Maharashtra Breaking News Update : शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल (दि. १० जानेवारी) निकाल दिल्यानंतर त्याचे पडसाद राज्यभर उमटलेले पाहायला मिळाले. शिवेसना (शिंदे गट) आणि भाजपाने या निकालाचे स्वागत केले. तर ठाकरे गट आणि महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने टीका केली. या निकालाचे पडसाद आजही महाराष्ट्रात उमटलेले पाहायला मिळत आहेत. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह भाजपावर टीका केली. या टीकेला पुन्हा प्रत्युत्तर मिळण्याची शक्यता आहे.
Shivsena Disqualification Result Highlights Today, 11 January 2024
यवतमाळ : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना (ठाकरे गट) विरोधात दिलेल्या निकालाविरोधात शिवसेना ठाकरे गटाने आज गुरुवारी दुपारी स्थानिक दत्त चौकात निकालपत्रांची होळी केली. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बॅनर जाळून निषेध नोंदविण्यात आला.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी सुनावणी घेतली. त्यांनी दिलेला निर्णय म्हणजे घटना व कायद्याचा मुडदा पाडून दिल्लीच्या मदतीने महाराष्ट्रावर केलेला आघात असल्याची टीका ठाकरे गटाने यावेळी केली. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार निदर्शने केली. विधानसभा अध्यक्षांविरोधात घोषणाबाजी करीत त्यांनी दिलेल्या निकालाची होळी करण्यात आली. नार्वेकर यांनी महाराष्ट्रातील चोर मंडळास मान्यता देण्यासाठी घटनेची पायमल्ली केली. ज्यांनी हे केले त्यांना महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही. भाजपचे शिवसेना संपवण्याचे षडयंत्र जनता हाणून पाडेल,असा इशारा शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
यावेळी जिल्हा सपंर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड, माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार, जिल्हाप्रमुख संतोष ढवळे, किशोर इंगळे, गजानन डोमाळे, संजय रंगे, रुपेश सावरकर, युवासेनेचे अमोल धोपेकर यांच्यासह शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे पदाधिकारी, कार्येकर्ते उपस्थित होते.

मुंबईः कांदिवली पश्चिम येथील छोट्या खोलीमध्ये मेफेड्रॉन (एमडी) बनवण्याचा कारखाना उभारणाऱ्या आरोपीसह दोघांना अटक करण्यात मालवणी पोलिसांना यश आले. याप्रकरणी सव्वाकोटी रुपयांचे एमडी, एमडी बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल व साहित्य पोलिसांनी जप्त केले.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी जो निकाल दिला, त्याला त्यांनी शिवसेनेची १९९९ सालची घटना आधार मानली होती. मात्र ठाकरे गटाकडून २०१८ सालची घटना ग्राह्य धरण्याची विनंती केली गेली. मात्र राहुल नार्वेकर यांनी निवडणूक आयोगाकडे असलेली घटना ग्राह्य धरली. यावर भाष्य करताना राज्याचे माजी महाधिवक्ता आणि ज्येष्ठ विधीज्ञ श्रीहरी अणे म्हणाले की, ठाकरे यांनी २०१८ ची घटना आधार माना, असे सांगून चालणार नाही. त्यांनी ती घटना निवडणूक आयोगाकडे जाऊन नोंदणी करायला हवी होती. हे त्यांचे चुकलेच. त्यामुळे आता ते कितीही सांगत असले की घटना बदलली तरी ते मानता येणार नाही.
अदाणी समूह कच्छमध्ये ३० गिगावॉट क्षमतेचा भव्य ग्रीन एनर्जी पार्क बांधणार आहे. हा प्रकल्प २५ चौरस किलोमीटर परिसर व्यापेल आणि अंतराळातून देखील दृष्टीस पडेल इतकी त्याची भव्यता असेल.
