Maharashtra Breaking News Updates, 18 February 2025 : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी अद्यापही कृष्णा आंधळे हा सातवा आरोपी फरार आहे. त्याला अटक केली जात नसल्याने देशमुख कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे. तसंच, आमचा पोलिसांवर विश्वास राहिला नसून आम्हाला सुरक्षाही पुरवली नसल्याची तक्रार देशमुख कुटुंबीयांनी सुप्रिया सुळेंकडे केली आहे. सुप्रिया सुळेंनी आज देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली असून त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. तसंच, त्यांनी परभणी येथे जाऊन व्यापारी महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. तर दुसरीकडे आज राज्यमंत्रिमंडळाची बैठक झाली असून सहा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यासह राज्यातील इतर घडामोडी जाणून घेऊयात.

Live Updates

Maharashtra News Live Update Today, 18 February 2025 :  राज्यातील ताज्या घडामोडी जाणून घ्या

10:59 (IST) 18 Feb 2025

बीड जिल्हाधिकाऱ्यांचे शासकीय वाहन जप्तीचे आदेश

बीड जिल्हाधिकाऱ्यांचे शासकीय वाहन जप्त करण्याचे आदेश माजलगावच्या न्यायालयाने दिले आहेत. वडवणी तालुक्यातील चिखलबीड येथे 1998 मध्ये लघु सिंचन प्रकल्प उभारण्यात आला होता. सविस्तर वाचा

10:58 (IST) 18 Feb 2025

नितीन गडकरी यांच्या स्वागताला कोल्हापुरातील सर्वपक्षीय नेते; समरजित घाटगे चर्चेत

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या कोल्हापूर भेटीवेळी सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. मात्र, यामध्ये भाजप प्रवेशाच्या चर्चेमुळे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले समरजित घाटगे यांची भेट उल्लेखनीय ठरली. सविस्तर वाचा

10:57 (IST) 18 Feb 2025

कोल्हापुरात शिक्षकांकडून बारावीचे पेपर न तपासता मंडळाकडे परत

राज्य शासनाने शिक्षणविषयक घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी केली जात नाही, तोपर्यंत राज्यभरात दहावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा इरादा व्यक्त करीत सोमवारी कोल्हापूर विभागीय अध्यक्षांकडे बारावीचे पेपर परत करण्यात आले. सविस्तर वाचा

10:57 (IST) 18 Feb 2025

इचलकरंजी महापालिकेतील कामचुकार अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई : पल्लवी पाटील

इचलकरंजी महापालिकेत येणाऱ्या नागरिकांची कामे विहित कालावधीत झालीच पाहिजेत असा दंडक करण्यात येईल. नागरिकांना हेलपाटे घालावे लागणार नाहीत. कामात कुचराई करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे इचलकरंजी महापालिकेच्या नूतन आयुक्त पल्लवी पाटील यांनी सांगितले. सविस्तर वाचा

10:56 (IST) 18 Feb 2025

मुंबईतील चार मंडळांच्या मूर्ती अद्याप विसर्जनाविनाच; कांदिवली, बोरिवलीतील मंडळांना सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा

माघी गणेशोत्सवातील सार्वजनिक मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करण्याचे निर्देश मुंबई महापालिकेने दिल्यामुळे निर्माण झालेला विसर्जनाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. पश्चिम उपनगरातील कांदिवली व बोरिवली परिसरातील चार मोठ्या मंडळांच्या उंच मूर्तींचे अद्याप विसर्जन झालेले नाही. सविस्तर वाचा

10:55 (IST) 18 Feb 2025

टोरेस गुंतवणूकदारांना सहा महिन्यांत ४० कोटींपर्यंत मिळण्याची शक्यता

टोरेस गैरव्यवहारप्रकरणी आतापर्यंत ३५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असून त्याशिवास टोरेस कंपनीशी संबंधित छोट्यामोठ्या वस्तू, सात-आठ मोटारगाड्या व महागडे खडे जप्त करण्याची परवानगी आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयाकडे मागितली आहे.

सविस्तर वाचा

10:54 (IST) 18 Feb 2025

टोरेस फसवणूक प्रकरण : भारतानंतर फरार आरोपींनी ‘या’ देशात थाटलंय दुकान

मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि मीरा-भाईंदर या भागांतील हजारो गुंतवणूकदारांचे याप्रकरणात कोट्यावधींचे नुकसान झाले आहे. हा संपूर्ण कट युक्रेनमधील नागरिक असलेल्या मुख्य आरोपीने रचला होता.

सविस्तर वाचा…

10:54 (IST) 18 Feb 2025

घोडबंदरला ‘आरएमसी’चा विळखा; प्रदूषण मुक्ततेसाठी रहिवाशांवर आंदोलनाची वेळ

धूळ, प्रदूषण मुक्त आणि ठाणे स्थानकापासून जवळच राहता यावे यासाठी लाखो रुपये खर्च करून घर घेणाऱ्या घोडबंदरकरांना आता आरएमसी प्रकल्पांचा धोका निर्माण होऊ लागला आहे. सविस्तर वाचा

10:54 (IST) 18 Feb 2025

१.४ अब्ज डॉलर्सच्या कर मागणीचे प्रकरण : फोक्सवॅगनची आयात थांबवणार नाही, सीमाशुल्क विभागाची उच्च न्यायालयात माहिती

कंपनीतर्फे २००१ पासून कारच्या सुट्या भागांची आयात केली जात असून सध्याचा संपूर्ण वाद सीकेडी युनिट्सबद्दल आहे. शिवाय, २०११ मध्ये सीकेडी युनिट्सवर लादण्यात येणारे सीमाशुल्क वाढवण्यासाठीची अधिसूचना काढण्यात आली होती.

सविस्तर वाचा…

10:53 (IST) 18 Feb 2025

ठाण्यातील आरोग्यमंदिरांसाठी पालिका घेणार भाड्याने जागा; ४८ पैकी ६ ठिकाणीच आरोग्यमंदिरे सुरू

केंद्र सरकारच्या पंधराव्या वित्त आयोगांतर्गत नागरी आयुषमान आरोग्यमंदिर उभारणीच्या योजनेतून ठाणे महापालिकेला ४८ पैकी ६ केंद्र आतापर्यंत उभारणे शक्य झाले असून आणखी ८ केंद्रांसाठी पालिकेने जागाही निश्चित केल्या आहेत. सविस्तर वाचा

10:53 (IST) 18 Feb 2025

ठाण्यात मेट्रोचे सर्वेक्षण करण्यासाठी गेलेल्या अभियंत्यांना धक्काबुक्की आणि मारहाण

ठाण्यात मेट्रो निर्माणाचे काम घोडबंदर भागात सुरू आहे. या सर्वेक्षणासाठी गेलेल्या अभियंत्यांना कावेसर भागात धक्काबुक्की आणि मारहाण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

सविस्तर वाचा

10:52 (IST) 18 Feb 2025

झंकारती सतार अन् सुरांनी भारले रसिकगण; असद खान, व्यंकटेशकुमार यांच्या सादरीकरणाने प्रिसिजनची सांगता

प्रिसिजन संगीत महोत्सवाच्या दशकपूर्तीचा दुसरा दिवस आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सतारवादक असद खान यांच्या सतारवादनाने आणि विख्यात शास्त्रीय गायक पद्मश्री पं. एम. व्यंकटेशकुमार यांच्या भावगहिऱ्या गायनाने गाजला. सविस्तर वाचा

10:50 (IST) 18 Feb 2025

मुखेडमध्ये बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

नांदेड : बारावीची परीक्षा सुरू असतानाच एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन सोमवारी दुपारी आत्महत्या केली. मुखेड शहरातील ही घटना आहे. ताणतणावातून मुस्कान महेबूबसाब शेख (वय १८) हिने टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे. मुस्कान मुखेड शहरातीलच एका महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेत होती. मुस्कानचे आई-वडील बांगड्या विकण्याचा व्यवसाय करतात. फुलेनगरात ती राहात होती. तिच्या पश्चात चार बहिणी आहेत.

