Mumbai Maharashtra Weather Update, 20 June 2023: शिवसेना वर्धापन दिनानिमित्त इतिहासात पहिल्यांदाच दोन मेळावे घेण्यात आले. या दोन्ही मेळाव्यांमध्ये ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. नेतेमंडळींनी केलेल्या टीका-टिप्पणीवर आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत. तर दुसरीकडे शिंदे सरकारच्या वर्षपूर्तीबरोबरच शिवसेनेत झालेल्या सर्वात मोठ्या बंडखोरीचीही वर्षपूर्ती होत असताना त्यावरून राजकीय टोलेबाजी पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Mumbai Maharashtra News: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

14:33 (IST) 20 Jun 2023
अकोला: धक्कादायक! तीव्र उन्हात रस्त्यावर बाळाचा जन्म; सिमेंट रस्त्यावर प्रसुती

अकोला: ४१ डिग्री अं.से. तापमानामध्ये अंग भाजत असतांना एका आदिवासी महिलेची चक्क सिमेंटच्या रस्त्यावर प्रसुती झाल्याची धक्कादायक व मन सुन्न करणारी घटना अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे घडली.

सविस्तर वाचा…

14:32 (IST) 20 Jun 2023
Maharashtra Breaking News Live: आडवाणीजीही जिनांच्या कबरीवर नतमस्तक झाले होते – उद्धव ठाकरे

आडवाणीजीही जिनांच्या कबरीवर नतमस्तक झाले होते. नवाज शरीफांच्या वाढदिवशी केक खायला आपले पंतप्रधान गेले होते. त्यामुळे आता स्वच्छ आणि एका विचाराने पुढे जायची गरज आहे. तुम्हाला एखाद्याचा चेहरा चालत नसेल तर तिथे जय बजरंगबली करायचं, कधी दाऊदचा चेहरा, कधी औरंगजेबाचा चेहरा दाखवायचा. औरंगजेबाच्या मुद्द्यावरून दंगा करणारे हे औरदंगाबाद आहेत. कारण यांना दंगली करून कारभार करायचाय – उद्धव ठाकरे

14:31 (IST) 20 Jun 2023
मुंबई : शिव योग केंद्रात १५ हजार लाभार्थ्यांनी घेतले प्रशिक्षण

दैनंदिन जीवनातील धावपळ, ताणतणाव यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय विकार, तसेच नैराश्य यासारख्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने २०२२ मध्ये विभाग स्तरावर मोफत शिव योग केंद्रे सुरू केली. या शिव योग केंद्रांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या केंद्रांमध्ये वर्षभरात तब्बल १५ हजार नागरिकांनी योग प्रशिक्षण घेतले.

सविस्तर वाचा

14:29 (IST) 20 Jun 2023
Maharashtra Breaking News Live: आता ते आवडाबाई नाही, नावडाबाई झालेत – देवेंद्र फडणवीस

काल मी क्लिप ऐकवली. देवेंद्र फडणवीस असं बोलू शकतात का, मला विश्वास बसत नव्हता. तीही कुणी मॉर्फ्ड केली होती का? हे त्यांनी शोधावं. ते म्हणतात मोदींनी लस तयार केली नसती तर? मोदींनी लस तयार केली? मला वाटत नाही की मोदी असं बोलले असतील. त्यावर ते मला अर्धवटराव म्हणाले. हे पात्र कुणाचं? रामदास पाध्ये, बोलका बाहुला. आता मला अर्धवटराव म्हणत असतील तर हे दिल्लीश्वरांचे आवडाबाई आहेत का? कारण त्यांची दोन पात्र होती.. अर्धवटराव आणि आवडाबाई.. पण तेही दिसत नाही. आता ते नावडाबाई झाले आहेत. मोदींनीलस तयार केली या वाक्याला काही अर्थ आहे का? ते नसते तर आपण कटोरा घेऊन बसलो असतो वगैरे.. कोणत्या जगात तुम्ही आहात? लोकांना मूर्ख का समजता? मी मुख्यमंत्री असताना एकरकमी चेक देऊन लस खरेदी करण्याची तयारी दाखवली होती. पण नाही दिल्या. पण आम्ही कधी केंद्रावर दोषारोप केलेले नाहीत – उद्धव ठाकरे

14:26 (IST) 20 Jun 2023
Maharashtra Breaking News Live:

गद्दारांकडे स्वत:ची ताकद नाहीये. त्यांना ताकदही चोरावी लागते. पोलिसांची मदत घ्यावी लागते. मग त्यांच्यात मर्दुमकी कुठे आहे. नुसत्या घोषणा केल्या जातात. पण पोलिसांशिवाय तुमचं पान कुठे हलतं? – उद्धव ठाकरे

14:26 (IST) 20 Jun 2023
पुणे : इंदुरीकर महाराजांवरील खटला सुरू ठेवण्यासाठी महाराष्ट्र अंनिसतर्फे कॅव्हेट

इंदुरीकर महाराज यांना त्यांच्या मागणीनुसार पुढील अपील करण्यासाठी उच्च न्यायालयाने चार आठवड्यांची मुदत दिलेली आहे. त्यामुळे या काळात ते औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश किशोर संत यांच्या निकालाला आव्हान देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.

सविस्तर वाचा

14:25 (IST) 20 Jun 2023
Maharashtra Breaking News Live: ज्यांना यायचंय, त्यांनी मोर्चात यावं – उद्धव ठाकरे

महाविकास आघाडीतील इतर पक्षांना १ जुलैच्या मोर्चात यायचं असेल तर येऊ देत. ज्यांना यायचंय त्यांना येऊ द्या. मी पहिल्यांदाच तुमच्यासमोर हे जाहीर करतोय – उद्धव ठाकरेंची १ जुलैच्या विराट मोर्चाबाबत भूमिका

14:24 (IST) 20 Jun 2023
Maharashtra Breaking News Live: ..म्हणून मिंधे रोज दिल्लीला जात असतील – उद्धव ठाकरे

त्यांच्यामुळे मला आता कळलं की मिंधे सातत्याने दिल्लीला का जातात. म्हणजे त्यांना नोटिसा येत असतील, म्हणून ते रोज जात असतील दिल्लीला – उद्धव ठाकरेंना नोटीस आल्यानंतर त्यांनी दिल्लीला जाऊन मोदींची भेट घेतली होती या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या टीकेवर उद्धव ठाकरेंचा टोला.

14:22 (IST) 20 Jun 2023
Maharashtra Breaking News Live: त्यांच्यावरच्या आरोपांची चौकशी होत नाही – उद्धव ठाकरे

त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांची कुठेही चौकशी होत नाहीये. उलट क्लीनचिट दिली जाते. या सगळ्या चिटा आम्ही काढू आणि त्यांची चौकशी करू – उद्धव ठाकरे

14:22 (IST) 20 Jun 2023
Maharashtra Breaking News Live: गद्दार हे गद्दारच असतात – उद्धव ठाकरे

आज आम्ही जागतिक गद्दार दिन घोषित करावा अशी मागणी संजय राऊतांनी युनोकडे केली आहे. निवडणूक आयोगाकडे नाही करत ना? यांनी किती काहीही म्हटलं तरी यांच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाहीये – उद्धव ठाकरे

14:19 (IST) 20 Jun 2023
Maharashtra Breaking News Live: १ जुलै रोजी शिवसेनेचा विराट मोर्चा

येत्या १ जुलैला शिवसेना मुंबई महापालिकेवर विराट मोर्चा काढेल. या मोर्चाचं नेतृत्व आदित्यबरोबरच शिवसेनेचे नेते करतील – उद्धव ठाकरे

14:18 (IST) 20 Jun 2023
Maharashtra Breaking News Live: मुंबईला कुणी मायबापच उरलेला नाही – उद्धव ठाकरे

पावसाप्रमाणे निवडणुकाही लांबत चालल्या आहेत. निवडणुका घेण्याची हिंमत या सरकारमध्ये नाहीये. पैसाक उकळला जातोय, पण त्यांना जाब विचारणारं कोणीच नाहीये. महापालिकेत लोकप्रतिनिधी असतात, तेव्हा सर्व निर्णयांवर चर्चा होते. कंत्राटांना मंजुरी दिली जाते. पण सध्या वारेमाप उधळपट्टी चालू आहे. मुंबईला कुणी मायबापच उरलेला नाही – उद्धव ठाकरे

14:13 (IST) 20 Jun 2023
चार दिवसाच्या बाळाची चोरी; चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयातील प्रकार

चंद्रपूर: जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयातून मंगळवारी पहाटेच्या सुमारास चार दिवसांच्या नवजात बाळाची चोरी झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

सविस्तर वाचा…

14:08 (IST) 20 Jun 2023
“माझ्यावरील हल्ल्यामागे संजय राऊत आणि त्यांच्या बंधूचा हात”, संदीप देशपांडे यांचा आरोप

नागपूर : माझ्यावर करण्यात आलेल्या हल्ला प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या चार्टशिटमध्ये निलेश पराडकर यांच्या चेंबूर येथिल कार्यालयात हे षडयंत्र रचले गेले होते. या हल्ल्यामागे संजय राऊत आणि त्यांच्या बंधू हात असून त्यांच्या सांगण्यानुसार हा हल्ला करण्यात आला असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला.

वाचा सविस्तर…

14:05 (IST) 20 Jun 2023
राहुल गांधींच्या वाढदिवशी नागपुरात उघडली “मोहब्बत की दुकान”; नेमके काय आहे खास, वाचा…

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा वाढदिवस काँग्रेसच्या वेगवेगळ्या आघाड्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला. नागपूर युवक काँग्रेसने तर पक्ष्यांना पिंजऱ्यातून मोकळ्या आकाशात उडवून वाढदिवस साजरा केला.

वाचा सविस्तर…

14:04 (IST) 20 Jun 2023
फेरीवाल्यांची मतदारयादी प्रसिद्ध; मंबई महानगरपालिकेने मागविल्या हरकती आणि सूचना

मुंबई महानगरपालिकेने शहर आणि उपनगरांतील फेरीवाल्यांची फेरपात्रता निश्चिती करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी शहर फेरीवाला समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सविस्तर वाचा…

14:03 (IST) 20 Jun 2023
थोड्याच वेळात उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत संवाद साधणार…

14:02 (IST) 20 Jun 2023
Maharashtra Breaking News Live: उद्धव ठाकरे गटाकडून वर्धापन दिनाचा व्हिडीओ ट्वीट!

ठाकरे गटाकडून वर्धापन दिनाचा एक व्हिडीओ ट्वीट करण्यात आला आहे.

14:00 (IST) 20 Jun 2023
Maharashtra Breaking News Live: संजय शिरसाट यांचा मोठा दावा

जयंत पाटील राष्ट्रवादीत राहणार आहेत का? शरद पवारांनी राजीनामा दिला तेव्हा सगळ्यात जास्त दु:ख कुणाला झालं असेल तर ते जयंत पाटलांना झालंय. सुप्रिया सुळे हसत होत्या, अजित पवार दम देत होते. हा एकटाच रडत होता. कारण त्याला माहितीये की शरद पवारांचं छत्र आपल्या डोक्यावर आहे तोपर्यंत आपण राष्ट्रवादीत आहोत. नाहीतर आपल्याला लगेच इथून निघावं लागेल. काही दिवसांत ते भाजपाकडे जाणारच हे निश्चित – संजय शिरसाट

13:54 (IST) 20 Jun 2023
Maharashtra Breaking News Live: उरलेल्या शिवसेनेतील आमदारही संपर्कात – उदय सामंत

आम्ही महाराष्ट्राच चांगली विकासकामं करत आहोत. उरलेली शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे अनेक आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत – उदय सामंत

13:53 (IST) 20 Jun 2023
Maharashtra Breaking News Live: …म्हणून शिंदेंकडे गेलो – बच्चू कडू

जे अशा प्रकारे आमच्यावर आरोप करतात, गद्दार म्हणतात त्यांच्याविरोधात आम्ही कोर्टात जाणार आहोत. मानहानीचा दावा दाखल करणार आहोत. मीही कोर्टात दाद मागणार आहे. आम्ही विकासासाठी तिकडे गेलो आहोत. उद्धव ठाकरे माणूस म्हणून चांगले आहेत. पण मुख्यमंत्री म्हणून ते की पडले म्हणून आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला – बच्चू कडू

13:50 (IST) 20 Jun 2023
Maharashtra Breaking News Live: सरकारमध्ये ती क्षमता नाही – बच्चू कडू

मंत्रीमंडळ विस्ताराला वर्षभर लागेल असं आम्हाला वाटलं नव्हतं. पण ते नाही झालं. त्यांनी मंत्री केलं नाही यामुळे मी नाराज नाहीये. मंत्रीमंडळ २०२४ नंतरच होईल हे मी नेहमी सांगत असतो. ती क्षमता सध्या सरकारमध्ये नाहीये. – बच्चू कडू

13:43 (IST) 20 Jun 2023
अकोला दंगल प्रकरणातील मुस्लीम आरोपींना आंतरधर्मीय जामीनदार आणण्याची सूचना; पोलीस अधीक्षकांनी आरोप फेटाळले

जुने शहरातील दंगल प्रकरणात अटकेतील आरोपींना न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला. जामिनावर सुटलेल्या आरोपींना कोऱ्या मुद्रांकासह आंतरधर्मीय जामीनदार आणण्याचे तोंडी सांगण्यात येत असल्याचे बचावपक्षाच्या वकिलांचे म्हणणे आहे.

सविस्तर वाचा…

13:42 (IST) 20 Jun 2023
Maharashtra Breaking News Live: सरकार आम्हाला घाबरतंय – जितेंद्र आव्हाड

आज सगळी कडे गद्दार दिवस साजरा होत आहे …. जे साजरा करतील त्यांना त्वरित अटक करा असा आदेश सरकार ने दिला आहे पोलिसी राज्य आहे का ? सरकार हमसे डरती है पोलिस को आगे करती है … – जितेंद्र आव्हाड

13:39 (IST) 20 Jun 2023
Maharashtra Breaking News Live: ‘आदिपुरुष’च्या प्रदर्शनावर बंदी आणा – चित्रपट संघटनेची मागणी

आदिपुरुष चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी अखिल भारतीय चित्रपट कर्मचारी संघटनेनं केली असून तसं पत्रच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आलं आहे.

13:17 (IST) 20 Jun 2023
अपात्र असताना रेशनचा लाभ घेणे अंगलट; अकोल्यात तब्बल ६५ जणांवर गुन्हे दाखल

अपात्र असताना शिधापत्रिकेवर मिळणारे स्वस्त धान्य घेऊन लाभ घेतल्याप्रकरणी जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ६५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात १९८१ जणांनी लाभ नाकारत असल्याचे अर्ज दाखल केले आहेत, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यु. काळे यांनी दिली.

सविस्तर वाचा

13:14 (IST) 20 Jun 2023
Maharashtra Breaking News Live: खोके बंद झालेले खोके दिन साजरा करतायत – उदय सामंत

ज्यांचे २० जूनला खोके बंद झाले, ते खोके दिन साजरा करतायत. ज्यांनी मतदारांशी गद्दारी केली, ते गद्दार दिन साजरा करतायत – उदय सामंत

13:11 (IST) 20 Jun 2023
“आईच्या पाठीत खंजिर खुपसून गद्दार…”; पंतप्रधान मोदींचा उल्लेख करत संजय राऊतांचा हल्लाबोल

शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी संयुक्त राष्ट्राला पत्र लिहून जागतिक गद्दार दिवस जाहीर करण्याची मागणी केली आहे. तसेच महाराष्ट्रात गद्दारी व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला. ते मंगळवारी (२० जून) मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते.

सविस्तर वाचा…

13:10 (IST) 20 Jun 2023
ओडिशातील रेल्वे अपघातप्रकरणाला नवं वळण, सिग्नल इंजीनियर कुटुंबासह बेपत्ता, सीबीआयचं मोठं पाऊल

ओडिशातील बालासोर येथील रेल्वे अपघातप्रकरणी सीबीआयने मोठे पाऊल उचलले आहे. या रेल्वे अपघाताला सिग्नल यंत्रणेतील दोष कारणीभूत ठरल्याची चर्चा सुरू असतानाच सीबीआयने सोमवारी (१९ जून) रेल्वेच्या सिग्नल यंत्रणा विभागातील सोरो सेक्शन सिग्नल जुनियर इंजीनियरचं घर सील केलं आहे. बालासोरमध्ये भाड्याच्या घरात राहणारा हा इंजीनियर सीबीआय चौकशीनंतर कुटुंबासह बेपत्ता आहे.

सविस्तर वाचा…

13:10 (IST) 20 Jun 2023
“अब्दुल सत्तारांबद्दल केंद्रात प्रचंड नाराजी, देवेंद्र फडणवीसांनी…”; राष्ट्रवादी काँग्रेसचा गंभीर आरोप

मागील अनेक दिवसांपासून शिवसेनेच्या (शिंदे गट) नेत्यांकडून शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराबाबत विविध तारखा सांगितल्या जात आहेत. मात्र, अद्यापही हा मंत्रीमंडळ विस्तार खोळंबलेला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीतील भेटीगाठीही वाढलेल्या दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी काही मंत्र्यांचा उल्लेख करत गंभीर आरोप केला आहे. ते नाशिकमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.

सविस्तर वाचा…

महाराष्ट् न्यूज