Maharashtra Breaking News Updates, 18 February 2025 : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी अद्यापही कृष्णा आंधळे हा सातवा आरोपी फरार आहे. त्याला अटक केली जात नसल्याने देशमुख कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे. तसंच, आमचा पोलिसांवर विश्वास राहिला नसून आम्हाला सुरक्षाही पुरवली नसल्याची तक्रार देशमुख कुटुंबीयांनी सुप्रिया सुळेंकडे केली आहे. सुप्रिया सुळेंनी आज देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली असून त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. तसंच, त्यांनी परभणी येथे जाऊन व्यापारी महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. तर दुसरीकडे आज राज्यमंत्रिमंडळाची बैठक झाली असून सहा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यासह राज्यातील इतर घडामोडी जाणून घेऊयात.
Maharashtra News Live Update Today, 18 February 2025 : राज्यातील ताज्या घडामोडी जाणून घ्या
अजित पवारांचा जितेंद्र आव्हाडांना धक्का, आव्हाडांचे यांचे दोन खंदे समर्थक अजित पवारांच्या राष्ट्रवादीत
ठाणे : राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे नेते व कळवा मुंब्रा मतदार संघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय अभिजित पवार आणि हेमंत वाणी यांच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.
“अल्पवयीन मुलीला वाईट स्पर्श…”, लैंगिक अत्याचार करणाऱ्या माजी लष्करी अधिकाऱ्याला उच्च न्यायालयाने फटकारले
एका माजी लष्करी अधिकाऱ्याराला ११ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. या माजी अधिकाऱ्याने तुरुंगवासाच्या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने माजी लष्करी अधिकाऱ्याची याचिका फेटाळून लावली आहे.
सुनावणीदरम्यान न्यायालयाने म्हटले की, पीडितेला आरोपीच्या वाईट स्पर्शाची चांगली जाणीव होती. या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायमूर्ती रेवती मोहित डेरे आणि नीला गोखले यांच्या खंडपीठाने सांगितले की, पीडितेने तिचे वडील खोलीतून बाहेर गेल्यानंतर आरोपी तिच्याशी कसा वागला याबद्दल न्यायालयाला सविस्तर सांगितले आहे.
धारावीतील २०२२ नंतरची अतिक्रमित, अपात्र बांधकामे पुनर्वसनातून बाद
मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत धारावीतील पोटमाळ्यावरील अपात्र रहिवाशांचेही पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यांना धारावीबाहेर भाडेतत्त्वावरील योजनेअंतर्गत घरे दिली जाणार आहेत. मात्र २०२२ नंतरच्या अतिक्रमित, अपात्र बांधकामांना पुनर्वसन योजनेचा कोणताही लाभ मिळणार नाही, असे धारावी पुनर्वसन प्रकल्पाकडून (डीआरपी) आता स्पष्ट करण्यात आले आहे.
संगमनेर: कामात सुधारणा करा नाहीतर बदल्या करून घ्या; महावितरणच्या कर्मचाऱ्यांना आमदार खताळ यांचा सज्जड इशारा
संगमनेर तालुक्यात महावितरणचा कारभार अतिशय ढिसाळपणे चालू आहे. महावितरणच्या अधिकारी, कर्मचारी यांनी वेळेत आपल्या कामात सुधारणा करा, नाहीतर बदल्या करून घ्या. माझ्या मतदारसंघात हलगर्जीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड इशारा महावितरण कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना आमदार अमोल खताळ यांनी दिला.
‘छावा’ चित्रपटाचे गोरेगाव चित्रनगरीतही चित्रीकरण; चौथ्या दिवसअखेर १४५.५३ कोटींची कमाई
‘छावा’ने प्रदर्शनानंतर ४ दिवसांत संपूर्ण भारतात एकूण १४५.५३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. विशेष बाब म्हणजे ‘छावा’ चित्रपटाचे देशातील विविध ठिकाणांसह मुंबईतील गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीतही चित्रीकरण झाले आहे.
धारावीत अनधिकृत बांधकाम केल्यास मिळणार नाही पुनर्विकास योजनेचा लाभ, होणार अपात्रतेची कारवाई
धारावीत सुरू असलेली सर्व अनधिकृत बांधकामे तात्काळ थांबवावी, अशा सूचना धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या (डीआरपी) अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. २०२३ साली झालेल्या ड्रोन सर्वेक्षणालाच आधारभूत मानून सध्याच्या भाडेकरूंची ओळख पटविली जाणार आहे. तसेच, याच सर्वेक्षणाद्वारे धारावी अंतर्गत परिसरातील (डीएनए) मोकळ्या जागेची नोंद केली जाणार आहे. या सर्वेक्षणानंतर केलेले कोणतेही नवीन बांधकाम किंवा बांधकामाचा विस्तार हे अनधिकृत मानले जाईल आणि त्यांना पुनर्विकासाच्या लाभांसाठी अपात्र ठरवले जाईल.
उमर्टीतून महाराष्ट्रासह मध्य प्रदेशात गावठी बंदुकांची तस्करी; पोलिसांचे अपयश पुन्हा सिध्द
जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात मध्य प्रदेश सीमेजवळ उमर्टीसारख्या लहान खेड्यात अगदी घराघरातून गावठी बंदुकांची निर्मिती केली जाते. याठिकाणाहून महाराष्ट्रासह मध्य प्रदेशात बंदुकांची सर्रास तस्करी होत आहे. सविस्तर वाचा…
धनंजय मुंडे आजारी असल्याने मी भेटायला गेलो होतो. माझे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांनी मला बोलावले होते. २१ दिवसांपूर्वी आम्ही भेटलो होतो. वीस ते तीस मिनिटे आम्ही होतो. संध्याकाळी साडेनऊ वाजता गुप्त भेट होत नसते. रात्री दीड दीड वाजता मंत्र्यांच्या चेंबरमध्ये भेटी होत असतात. प्रदेशाध्यक्षांनीही यावर खुलासा केला आहे. त्यांच्या तोंडून साडेचार तास हा शब्द कुठून आला, हे मी सांगू शकत नाही. माझ्याकडे संशयाने पाहण्यासारखं काहीच नाही. प्रदेशाध्यक्षांनी मला बोलावलं आणि त्यांना भेटून मी तीस मिनिटांच्या आत मी बाहेर पडलो - सुरेश धस, भाजपा, आमदार
डोंबिवली आयरेतील समर्थ कॉम्पलेक्स जमीनदोस्त करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश, बनावट कागदपत्रांच्या आधारे बेकायदा इमारतीची उभारणी
डोंबिवली पूर्व आयरे भागातील टावरीपाडा येथील समर्थ काॅम्पलेक्स ही सात माळ्याची बेकायदा इमारत तोडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. ६५ महारेरा प्रकरणातील ही इमारत आहे. सविस्तर वाचा…
जातीभेदाच्या भिंती तोडणारा महाकुंभ हिंदुत्वाचे प्रतीक; भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुनील देवधर यांचे प्रतिपादन
विश्वातून श्रध्दा, भावनेने कोट्यवधी भाविक प्रयागराज येथे महाकुंभासाठी दाखल झाले आहेत. जातीभेदाच्या भिंती महाकुंभच्या माध्यमातून मोडून पडल्या आहेत. त्यामुळे महाकुंभ हे हिंदुत्वाचे प्रतिक आहे, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुनील देवधर यांनी रविवारी येथे केले. सविस्तर वाचा…
करोनानंतर प्रथमच जिल्ह्यात पशुपक्षी प्रदर्शन; प्रदर्शनात पशुपालकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
करोनामुळे खंडित पडलेले जिल्हास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनाचे यंदा शुक्रवार, २१ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे. शेतकरी आणि पशुपालक यांना पशुपालन उद्योग, शेती व्यवसायाकरिता प्रोत्साहित करुन त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी हे प्रदर्शन भरविण्यात येते.
क्रिप्टो चलनात अडीच लाखांची फसवणूक; गुंतवणुकीतील अमिष भोवले, गुन्हा दाखल
डिजीटल अटकेसह ऑनलाईन फसवणुकीच्या असंख्य प्रकारांबाबत शासन जनजागृती करत असले तरी नागरिकांची फसवणूक मात्र थांबलेली नाही. बदलापुरातील एका महिलेला २ लाख ३८ हजार रूपयांना अशाच प्रकारे गंडा घालण्यात आला आहे. सविस्तर वाचा…
कल्याण डोंबिवली पालिकेला सर्वोत्कृष्ट; ई-गव्हर्नन्स प्रणालीचा सुवर्ण पुरस्कार
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील नागरिकांना अधिकाधिक नागरी सेवा ऑनलाईन (ई गव्हर्नन्स प्रणाली) माध्यमातून उपलब्ध करून देण्यात पालिका प्रशासनाने महत्वाची भूमिक बजावली आहे. सविस्तर वाचा…
त्र्यंबकेश्वर तालुक्यात पाण्यासाठी हंडा मोर्चा
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव ग्रामपंचायतपैकी गणेशनगर, बरड्याची वाडी, लोणवाडी, धाराची वाडी या ठिकाणी नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी येथील महिलांना कधी रात्री नदीवर पायपीट करत जावे लागते.
‘अविनाश – विश्वजीत’ जोडीकडून मिळणार सांगीतिक मेजवानी, संगीतबद्ध केलेले वैविध्यपूर्ण चित्रपट २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला
अविनाश-विश्वजीत या जोडीने संगीतबद्ध केलेले वैविध्यपूर्ण चित्रपट २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यासोबतच त्यांच्या सांगीतिक कार्यक्रमांची मेजवानी सुद्धा रसिकप्रेक्षकांना महाराष्ट्रातील विविध शहरांतून घेता येणार आहे.
पुणे : एटीएममध्ये ज्येष्ठांची फसवणूक करणारा चोरटा गजाआड, १४ लाखांचा मुद्देमाल जप्त; १६६ एटीएम कार्ड जप्त
आरोपी राजू कुलकर्णी सराइत असून, त्याने २१ ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक केल्याचे तपासात उघढकीस आले आहे.
'कौन बनेगा करोड़पती'मध्ये 'या' केंद्रीय मंत्र्यांची…
बुलढाणा : बातमीचे हेडिंग वाचून हजारो वाचक, ह्युवर्स चक्रावून जाने स्वाभाविक आहे.यात आश्चर्य होन्यासारखे काही नाही. पण हे खरे आहे. अर्थात केंद्रीय आरोग्य, आयुष आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रतापराव जाधव सुप्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या समोर 'हॉट सीट'वर बसले नव्हते,तर या लोकप्रिय मालिकेच्या एका भागात त्यांचा उल्लेख करण्यात आला.
ठाण्यात ९९२३ थकबाकीदारांना नोटीसा, महापालिकेची गेल्या वर्षभरातील कारवाईमुळे शंभर कोंटीची वसुली
ठाणे : ठाणे महापालिकेच्या पाणी देयके भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या थकबाकीदारांविरोधात पाणी पुरवठा विभागाकडून सातत्याने कारवाई करण्यात येत असून यामध्ये गेल्या वर्षभरात ९ हजार ६०३ नळ जोडण्या खंडित करण्याबरोबरच ४११ मोटर पंप जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
अवैध देह व्यापाराचा संशय, पोलिसांनी छापा टाकताच…
अकोला शहरातील एका भागामध्ये भाड्याच्या घरात बाहेर जिल्ह्यातील चार महिला गेल्या काही दिवसांपासून राहात आहेत.त्या ठिकाणी अवैध देह व्यापार चालवला जात असल्याच्या संशयावरून परिसरातील नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला.मात्र, भलतेच वास्तव समोर आले.
धक्कादायक! बनावट दस्तावेजांच्या आधारे जन्म दाखले…
अमरावती : बनावट कागदपत्रे जोडून जन्म दाखले मिळवण्याचे प्रकार आता अमरावती शहरातही उघडकीस आले असून नायब तहसीलदारांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी आज एका महिलेसह सहा जणांच्या विरोधात विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले आहेत.भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी राज्यात अवैधरीत्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी रोहिंग्या मुस्लिमांनी जन्म प्रमाणपत्रे मिळवल्याचा आरोप केला होता.
Maharashtra Live Update : राज्यात सहावा वित्त आयोग स्थापन करण्यास परवानगी; राज्यमंत्रिमंडळातील महत्त्वाचे निर्णय वाचा!
