Maharashtra Breaking News Updates, 18 February 2025 : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी अद्यापही कृष्णा आंधळे हा सातवा आरोपी फरार आहे. त्याला अटक केली जात नसल्याने देशमुख कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे. तसंच, आमचा पोलिसांवर विश्वास राहिला नसून आम्हाला सुरक्षाही पुरवली नसल्याची तक्रार देशमुख कुटुंबीयांनी सुप्रिया सुळेंकडे केली आहे. सुप्रिया सुळेंनी आज देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली असून त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. तसंच, त्यांनी परभणी येथे जाऊन व्यापारी महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. तर दुसरीकडे आज राज्यमंत्रिमंडळाची बैठक झाली असून सहा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यासह राज्यातील इतर घडामोडी जाणून घेऊयात.

Live Updates

Maharashtra News Live Update Today, 18 February 2025 :  राज्यातील ताज्या घडामोडी जाणून घ्या

14:14 (IST) 18 Feb 2025

बारुद कंपन्यातील स्फोटात २६ जणांचा मृत्यू; गेल्या दीड वर्षात…

नागपूर : गेल्या दीड वर्षांत नागपूर परिसरात असलेल्या ४ कंपन्यांतील स्फोटात तब्बल २६ कामगारांचा मृत्यू झाला तर तर १९ कामगार गंभीर जखमी झाले. एवढ्या मोठ्या जिवीतहाणीनंतरही प्रशासनाला जाग आली नाही. अजुनही अनेक कंपन्यांमध्ये सुरक्षिततेची साधने कामगारांना देण्यात येत नाही. एखादी अनुचित घटना झाल्यावरच प्रशासनाला जाग येते, असा आरोप होत आहे.

सविस्तर वाचा

14:14 (IST) 18 Feb 2025

गोवा बांबुळी येथे रुग्णाला घेऊन जाणारी रूग्णवाहिका गोवा कोलवाळ येथे अग्नि प्रलयात भस्मसात! रूग्ण, डॉक्टर,चालक बालंबाल बचावले

सावंतवाडी येथून गोवा बांबोळी येथे रुग्ण घेऊन जाणाऱ्या १०८ रुग्णवाहीका सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास कोलवाळ गोवा येथे रस्त्यावर अग्नि प्रलयात जळून खाक झाली. सुदैवाने रुग्णवाहीकेवर असणाऱ्या डॉक्टर व चालकाच्या प्रसंगावधनामुळे मोठा अनर्थ टळला. यामध्ये असलेल्या रूग्णासह डॉक्टर व चालक बालंबाल बचावले.

सविस्तर वाचा

14:08 (IST) 18 Feb 2025

पुणे : विद्यापीठाच्या ‘पोस्ट डॉक फेलोशिप’ची रखडपट्टी.. झाले काय?

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे देण्यात येणाऱ्या ‘पोस्ट डॉक फेलोशिप’ची रखडपट्टी झाली आहे. सप्टेंबरमध्ये अर्ज प्रक्रिया सुरू केल्यानंतर फेब्रुवारीमध्येही फेलोशिपधारकांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत.

वाचा सविस्तर…

13:58 (IST) 18 Feb 2025

‘भाजप केंद्रित’ अंदाजपत्रकाला महाविकास आघाडीचा विरोध, न्यायालयात दाद मागण्याचा इशारा

पुणे : महापालिकेच्या आगामी आर्थिक वर्षासाठीच्या अंदाजपत्रकामध्ये भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांचा हस्तेक्षपाचे तीव्र पडसाद विरोधकांमध्ये उमटण्यास सुरुवात झाली आहे. या ‘भाजप केंद्रित’ अंदाजपत्रकाला महाविकास आघाडीने विरोध दर्शविला असून, याविरोधात न्यायालयात जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

वाचा सविस्तर…

13:53 (IST) 18 Feb 2025

१४ ऑक्टोंबरची सुट्टी पूर्ववत करा, आंबेडकरी अनुयायांची मागणी

नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनाची १४ ऑक्टोबरची सुट्टी रद्द करण्यात आली. त्यामुळे आंबेडकरी अनुयायांच्या भावना दुखावल्या आहेत. ही सुट्टी पूर्ववत करण्याची मागणी विविध संघटनांकडून केली जात आहे. विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे यांनी १० फेब्रुवारी रोजी काढलेल्या आदेशानुसार १४ ऑक्टोबरची सुट्टी रद्द करण्यात आली.

सविस्तर वाचा

13:50 (IST) 18 Feb 2025

रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी: हमाल देणार मोफत सेवा

नागपूर: प्रयागराज येथील महाकुंभ मेळात आणि नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत अनेकांनी प्राण गमावल्यानंतर मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने नागपूर, बल्लारशाह, चंद्रपूर, सेवाग्राम, बैतूल आणि पांढुर्णा यासारख्या प्रमुख स्थानकांवर हेल्पाईन सुरू केली आहे.

सविस्तर वाचा

13:47 (IST) 18 Feb 2025

नदी नक्की जिवंत ठेवायची आहे ना?

अलीकडे पुण्यात पावसाळ्यात पूर आल्यावरच प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना नदीची आठवण येते. ती वर्षभर वाहती राहण्यासाठी, कचरा, राडारोडामुक्त ठेवण्यासाठी काय करता येईल, यापेक्षाही नदीकाठ संवर्धनासारखे नुसते सुशोभीकरणाचे गाजर दाखवले जाते. पुण्यासाठी नक्की प्राधान्याचे काय आहे?

वाचा सविस्तर…

13:40 (IST) 18 Feb 2025

“मला बाहेरच्या वॉर्डात टाकलं, तुमचे मनसुबे काय?”, ठाकरेंच्या शिलेदाराने शिवसेनेला ठोकला रामराम!

विलेपार्ले विधानसभेबाबत निर्णय घेणारे संजय राऊत आणि अनिल परब कोण आहेत? यांनी ही विधानसभा ‘आप’ला दिली होती. पण आम्ही ‘झाडू’बरोबर काम करायला विरोध दर्शवला त्यामुळे ती जागा शिवसेनेकडे आली. भाजपाकडून ती जागा काढून शिवसेनेकडे घ्यायची होती, ही माझी इच्छा होती. पण माझी इच्छा लक्षात न घेता मला बाहेरच्या वॉर्डात टाकलं. म्हणजे तुमचे मनसुबे काय आहेत? तुम्हाला संघटना जिंकवायची आहे की भाजपा जिंकवायची आहे? म्हणून हा माझा निर्णय आहे – जितेंद्र जानवळे

उद्धवजींवर माझा राग नाही. विभागीय राजकारण सुरू होतं, त्याला मी कंटाळलो होतो. माझी राजकीय कोंडी विभागात केली. एवढं मी लढलो, माझी नोकरी आणि घर गेलं. तरीही मी जिद्दीने उभा होतो. माझं घर, पक्ष गेलं, पण मी कधी रडत आलो नाही. पण आता मी आलो आहे. मला आता घाणेरड्या राजकारणाचा कंटाळा आला आहे – जितेंद्र जानवळे

13:23 (IST) 18 Feb 2025

उन्हाळ्याची चाहूल! २८७ गावांमध्ये झळा

अकोला जिल्ह्यात उन्हाळ्याची चाहूल लागतात पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. २८७ गावांना पाणी टंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली. ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी पाणी टंचाई निवारण आराखडा जिल्हा प्रशासनाने मंजूर केला.

सविस्तर वाचा

13:12 (IST) 18 Feb 2025

विद्यार्थिनींच्या वसतिगृहाबाबत सरकारचा मोठा निर्णय… आता होणार काय?

पुणे : राज्यात उच्च शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थिनींसाठी बांधलेल्या वसतिगृहांच्या प्रवेशासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

वाचा सविस्तर…

12:50 (IST) 18 Feb 2025

पिंपरी- चिंचवड : प्रेम प्रकरणातून कॉम्प्युटर इंजिनिअरिंग तरुणीची आत्महत्या, ४२ मिनिटांची voice note…

पिंपरी चिंचवड: प्रेमसबंधातून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या तरुणीने १५ व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी प्रियकर प्रणव डोंगरेला अटक करण्यात आली आहे.

वाचा सविस्तर…

12:43 (IST) 18 Feb 2025

‘न्यू इंडिया’ तील अपहाराची रक्कम ‘झोपु’ योजनेत

व्यावसायिकांना पैशांची नितांत गरज असल्याचे पाहून हितेशने बँकेतील ठेवीदारांचे पैसे व्याजाने देण्यास सुरूवात केल्याची प्राथमिक माहिती तपासात उघड झाली आहे.

सविस्तर वाचा…

12:41 (IST) 18 Feb 2025

विमाननगर भागातील ‘एसआरए’ वसाहतीत दोन गटात हाणामारी, पोलिसांना धक्काबुक्की; ६० जणांविरुद्ध गुन्हा

एसआरए वसाहतीत दोन गटात हाणामारी झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या वेळी दोन गटातील वाद सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करुन धक्काबुक्की करण्यात आली.

