Maharashtra Breaking News Updates, 19 February 2025 : विकिपिडियावर छत्रपती संभाजी महाराजांबाबत करण्यात आलेला वादग्रस्त उल्लेख आणि त्यावर कमाल आर खाननं केलेलं ट्विट यावर सध्या जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनी विकिपिडियावरून संबंधित मजकूर काढण्याबाबत कार्यवाही सुरू केली आहे. दुसरीकडे रणवीर अलाहाबादिया प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू असली, तरी अशा मजकुरावर निर्बंध लागू करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यावरील सर्व अतिक्रमणे काढणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदल होत आहेत. रात्री आणि पहाटे गारवा तर दिवसा मात्र उन्हाच्या झळा जाणवत आहेत. राज्यातील तापमान केव्हाच ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले आहे. तर बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३५ ते ४० वर पोहोचले आहे.उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात सर्वाधिक तापमानाच्या नोंदवले जात आहेत. दरम्यान, गेल्या २४ तासांत तापमानात मोठा बदल जाणवत आहे.
पुणे : मद्यपी टोळक्याकडून पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण, पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर गुन्हा दाखल
पोलीस ठाण्यातील काम संपवून घरी निघालेल्या पोलीस कर्मचाऱ्याने सेनापती बापट रस्त्यावर गोंधळ घालणाऱ्या मद्यपी टोळक्याला हटकले.
छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यावरील सर्व अतिक्रमणे काढणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नारायणगाव : छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांचे संवर्धन झाले पाहिजे. शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी सह स्वराज्याची राजधानी रायगड तसेच इतर किल्ल्यांवर संवर्धनाची कामे सुरू आहेत. छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यावरील सर्व अतिक्रमणे काढूण टाकण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्यासाठी राज्य शासनाने स्पेशल टास्क फोर्स निर्माण केला आहे.
पुनर्विकासाविरोधात धारावीत १० सभा, धारावी बचाव आंदोलनाच्या बैठकीत निर्णय
मुंबई : धारावीकरांना पुनर्विकास हवा आहे, पुनर्विकासाला धारावीकरांचा विरोध नाही. मात्र हा पुनर्विकास धारावीकरांच्या मागण्या मान्य करत योग्य प्रकारे करावा. सर्व धारावीकरांचे पुनर्वसन धारावीतच करावे. एकही धारावीकर धारावीबाहेर जाता कामा नाही अशी आमची मागणी आहे. तरीही आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून धारावी पुनर्विकासाअंतर्गत अदानी समुहाकडून धारावीकरांची फसवणूक केली जात आहे.
Abu Salem Moves to Bombay High Court for Early Realease: अबू सालेमला हवीये तुरुंगातून सुटका!
गँगस्टर अबू सालेमनं मुदतपूर्व सुटकेसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मुंबई साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आता २५ वर्षांची शिक्षा भोगून झाली आहे, असा दावा करत सालेमनं मुदतपूर्व सुटकेसाठी याचिका केली आहे. येत्या १० मार्च रोजी त्याच्या याचिकेवर सुनावणी होईल.
नवीन प्रदेशाध्यक्ष सपकाळ काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देतील का ?
प्रदेशाध्यक्षपदासाठी इच्छुक आणि इच्छुक नसलेल्या नेत्यांच्या मांदियाळी बाजूला ठेवत हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली.
दापोलीत रानकोंबड्याची शिकार; बंदुकीसह दोघेजण वनविभागाच्या ताब्यात
दापोली : संरक्षित असलेल्या रान कोंबड्याची शिकार करणे दोन इसमांना महागात पडले असून वन विभागाने या दोघांवर गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे. ही कारवाई कुंभवे ता. दापोली येथे करण्यात आली आहे. त्यामुळे अवैधरित्या शिकार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
बेळगाव सीमा वादावर प्रकाश; ‘फॉलोअर’ चित्रपट २१ मार्चला प्रदर्शित होणार
लक्षणीय मराठी भाषिक लोकसंख्या असलेले बेळगाव शहर हे महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यांमधील वादाचा मुद्दा राहिले आहे.
कृषी पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेशासाठीची सीईटी जाहीर.. अर्ज भरण्यासाठी १० मार्चपर्यंतची मुदत
कृषी पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेशासाठीची सीईटी जाहीर.. अर्ज भरण्यासाठी १० मार्चपर्यंतची मुदत
शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांसाठी पहिल्यांदाच सेवापूर्व प्रशिक्षण; केंब्रिज, विश्वकर्मा विद्यापीठातर्फे अभ्यासक्रमाची निर्मिती
पुणे : शिक्षण क्षेत्रात होत असलेले बदल लक्षात घेऊन केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट, विश्वकर्मा विद्यापीठ यांच्यातर्फे गुणवत्तापूर्व शिक्षक घडण्यासाठी सेवापूर्व प्रशिक्षण अभ्यासक्रम विकसित करण्यात आला आहे.