प्रवेगच्या अयोध्या कनेक्शनबद्दल सांगायचे झाल्यास या कंपनीचा ECO हा लक्झरी हॉस्पिटॅलिटी व्यवसाय आहे. कंपनी आलिशान तंबू बसविण्याचे काम करते. कंपनीने ६ शहरांमध्ये तंबूच्या माध्यमांतून ५४० हून अधिक खोल्या बांधल्या आहेत.
मागील महिनाभरापूर्वी कल्याण-डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात दाखल झालेल्या दहा इलेक्ट्रिक बस – विद्युत बस पूर्ण क्षमतेचे चार्जिंंग स्टेशन ( विद्युत भारीत केंद्र) आणि त्याला विद्युत भार पोहचविणारे रोहित्र बसविण्याचे बाकी असल्याने उभ्या आहेत.
कार्यालयाची डागडुजी पूर्ण झाल्यानंतर भूमी अभिलेख अधीक्षक गिजेवार यांच्या पुढाकारातून या कार्यालयाची वास्तुशांती करण्यात आली.
मुंबई: पतीने खरेदी केलेल्या घराचा ताबा देण्याऐवजी शिक्षिकेची बोळवण करून विकासकाने १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार मुलुंडमध्ये घडला. इतकेच नव्हे तर पैसे भरलेले असतानाही शिक्षिकेऐवजी भलत्यालाच घराचा ताबा देण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.
मुंडन करणारे पदाधिकारी आणि रडारड करणारे व बोंबा मारणारे कार्यकर्ते, महिला यांमुळे जिल्हा कचेरीसमोरील हे आंदोलन नागरिकांचेही लक्ष वेधणारे ठरले.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण प्रकरणात विशेष न्यायालयाने राणा दाम्पत्याची कानउघाडणी केली आहे. १९ जानेवारी रोजी न्यायालयात हजर न झाल्यास जामीनपात्र वॉरंट काढले जाईल, असे न्यायालयाने सांगितले. या प्रकरणी दोषमुक्तीसाठी डिसेंबर महिन्यात दाखल केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला होता.
श्रद्धा (काल्पनिक नाव) ही नागपुरातील एका कंपनीत प्रशिक्षणार्थी अधिकारी असून, तिचा प्रियकर मनोज हा हैदराबादमधील एका सॉफ्टवेअर कंपनीत मुख्य कार्यकारी अधिकारी आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वेगळा नियम उद्धव ठाकरे यांना वेगळा नियम, असे होणार नाही, असे देखील बावनकुळे यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या शब्दावर कायम राहावे, त्यांच्यावर तेच दिवस येतील, असे आमदार नितीन देशमुख म्हणाले.
बुधवारी दुपारी कारागृहाबाहेर पडताच त्यांच्यावर पुन्हा धंतोली ठाण्यात गुन्हा करण्यात आला.
तलाठी भरतीवरून राज्यात सुरू झालेल्या वादावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खरमरीत पत्र लिहले आहेत.
शिवसेना उबाठा गटाचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालावर टीका केली. या निकालानंतर आमच्या गटातील कुणीही शिंदे गटात जाणार नाही. जायचे असते तर मागेच गेले असते. दिल्लीतून निरोप आला आहे का? लोकसभा निवडणुकीपूर्वी दोन मंत्र्यांना बाजूला करा. अन्यथा लोकसभेच्या जागांना धोका पोहचू शकतो, असा दावा खैरे यांनी केला.
मुंबई: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) वांद्रे रेक्लमेशन येथील मोक्याच्या ठिकाणी २९ एकर जागेवर उत्तुंग इमारत बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
दिवसभर मजुरी करुन ती आपला पोहण्याचा छंद जोपासते. यापूर्वीसुध्दा तिने अनेक सागरी लांब पल्याच्या स्पर्धा गाजविल्या आहेत.
राज्यात एकीकडे आरक्षणासाठी आंदोलनाचे वादळ उठलेले असताना दुसरीकडे आदिवासी समाजाला आरक्षण असूनही लाभ मिळत नसल्याने आदिवासी समाजातून नाराजी व्यक्त होत आहे.
वसई: वसई विरार महानगरपालिकेत ठेकेदारांनी केलेल्या १२२ कोटीच्या गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी मागील ५ वर्षांपासून रखडली आहे. याप्रकरणी विशेष तपास पथकामार्फत तपास करण्याचे तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे आश्वासन देखील पोकळ ठरले आहे.
२२ जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. त्यामुळे या दिवशी सुट्टी जाहीर करावी, अशी विनंती मी देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.
प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी १० जानेवारीपर्यंत चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागितले होते.
जळगाव - अमळनेर येथील विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्यनगरीच्या जागेत विविध पुरोगामी पुस्तकांच्या पताका लावलेला नांगर फिरवून प्रसिद्ध विचारवंत डॉ. संग्राम पाटील यांनी वैचारिक पेरणी करीत भूमिपूजन केले.
जळगाव - ईव्हीएम यंत्र हटवा, मतदान चिठ्ठ्यांचा वापर करा आणि लोकशाही वाचवा, या मागण्यांसाठी बुधवारी भारत मुक्ती मोर्चाच्या जिल्हा शाखेतर्फे तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. ईव्हीएम यंत्रातील मतदानासोबतच व्हीव्हीपीएटीतील निघालेल्या चिठ्ठ्यांची शंभर टक्के मोजणी करावी यासह २० मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.
नाशिक - देशातील प्रत्येक धार्मिक स्थळावर आता प्रसाद म्हणून 'आयुष्यमान हेल्थ कार्ड' देण्याची संकल्पना राबवली जाणार आहे. त्याची सुरुवात पंचवटीतील काळाराम मंदिरापासून होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या वितरणाचा शुभारंभ करण्याचा मानस असल्याची माहिती आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश शेटे यांनी दिली. विविध मंदिरे, संस्था आदी माध्यमातून नागरिकांना प्रसादरुपी आयुष्यमान कार्ड देण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे.
नाशिक - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी पंचवटीतील काळाराम मंदिरात श्रीरामाचे दर्शन घेऊन पूजा करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर, मंदिर परिसराच्या सुशोभिकरणावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून विशेष बाब म्हणून काळाराम मंदिर परिसर सुशोभिकरण आणि ओसरीच्या नुतनीकरणासाठी सुमारे दोन कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
नाशिक - २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी शुक्रवारी शहरात दाखल होणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंचवटीतील काळाराम मंदिरात श्रीरामाचे दर्शन घेणार आहेत. तसेच रामकुंडावर गोदावरी पूजनही करणार आहेत. त्यानंतर पंतप्रधानांचा सुमारे दोन किलोमीटरचा रोड शो होईल. युवा महोत्सवाचे उद्घाटन होणारा तपोवन मैदानचा संपूर्ण परिसर रामायणातील प्रसंगांवर आधारीत चित्रांनी सजवला जात आहे. यामुळे युवा महोत्सवाला जणू धार्मिक महोत्सवाचे स्वरुप प्राप्त झाल्याचे दिसत आहे. सुमारे साडेचार हजार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात केला जात आहे.
पुणे : मालमोटारीने दिलेल्या धडकेमुळे झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा हात तुटला. हा तुटलेला हात पुन्हा जोडण्याची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पुण्यातील डॉक्टरांनी यशस्वीरीत्या केली आहे. या शस्त्रक्रियेनंतर काही आठवड्यांनी रुग्णाला घरी सोडण्यात आले.
पुणे : गुंड शरद मोहोळ खून प्रकरणात आरोपींना पिस्तूल पुरविणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली. आरोपींनी मुळशी तालुक्यात दोन ते तीन ठिकाणी गोळीबाराचा सराव केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
रिलायन्स गुजराती कंपनी आहे. ते माझी कर्मभूमी गुजरात असल्याचंही सांगतात. मग महाराष्ट्रात तुम्ही आलात कशाला?, असा सवालही मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निकालानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं.
Shivsena Disqualification Result Highlights Today, 11 January 2024 | विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालानंतर महाराष्ट्रात आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण