शिवसेनेचे नेते राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. राजन साळवी हे उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जात होते. मात्र एकनाथ शिंदे हे मला गुरुस्थानी आहेत असं आता त्यांनी म्हटलंं आहे. शिवसेनेच्या सगळ्या पदांचा त्यांनी राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा झटका मानला जातो आहे. राजन साळवी यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या शिंदे गटातील पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब झालं आहे. राजन साळवी आज दुपारी ३ वाजता एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करतील. दरम्यान एकनाथ शिंदे यांचा महादजी शिंदे पुरस्काराने दिल्लीत गौरव करण्यात आला. हा सत्कार शरद पवार यांच्या हस्ते पार पडला. ज्यानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात वादाच्या ठिणग्या उडाल्याचं दिसून आलं. त्याचे पडसाद शमेपर्यंतच राजन साळवी उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याची माहिती समोर आली. तसंच सुरेश धस हे आज पुन्हा एकदा अजित पवारांची भेट घेणार आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन महापुरुषांचा अपमान रोखण्यासाठी कठोर कायदे करण्याची मागणी केली आहे. या आणि अशा सगळ्या घडामोडींवर आपली नजर लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून असणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा