शिवसेनेचे नेते राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. राजन साळवी हे उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जात होते. मात्र एकनाथ शिंदे हे मला गुरुस्थानी आहेत असं आता त्यांनी म्हटलंं आहे. शिवसेनेच्या सगळ्या पदांचा त्यांनी राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा झटका मानला जातो आहे. राजन साळवी यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या शिंदे गटातील पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब झालं आहे. राजन साळवी आज दुपारी ३ वाजता एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करतील. दरम्यान एकनाथ शिंदे यांचा महादजी शिंदे पुरस्काराने दिल्लीत गौरव करण्यात आला. हा सत्कार शरद पवार यांच्या हस्ते पार पडला. ज्यानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात वादाच्या ठिणग्या उडाल्याचं दिसून आलं. त्याचे पडसाद शमेपर्यंतच राजन साळवी उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याची माहिती समोर आली. तसंच सुरेश धस हे आज पुन्हा एकदा अजित पवारांची भेट घेणार आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन महापुरुषांचा अपमान रोखण्यासाठी कठोर कायदे करण्याची मागणी केली आहे. या आणि अशा सगळ्या घडामोडींवर आपली नजर लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Live Updates

Maharashtra News Live Update Today, 13 February 2025 : राजन साळवींनी सोडली उद्धव ठाकरेंची साथ, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत करणार शिवसेनेत प्रवेश 

12:31 (IST) 13 Feb 2025

नागपूरकरांना आता निःशुल्क हेल्मेट मिळणार! कारण…

नागपूर : चौकात वाहतूक पोलीस कर्मचारी उभे असल्यानंतर वाहनचालक वाहतुकीचे नियम तोडण्याची हिंमत करीत नव्हते. मात्र, आता वाहतूक पोलिसांचा वचक संपला असून कारवाईची पर्वा न करता बिनधास्त नियमांचे उल्लंघन करीत आहेत. नागपूरकर वाहतूक नियमांविषयी बेफिकीर असून गेल्या वर्षभरात शहरातील तब्बल ८ लाख ९२ हजार दुचाकीचालकांवर हेल्मेटची कारवाई करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा…

12:29 (IST) 13 Feb 2025

बांधकामांसाठी प्रक्रियायुक्त पाणीवापर बंधनकारक, नवी मुंबई महापालिका आयुक्तांचा निर्णय

नवी मुंबई</strong> : स्वत:च्या मालकीचे धरण असूनही काही भागात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईमुळे सतर्क बनलेल्या नवी मुंबई महापालिकेने येत्या उन्हाळ्यातील पाण्याच्या नियोजनासाठी आतापासूनच कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. शहरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या बांधकामांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करु नये, असे स्पष्ट आदेश महापालिका आयुक्त डाॅ. कैलास शिंदे यांनी काढले आहेत.

सविस्तर वाचा…

12:02 (IST) 13 Feb 2025

प्रसिध्द हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायक पंडित प्रभाकर कारेकर यांचे निधन; अंत्यसंस्कार शिवाजी पार्क स्मशानभूमीत सायंकाळी ५ वाजता

मुंबई : प्रसिध्द हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायक पंडित प्रभाकर जनार्दन कारेकर यांचे बुधवारी रात्री त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. त्यांचा मृतदेह अंत्यदर्शनासाठी गुरुवारी सकाळी त्यांच्या शिवाजी पार्क येथील घरी ठेवण्यात येणार आहे. दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत सायंकाळी ५ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सविस्तर वाचा

11:57 (IST) 13 Feb 2025

पटोलेंचा राजीनामा मंजूर, बुलढाण्याचे हर्षवर्धन सपकाळ नवे प्रदेशाध्यक्ष ?

नागपूर : विधानसभा निवडणुकीत दणदणीत पराभव झाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेला राजीनामा प्रदीर्घ काळानंतर स्वीकारण्यात आला असून त्यांच्या जागी विदर्भातील बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली आज आहे. असे झाल्यास आतापर्यंत पूर्व विदर्भाकडे असलेले प्रदेशाध्यक्षपद पश्चिम विदर्भाकडे जाईल. हर्षवर्धन सपकाळ हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात.