पिंपरीत दोन गटात तुफान हाणामारी; व्हिडिओ व्हायरल,पोलीस अज्ञातांचा शोध घेत आहेत
पिंपरी- चिंचवडमधील संत तुकाराम भागात दोन गटात हाणामारी झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोन गटात सिमेंट च्या मोठ्या गट्टीने मारहाण करण्यात आली. एक जण दुसऱ्याच्या अंगावर धावून जात कानशिलात लागवल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. त्यानंतर त्या तरुणाला इतरांनी मारहाण केली. दोन्ही गटात तुफान हाणामारी झाली. एकाने भला मोठा दगड सिमेंट चा गट्टू उचलून एकाच्या पाठीत घातला. तर दुसऱ्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला.
हा व्हिडीओ सजग नागरिकाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. हाणामारी चा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना जाग आली आहे. अद्याप या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल नाही. संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही गटातील तरुणांचा शोध सुरू केला आहे.
शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार ही हत्येच्या आडून राजकारण करणारी टोळी: ओबीसी नेते लक्ष्मण हाके
पुणे प्रतिनिधी : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन जवळपास दोन महिन्यांचा कालावधी लोटला. मात्र, या प्रकरणातील सातव्या आरोपीचा अद्यापपर्यंत शोध लागला नसून त्याचा शोध पोलिस घेत आहेत. तर या प्रकरणी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांकडून सातत्याने न्यायाची मागणी होत आहे.
आमदारांची सुरक्षा काढली: शिंदे गटाच्या मंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले " गह खात्याच्या समितीचा…"
नागपूर: आमदारांची सुरक्षा कमी केल्याने नाराजी नाही, सुरक्षा कोणाला द्यावी हा सर्वस्वी हा गृह विभागाचा निर्णय असतो, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे विदर्भातील नेते व नियोजन खात्याचे राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांनी नागपूर येथे माध्यमांशी बोलताना दिली.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मात्र जादा पाणी वापरले म्हणून महापालिकेला नोटीस देण्याचा आदेश दिला आहे.
गुजरात बसपोर्ट म्हणजे व्यापार आणि प्रवासी दळणवळणाचा सुंदर मेळ – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
गुजरातमधील अहमदाबाद व वडोदरा येथील बसपोर्टची सरनाईक याच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडाळाने पाहणी केली.
लाकूड, कोळशावरील भट्ट्या स्वच्छ इंधनावर चालविण्यासाठी ८ जुलैची मुदत
लाकूड व कोळसा याचा इंधन म्हणून उपयोग करणाऱ्या भट्ट्या (बेकरी), हॉटेल, उपाहारगृहे आणि उघड्यावर खाद्यापदार्थ विकणारे व्यवसायदेखील वायुप्रदूषणास कारणीभूत ठरतात.
मुंबई : परीक्षांचे गुण भरण्यास, शैक्षणिक श्रेयांक खात्यांचा तपशील सादर करण्यास विलंब, विद्यार्थ्यांचे निकाल राखीव राहिल्यास महाविद्यालयच जबाबदार
राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी झाली आहे. या अनुषंगाने शिक्षणक्षेत्रात विविध बदल पाहायला मिळत आहेत.
दीर्घकाळ तुरुंगवासाने आरोपी नैराश्याच्या गर्तेत, खून प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर करताना उच्च न्यायालयाचे निरीक्षण
खटल्याविना दीर्घकाळ तुरुंगवास भोगावा लागत असल्यास आरोपीला गंभीर मानसिक आजारांना सामोरे जावे लागते. त्याचबरोबर अशा प्रकरणांचे अनेक गंभीर सामाजिक परिणामही होतात.
पुणे : रस्त्यावर जैववैद्यकीय कचरा टाकणाऱ्याकडून दंड वसुली !
नागरिकांनी रस्त्यांवर कचरा टाकू नये तसेच आपले शहर स्वच्छ कसे राहील याकडे लक्ष द्यावे याकरिता महापालिकेच्या वतीने जनजागृती केली जाते.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२५ लाइव्ह
ॉMaharashtra News Live Update Today, 18 February 2025 : राज्यातील ताज्या घडामोडी जाणून घ्या