Mumbai Maharashtra Weather Update, 20 June 2023: शिवसेना वर्धापन दिनानिमित्त इतिहासात पहिल्यांदाच दोन मेळावे घेण्यात आले. या दोन्ही मेळाव्यांमध्ये ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. नेतेमंडळींनी केलेल्या टीका-टिप्पणीवर आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत. तर दुसरीकडे शिंदे सरकारच्या वर्षपूर्तीबरोबरच शिवसेनेत झालेल्या सर्वात मोठ्या बंडखोरीचीही वर्षपूर्ती होत असताना त्यावरून राजकीय टोलेबाजी पाहायला मिळत आहे.
Mumbai Maharashtra News: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर
पंढरपूर : भाविकांना दर्शन देण्यासाठी आता सावळा विठूराया २४ तास उभा राहणार आहे. ७ जुलै पर्यंत देवाचे २४ दर्शन तसेच सुरु राहणार असून व्हीआयपी दर्शन बंद राहणार आहे.
नाशिक: महाविकास आघाडीकडून वारंवार खोके, गद्दार म्हणून हिणवले जात असल्याने शिवसेनेने (शिंदे गट) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अल्पावधीत केलेली विकास कामे मांडून विरोधकांना प्रत्युत्तर दिले.
आमदार गीता जैन यांची मनपा अभियंत्याला मारहाण!
आदित्य ठाकरेंचं दोन शब्दांचं ट्वीट...!
शिवसैनिक गद्दार दिनाचं आंदोलन करत होते. त्यांच्यावर कारवाया करण्यात आल्या. यायचा अर्थ महाराष्ट्र सरकारने गद्दार दिनाला मान्यता दिली. तो दिन साजरा करू नये असं म्हणून शिंदे-फडणवीस सरकारने त्याला मान्यता दिली आहे - संजय राऊत
नाशिक: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडाला वर्ष पूर्ण झाल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या वतीने मंगळवारी शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी डोक्यावर खोके घेऊन आंदोलन केले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील आमदारांच्या शिष्टमंडळाच्या आमदारांनी मंगळवारी पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली.
https://twitter.com/RavindraWaikar/status/1671135851190054912
नाशिक: जुने नाशिक परिसरातील धोकादायक वाड्यांना नोटीसा बजावण्यासह संबंधित ठिकाणचा वीज व पाणी पुरवठा खंडित करण्याची तयारी करण्यात आली आहे. यात पूर्व विभागातील ३७३ धोकादायक वाड्यांचा समावेश आहे.
डोंबिवली: डोंबिवली शहरातील वाहन चालकांवर कल्याण डोंबिवली पालिकेने शहराच्या विविध भागात स्मार्ट सिटीच्या माध्यमातून बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नजर ठेवण्याचा निर्णय डोंबिवली वाहतूक विभागाने घेतला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने अतिशय योग्य दिवशी जागतिक गद्दार दिन साजरा केला, याबद्दल त्यांचे नितांत आभार…! उशीरा का होईना राष्ट्रवादीला उपरती झाली आणि त्यांनी नवाब मलिकांचा वाढदिवस ‘जागतिक गद्दार दिवस’ म्हणून साजरा केला. नवाब मलिकांना जागतिक गद्दार दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! - चित्रा वाघ
संजय शिरसाटांपेक्षा माझी क्रेडिबिलिटी जरा जास्त आहे. त्यामुळे त्यांच्या मुद्द्यावर माझी प्रतिक्रिया विचारणं हे जरा पुढचंच झालं - जयंत पाटील
उन्हाची काहिली आणि लांबणीवर पडलेला पाऊस यामुळे अनेक भागात पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे. तसेच वाढत्या सांडपाण्यामुळे जलप्रदूषणाची समस्या गंभीर बनली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प उभारला आहे.
सविस्तर वाचा…
‘सडक २’ आणि ‘बाटला हाऊस’सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री क्रिसन परेराचा मुंबईत परतण्याचा मार्ग मोकळा झाला असताना आरोपीने क्रिसेनप्रमाणे अंमलीपदार्थांच्या खोट्या गुन्ह्यांत अडकवलेल्या क्लेटन रॉड्रीक्सला मात्र शारजामध्ये २५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. सविस्तर वाचा…
बाजार, राजकारणातील आपला ‘टीआरपी’ कसा वाढेल यासाठी प्रत्येकजण उठसुट उलटसुलट वक्तव्य करतो. अशा वक्तव्य करणाऱ्यांचा बंदोबस्त शिवसेना-भाजपच्या वरिष्ठ पातळीवरुन झाला आहे. त्यामुळे टीआरपीचा हा खेळ आता कायमचा बंद होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी येथे दिली. सविस्तर वाचा…
शिवसेनेत बंड होऊन महाविकास आघाडीचे सरकार पडल्याच्या घटनेला एक वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्ताने ठाण्यातील राष्ट्रवादीने ‘गद्दार दिन’ साजरा केला. पन्नास खोके असे लिहिलेल्या खोक्याची होळी करत कार्यकर्त्याकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
डोंबिवली पश्चिमेत सर्वाधिक वर्दळीचा रस्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महात्मा फुले रस्ता, सुभाष रस्ता, घनश्याम गुप्ते रस्ता, महात्मा गांधी रस्त्यांवर संध्याकाळच्या वेळेत दुतर्फा विविध वस्तू, खाऊच्या हातगाड्या लावण्यात येतात. सविस्तर वाचा…
मी केलेल्या सर्वेनुसार इम्तियाज जलील महाराष्ट्राचा सर्वात चांगला मुख्यमंत्री होऊ शकतो. दोन किंवा चार आमदार का निवडून येईनात. पण माझ्या सर्वेनुसार इम्तियाज जलील महाराष्ट्राचा सर्वात चांगला मुख्यमंत्री असेल. माझी मुख्यमंत्रीपदाची इच्छा का असू शकत नाही? हे जे कुणी बसलेत तिथे, त्यांच्यापेक्षा किमान ५० टक्के चांगला मुख्यमंत्री मी होईन - इम्तियाज जलील
आम्ही समान नागरी कायद्याला पाठिंबा देतो, पण त्यामुळे फक्त मुस्लीमांनाच अडचण होणार नाही, हिंदूंनाही होईल. अनेक प्रश्न उपस्थित होतील. पण समान नागरी कायद्याप्रमाणेच सरकारने काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत गोमांस बंदी लागू करावी - उद्धव ठाकरे
धुळे: शहरवासीयांना हंडाभर पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असून आश्वासने देऊन महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजप धुळेकरांची बोळवण करीत असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादीतर्फे मंगळवारी महापालिकेवर हंडा मोर्चा काढण्यात आला.
नागपूर: सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अनुसुचित जातीच्या गुणवंत विद्यार्थीसाठी परदेशात उच्चशिक्षणासाठी दिली जाणारी शिष्यवृत्ती अर्ज करण्याची मुदत आज संपली आहे.
सांडपाणी प्रक्रियेतून रेल्वेने मोठी पाणी बचत सुरू केली आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून लाखो लिटर पाणी रेल्वेला मिळत आहे. या प्रकल्पातून मिळालेले पाणी लोहमार्ग धुण्यासाठी व स्थानकांवर इतर स्वच्छतेच्या कामांसाठी वापरले जात आहे. त्यामुळे मध्य रेल्नेचा पिण्याच्या पाण्याचा एकूण वापर ६.३ टक्क्याने कमी झाला आहे.
या राज्यात लोकशाही राहिली आहे का? असा सवाल करतानाच रस्त्यावर आंदोलन करायला परवानगी मिळत नसेल तर कितीही किंमत मोजावी लागली तरी आम्ही दडपशाहीच्या विरोधात लढत राहणार. 'महाराष्ट्र कभी झुका है, ना कभी झुकेगा'... 'मोडेन पण वाकणार नाही' जे 'गद्दार' असतील त्यांना 'गद्दार' म्हणायची ताकद माझ्यात आहे - सुप्रिया सुळे
पुणे: धनकवडी भागातील तळजाई पठार परिसरात मध्यरात्री टोळक्याने दहशत माजविली. टोळक्याने रस्त्याच्या कडेला लावलेल्या २० ते २५ वाहनांची तोडफोड केली.
अमरावती: सध्याच्या इंटरनेट युगात जवळपास प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन असल्यामुळे ऑनलाइन व्यवहार ग्राहकांकडून होऊ लागले आहेत. त्यातच ग्राहकांची फसवणूक होण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे.
नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) विद्यार्थीभिमुख होण्याचा प्रयत्न करत आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या त्वरित सुटाव्यात यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. मोबाईल ॲपमुळे विद्यार्थ्यांच्या समस्या सुटण्यासाठी मदत होत आहे.
४४८ कोटी रुपयांचे कर्ज असणाऱ्या बीडमधील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पंकजा मुंडे यांनी निवड झाली आणि उपाध्यक्षपदी धनंजय मुंडे यांचे समर्थक चंद्रकांत कराड यांची यांची वर्णी लागली. मुंडे बहिण भावाच्या ‘सहकार’ धोरणामुळे दोन गटात कमालीचा विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांची मात्र कोंडी झाली आहे.
इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन नीलेकणी यांनी आयआयटी मुंबईतून १९७३मध्ये विद्युत अभियांत्रिकीची पदवी संपादन केली होती. आयआयटी मुंबई या संस्थेबरोबरचे ५० वर्षांचे नाते त्यांनी अनोख्या पद्धतीने साजरे केले आहे.
काल अमरावती येथून शिवसेनेच्या (शिंदे गट) वर्धापनदिनासाठी मुंबईत आलेले तिवसा तालुक्याचे तालुकाप्रमुख अंबादास राजूरकर यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय. काल कार्यक्रम संपल्यावर पुन्हा लॉजवर गेल्यानंतर अचानक ते कोसळले. दरम्यात त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याना तातडीने मुंबईतील जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
समान नागरी कायद्यावर आमचा आक्षेप नाहीये. पण त्या कोडमुळे फक्त मुसलमानांना त्रास होईल असं त्यांना वाटतंय. पण हिंदुंनाही काय त्रास होईल, होईल की नाही हे सगळ्यांसमोर ठेवा ना. त्याआधी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत गोवंश हत्याबंदी लागू करा. काही राज्य त्यांनी का सोडली आहेत? त्रिपुरात नाहीये. तिथले त्यांचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात आम्ही गोमांस खातो. मनोहर पर्रीकर गोव्याचे मुख्यमंत्री असताना म्हणाले होते की इथे गोमांस कमी झालं तर मी बाहेरून आणेन. मग समान नागरी कायद्यात गोवंश हत्याबंदी येणार की नाही? समान कायदा सर्वच बाबतीत लागायला हवा. त्यांच्या पक्षात जाणाऱ्यांचीही चौकशी व्हायला हवी - उद्धव ठाकरे
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबई महानगरपालिकेत (बीएमसी) भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप केला. यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने १२०० कोटी रुपयांच्या बीएमसीतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) नियुक्ती केली. याबाबत विचारलं असता शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं. ते मंगळवारी (२० जून) मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते.
Mumbai Maharashtra News: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर