Mumbai Maharashtra Weather Update, 20 June 2023: शिवसेना वर्धापन दिनानिमित्त इतिहासात पहिल्यांदाच दोन मेळावे घेण्यात आले. या दोन्ही मेळाव्यांमध्ये ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. नेतेमंडळींनी केलेल्या टीका-टिप्पणीवर आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत. तर दुसरीकडे शिंदे सरकारच्या वर्षपूर्तीबरोबरच शिवसेनेत झालेल्या सर्वात मोठ्या बंडखोरीचीही वर्षपूर्ती होत असताना त्यावरून राजकीय टोलेबाजी पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Mumbai Maharashtra News: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

13:04 (IST) 20 Jun 2023
समृद्धी महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार; दोघांचा जळून मृत्यू

वाशीम: समृध्दी महामार्गावर एका खासगी बसवर दगडफेक करून लुटण्याचा प्रकार ताजा असतानाच सोमवारी रात्री दोन वाजेदरम्यान कांद्याने भरलेल्या ट्रकचा अपघात होऊन पेट घेतला. यामधे ट्रक जळून राख झाला असून यामधे चालक व इतर एकाचा जाळून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

वाचा सविस्तर…

13:04 (IST) 20 Jun 2023
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसकडून गद्दार दिवस साजरा; ‘गुवाहाटी चले जाव’ची घोषणाबाजी

पुणे : ठाकरे गटाच्या आमदारांना सोबत घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यभरात गद्दार दिवस म्हणून साजरा केला जात आहे.

वाचा सविस्तर…

12:50 (IST) 20 Jun 2023
Maharashtra Breaking News Live: “उद्धवजी.. सत्याचा सामना करा”

अडीच वर्षं जो व्यक्ती आपल्या घरातच बंद राहिला, आपल्या कार्यकर्त्यांनाही भेटला नाही, जो कोविडच्या भीतीने आपल्या घरातून बाहेरच पडला नाही, त्याला सत्तेतून बाहेर करण्याचं काम त्यांच्याच कार्यकर्त्यांनी केलं. जनतेनं केलं. ते आपली विचारसरणी सोडून त्या विचारसरणीला जवळ केलं ज्याला बाळासाहेब ठाकरे नेहमीच विरोधच करत होते, तर मग हा दिवस तर त्यांना बघायचाच होता. आता पश्चात्ताप करून काय फायदा. उद्धव ठाकरेजी, आता तरी सत्याचा सामना करा.

12:49 (IST) 20 Jun 2023
‘मेट्रो ६’च्या कारशेडसाठी कांजूरमार्गमधील आणखी सात हेक्टर जमिनीची आवश्यकता, एमएमआरडीएची राज्य सरकारकडे मागणी

‘एमएमआरडीए’ पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या १५.३१ किमी लांबीच्या मेट्रो मार्गिकेचे बांधकाम करीत आहे.  सुमारे ६,६७२ कोटी रुपये खर्च करून ही मार्गिका उभारण्यात येत असून १३ मेट्रो स्थानकांचा समावेश असलेली ही मार्गिका २०२५ मध्ये वाहतूक सेवेत दाखल करण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे.

सविस्तर वाचा

12:49 (IST) 20 Jun 2023
जळगावात २७ जूनला शासन आपल्या दारी कार्यक्रम; जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

जळगाव: शासन आपल्या दारी अभियानाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम २७ जून रोजी जळगावात होणार असल्याने सर्व समन्वयक अधिकाऱ्यांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी एकमेकांशी समन्वय राखून पार पाडून यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी केले.

सविस्तर वाचा…

12:31 (IST) 20 Jun 2023
Maharashtra Breaking News Live: शिवसेना भवनवर महत्त्वपूर्ण बैठक

उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या माजी नगरसेवकांची महत्त्वपूर्ण बैठक शिवसेना भवन येथे आयोजित केली असून या बैठकीत उद्धव ठाकरे माजी नगरसेवकांना संबोधित करणार आहेत.

12:25 (IST) 20 Jun 2023
Maharashtra Breaking News Live: नितेश राणेंची खोचक मागणी…

२७ जुलै जागतिक गद्दार दिन म्हणून पाळला जावा. कारण या दिवशी अशा व्यक्तीचा जन्म झाला, ज्यानं आपल्याच वडिलांच्या पाठित खंजीर खुपसला – नितेश राणे

12:16 (IST) 20 Jun 2023
नाशिकरोडमधील जल वाहिनीला गळती; दुरुस्तीमुळे बुधवारी चार प्रभागात पाणी पुरवठा बंद

नाशिक: नाशिकरोड विभागातील गोदावरी जलकुंभ भरणाऱ्या ६०० मिलीमीटर व्यासाच्या वाहिनीला मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे. त्यामुळे उपरोक्त जलकुंभावर होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

सविस्तर वाचा…

12:14 (IST) 20 Jun 2023
Maharashtra Breaking News Live: अनुराग ठाकूर यांचा उद्धव ठाकरेंना टोला!

करोना काळात उद्धव ठाकरे घराबाहेर आले नाहीत, ते नागरिकांना विसरले – अनुराग ठाकूर

11:49 (IST) 20 Jun 2023
नागपूर: शेतकऱ्यांसह आता सर्वसामान्यांचेही पावसाकडे डोळे

नागपूर: जून महिन्याचा उत्तरार्ध सुरू होऊनही राज्यात मान्सून रखडल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यही पावसाकडे डोळे लावून बसले आहेत.

सविस्तर वाचा…

11:38 (IST) 20 Jun 2023
Maharashtra Breaking News Live: मनीषा कायंदे अपात्र ठरणार का? उज्ज्वल निकम म्हणतात…

मनीषा कायंदेंनी शिंदे गटात प्रवेश केल्याचं जाहीर केलं असलं, तरी ती अपात्रता मानली जाऊ शकत नाही. कारण त्यांचा दावा असेल की त्या शिवसेनेतच आहेत, शिवसेना सोडली नाही. पण विधानपरिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यासंदर्भात अंतिम निर्णय घेतील. दहाव्या परिशिष्टानुसार त्या अपात्र ठरतात की नाही, याबाबत नीलम गोऱ्हे सभागृहाच्या सभापती म्हणून निर्णय घेतील – उज्ज्वल निकम

11:37 (IST) 20 Jun 2023
पुणे : कर्वे रस्त्यावरील वाहतूककोंडी सुटणार

वनाज ते गरवारे दरम्यान मेट्रो आणि नळस्टॉप चौकातील उड्डाणपुलाची कामे संपल्यामुळे कर्वे रस्त्यावर दुतर्फा वाहने उभी करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी या रस्त्यावरील स्थानिक व्यावसायिकांनी केली होती. मनसेचे सरचिटणीस हेमंत संभूस यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधून तोडगा न काढल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता.

सविस्तर वाचा

11:26 (IST) 20 Jun 2023
मरणानेही छळले येथे; पुण्यातील स्मशानभूमींची अशी आहे अवस्था

नागरिकांनी पुढाकार घेतलेल्या पुणे एअर हब या अंतर्गत स्मशानभूमींची तपासणी करण्यात आली. पुणे एअर हबमध्ये परिसर, सेंटर फाॅर एन्व्हाॅयरमेंन्ट एज्युकेशन, प्रयास आरोग्य गट, समुचित, हिंजवडी रेसिडन्ट्स वेलफेअर असोसिएशन (हिरवा) या संघटना आणि व्यक्तींचा समावेश आहे.

सविस्तर वाचा

11:18 (IST) 20 Jun 2023
Maharashtra Breaking News Live: औरंगाबादमध्ये ठाकरे गटाचं आंदोलन

औरंगाबादमध्ये ठाकरे गटाच्या काही कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांनी शिंदे सरकारविरोधात 'गद्दार दिन आंदोलन' केलं असून रस्त्यावर उतरून घोषणाबाजीही केली आहे. तसे फलक दाखवण्यात येत आहेत.

11:18 (IST) 20 Jun 2023
गोंदिया: गिधाडी येथील महिलांचा गावात दारूबंदीचा निर्णय

गोंदिया: गोरेगाव तालुक्यातील गिधाडी येथे अवैधरित्या देशी, विदेशी दारूविक्री बंदीचा निर्णय महिलांनी ग्रामसभेत घेतला असून, यापुढे कोणी दारू विक्री करताना आढळल्यास त्याच्यावर एक लाख रुपये दंड आकारला जाणार आहे. या निर्णयामुळे गावातून अवैध दारूविक्री हद्दपार होईल, यात शंका नाही.

वाचा सविस्तर…

11:17 (IST) 20 Jun 2023
Maharashtra Breaking News Live: ..म्हणून तशी मागणी केली – संजय राऊत

या देशातलं पूर्ण राजकारण गद्दारीच्या पायावरच उभं राहिलं आहे. आपले पंतप्रधान, केंद्र सरकार गद्दारीला प्रोत्साहन देत आहेत. महाराष्ट्रातले शिवसेनेचे ४० आमदार उद्धव ठाकरे आजारी पडल्यावर सोडून निघून गेले. यामागे आपले पंतप्रधान, केंद्र सरकार आणि खूप सारा पैसा आहे. म्हणून हा दिवस जागतिक गद्दारी दिवस जाहीर करावा अशी मागणी आम्ही केली – संजय राऊत

11:17 (IST) 20 Jun 2023
‘जीएसटी’च्या उत्पन्नावर पुणे महापालिकेचा डोलारा; मिळकतकरात घट होण्याची शक्यता

चालू आर्थिक वर्षाच्या (सन २०२३-२४) अंदाजपत्रकाचा डोलारा वस्तू आणि सेवाकरातून (जीएसटी) मिळणाऱ्या उत्पन्नावरच अवलंबून असून, महापालिकेला मिळणाऱ्या एकूण उत्पन्नापैकी एक चतुर्थांश वाटा या माध्यमातून महापालिकेच्या तिजोरीत जमा होणार आहे.

सविस्तर वाचा

11:13 (IST) 20 Jun 2023
ठाणे: भीषण अपघातात रिक्षाचालक जखमी

ठाणे: ठाणे भिवंडी मार्गावरील यशस्वी नगर भागात मंगळवारी रस्त्याकडेला उभ्या असलेल्या एका टेम्पोला मागून येऊन एका रिक्षाने जोरदार धडक दिली. या घटनेत रिक्षाचालक किरण हौसलमल (३३) हे जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सविस्तर वाचा…

11:08 (IST) 20 Jun 2023
मुख्यमंत्र्यांपेक्षा त्यांच्या मुलाचा दौरा कोल्हापूरकरांसाठी फायदेशीर

कोण अधिक कार्यक्षम मुख्यमंत्री कि मुख्यमंत्री पुत्र? असा प्रश्न कोल्हापूरकरांना विचारला तर त्यांची पसंती ‘पुत्र’ अशी निश्चितच असेल. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचे आगमन कोल्हापूरकरांच्या पथ्यावर पडले आहे. सलग दोन दौऱ्यामध्ये खासदार शिंदे यांनी कोल्हापूरची रखडलेली दोन महत्त्वाची कामे अत्यंत झपाट्याने मार्गी लावली.

सविस्तर वाचा

11:06 (IST) 20 Jun 2023
पिंपरी : राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाच्या मुलासह चौघांवर गुन्हा

दुसर्‍याच्या जागेत जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण करून पत्र्याचे कंपाऊंड पाडल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाच्या मुलासह चार जणांवर रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार  रावेत येथे घडला.

सविस्तर वाचा

11:06 (IST) 20 Jun 2023
नागपूर: ज्येष्ठ साहित्यिक, भाषा व लिपी तज्ज्ञ दिवाकर मोहनी यांचे निधन

नागपूर: ज्येष्ठ भाषा व लिपी तज्ज्ञ, साहित्यिक दिवाकर मोहनी यांचे सोमवारी रात्री निधन झाले ते ९२ वर्षाचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. सोमवारी रात्री त्यांचे धरमपेठ खरे टाऊन येथील निवासस्थानी निधन झाले. त्यांनी देहदानाचा संकल्प केला होता . त्यांच्या पश्चात पत्नी लेखिका सुनंदा. मुलगी अनुराधा मुलगा भरत व मोठा आप्त परिवार आहे.

वाचा सविस्तर…

11:05 (IST) 20 Jun 2023
येरवडा कारागृहात कैद्यांच्या दोन गटात हाणामारी; १६ कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल

कारागृह अधिकारी हेमंत इंगोले यांनी या संदर्भात येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सयेरवडा कारागृहातील सर्कल क्रमांक तीन आणि बराक क्रमांक आठमध्ये कैद्यांमध्ये झालेल्या वादातून हाणामारी झाली. हाणामारीत दगड, तसेच पत्र्याच्या तुकड्यांचा वापर करण्यात आला. कारागृहातील बराकीत वर्चस्वाच्या वादातून हाणामारीची घटना घडल्याचा संशय आहे.

सविस्तर वाचा

11:04 (IST) 20 Jun 2023
जमाखर्च : दादा भुसे; ना खात्याचा प्रभाव, मतदारसंघातच व्यस्त

उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये दादा भुसे यांच्याकडे कृषी सारख्या महत्वाच्या खात्याची धुरा होती. शिवसेनेतील बंडात त्यांनी एकनाथ शिंदे यांची साथ केली. या सत्तांतरानंतर भुसे यांची पुन्हा मंत्रिपदी वर्णी लागली खरी, मात्र बंदरे व खनिकर्म या तुलनेने कमी महत्वाच्या खात्याच्या मंत्रिपदावर त्यांची बोळवण केली गेली.

सविस्तर वाचा

11:04 (IST) 20 Jun 2023
Maharashtra Breaking News Live: काही बेडकं डराव डराव करतायत – चित्रा वाघ

कलानगरातील काही बेडकं डराव डराव करू लागलेत… असू द्या पावसाळा आलाय.. डबक्यात उडी मारायची त्यांची वेळ झालीय…! – चित्रा वाघ

11:04 (IST) 20 Jun 2023
राज्यातील ओबीसी विद्यार्थी आमदारांच्या पायरीवर ठिय्या देणार; सुरुवात उपमुख्यमंत्र्यांच्या सचिवापासून…

वर्धा: नागपुरात संविधान चौकात आंदोलन केले त्यावेळी उन्हामुळे कार्यकर्त्यांची प्रकृती बिघडेल म्हणून समता परिषदेचे नेते छगन भुजबळ यांनी उपोषण सोडायला लावले.

सविस्तर वाचा…

11:03 (IST) 20 Jun 2023
पुणे : परदेशी पाहुण्यांनी जाणून घेतला इतिहास

पारंपरिक ढोल ताशाच्या गजरात पाहुण्यांचे स्वागत करून शनिवारवाड्यापासून या वारसा स्थळ भेटीची सुरूवात झाली. शनिवारवाड्याची भव्यता, प्रवेशद्वार, विस्तारलेला परिसर प्रतिनिधींनी आपल्या मोबाईलमध्ये टिपला.

सविस्तर वाचा

11:00 (IST) 20 Jun 2023
Maharashtra Breaking News Live: आशिष शेलार यांचं खोचक ट्वीट!

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबत जाब विचारला की उबाठाला एवढी का मिरची झोंबते? मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करता? किती स्टंप आणि बॅट तुमच्याकडे आहेत? मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभारच मानायला हवेत, त्यांनी चौकशी लावून तुमचे “कटकमिशनचे उद्योग मुंबईकरांसमोर उघडे पाडायचे ठरवलेय! तेव्हा तर दीड कोटी मुंबईकरसुद्धा तुम्हाला हिशेब विचारणार आहेत, तेवढे स्टंप आणि बॅट आहेत का तुमच्याकडे? आम्ही तर रोज विचारणार.. कोविड मध्ये “कफना”त पण “कट कमिशन कोणी खाल्ले? औषधांवरची मलाई कुणी खाल्ली? रस्त्यावरचे डांबर, नाल्यातील गाळ, शाळेतील मुलांच्या वस्तू यामध्ये कोट्यवधी कुणी लाटले? या स्टंप घेऊन आम्ही पण तयार आहोत!! – आशिष शेलार

10:58 (IST) 20 Jun 2023
चंद्रपूर: पाणीपुरवठा योजनेच्या प्रस्तावित खासगीकरणाला विरोध

चंद्रपूर: गुरुकृपा व उज्वलचा प्रयोग फसल्यानंतर आणि अमृत पाणीपुरवठा योजना शहरातील ४० टक्के भागात पोहोचलेली नसतानाच महापालिका प्रशासक तथा आयुक्त व माजी पदाधिकाऱ्यांनी पाणीपुरवठ्याचे खासगीकरण करण्याचा घाट घातलेला आहे.

वाचा सविस्तर…

10:56 (IST) 20 Jun 2023
‘मावळ’ लोकसभा मतदारसंघात रायगडचा उमेदवार? भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसकडून हालचाली सुरू

मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निर्मितीपासून रायगड जिल्ह्याला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नाही. सलग १५ वर्षे मावळचे प्रतिनिधित्व पिंपरी-चिंचवडकडे आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांकडून रायगडमधील उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

सविस्तर वाचा

10:49 (IST) 20 Jun 2023
येत्या दोन-तीन दिवसात मान्सून पुढे सरकणार

नागपूर: मान्सून येत्या दोन-तीन दिवसात पश्चिम बंगाल, बिहार आणि दक्षिण द्वीपकल्पातील काही भागात सरकण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

सविस्तर वाचा…

महाराष्ट् न्यूज