Mumbai Live News Today, 28 August 2023: उद्धव ठाकरे यांनी आपल्या रविवारच्या भाषणात देवेंद्र फडणवीस आणि शिंदे गटावर टीका केली आहे. त्यांना भाजपाकडून उत्तर दिलं जातं आहे. तर दुसरीकडे छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी भुजबळांना आर्मस्ट्राँग म्हटलं आहे. तर उद्धव ठाकरेंवरही टीका होऊ लागली आहे. महाराष्ट्रात पावसाने ओढ दिली आहे. तसंच आमदार बच्चू कडू हे सचिन तेंडुलकरला कायदेशीर नोटीस पाठवणार आहेत. शिंदे फडणवीसांच्या दौऱ्यावर संजय राऊत यांनी टीका केली आहे. या आणि राज्यातल्या विविध घडामोडींवर आपली नजर असणार आहे लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Marathi Breaking News Live| “सत्तेची हाव नाही तर शपथ का घेतली?” संजय राऊतांचा अजित पवारांना सवाल; यासह महत्त्वाच्या घडामोडी
नवी मुंबई: एपीएमसी बाजारात वर्षभर परदेशी सफरचंद बाजारात दाखल होत असतात. जुलैअखेर देशी सफरचंद दाखल होण्यास सुरुवात होते.
नागपूर: मध्य प्रदेशातून नागपुरात उपचारासाठी आलेला एक तरूण मेट्रोतून प्रवास करीत असताना अचानक चक्कर येऊन पडला आणि बेशुद्ध झाला.
पुणे पोलिसांकडून आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात सोमवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह, पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त रितेश कुमार, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर आदी यावेळी उपस्थित होते.
ठाणे : ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या उपक्रमांतर्गत रस्ते नुतनीकरण, सुशोभिकरण तसेच इतर नागरि प्रकल्पांची कामे सुरू असतानाच, या उपक्रमांतर्गत आता शहरातील रस्ते सफाईचे नवे नियोजन पालिका प्रशासनाने आखले आहे. येत्या १ सप्टेंबरपासून या नियोजनाची अंमलबजावणी होणार असून त्यासाठी रस्ते सफाईच्या कंत्राटातील अटी शर्तीत सुधारणा करण्यात आल्या आहेत.
अमरावती: एका विवाहित महिलेच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या अविवाहित तरुणाला तिने ऐनवेळी लग्नास नकार दिला. त्यामुळे प्रेमभंग झालेल्या तरुणाने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.
डोंबिवली पूर्वेतील टिळक रस्त्यावरील सर्वेश सभागृहाच्या कोपऱ्यावर शिवसेनेने मंगळागौर स्पर्धेचा फलक लावला आहे.
कल्याण- ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात भाजपचे भिवंडीचे खासदार, केंद्रीय मंत्री कपील पाटील आणि मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्यात जोरदार कलगीतुरा रंगला आहे. भिवंडी लोकसभेसाठी इच्छुक कथोरे यांचे खच्चीकरण करण्यासाठी खासदार पाटील गटाने जोरदार मोहीम हाती घेतली आहे.
नागपूर : महाविकास आघाडी सरकार जाऊन शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर आमच्या मतदारसंघातील कामांना स्थगिती देण्यात आली आहे. पण, आता शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्या निधी वाटपावरून लाथाळ्या वाढतील. हे तिघेही एकमेकांचे कपडे फाडताना दिसतील, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. ते आज सकाळी नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.
नागपूर: राज्यात भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भारतीय रिपब्लिकन पक्षासह इतर पक्ष अशा महायुतीची सरकार सत्तेवर आहे. नंतर अजित पवारही सरकारमध्ये आले. त्यामुळे येथे गर्दी वाढल्याने आता महायुतीत नवीन पक्षांना प्रवेश नको, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व भारतीय रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) प्रमुख रामदास आठवले यांनी वर्तवले.
गोंदिया: गोंदिया तालुक्यातील शेतकऱ्यांचे ५ कोटी ७२ लक्ष रुपयांचे चुकारे न मिळाल्याने अखेर संतप्त झालेल्या शेकडो शेतकऱ्यांनी आज, सोमवारी अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांच्या घरासमोर भर उन्हात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
'बैल गाडी एकाची, बैल दुसऱ्याचा आणि हाकणारा तिसराच आहे', असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याची ही शेवटची संधी असून यापुढे मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी स्पष्ट केले. प्रवेश नोंदणी ते अर्ज सादर करण्याची प्रक्रिया समजून घेण्यासाठी संकेतस्थळावर चित्रफितीची लिंक देण्यात आली आहे.
नागपूर : उद्धव ठाकरेंच्या सभेत जिवंतपणा होता, तर अजित पवारांच्या सभेत मुर्दाडपणा होता. कारण त्यांच्याकडे सांगण्यासारखे नाही, हे लोक जनतेला काय सांगणार? बेईमानी केली, पक्ष फोडला, जनतेसोबत दगाबाजी केली, हे सांगणार काय? अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
पुणे: शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने एकाची ४० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नागपूर: श्रावण महिना सुरू झाला तरी पावसाने काही जोर पकडला नाही, पावसाने उसंत घेतल्याने त्याचे दुरागामी परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यभरातील जलसाठ्यात गत वर्षीच्या तुलनेत सरासरी २० टक्के घट झाली आहे.