सविस्तर वाचा…

11:43 (IST) 13 Feb 2025

लाचखोरीत पोलीस अव्वल; २०२४ मध्ये ठाण्यासह कोकणातील २१ पोलीस लाचखोरीच्या सापळ्यात

ठाणे : लाच घेणे आणि देणे दोन्ही गुन्हे असतानाही ठाणे, पालघर आणि तळ कोकणामध्ये लाचेचा विळखा शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये घट्ट पकडला आहे. त्यातही लाच घेण्यामध्ये पोलीस अव्वल ठरल्याचे कारवाईतून आढळून आले आहे. कारवाई टाळण्यासाठी, जामीन मिळवून देणे, अटक करु नये अशा विविध कारणांसाठी पोलिसांनी लाच मागितल्याचे समोर आले आहे.

सविस्तर वाचा…

11:36 (IST) 13 Feb 2025

वनमंत्री गणेश नाईक यांनी कल्याण-डोंबिवलीत जनता दरबार घ्यावा; ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांची मागणी

कल्याण कल्याण, डोंबिवली शहरातील नागरिकांच्या नागरी समस्या, विकासाचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी कल्याण, डोंबिवली शहरांमध्ये महिन्यातून एकदा जनता दरबार घ्यावेत, अशी मागणी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डोंबिवलीतील जिल्हाप्रमुख दीपेश पुंडलिक म्हात्रे यांनी केली आहे.

सविस्तर वाचा

11:35 (IST) 13 Feb 2025

सलग तिसऱ्या दिवशी मुंबईतील तापमानातील घट कायम

मुंबई :  कमाल तापमान ३२ अंशापार असताना मुंबईतील किमान तापमानात मात्र सलग तिसऱ्या दिवशी घट झाली आहे. हवामान विभागाच्या कुलाबा आणि सांताक्रूझ या दोन्ही केंद्रावर गुरुवारी किमान तापमान २० अंशाखाली नोंदले गेले.

सविस्तर वाचा

11:34 (IST) 13 Feb 2025
झोपु प्राधिकरणाकडून झोपडपट्टीधारकांच्या कागदपत्रांचे जतन; आतापर्यंत दोन कोटी कागदपत्रांचे जतन पूर्ण

मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून झोपडीधारकांच्या कागदपत्रांसह झोपु योजनांशी संबंधित सर्व कागदपत्रांचे डिजिटल स्वरुपात जतन करण्यात येत आहे. वर्गीकरण करून कागदपत्रांचे स्कॅनिंग करण्यात येत असून झोपु प्राधिकरणाने आतापर्यंत दोन कोटी कागदपत्रांचे जतन केले आहे.

सविस्तर वाचा

11:30 (IST) 13 Feb 2025

नभांगणी शुक्राचे विलोभनीय दर्शन; उद्यापासून प्रचंड तेजस्विता…

अकोला : सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह म्हणून शुक्राची ओळख आहे. सध्या पश्चिम आकाशात अधिराज्य गाजवणारा शुक्र ग्रह कधी तारा म्हणून ओळखल्या जात होता. सद्यस्थितीत पृथ्वीच्या जवळ आल्याने त्याची तेजस्विता अधिकाधिक वाढलेली आहे. १४ ते १८ फेब्रुवारीदरम्यान सर्वाधिक तेजस्विता असल्याने शुक्र ग्रह पश्चिम आकाशात अधिक प्रकाशमान दिसणार आहे

सविस्तर वाचा…

11:29 (IST) 13 Feb 2025

खाद्य निर्मिती कारखान्याला आग, कोट्यावधींचा माल भस्म

सांगली : पुणे-बंगळूर महामार्गावरील नेर्ले (ता. वाळवा) येथील खाद्य पदार्थ निर्मिती कारखान्याला गुरुवारी आग लागली. आगीत तयार खाद्य पदार्थाचे गोदाम बेचिराख झाले असून कोट्यावधींचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

आज सकाळी विजेचे शार्ट सर्किट होऊन आग लागल्याचा संशय आहे. आगीने अल्प वेळात रौद्र स्वरुप घेतले. धुराचे लोट व आगीच्या ज्वाला वीस फुटाहून उंच होत्या. याठिकाणी विविध प्रकारचे खाद्य पदार्थ तयार करुन निर्यात केले जातात. तयार माल ठेवण्यात आलेले गोदाम आगीत भस्मसात झाले. इस्लामपूर नगरपालिका, राजारामबापू कारखाना यांच्या अग्निशमन बंबानी आग विझवण्यास शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर तीन तासांनी आगीवर नियंत्रण मिळाले.

11:16 (IST) 13 Feb 2025

व्हॅलीशिल्प’ सोसायटीचे नऊ कोटी रुपये सिडकोकडून थकित, गृहनिर्माणातील क्लबहाऊसची अवस्था ओसाड

नवी मुंबई : खारघर उपनगरामधील सेक्टर ३६ येथील सिडकोच्या महत्त्वाकांक्षी ‘व्हॅलीशिल्प’ या उच्च उत्पन्न गटाच्या गृहनिर्माण सोसायटीतील विक्रीविना शिल्लक १४२ सदनिकांचे देखभाल-दुरुस्ती शुल्क सिडकोने थकविले आहे.

सविस्तर वाचा…

11:15 (IST) 13 Feb 2025

“गृहमंत्री अमित शहा यांना किरीट सोमय्या निष्क्रिय ठरवताहेत,” माजी मंत्र्यांची टीका; म्हणाले…

अमरावतीत : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केवळ चमकोगिरीसाठी मुंबईहून अमरावतीत येऊन बेताल वक्तव्ये करू नयेत आणि अमरावतीत जिल्ह्याचे नाव निष्कारण बदनाम करू नये, आपल्या देशात बांगलादेशी सहजरित्या प्रवेश करू शकतात, या त्यांच्या दाव्यातून ते देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना निष्क्रिय ठरवित आहेत, अशी टीका काँग्रेसचे नेते माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी केली आहे.

सविस्तर वाचा…

10:51 (IST) 13 Feb 2025

शहरातील नमो द ग्रँड सेंट्रल पार्क नागरिकांचे आकर्षणाचे केंद्र, वर्षभरात १३ लाख ७० हजार भेटी आणि कोटींचे उत्पन्न

ठाणे : शहरातील कोलशेत येथे उभारण्यात आलेले नमो ग्रँड सेंट्रल पार्क हे ठाणेकरांसह मुंबई महानगरातील नागरिकांचे आकर्षणाचे केंद्र बनले आहे. या पार्कमध्ये लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंतसाठीच्या अनेक सोयीसुविधा असल्याने वर्षभरात या पार्कला १३ लाख ७० हजार नागरिकांनी भेट दिली आहे.

सविस्तर वाचा…

10:50 (IST) 13 Feb 2025

विकास आराखड्यावरील सुनावणीचा महत्त्वाचा टप्पा आजपासून; पालिकेक़डे प्राप्त झाल्या साडे सात हजाराहून अधिक तक्रार

ठाणे : विधानसभा निवडणुक आचारसंहितेच्या दोन दिवस आधी ठाणे पालिका प्रशासनाने प्रसिद्ध केलेला शहराचा सुधारीत प्रारुप विकास योजनेचा आराखड्याबाबत साडेसात हजारहून अधिक तक्रारी पालिकेकडे प्राप्त झाल्या आहेत. आरक्षण फेरबदल, रस्ते आरक्षण तसेच इतर आरक्षणांसंबंधीच्या तक्रारींचा समावेश असून या तक्रारींवर गुरुवार, आजपासून सुरूवात होणार आहे.

सविस्तर वाचा…

10:29 (IST) 13 Feb 2025

दहिसर करोना केंद्र घोटाळा प्रकरण: डॉ. किशोर बिसुरे यांनाउच्च न्यायालयाकडून जामीन

करोना केंद्र घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी अटकेत असलेले दहिसर करोना केंद्राचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. किशोर बिसुरे यांना उच्च न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला. सक्तवसूली संचालनालयाने (ईडी) बिसुरे यांना २०२३ मध्ये अटक केली होती.

सविस्तर वाचा…

10:28 (IST) 13 Feb 2025

लोकजागर : आदिवासींचे मारेकरी कोण?

पराभव कोणत्याही क्षेत्रात पदरी पडलेला असो, तो जिव्हारी लागतोच. अनेकांच्या आयुष्यात हे दु:ख दीर्घकाळ राहते. यातून काहीजण पार खचून जातात तर काही पुन्हा जिद्दीने उभे ठाकतात. राजकीय क्षेत्रात तर पराभव विसरून पुन्हा जोमाने कामाला लागणे केव्हाही उत्तम.

