शिवसेनेचे नेते राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. राजन साळवी हे उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जात होते. मात्र एकनाथ शिंदे हे मला गुरुस्थानी आहेत असं आता त्यांनी म्हटलंं आहे. शिवसेनेच्या सगळ्या पदांचा त्यांनी राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा झटका मानला जातो आहे. राजन साळवी यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या शिंदे गटातील पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब झालं आहे. राजन साळवी आज दुपारी ३ वाजता एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करतील. दरम्यान एकनाथ शिंदे यांचा महादजी शिंदे पुरस्काराने दिल्लीत गौरव करण्यात आला. हा सत्कार शरद पवार यांच्या हस्ते पार पडला. ज्यानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात वादाच्या ठिणग्या उडाल्याचं दिसून आलं. त्याचे पडसाद शमेपर्यंतच राजन साळवी उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याची माहिती समोर आली. तसंच सुरेश धस हे आज पुन्हा एकदा अजित पवारांची भेट घेणार आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन महापुरुषांचा अपमान रोखण्यासाठी कठोर कायदे करण्याची मागणी केली आहे. या आणि अशा सगळ्या घडामोडींवर आपली नजर लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Live Updates

Maharashtra News Live Update Today, 13 February 2025 : राजन साळवींनी सोडली उद्धव ठाकरेंची साथ, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत करणार शिवसेनेत प्रवेश 

10:19 (IST) 13 Feb 2025

रामराजेंनी घेतली अजित पवार यांची भेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंगळवारी भेट घेतली. या वेळी दोघांमध्ये दीर्घ चर्चा झाली. सविस्तर वाचा…

10:19 (IST) 13 Feb 2025

वीजपुरवठा खंडित केल्याने थकबाकीदाराकडून लोखंडी पाइपने मारहाण; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : वीजबिलाच्या थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केल्यानंतर परस्पर वीजपुरवठा घेणाऱ्या थकबाकीदाराने महावितरणच्या जनमित्रास लोखंडी पाइपने मारहाण केली. हवेली तालुक्यातील तुपेवस्ती येथे सोमवारी (दि. १०) ही घटना घडली. या घटनेत जखमी झालेल्या जनमित्राला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर एका आरोपीविरुद्ध ऊरूळी कांचन पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता अधिनियमाच्या कलम १३२, १२१ (१), ११८ (१), ३५१ (१), ३५१ (३) व ३५२ नुसार फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सविस्तर वाचा…

10:17 (IST) 13 Feb 2025

बाजीराव रस्त्यावरील दुकानातून १४ लाखांची रोकड चोरीला मध्यभागात चाेरट्यांचा सुळसुळाट

पुणे : बाजीराव रस्त्यावरील एका मोटार सजावट साहित्याची विक्री करणाऱ्या दुकानाचा दरवाजा उचकटून चोरट्यानी १३ लाख ८० हजारांची रोकड चोरुन नेले. रविवार पेठेतील कापडगंज परिसरातील एका वस्त्रदालनातून चोरट्यांनी एक लाख ६८ हजारांची रोकड आणि लॅपटाॅप चोरुन नेला.

सविस्तर वाचा…

(फोटो-राजन साळवी यांचं फेसबुक पेज)

 

शिवसेनेचे नेते राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. राजन साळवी हे उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जात होते. मात्र एकनाथ शिंदे हे मला गुरुस्थानी आहेत असं आता त्यांनी म्हटलंं आहे. शिवसेनेच्या सगळ्या पदांचा त्यांनी राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा झटका मानला जातो आहे. राजन साळवी यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या शिंदे गटातील पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब झालं आहे. राजन साळवी आज दुपारी ३ वाजता एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करतील