पुणे : ‘अभय’ योजनेची मुदत मार्च अखेरपर्यंतच
महावितरणच्या अभय योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत असून वीजबिलांच्या थकबाकीतून वीज ग्राहकांना मुक्त होता येणार आहे.
पाणीपट्टी थकबाकी भरण्यास नकार ! पुणे महापालिकेचे जलसंपदा विभागाच्या नोटिशीला उत्तर
जलसंपदा विभागाच्या खडकवासला धरणसाखळीतून, तसेच भामा आसखेड धरणातून महापालिकेला पाणीपुरवठा केला जातो.
मित्राच्या सदऱ्यावर पडलेल्या डागावरून वाद होऊन डोंबिवलीत मैत्रिणीची आत्महत्या
डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील ठाकुर्ली जवळील खंबाळपाडा येथे एक ३० वर्षाचा मित्र आणि त्याची २२ वर्षाची मैत्रिणी लिव्ह इन रिलेनशिपमध्ये राहत होते. ते लग्न करणार होते. या दोघांमध्ये जेवण बनविण्यावरून आणि मित्राच्या सदऱ्यावर तेलाचे डाग पडल्यावरून झालेल्या वादातून मैत्रिणीने रागाच्या भरात राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
सेवानिवृत्त शिक्षकाकडून लाच स्वीकारताना सहायक लेखाधिकार्याला अटक
अहिल्यानगरः सेवानिवृत्त शिक्षकाकडून ८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना माध्यमिक शिक्षण कार्यालयातील वेतन व भविष्य निर्वाह विभागातील सहायक लेखाधिकाऱ्याला अटक केली आहे.
कोकणातील काजूला हमीभाव हवा, शासनाच्या आयात धोरणाचा कोकणातील काजू बागायतदारांना फटका
कोकणात १ लाख ७६ हेक्टर लागवड क्षेत्र लागवडीखालील क्षेत्र आहे. दरवर्षी साधारणपणे २ लाख ९८ हजार ६२४ मेट्रीक टन काजूचे उत्पादन होते.
एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्षेत्रात भाजप आक्रमक
विधानसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर भाजपने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रभाव क्षेत्र असलेल्या ठाणे जिल्ह्यात पुन्हा एकदा आक्रमक राजकारणाला सुरुवात केली आहे.
Video: मासे खायला गेला अन्… बिबट्यचे पिल्लू मस्ती करता करता…
मध्यप्रदेशात आधी रानडुकराच्या मागे धावताना वाघीण विहिरीत पडली. मध्यप्रदेश वनखात्याच्या चमूने त्यांना यशस्वीरीत्या बाहेर काढले. त्यानंतर महाराष्ट्रात वाघ विहिरीत पडला. महाराष्ट्र वनखात्याच्या चमूने त्यालाही यशस्वीपणे बाहेर काढले. सविस्तर वाचा…
दोघांत तिसरा अन् … प्रेमविवाहानंतर तरुणीच्या आयुष्याला प्रियकराचे ग्रहण, घटस्फोटासाठी …
विद्यार्थी दशेतच दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि कुटुंबीयांचा विरोध पत्करुन दोघांनी प्रेमविवाह केला. मात्र, लग्नानंतर तिच्या जीवनात नवीन प्रियकराने प्रवेश केला.
Udayanraje Bhosle on Rahul Solapukar: “…तर त्यांनी चेकअप करून घ्यावं”!
अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानावरून वाद झाल्यानंतर त्याबाबत जाहीर माफी मागितली. पुणे पोलिसांनी यासंदर्भात सोलापूरकर यांना क्लीनचिट दिली. “त्यांच्या विधानात गुन्हा दाखल करण्यासारखं काही दिसत नाही”, असं पुणे पोलीस आयुक्तांनी म्हटल्याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता उजयनराजे भोसले यांनी त्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “मी त्यांचं विधान बघितलं नाही. पण असं कुणी म्हणत असेल, तर त्यांनी स्वत:चं चेकअप करून घ्यायला हवं. क्लीनचिट कशी देणार तुम्ही? छत्रपती शिवाजी महाराजांबाबत लाच हा शब्द कुणी उच्चारत असेल तर त्याला काय म्हणणार?” असं उदयनराजे भोसले म्हणाले.
सांगलीत अनधिकृत फलकावर आता दंडासोबत फौजदारी कारवाई
बरेच फलक, जाहिराती या विनापरवानगी, अनधिकृत असल्याचे दिसून येते. उच्च न्यायालयाच्या आदेशाने अशा विनापरवाना फलकावर कारवाई करण्याचे आदेश आहेत.
भाजपच्या सदस्य नोंदणीमध्ये सांगली शहर जिल्हा आघाडीवर
सांगली : भाजपच्या सदस्य नोंदणीमध्ये पश्चिम महाराष्ट्रात सांगली शहर जिल्हा आघाडीवर असून, याबद्दल शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग व अभियान संपर्कप्रमुख विश्वजित पाटील यांचा कोल्हापूर येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीत सत्कार करण्यात आला. ल्हापूर येथे पक्षाची पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठक पार पडली. या वेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे आदी उपस्थित होते.
या वेळी पश्चिम महाराष्ट्रातील सभासद नोंदणीचा प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली शहर जिल्हा सभासद नोंदणीमध्ये प्रथम क्रमांकावर असल्यामुळे ढंग, पाटील यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. सांगली विधानसभा मतदारसंघ सभासद नोंदणी पश्चिम महाराष्ट्रात चौथ्या क्रमांकावर आहे. गली शहर जिल्ह्याला एक लाख २४ हजार सभासद नोंदणीचे उद्दिष्ट असून, आतापर्यंत एक लाख १४ हजारांच्या वर सभासद नोंदणी झालेली आहे. यामध्ये सांगली विधानसभा ६२००७, तर मिरज विधानसभा क्षेत्रात ५२३०० इतकी सभासद नोंदणी झाली आहे.
मीटर नंतर आता शेअरिंग रिक्षाचालकांचाही भाडेवाढीसाठी तगादा
ठाणे : मीटरवर चालणाऱ्या रिक्षाच्या भाडेदरात तीन रुपयाप्रमाणे वाढ करण्यात आली असतानाच, आता ठाण्यातील शेअरिंग रिक्षा चालकांनी देखील भाडेवाढीसाठी तगादा लावला आहे. यासाठी रिक्षा चालकांची त्यांच्या संघटनेसोबत चर्चा सुरु आहे.
सातत्याने बदलत्या वातावरणामुळे मच्छीमारांची मासळीच्या दुष्काळाशी झुंज
उरण : हवामानातील सातत्याने होणारे बदल, समुद्रातील वाढता मानवी हस्तक्षेप आणि जलप्रदूषणामुळे दिवसेंदिवस माशांचा साठा कमी होत चालला आहे. कधीकाळी राज्याच्या सागरी जलाधिक्षेत्रात मुबलक मत्स्यसंपदा होती. पण तिच्यावर उपजीविका करणारे लाखो मच्छीमार मागील काही वर्षांपासून मासळीच्या दुष्काळाशी झुंजत लागत आहेत.
अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरण: कोर्ट मार्शलमध्ये दिलेला आदेश रद्द होणार नाही, उच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
फेब्रुवारी २०२० मध्ये वडिलांच्या सांगण्यावरून धाकट्या भावासह ती आरोपीला भेटण्यास गेली होती. त्यावेळी, आरोपीने त्यांना त्याच्या खोलीत नेले.
आपलं सरकारवर आईची जात, सामाजिक स्थितीची माहिती सादर करणे शक्य ? उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा
स्वानुभूती जीवराज जैन या ३० वर्षांच्या महिलेने तिची आई शिंपी समाजाशी संबंधित असल्याचा दावा करून आपलं सरकार पोर्टलवर जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज केला होता.
कर सवलत प्रकरणात उच्च न्यायालयाचा बीसीसीआयला दिलासा, मात्र कर सवलत दर्जाचे स्वतंत्रपणे मूल्यांकन करण्याचे आदेश
बीसीसीआयने २००६ आणि २००७ मध्ये संस्थात्मक सुधारणा करून आपयपीएलसारखे व्यावसायिक उपक्रम सुरू केले होते. परंतु, या सुधारणांची माहिती प्राप्तिकर विभागाला दिली नाही.
ठाणे स्थानकातील ममता कक्षाविषयी मध्य रेल्वे निष्ठुर
ठाणे : तान्ह्या मुलांसह रेल्वेप्रवास करणाऱ्या मातांसाठी उपयुक्त असलेल्या ममता कक्षांची दुरवस्था झाली आहे. ठाणे स्थानकात दिवसभरात दोन ते तीनदा स्वच्छता केली जात असूनही मध्य रेल्वेच्या दुर्लक्षामुळे कक्षाची धूळधाण उडाली आहे.
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक प्रकरणी लाय डिटेक्टर चाचणीची मागणी करण्याची शक्यता
पोलीस मेहताची लायडिटेक्टर चाचणी करण्याची न्यायालयात मागणी करण्याबाबत विचार करत आहेत.
डहाणू येथील राज्य महामार्ग-३० रुंदीकरण प्रकल्प, ७७७ झाडे तोडण्यास उच्च न्यायालयाची स्थगिती
राज्य महामार्ग रुंदीकरणासाठी ७७७ झाडे कापण्याबाबत नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरणाने जाहीर सूचना काढली.
भाद्रपदातील गणेशोत्सवावरही पीओपीच्या निर्णयाचे सावट, गणेशोत्सवाचे रूप पालटणार ?
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तींवर २०२० मध्ये बंदी घातली होती. मात्र विविध कारणांमुळे या निर्णयाची अंमलबजावणी लांबणीवर पडली.