सविस्तर वाचा…

10:27 (IST) 13 Feb 2025

जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणाच्या कटू स्मृती कायम; विविध संस्थांकडून आज आदरांजली कार्यक्रम

जर्मन बेकरीत झालेल्या बाँम्बस्फोटाच्या कटू स्मृती आजही कायम आहेत. १३ फेब्रुवारी २०१० रोजी झालेल्या स्फोटात १७ जणांचा मृत्यू झाला होता, तसेच ५६ जण जखमी झाले होते. या स्फोटामुळे पुण्यात नव्हे, तर देशभरात खळबळ उडाली होती. सविस्तर वाचा…

10:26 (IST) 13 Feb 2025

अभिनेते सोलापूरकर यांची चित्रफीत तपासली, गुन्ह्याचा प्रकार दिसत नाही; पोलीस आयुक्तांचे स्पष्टीकरण

अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या दोन चित्रफितींची तपासणी पोलिसांनी केली आहे. सोलापूरकरांच्या चित्रफितीत गुन्ह्याचा उद्देश प्रथमदर्शनी दिसत नसल्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. सविस्तर वाचा…

10:26 (IST) 13 Feb 2025

बँकॉकला ‘बिझनेस ट्रिप’साठी! कथित अपहरण प्रकरणात माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचा जबाब

‘बँकॉकला व्यावसायिक कामानिमित्त (बिझनेस ट्रिप) चाललो होतो,’ असा जबाब खासगी विमानाने मित्रांबरोबर बँकॉकला निघालेल्या माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या पुत्राने, ऋषिराज यांनी पोलीस चौकशीत दिला आहे. सविस्तर वाचा…

10:25 (IST) 13 Feb 2025

कर्णाचे उदात्तीकरण कशासाठी ? सारस्वतांनी सत्यदर्शन घडवायला हवे – शंकर अभ्यंकर

‘सारस्वतांनी समाजाला कोणत्याही कल्पनेशिवाय निव्वळ सत्यदर्शन घडवले पाहिजे. मात्र, कथा-कादंबऱ्यांमधून असे होताना दिसत नाही. कादंबरीकारांनी काही लिहले की नवीन पीढी ते लगेच आत्मसात करते. सविस्तर वाचा…

10:24 (IST) 13 Feb 2025

पुण्यातील बावधन मधील शाळेत बॉम्ब ठेवल्याचा मेल; बीडीडीएस पथक घटनास्थळी

पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या बावधन मध्ये खासगी शाळेत बॉम्ब ठेवल्याचा मेल पोलीस आयुक्तालयात प्राप्त झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी बीडीडीएस पथक आणि पोलीस दाखल झाले आहेत. सविस्तर वाचा…

10:23 (IST) 13 Feb 2025

राडारोडा प्रक्रिया प्रकल्पांची क्षमता वाढणार, मुंबई महानगरपालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू

मुंबई : महापालिकेने राडारोड्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी दहिसर आणि शीळ फाटा येथे प्रकल्प सुरू केले आहेत. मात्र, मुंबईत प्रतिदिन निर्माण होणाऱ्या सुमारे ८ हजार मेट्रिक टन राडारोड्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता या प्रकल्पांमध्ये नाही. त्यामुळे या प्रकल्पांची प्रक्रिया करण्याची क्षमता वाढविण्याचा विचार महापालिका प्रशासन पातळीवर सुरू आहे.

सविस्तर वाचा…

10:23 (IST) 13 Feb 2025

बेदाणा सौद्यामध्ये चालू हंगामातील उच्चांकी ३७१ रुपये प्रति किलो भाव

सांगली बाजार समिती आवारात बुधवारी झालेल्या बेदाणा सौद्यामध्ये चालू हंगामातील उच्चांकी ३७१ रुपये प्रति किलो भाव मिळाला. हा हिरवा बेदाणा विजयकुमार आमगोंडा पाटील यांच्या दुकानात भाग्यश्री एंटरप्राइजेस यांनी खरेदी केला. सविस्तर वाचा…

10:22 (IST) 13 Feb 2025

सोलापुरात टेक्स्टाईल पार्कसाठी प्रस्ताव पाठवा; पालक सचिव संजय सेठींची जिल्हा प्रशासनास सूचना

सोलापुरी चादर आणि टॉवेल उत्पादनासाठी सोलापूरचा वस्त्रोद्योग लौकिक प्राप्त असला, तरी येथील सोलापुरी चादर उत्पादनातील बनावटगिरी वाढली आहे. त्यामुळे मूळ अस्सल सोलापुरी चादरीचे उत्पादन कमालीचे घटले आहे. सविस्तर वाचा…

10:22 (IST) 13 Feb 2025

उडत्या विमानाचा मार्ग बदलणे अत्यंत जोखमीचे… वाहतूक तज्ञांचे काय मत ?

पुणे : ऐन प्रवासातून खासगी विमान परत आणणे आपत्कालीन स्थिती सोडून इतर वेळी सहज शक्य नाही, असे हवाई वाहतूक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज प्रवास करत असलेले विमान हवेत असताना वळवून परत आणण्यासाठी पोलिस प्रशासन, हवाई दल, नागरी विमान वाहतूक संचालनालय (डीजीसीए), संरक्षण विभाग यांच्या परवानग्या अवघ्या काही मिनिटांत मिळाल्याने त्याकरता मोठी ‘शक्ती’ पणाला लागल्याची चर्चा आहे.

सविस्तर वाचा…

10:21 (IST) 13 Feb 2025

सोलापूरचे ८०० ज्येष्ठ नागरिक जगन्नाथ पुरीला विशेष रेल्वेने रवाना; मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना

शासनाच्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील ८०० ज्येष्ठ नागरिक ओडिसा येथील जगन्नाथ पुरी मंदिराच्या दर्शनासाठी बुधवारी सकाळी एका विशेष रेल्वेने रवाना झाले. सविस्तर वाचा…

10:21 (IST) 13 Feb 2025

शिवाजीनगर एसटी बस स्थानकाच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा, प्रवाशांना किती वर्ष वाट पहावी लागणार?

पुणे : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) आणि महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (महामेट्रो) यांच्यातील वादामुळे रखडलेला शिवाजीनगर येथील जुन्या एसटी बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचा प्रकल्प आता मार्गी लागणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत दोन्ही विभागांमध्ये समेट घडवून आणण्यात आला असून, या प्रकल्पासाठी ‘एमएसआरटीसी’ आणि महामेट्रो यांच्यात येत्या आठवडाभरात करार करण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा…

10:21 (IST) 13 Feb 2025

महापुरुषांचा अवमान रोखण्यासाठी कडक कायदा करा : उदयनराजे

महापुरुषांबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये, चित्रपट बनवताना होणाऱ्या चुकांबाबत केंद्र सरकारने कडक कायदा करावा अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेत केली आहे. सविस्तर वाचा…

10:20 (IST) 13 Feb 2025

नोकरीचे आमिष दाखवून संस्थाचालकाचा अत्याचार; खंडणीप्रकरणी पीडित महिलेवरही गुन्हा

निराधार, उपेक्षित मुलींसाठी आश्रमशाळा चालविणाऱ्या संस्थेत अधीक्षकपदाची नोकरी देण्याचे आमिष दाखवून मुंबईतील एका मागासवर्गीय उच्चविद्याविभूषित महिलेवर लैंगिक अत्याचार केला आणि तिच्याशी जातीवाचक शब्द वापरून अवमान केल्याप्रकरणी संस्थाचालकासह तेथील दोन महिलांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वाचा…

10:20 (IST) 13 Feb 2025

‘बीकेसी-वरळी टप्पा २ अ’ मार्चअखेर सेवेत

मुंबई : ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ भुयारी मेट्रो ३’ मार्गिकेवरील बीकेसी- कुलाबा टप्पा मार्गिकेचे ९३.१ टक्के काम पूर्ण झाले आहे. या टप्प्यातील बीकेसी-आचार्य अत्रे चौक, वरळी टप्पा २ अ’ मार्चअखेरपर्यंत सेवेत दाखल करण्याचे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे (एमएमआरसी) नियोजन आहे. त्यानुसार ‘टप्पा २ अ’च्या कामालाही वेग देण्यात आला आहे. यातील स्थानकांचे ९८.९ टक्के काम पूर्ण झाले आहे.

सविस्तर वाचा…

(फोटो-राजन साळवी यांचं फेसबुक पेज)

 

शिवसेनेचे नेते राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. राजन साळवी हे उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जात होते. मात्र एकनाथ शिंदे हे मला गुरुस्थानी आहेत असं आता त्यांनी म्हटलंं आहे. शिवसेनेच्या सगळ्या पदांचा त्यांनी राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा झटका मानला जातो आहे. राजन साळवी यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या शिंदे गटातील पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब झालं आहे. राजन साळवी आज दुपारी ३ वाजता एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करतील