेडले असता, त्यांनी ‘आगे आगे देखो, होता है क्या?’ असे उत्तर दिल्याने राज्यात पुन्हा एकदा पक्ष फुटीची मोठी घटना घडण्याचे सुतोवाच आहे.
रवींद्र नाट्य मंदिरचा पडदा २८ फेब्रुवारीला उघडणार
मुंबई : प्रत्येक रंगकर्मी व रसिकप्रेक्षकांच्या हक्काचे ठिकाण असणाऱ्या मध्य मुंबईतील प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीसह रवींद्र नाट्य मंदिरच्या नूतनीकरणाचे काम अखेर पूर्ण झाले आहे.
जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरण : हिमायत बेगवर कोणतेही मानसिक परिणाम नाही, एकांतवासातून बाहेर काढण्याची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली
मुंबई : पुणे येथील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाशी संबंधित खटल्यातील दोषसिद्ध आरोपी मिर्झा हिमायत बेगवर कोणताही मानसिक आघात झाल्याचे दिसून येत नाही, असे उच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले. तसेच, एकांतवासातून बाहेर काढण्याची त्याची मागणी फेटाळून लावली. बेग याने याचिकेत आरोप केल्याप्रमाणे सद्यस्थितीला त्याच्यावर कोणत्याही मानसिक आघात झाल्याचे दिसून येत नाही. तसेच तो कोणत्याही एकांतवासात नाही, हे येरवडा कारागृहाने पुराव्यांसह स्पष्ट केले आहे.
अहिल्यानगरमध्ये तूर खरेदीसाठी १२ केंद्रांना मंजुरी, ९ केंद्रावर खरेदी सुरू
अहिल्यानगरः आधारभूत किंमतीच्या खरेदी योजनेंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यासाठी पणन महासंघाने तूर खरेदीच्या १२ केंद्रांना मंजूरी दिली आहे. ९ केंद्रावरून हमीभावाने तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी तसेच प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
एरंडवण्यातील डीपी रस्त्यावर तरुणाला लुटणारे गजाआड, चोरट्यांकडून सोनसाखळी, दुचाकी, तलवार जप्त
पुणे : एरंडवणे भागातील डीपी रस्त्यावर धावण्याचा सराव करणाऱ्या तरुणाला तलवारीचा धाक दाखवून लुटणाऱ्या चोरट्यांना अलंकार पोलिसांनी गजाआड केले.सुमीत उर्फ अभिषेक उर्फ डायमंड राजू आसावरे (वय १९), अभिषेक उर्फ कानोळ्या भारत खंदारे (वय २२, दोघे रा. किष्किंदानगर, कोथरूड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
विकासकांकडील घरखरेदीदारांच्या थकबाकीपैकी फक्त २५ टक्के वसुली! मुंबई उपनगर, पुणे, ठाणे आघाडीवर
मुंबई : घरखरेदीदारांना नुकसान भरपाईपोटी महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरणाने (महारेरा) तब्बल ९८० कोटींचे वसुली आदेश जारी केले असले तरी त्यापैकी फक्त २५ टक्के म्हणजे २०९ कोटींची वसुली आतापर्यंत झाल्याचे आढळून येत आहे. वसुली आदेशाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रभावी कारवाई केली जात नसतानाही ‘महारेरा’ला विनंती पत्रे पाठविण्याव्यतिरिक्त काहीही करता आलेले नाही.
महसूल मंडळाची फेररचना केल्याशिवाय कोणताही निर्णय होणार नाही – मंत्री विखे
राहता : अप्पर तहसिल कार्यालयावरून सुरू असलेल्या आंदोलनाबाबत बोलतांना विखे यांनी काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता म्हणाले की,ज्यांच्याकडे कोणतेच मुद्दे राहीलेले नाहीत ते फक्त जनतेला पुढे करून अस्तित्वाची लढाई करून दिशाभूल करण्याचे काम करीत आहेत.
खेड भरणेतील शामराव पतसंस्था दिवाळखोरीत; ठेवीदारांची पोलीस ठाण्यात धाव…
दापोली : खेड मधील भरणे नाका या ठिकाणी असलेली शामराव सहकारी पतसंस्था दिवाळखोरीत निघाली असून या पतसंस्थेत कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे. शेकडो ठेवीदारांचे पैसे देण्यासाठी पतसंस्थेत पैसे नाहीत असे सांगितले जात आहे.