सविस्तर वाचा…

12:23 (IST) 18 Feb 2025

संतोष देशमुखांनंतर सुप्रिया सुळे महादेव मुंडेंच्या घरी; कुटुंबियांची भेट घेत केलं सांत्वन!

बीडमधील संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळेंनी आता परभणीत जाऊन महादेव मुंडे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.

12:23 (IST) 18 Feb 2025

खासगी ‘आरओ’ प्रकल्पांबाबत महापालिकेचा मोठा निर्णय !

पुणे : शहरातील सर्वच भागांतील खासगी ‘आरओ’ प्रकल्पांमधून पाणी देताना नक्की काय काळजी घ्यावी यासाठी, तसेच आरओ प्रकल्प उभारण्याची नियमावली आता महापालिकेने तयार केली आहे.

वाचा सविस्तर…

12:02 (IST) 18 Feb 2025

उत्तरेकडे जाताना कडेकोट बंदोबस्तात प्रवास, रेल्वे सुरक्षा पोलिसांचे काय आहे नियोजन ?

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असणारा महाकुंभ अंतिम टप्प्यात असताना प्रवाशांची प्रयागराजच्या दिशेने जाण्यासाठी धडपड कायम आहे.

सविस्तर वाचा…

11:50 (IST) 18 Feb 2025

‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड’साठी देव चौधरीची दौड सुरू

आतापर्यंत त्याने ७० स्पर्धेत धावण्याची गती कायम ठेवली आहे. देव दररोज किमान २५ किलोमीटर धावतो. त्यासोबतच स्विमिंग, जिम आदी व्यायाम प्रकार करतो.

सविस्तर वाचा

11:49 (IST) 18 Feb 2025

बनावट ‘सुरक्षा क्रमांक पाटी’ विक्रेत्यांमुळे आरटीओपुढे आव्हान

पुणे : प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) निर्देशांचा गैरफायदा घेऊन बनावट ‘उच्च सुरक्षा क्रमांक पाटी’ लावून देण्यात येत असल्याचे समोर आले आहे.

वाचा सविस्तर…

11:47 (IST) 18 Feb 2025

शहापूर तालुक्यातील कर्करोग जनजागृतीसाठी फिरते वाहन; एक महिना वाहनाचा तालुक्यात मुक्काम

कल्याण – कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन ग्रामीण, दुर्गम भागातील खेडेगावात राहत असलेल्या नागरिकांच्या घराच्या दारात जाऊन कर्करोगविषयक तपासणी करता यावी. कर्करोगविषयक जनजागृती करावी, .या उद्देशातून आरोग्य विभागाच्या माध्यमातून शहापूर तालुक्यात कर्करोग जनजागृती वाहन दाखल झाले आहे. सविस्तर वाचा…

11:46 (IST) 18 Feb 2025

अमृत पाणी पुरवठा कंत्राटदाराची १५ कोटींची देयके राखून धरली

चंद्रपूर शहरात केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० अभियान अंतर्गत मंजुर मलनि:सारण प्रकल्प व पाणी पुरवठा योजनेची कामे सुरु आहेत.

सविस्तर वाचा…

11:45 (IST) 18 Feb 2025

बनावट कागदपत्रांद्वारे जन्म दाखले: किरीट सोमय्यांच्या आरोपानंतर…

बांगलादेशी रोहिंग्या मुस्लिमांविरोधात भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आक्रमक पवित्रा घेतला.

सविस्तर वाचा…

11:35 (IST) 18 Feb 2025

कोथरूडमधील डुकरांचा मृत्यू नेमका कशामुळे…गूढ अखेर उलगडलं

कोथरूडमध्ये भारती नगर नाला आणि भिमाले कॉर्नर परिसरात ६ फेब्रुवारीपासून मृत डुकरे आढळून येत आहेत. आतापर्यंत या परिसरात ५४ मृत डुकरे आढळली आहेत.

वाचा सविस्तर…

11:33 (IST) 18 Feb 2025

चंद्रपूर : २५ वर्षांपासून मोबदला नाही, प्रकल्पग्रस्तांनी ‘ग्रेटा एनर्जी’चे काम बंद पाडले

प्रकल्पग्रस्तांना अद्यापपर्यंत मोबदला मिळालेला नाही. प्रकल्पग्रस्तांची प्रशासनासोबत चर्चा सुरू असतानाच सोमवारी पोलीस बंदोबस्तात ग्रेटा एनर्जी या कंपनीने तेथे काम सुरू केले.