वाशिम: अत्यल्प पाऊस, पिकावर होत असलेला किडीचा प्रादुर्भाव त्यातच जिल्ह्यात लंपीचा आजार पुन्हा सक्रीय झाला आहे. परिणामी अनेक जनावरे दगावण्याची भीती असल्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
जळगाव: जिल्ह्यातील ग्रामीण भागात सद्यःस्थितीत एक हजार ८८९ अतितीव्र आणि सात हजार ३२६ सौम्य कुपोषित बालके असल्याची माहिती उघड झाली आहे.
नागपूर: महाराष्ट्रातील रेल्वे विकासाला आणखी गती देण्यासाठी आधुनिक पायाभूत सुविधांची निर्मिती वेगाने केली जात आहे. देशभरातील १३०९ स्थानकांचा पुनर्विकास करण्यासाठी अमृत भारत स्टेशन योजना सुरू करण्यात आली असून त्यात मध्य रेल्वेच्या एकूण ७६ स्थानकांचा समावेश आहे.
वर्धा: काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेची सुरुवात वर्धा जिल्ह्यातील आष्टी शहीद या गावापासून होणार आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात ही यात्रा ३ ते १२ सप्टेंबरदरम्यान चालणार आहे. पदयात्री जनतेच्या दारात जाऊन त्यांची भेट घेणार आहे.
बुलढाणा: साप्ताहिक सुट्या व एकादशीचा जुळून आलेला योग यामुळे विदर्भ पंढरीत सुमारे पन्नास हजार भाविकांची मांदियाळी जमली.
नवी मुंबई : इंग्रजी शाळेत ‘काव्यरंग’ च्या मंचावरून ज्येष्ठ कवि ना.धों. महानोर यांच्या कवितांचा बहर सजला होता. निमित्त होते महानोर यांच्या स्मृती दिनाचे. या काव्य स्पर्धेत तब्बल ७५ विद्यार्थ्यांनी कविता सादरीकरण केले. कोपरखैरणेतील नॉर्थ पॉईंट शाळेत मराठी कवितांची ही स्पर्धा पार पडली.
पिंच्याक सिलॅट खेळाला देशातील १५ राज्यांच्या राज्य ऑलिम्पिक संघटनेची मान्यता आहे.
पनवेल: खारघर वसाहतीमधील उद्याने जिवघेणी ठरत आहेत. तीन दिवसांपुर्वी रविवारी सायंकाळी खारघरमधील सेक्टर १२ येथील उद्यानात खेळण्यासाठी गेलेल्या एका चार वर्षांच्या बालिकेला उद्यानातील बाकाच्या दूरवस्थेमुळे प्राण गमवावे लागले. ऋक्षा प्रकाश विश्वकर्मा असे या बालिकेचे नाव आहे.
पुणे : राज्य मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यात बारावीचा निकाल ३२.१३ टक्के, तर दहावीचा निकाल २९.८६ टक्के लागला.राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, सचिव अनुराधा ओक यांनी निकालाची माहिती दिली.
घरातील दागिने, लहान मुलांचे दागिने असा ९० हजार रुपयांचा किंमती ऐवज चोरी गेल्याचे निदर्शनास आले.
नवी मुंबई : वाशीतील रघूलीला मॉल मधील स्वच्छतागृहात एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. याबाबत त्याने पालकांना सांगितल्यावर त्यांनी वाशी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीची दखल घेत बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधित कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
पुणे – शहरातील गणेशोत्सव पाहण्यासाठी शहरासह विविध भागांतून नागरिक शहरात येतात. त्या दरम्यान नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून गणेशोत्सव काळातील शेवटचे पाच दिवस मेट्रो रात्री १२ पर्यंत सुरू ठेवण्यात यावी, अशा सूचना संबधित अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले. सविस्तर वेळापत्रक http://www.mahasscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
बीड येथे झालेल्या अजित पवार गटाच्या सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेचे पडसाद सोमवारी ठाण्यात उमटले. शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी भुजबळ यांच्याविरोधात घोषणाबाजी करत त्यांचा पुतळा जाळला.
परळ वर्कशॉप येथून निघालेल्या गणेश मूर्ती आगमन मिरवणूकीदरम्यान गणेशभक्तांवर पोलिसांकडून सौम्य लाठीमार केला जात असल्याचा आरोप गणेशोत्सव मंडळांनी केला आहे. आगमन मिरवणुकीबाबत पोलीस स्थानकात माहिती देऊनही अशी कारवाई केली जाते, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
Mumbai Live News Today, 28 August 2023: उद्धव ठाकरे यांनी आपल्या रविवारच्या भाषणात देवेंद्र फडणवीस आणि शिंदे गटावर टीका केली आहे. त्यांना भाजपाकडून उत्तर दिलं जातं आहे. तर दुसरीकडे छगन भुजबळ यांनी शरद पवारामवर टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी भुजबळांना आर्मस्ट्राँग म्हटलं आहे. तर उद्धव ठाकरेंवरही टीका होऊ लागली आहे.