Maharashtra news today Update, Jan 31 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत शिंदे विरुद्ध ठाकरे असे दोन गट निर्माण झाले. दोघांनी शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केल्याने हा वाद निवडणूक आयोगासमोर पोहोचला होता. दरम्यान, काल दोन्ही गटांनी यासंदर्भात लेखी युक्तिवाद सादर केला. उद्धव ठाकरे गटाने ई-मेलद्वारे भूमिका मांडली असून शिंदे गटाच्या वकिलांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन लेखी प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान, यानंतर शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत दोन्ही गटाकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत. त्यामुळे आज दिवस भर हा विषय चर्चेत राहण्याची शक्यता आहे.

Live Updates

Mumbai Pune News : बेलापूर-गेट वे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी सेवा ६ फेब्रुवारीपासून होणार सुरू

 

 
11:35 (IST) 31 Jan 2023
पुणे : जमिनींविषयक वाद कायमचे सोडविण्यासाठी नागरिकांना संधी, शासनाचे महाराजस्व अभियान

प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढणे, अतिक्रमण केलेले अथवा बंद असलेले पाणंद रस्ते मोकळे करणे, जमीन मोजणीची प्रकरणे निकाली काढण्यासाठी महसूल विभागाकडून महाराजस्व अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. हे अभियान २६ जानेवारीपासून सुरू करण्यात आले असून ३० एप्रिलपर्यंत असणार आहे.

सविस्तर वाचा…

11:31 (IST) 31 Jan 2023
“शिंदे गटाच्या उठावानंतर राज्यात राजकीय अस्थिरता”, बच्चू कडू यांचं विधान; म्हणाले, “काही दिवसांपूर्वी…”

सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सध्या राजकीय अस्थिरता आहे, असं विधान प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे. नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी यांसदर्भात प्रतिक्रिया दिली. दरम्यान, एकीकडे मंत्रीमंडळ विस्तार न झाल्याने बच्चू कडू नाराज असल्याची चर्चा असताना आता त्यांच्या या विधानावरून पुन्हा राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. सविस्तर वाचा

11:29 (IST) 31 Jan 2023
“त्यांनी एकदा स्पष्टपणे सांगावं की…”, संजय राऊतांचं शिंदे गटावर टीकास्र; दहिसरमधील भाषणाचाही केला उल्लेख!

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह नेमकं कुणाला मिळणार? यासंदर्भातली उत्सुकता प्रचंड ताणली गेली आहे. निवडणूक आयोगासमोर यासंदर्भात सध्या सुनावणी सुरू असून ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही बाजूंनी आयोगासमोर युक्तिवाद केला आहे. आता आयोगाच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. संजय राऊतांच्या धमक्यांमुळे आम्ही शिवसेना सोडली, असा दावा सातत्याने शिंदे गटाकडून केला जात असताना त्यावर संजय राऊतांनी खोचक शब्दांत टीकास्र सोडलं आहे. सविस्तर वाचा

बेलापूर – गेट वे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी सेवा ६ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. गेट वे ऑफ इंडिया येथे या सेवेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. देशातील पहिली २०० प्रवासी क्षमतेची वॉटर टॅक्सी सोमवार ते शुक्रवारदरम्यान बेलापूर – गेट वे ऑफ इंडिया या जलमार्गावर धावणार आहे.