सविस्तर वाचा…

11:32 (IST) 18 Feb 2025

जगभरात मागणी पण ‘ही’ भारतातच दुर्लक्षित; कृषिमंत्री म्हणतात, “स्वतंत्र…”

भौगोलिक मानांकन व औषधी गुणधर्म यामुळे हळदीस सर्वत्र मोठी मागणी असल्याचे चित्र आहे.

सविस्तर वाचा…

11:26 (IST) 18 Feb 2025

Maharashtra Live Blog : “अमित शाहांशी चर्चा केलीय, मुख्यमंत्र्यांकडे पदर पसरणार”, सुप्रिया सुळेंचं संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना आश्वासन!

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मी आणि बजरंग सोनावणे यांनी भेट घेतली आहे. आम्ही संतोष देशमुख हत्याप्रकरणी त्यांच्याशी चर्चा केली असून ते या प्रकरणी लक्ष घालणार आहेत. तसंच, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची वेळ मागितली असून मी माझ्या भावाच्या न्यायासाठी त्यांच्याकडे पदर पसरणार आहे, असं सुप्रिया सुळे यांनी ग्रामस्थ आणि संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना आश्वस्त केलं.

11:21 (IST) 18 Feb 2025

पुण्यातील जीबीएस उद्रेक कोंबड्यांमुळे? ‘एनआयव्ही’चा तपासणीतून अखेर उत्तर मिळालं…

पुणे : नांदेड गाव परिसरात गुइलेन बॅर सिंड्रोमचा (जीबीएस) उद्रेक झाल्यानंतर पशुसंवर्धन विभागाने संपूर्ण जिल्ह्यातील कुक्कुटपालन केंद्राची तपासणी सुरू केली आहे. या तपासणीत कोंबड्यांमध्ये कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी आणि नोरोव्हायरस यांचा संसर्ग आढळून आला आहे. विशेष म्हणजे, हे दोन्ही संसर्ग जीबीएस उद्रेकाला कारणीभूत ठरले आहेत.

वाचा सविस्तर…

11:03 (IST) 18 Feb 2025

१.४ अब्ज डॉलर्सच्या कर मागणीचे प्रकरण : फोक्सवॅगनची आयात थांबवणार नाही, सीमाशुल्क विभागाची उच्च न्यायालयात माहिती

कंपनीतर्फे २००१ पासून कारच्या सुट्या भागांची आयात केली जात असून सध्याचा संपूर्ण वाद सीकेडी युनिट्सबद्दल आहे. शिवाय, २०११ मध्ये सीकेडी युनिट्सवर लादण्यात येणारे सीमाशुल्क वाढवण्यासाठीची अधिसूचना काढण्यात आली होती.

सविस्तर वाचा…

11:02 (IST) 18 Feb 2025

मुंबई : मिठी स्वच्छताप्रकरणी तीन कंत्राटदारांची चौकशी

मागील २० वर्षांपासून हा प्रकल्प सुरू असून ११०० कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते.

सविस्तर वाचा…

11:01 (IST) 18 Feb 2025

नीरेपासून गूळ निर्मितीचा यशस्वी प्रयोग ! सोलापूरमधील माळीनगरातील शेतकऱ्याचे यश

गुळाचे उत्पादन साधारणपणे उसाच्या रसापासून घेण्याची पारंपरिक पद्धत आहे. परंतु त्याऐवजी चक्क नीरेपासून चविष्ट गूळ सोलापूर जिल्ह्यातील माळीनगरात तयार होत आहे. महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रयोग असून या गुळाला बाजारपेठेत मोठी मागणी आहे.

सविस्तर वाचा

11:00 (IST) 18 Feb 2025

सोलापूर, पंढरपूरसाठी उजनीतून साडेपाच टीएमसी पाणी सोडले

सोलापूर आणि पंढरपूरसह मंगळवेढा, सांगोला आणि भीमा नदीच्या काठावरील पाणीपुरवठा योजनांसाठी उजनी धरणातून भीमा नदीत पिण्याचे पाण्याचे दुसरे आवर्तन सोमवारी सकाळी सोडण्यात आले. सविस्तर वाचा

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२५ लाइव्ह

ॉMaharashtra News Live Update Today, 18 February 2025 :  राज्यातील ताज्या घडामोडी जाणून घ्या