Maharashtra Breaking News Update : शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल (दि. १० जानेवारी) निकाल दिल्यानंतर त्याचे पडसाद राज्यभर उमटलेले पाहायला मिळाले. शिवेसना (शिंदे गट) आणि भाजपाने या निकालाचे स्वागत केले. तर ठाकरे गट आणि महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने टीका केली. या निकालाचे पडसाद आजही महाराष्ट्रात उमटलेले पाहायला मिळत आहेत. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह भाजपावर टीका केली. या टीकेला पुन्हा प्रत्युत्तर मिळण्याची शक्यता आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Shivsena Disqualification Result Highlights Today, 11 January 2024
ठाणे: आज दिवसाढवळ्या लोकशाहीची हत्या झाली, आणि लोकांनी ती उघड्या डोळ्यांनी बघितली अशा आशयाचे बॅनर ठाण्यात झळकू लागले आहे. महाविकास आघाडीने हे बॅनर बसविले असून ‘अब न्याय जनता करेगी’ असा ही उल्लेख करण्यात आला आहे.
मुंबई: चेंबूर परिसरात सेंट सेबेस्टीयन शाळेपासून सह्याद्रीनगर रोड येथील रस्त्याच्या रुंदीकरणासाठी ८९ झाडे कापावी लागणार आहेत. तर ३५ झाडे पुनर्रोपित करावी लागणार आहेत.
काही शेतकऱ्यांना सर्वप्रथम एका शेतामध्ये हा बिबट आढळून आला होता. माहिती मिळताच नागरिकांनी बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली.
कुटुंब प्रमुख असलेल्या पित्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे कुटुंबावर शोककळा पसरली.
राज्यातील काँग्रेसचे सर्व जिल्हाध्यक्ष आज मुंबईत दाखल झाले आहेत. दुपारी एक वाजता त्यांचा संवाद होणार आहे.
मी गुजराती असल्याचा मला अभिमान आहे. ‘रिलायन्स’ ही गुजराती कंपनी होती, आहे आणि राहील, असे रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले आहेत.
मुंबई: विक्रोळी येथील कन्नमवार नगरातील महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मालकीच्या १३ इमारतींच्या २००६ पासून रखडलेल्या पुनर्विकासाचा मार्ग अखेर न्यायालयाने मोकळा केला आहे.
मी गुजराती असल्याचा मला अभिमान आहे. ‘रिलायन्स’ ही गुजराती कंपनी होती, आहे आणि राहील, असे रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी व्हायब्रंट गुजरात समिटमध्ये म्हटले होते. त्यानंतर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी यावर आक्षेप घेतला आहे. तुमची कर्मभूमी गुजरात असेल आणि रिलायन्स गुजरातची कंपनी आहे, तर तुमचा महाराष्ट्रातील गाशा गुंडाळून गुजरातला जा, अशी टीका मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.
ठाणे: पूर्व द्रुतगती महामार्गालगत आनंदनगर जकातनाका येथे कोपरीच्या दिशेने वाहतूक करण्यासाठी धोकादायकरित्या महामार्ग ओलांडून नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. या जीवघेण्या प्रवासामुळे प्रत्येक दोन दिवसांत अपघातांची मालिका सुरू झाली आहे.
नाशिक: पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उदघाटनानिमित्त शहरात येत आहेत. पंचवटीतील निलगिरी बाग येथील मोकळ्या जागेत त्यांचे हॅलिकाॅप्टर उतरणार असून त्यानंतर रोड शो करत ते तपोवन मैदानावर जाणार आहेत.
पुणे: पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट येथे ४७ वी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. या सर्वसाधारण सभेपूर्वी नियामक मंडळाची बैठक होत आहे.
सविस्तर वाचा…
माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते (शरद पवार गट) जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राम मांसाहारी असल्याचे विधान आव्हाड यांनी केले होते.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गट हाच अधिकृत शिवसेना पक्ष होय, असे जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात ठाकरे गटाने नाराजी नोंदविली.
राज्यात पोलीस उपनिरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची वाणवा आहे. गेल्या सार्वत्रिक बदल्यांमध्ये महासंचालक कार्यालयाने योग्य समन्वय साधून अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या.
राज्यात महायुतीमध्ये एकूण १५ घटक पक्षांचा समावेश आहे. या १५ राजकीय पक्षांच्या समन्वयातून आगामी लोकसभा निवडणूक लढवली जाणार आहे.
मित्राच्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवल्यानंतर ती वारंवार पैशाची मागणी करीत होती. त्यामुळे कंटाळलेल्या युवकाने महिलेचा गळा आवळून खून केला.
मुंबई: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुंबई विद्यापीठाने पुढाकार घेत विद्यार्थ्यांना दुहेरी पदवीचे शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. मुंबई विद्यापीठाच्या अब्जांश विज्ञान आणि अब्जांश तंत्रज्ञान म्हणजेच नॅनोसायन्स आणि नॅनो टेक्नॉलॉजी विभागाने फ्रान्समधील ट्रॉयस विद्यापीठासोबत शैक्षणिक सामंजस्य करार केला आहे. नॅनोसायन्स आणि नॅनो टेक्नॉलॉजी विभागात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याला ६ ते ९ महिन्यांच्या कालावधीसाठी फेलोशिपवर ट्रॉयस विद्यापीठात शिकण्यासह त्या विद्यापीठातील तज्ज्ञांसोबत काम करण्याची संधीही मिळणार आहे. तसेच दुहेरी पदवी कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यास दोन्ही विद्यापीठाची पदवी मिळणार आहे.
भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशांतील अब्जांश विज्ञान आणि अब्जांश तंत्रज्ञान क्षेत्रातील अध्ययन, अध्यापन पद्धती, संशोधन आणि कौशल्य वृद्धीस चालना देण्यासाठी व विद्यार्थ्यांमध्ये आंतर – सांस्कृतिक समज आणि जागतिक दृष्टीकोनांना प्रोत्साहन देण्यासाठी या कराराचे महत्त्व अधोरेखित होणार आहे, असे मत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
मुंबई: कॅनरा बँकेची ५३८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाप्रकरणी अटकेत असलेले जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना १३ जानेवारी रोजी आजारी पत्नीची भेट घेण्याची परवानगी विशेष न्यायालयाने दिली. मानवतावादी दृष्टिकोनातून गोयल यांना ही परवानगी दिल्याचेही विशेष न्यायालयाने नमूद केले.
लोकलमधील गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने शून्य मृत्यू मोहीम हाती घेतली आहे. यासाठी मुंबई महानगरातील संस्थांना कार्यालयीन वेळेत बदल करण्याचे आवाहन केले आहे. या मोहिमेला सर्वप्रथम सकारात्मक प्रतिसाद मुंबईतील मुख्य पोस्ट मास्तर कार्यालयाने दिला.
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने सर्वात मोठा दिलासा दिला आहे. वैद्यकीय कारणांसाठी नवाब मलिक यांना सहा महिन्यांसाठी जामीन मंजूर करण्यात आला आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निकालानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं.
Shivsena Disqualification Result Highlights Today, 11 January 2024 | विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालानंतर महाराष्ट्रात आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण