Maharashtra Breaking News Updates, 19 February 2025 : विकिपिडियावर छत्रपती संभाजी महाराजांबाबत करण्यात आलेला वादग्रस्त उल्लेख आणि त्यावर कमाल आर खाननं केलेलं ट्विट यावर सध्या जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनी विकिपिडियावरून संबंधित मजकूर काढण्याबाबत कार्यवाही सुरू केली आहे. दुसरीकडे रणवीर अलाहाबादिया प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू असली, तरी अशा मजकुरावर निर्बंध लागू करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

Live Updates
11:26 (IST) 19 Feb 2025

उल्हास नदीवर धरणांची उभारणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे संकेत, पूरसंकट टळणार

उल्हास नदीवर वरच्या भागात धरणांची उभारणी केली जाणार आहे. त्यामुळे बदलापुरच्या पुराचा प्रश्न कमी होईल. त्याचसोबत नदी खोलीकरण आणि गाळ काढण्याच्या कामासाठी आवश्यक त्या गोष्टी केल्या जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सविस्तर वाचा

11:25 (IST) 19 Feb 2025

सायबर गुन्हेगारांनी वर्षभरात ठाणेकरांचे १६२ कोटी रुपये लुटले

ठाणे : गेल्या काही वर्षांमध्ये देशभरात सायबर फसवणूकीच्या प्रकरणांत सातत्याने वाढ होत आहे. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात ऑनलाईन फसवणूक करून सायबर गुन्हेगारांनी ठाणेकरांचे २०२४ या वर्षभरात १६२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे ठाणे पोलिसांच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

वाचा सविस्तर…

11:25 (IST) 19 Feb 2025

‘अनिल’मुळेच माझी ‘उपरा’कार ही ओळख, लक्ष्मण माने यांची कृतज्ञ भावना

बाबा आढाव वयाच्या नव्वदीतही कार्यरत आहेत. त्यांच्याकडे पाहून मला लढण्याची आणि कार्यरत राहण्याची प्रेरणा मिळते, असे माने यांनी सांगितले.

सविस्तर वाचा…

11:25 (IST) 19 Feb 2025

जुन्या ठाण्यासह वागळे, घोडबंदरमध्ये पाण्याची गुणवत्ता चांगली

ठाणे : जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकानुसार पिण्यायोग्य पाण्याच्या गुणवत्तेचे प्रमाण ९५ टक्के इतके असणे अपेक्षित असताना, ठाणे महापालिकेने गेल्या तीन महिन्यात केलेल्या पाणी नमुने तपासणीत जुन्या ठाण्यातील नौपाडा-कोपरी, उथळसर, वागळे इस्टेट आणि घोडबंदर भागातील पिण्यायोग्य पाण्याच्या गुणवत्तेचे प्रमाण ९४ ते ९८ टक्के इतके असून या भागांमध्ये पाणी चांगले असल्याचे स्पष्ट होत आहे.

वाचा सविस्तर…

11:24 (IST) 19 Feb 2025

संगीत संचिताचा साक्षीदार संग्रहालयात… संगीतकार सी. रामचंद्र यांचा पियानो पुण्यातील राजा दिनकर केळकर संग्रहालयाकडे सुपूर्द

पियानोचा स्वत:च्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे चार दशके सांभाळ करणारे यादव यांनी रविवारी तो केळकर संग्रहालयाला दिला, तेव्हा त्यांच्या डोळ्यांत पाणी तरळले.

सविस्तर वाचा…

11:24 (IST) 19 Feb 2025

पिंपरी : पोलीस ठाण्याचे कामकाज नेहरूनगर न्यायालयात वर्ग करण्याची मागणी

सध्या हिंजवडी, देहूरोड, भोसरी आणि वाकड पोलीस ठाण्याचे कामकाज पुणे, खडकी आणि वडगाव मावळ न्यायालयात चालते.

सविस्तर वाचा…

11:23 (IST) 19 Feb 2025

राहुल गांधी यांना न्यायालयाकडून दिलासा, सुनावणीस उपस्थित राहण्याबाबत कायमस्वरुपी सूट

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी सावरकर यांचे नातू सात्यकी यांनी राहुल गांधी यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल केला होता.

सविस्तर वाचा…

11:23 (IST) 19 Feb 2025

पिंपरी : अर्थसंकल्पात औद्योगिक परिसरासाठी विशेष तरतूद करा; उद्योजकांची मागणी

मागण्यांबाबत आयुक्तांनी सहकार्याची भूमिका घेऊन येणार्‍या अर्थसंकल्पात नक्कीच विचार केला जाईल, अशी ग्वाही दिल्याचे भोर यांनी सांगितले.

सविस्तर वाचा…

11:22 (IST) 19 Feb 2025

पुणे : शिवजयंतीनिमित्त आज वाहतुकीत बदल

मिरवणुकीची सांगता होईपर्यंत मध्य भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल लागू राहणार आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली.

सविस्तर वाचा…

11:19 (IST) 19 Feb 2025

पुण्यातील जागेवरून महायुतीत वादाची ठिणगी? शिंदे मुख्यमंत्री असतानाच्या काळातील व्यवहार थांबविण्याची भाजपच्या माजी पदाधिकाऱ्यांची मागणी

ससून रुग्णालयाजवळील मंगळवार पेठेतील सुमारे दोन एकर मोक्याची जागा भाजप आणि शिवसेना (शिंदे) यांच्यातील नव्या वादाची ठिणगी बनण्याची शक्यता आहे.

सविस्तर वाचा…

11:18 (IST) 19 Feb 2025

पुणे : रेल्वे स्थानकातील प्रीपेड रिक्षा केंद्र बंद होणार? रिक्षाचालकांमधील वाद विकोपाला

रेल्वे प्रवाशांना स्थानकावर आल्यानंतर रिक्षाचालकांकडून लुटण्याच्या घटना, मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. तसेच, मनमानी पद्धतीने प्रवासी भाडेदर आकारण्यावरून वादविवाद झाल्याच्या घटनाही समोर आल्या.

सविस्तर वाचा…

11:17 (IST) 19 Feb 2025

पुण्यात ‘या’ दोन नवीन मार्गांवर मेट्रो धावणार ! मेट्रोच्या दोन विस्तारीत मार्गांना पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने दिली मान्यता

पुणे महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि महामेट्रोच्या वतीने नागरिकांच्या सोयीसाठी ‘सर्वंकष वाहतूक आराखडा’ (काॅम्प्रेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन) तयार करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा…

11:17 (IST) 19 Feb 2025

पिंपरी : अनधिकृत होर्डिंग प्रकरणी रावेतमध्ये दोघांवर गुन्हा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड महापालिकेने अनधिकृत होर्डिंग बाबत कठोर धोरण अवलंबले आहे.

सविस्तर वाचा…

11:16 (IST) 19 Feb 2025

पुणे : बालेवाडी परिसरात महापालिका बांधणार चार हजार घरे !

पुणे शहरात राहणाऱ्या नागरिकांचे हक्काचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महापालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत.

सविस्तर वाचा…

11:16 (IST) 19 Feb 2025

पुणे : शिवजयंती निमित्त पीएमपी मार्गात बदल

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज (१९ फेब्रुवारी) छत्रपती शिवजी महाराज रस्ता, लक्ष्मी रस्ता या मार्गांवरून मिरवणुका काढल्या जाणार आहेत.

सविस्तर वाचा…

11:15 (IST) 19 Feb 2025

नाण्यांच्या संग्रहातून इतिहासाचे जतन !

जगताप यांच्या या संग्रहात सातवाहन ते मराठेशाहीपर्यंतच्या विविध राजवटींची नाणी आहेत. त्यांनी केवळ नाण्यांचा संग्रह केलेला नसून, या संग्रहातील प्रत्येक नाण्याचा काळ, राजवट, त्याचे नाव, वजन, धातू यांचाही तपशील जमा केलेला आहे.

सविस्तर वाचा…

11:13 (IST) 19 Feb 2025

पुणे : अंदाजपत्रकात तरतुदीसाठी ५० ते १०० कोटींच्या याद्या !

प्रशासकावर राज्य सरकारचा दबाब असल्याने आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी सादर केल्या जाणाऱ्या महापालिकेच्या अंदाजपत्रकावर भाजपच्या योजनांची छाप असणार हे निश्चित आहे.

सविस्तर वाचा…

11:12 (IST) 19 Feb 2025

पंढरपूर शहरी भागातील सर्व मिळकतींची ड्रोनद्वारे मोजणी

शहरी भागातील जमिनीची ड्रोनद्वारे मोजणी करून अद्ययावत व अधिक अचूक नकाशे तयार करण्याचा ‘नक्शा’(NAKSHA) उपक्रम सुरु करण्यात येत आहे.

सविस्तर वाचा…

11:04 (IST) 19 Feb 2025

Devendra Fadnavis on Chhava: छावा टॅक्स फ्री होणार का? फडणवीस म्हणाले…

छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित अतिशय चांगला असा हा सिनेमा तयार झाला आहे. मी अजून तो पाहिलेला नाही, पण मला इतरांनी सांगितलंय की इतिहासाशी कोणतीही प्रतारणा न करता हा सिनेमा तयार करण्यात आला आहे. त्यासाठी मी चित्रपट निर्मात्यांचं, दिग्दर्शकांचं आणि अभिनेते विकी कौशल यांचं अभिनंदन करतो. आता मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे की चित्रपट टॅक्स फ्री करावा. इतर राज्य जेव्हा चित्रपट टॅक्स फ्री करतात, तेव्हा त्यावरचा करमणूक कर माफ करत असतात. पण महाराष्ट्रात २०१७ सालीच करमणूक कर रद्द केला आहे. त्यामुळे चित्रपट करमुक्त करण्यासाठी आपल्याकडे तसा करच नाही – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

11:03 (IST) 19 Feb 2025

कोल्हापूर: ठेकेदारांनी सार्वजनिक बांधकाम कार्यालयात वाहने घुसवली

गेली सात महिने एक रुपयाही ठेकेदारांना दिलेला नाही. त्यामुळे ते आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेले आहेत .

सविस्तर वाचा…

11:02 (IST) 19 Feb 2025

कोल्हापूर : रुग्णालय उद्घाटनाच्या निमित्ताने गडकरींकडून नातेबंधाची जपणूक

कन्यासम मुलीच्या रुग्णालयाचे उद्घाटन करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नातेबंधाची जपणूक केली.

सविस्तर वाचा…

11:01 (IST) 19 Feb 2025

छत्रपती शिवरायांच्या अर्थनीतिचा अभ्यास करावा : इतिहास संशोधक अजित आपटे

शिवजयंती उत्सव समिती शिरूर यांच्या वतीने आपटे यांचे ‘ छत्रपती शिवाजी महाराज यांचे व्यवस्थापन शास्त्र ‘ या विषयावर व्याख्यान झाले.

सविस्तर वाचा…

10:42 (IST) 19 Feb 2025

Sanjay Raut on Sharad Pawar: शरद पवार, अजित पवारांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही – संजय राऊत

एकनाथ शिंदे विधिमंडळ पक्षाचे नेते झाले होतेच. तेव्हा अजित पवार, त्यांचे इतर सहकारी, खुद्द ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भूमिका होती की एकनाथ शिंदे आम्हाला मुख्यमंत्री म्हणून चालणार नाहीत. आमचे वरीष्ठ नेते त्यांच्या हाताखाली काम करणार नाहीत अशी त्यांची भूमिका होती. तेव्हा भाजपानं शब्द पाळला असता, तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले होते. शिंदेंना विधिमंडळ पक्षनेते केलं तो एक सिग्नल उद्धव ठाकरेंनी दिला होता. अजित पवार, शरद पवारांनी महाविकास आघाडीत एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही – संजय राऊत</p>

10:42 (IST) 19 Feb 2025

Sanjay Raut on Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या उद्धव ठाकरेंवरील टीकेला संजय राऊतांचं उत्तर

तुम्ही चोरलेला धनुष्यबाण ज्यांच्या दावणीला बांधला आहे, ते योग्य आहे का? रोज तुम्ही दिल्लीला ज्या उठाबशा काढताय, त्या बाळासाहेब ठाकरेंना मान्य असतील का? त्यांना आत्मचिंतनाची गरज आहे. त्यांनी कामाख्या मंदिर किंवा इतर कुठे जाऊन आत्मचिंतन करावं. ते आज ज्या पक्षाबरोबर बसले आहेत, त्यांनी शब्द पाळला नाही. एकनाथ शिंदेही त्या निर्णयात आमच्यासोबत होते. त्यांनी कधीही विरोध केला नाही. त्यांना कोणतं खातं मिळतंय यावरच त्यांचं लक्ष होतं. त्यांना मुख्यमंत्री व्हायची इच्छा होती. पण मविआच्या प्रमुख नेत्यांनी सांगितलं की एकनाथ शिंदे ज्युनिअर आहेत, त्यांच्या हाताखाली आम्ही काम करणार नाही. म्हणून एकनाथ शिंदेंचा मुख्यमंत्रीपदासाठी विचार होऊ शकला नाही. महाविकास आघाडीचं सरकार व्हावं, ही एकनाथ शिंदेंची भूमिका होतीच – संजय राऊत</p>

10:35 (IST) 19 Feb 2025

Sanjay Raut on Shivaji Maharaj Jayanti: “छत्रपतींनी कधीही सुडाचं राजकारण केलं नाही”

छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी सुडाचं राजकारण केलं नाही. त्यांच्या राज्यातही लोकशाही होती. निवडणूक, आयोग, गृहमंत्री नसला तरी तेव्हा लोकशाही होती. त्याला आम्ही शिवशाही म्हणतो. सगळ्यांनीच शिवाजी महाराजांच्या इतिहासानुसार आचरण करायला हवं – संजय राऊत</p>

10:26 (IST) 19 Feb 2025

Eknath Shinde on Uddhav Thackeray: एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

खरा वाघ कोण असेल तर त्याचं नाव बाळासाहेब ठाकरे. त्यांचाच मी चेला आहे. दहा वेळा शब्द देताना विचार करायला हवा. शिवसेना वाचवण्यासाठी, शिवधनुष्यबाण वाचवण्यासाठी, काँग्रेसच्या दावणीला तुम्ही बांधलेला पक्ष सोडवण्यासाठी आम्ही हे केलं. कारण बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही. हे मुख्यमंत्री झाले नसते, तर शिवसेना पक्ष फुटला नसता – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

Maharashtra News Live Update Today, 19 February 2025 : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या राजकीय घडामोडी…