शिरूर शहरामध्ये कोयत्याने दहशत निर्माण करणा-या तीन आरोपीच्या पोलीसांनी आवळल्या मुसक्या
शिरुर : शिरुर शहरात कोयत्याने दहशत निर्माण करणा -या तीन जणांना पोलीसांनी जेरबंद केले आहे . १) शाहिद गफुर शेख २) सोनु उर्फ अश्पाक गफुर शेख ३) प्रदिप भाउसाहेब गायकवाड सर्व, रा. प्रितम प्रकाश नगर शिरूर ता शिरूर जि पुणे अशी जेरबंद झालेल्यांची नावे असून न्यायालयाने आरोपीना २० फेबृवारी पर्यत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली
शिक्षा माफीसाठी कुख्यात गुंड अबू सालेमची उच्च न्यायालयात धाव
मुंबई : मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्यात दोषी ठरवण्यात आलेला गुंड अबू सालेम याने शिक्षामाफीसाठी आणि तुरूंगातून सुटका करण्याच्या मागमीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
उंड्रीतील गोदामात छापा, ६४ लाखांचा गुटखा जप्त, पोलीस आणि एफडीएच्या पथकाची कारवाई
पुणे : गुटख्यावर बंदी घातलेली असताना शहरात छुप्या पद्धतीने गुटख्याचे वितरण, तसेच विक्री प्रकरणात काळेपडळ पाेलीस, तसेच अन्न आणि ओैषध प्रशासन विभागाने (एफडीए) कारवाई करुन ६४ लाखांचा गुटखा जप्त केला. गुटख्याची वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे चार मालवाहू वाहने (पीकअप) पोलिसांनी जप्त केले.
Sachin Tendulkar on Shivjayanti 2025: सचिन तेंडुलकरनं दिल्या शिवजयंतीच्या शुभेच्छा!
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. "छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपणा सर्वांना शुभेच्छा. महाराजांचे विचार, त्यांचे शौर्य आणि त्यांचे अद्भुत देशप्रेम आपल्याला नेहमी प्रेरित करत राहो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो", असं सचिननं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
झारखंडमधील फरार नक्षल कमांडर खोट्या कागदपत्रांच्या आधारे २३ वर्षांपासून यवतमाळात मुक्कामी, अटक
यवतमाळ : तब्बल दीड महिना सखोल माहिती घेत यवतमाळ पोलिसांनी झारखंड, छत्तीसगडमधील फरार नक्षल कमांडरच्या मुसक्या आवळल्या.अत्यंत गुप्तपणे केलेल्या कारवाईत अटक केलेल्या नक्षलवाद्याचे नाव तुलसी उर्फ दिलीप जेठू महतो (४७), असे आहे.
अभिनेता विकी कौशलने रायगडावर घेतले छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन
शिवजयंतीचे औचित्य साधून रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी येणार असल्याची घोषणा त्याने कालच केली होती.
स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे पहिले स्वातंत्र्य सेनानी : वडेट्टीवार
छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. स्वराज्याचे स्वप्न त्यांनी साकारले, ते पहिले स्वातंत्र्य सेनानी आहेत, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी अभिवादन केले. सविस्तर वाचा…
शहरबात : गौरव, पुरस्कार आणि बरेच काही…
विद्यापीठाने समाजाभिमुख राहून काम करणे, समाजात आदर्शवत काम करणाऱ्या व्यक्ती विद्यार्थ्यांसमोर आणणे नक्कीच महत्त्वाचे आहे.
यंदा पावसाळ्यापूर्वी मुंबईतील सगळे रस्ते काँक्रीटचे ?पूर्व उपनगरातील रस्ते कॉंक्रिटीकरण कामाची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडून पाहणी
मुंबई : मुंबई महापालिकेने रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचा प्रकल्प हाती घेतला असून आतापर्यन्त मुंबईतील ६५ टक्के रस्ते काँक्रिटचे झाले आहेत. उर्वरित रस्त्यांची कामे सुरु असून सुरुवात केलेली कामे पावसाळ्यापूर्वी, ३१ मे पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्टय महापालिका यंत्रणेपुढे आहे.