10:50 (IST) 18 Feb 2025

कोल्हापुरात हवेचा दर्जा बिघडला; टँकरद्वारे रस्त्यावर पाणी फवारणी

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील वाढती धूळ, हवेचा खराब होत चाललेला दर्जा याविरोधात नागरिकांच्या तक्रारी वाढल्याने प्रशासनाने जल फवारणी (वॉटर स्प्रिंकलर) टँकरद्वारे मुख्य रस्त्यांची स्वच्छता केली. शहरातील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी, धुलीकण कमी करण्यासाठी वॉटर स्प्रिंकलर टँकरची खरेदी महानगरपालिकेने केला आहे. त्याद्वारे रस्त्यावरील धूलिकण कमी करण्यासाठी पाण्याची फवारणी करणे, रस्ते, दुभाजक धुणे, झाडांना पाणी देणे ही कामे करता येतात. पण, या यंत्रणेचा वापर करण्यात येत नव्हता. याप्रश्नी नागरिकांच्या तक्रारीत भर पडू लागल्याने आज ताराराणी चौक, शाहू टोल नाका,पोलीस अधीक्षक चौक या मुख्य मार्गावर चाचणी घेण्यात आली. काही मार्गावर या गाडीद्वारे पाणी शिंपडण्यात आले.

10:46 (IST) 18 Feb 2025

तानाजी सावंतांचं पोरगं सापडतं, पण संतोष देशमुखांचा खुनी सापडत नाही? सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल

विमानाने गेलेलं तानाजी सावंतंचं पोरगं सापडतं, पण संतोष देशमुखांचा खुनी सापडत नाही? तो गरीब, शोषित, पीडित आहे म्हणून आवाज नाही का त्याला? जोपर्यंत त्याला न्याय मिळत नाही, दोन्ही मुलांची जबाबदारी पवारांनी घेतली आहे – सुप्रिया सुळे</p>

10:42 (IST) 18 Feb 2025

पुणे : चॉकलेट शेकमध्ये उंदीर, विश्रांतवाडीतील कॅफे मालकाविरुद्ध गुन्हा

चाॅकलेट शेक तयार करताना मिक्सरमध्ये उंदिराचे पिलू पडले.

सविस्तर वाचा…

10:41 (IST) 18 Feb 2025

पिंपरी : कुदळवाडीतील कारवाईमुळे महापालिकेला ६० कोटींचा फटका

एक हजार एकर परिसरातील तीन हजारांहून अधिक अनधिकृत बांधकामे, पत्राशेड महापालिकेने जमीनदोस्त केली आहेत.

सविस्तर वाचा…

10:41 (IST) 18 Feb 2025

पिंपरी : महापालिकेचा येत्या शुक्रवारी अर्थसंकल्प; भाजप आमदारांचे बैठकांचे सत्र

महापालिकेच्या लेखा व वित्त विभागाकडून २०२५-२६ चा अर्थसंकल्प तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी विविध कामे, तरतुदींबाबत विभागनिहाय अधिकाऱ्यांच्या बैठका सुरू आहेत.

सविस्तर वाचा…

10:40 (IST) 18 Feb 2025

सातवा आरोपी कृष्णा आंधळे सापडत कसा नाही? – सुप्रिया सुळे

कोणाला पटतंय की कृष्णा आंधळे सापडू शकत नाही. सीडीआर काढा. फोन असा जातो कुठे. कृष्णा आंधळेचा सीडीआर मिळालाच पाहिजे. यासाठी आपण लढा लढू- सुप्रिया सुळे</p>

10:39 (IST) 18 Feb 2025

सत्तेची आणि पैशांची मस्ती उतरली पाहिजे – सुप्रिया सुळे

मी या मुलीला, आईला आणि आजीला शब्द देते की या बीडमध्ये सर्व मस्ती उतरलीच पाहिजे. सत्तेची आणि पैशांची ही मस्ती आहे.आपण जोपर्यंत एकत्र आहोत, ते ताकदीने लढू. कोर्ट केस मी लढेन. मी जशी राज्यात आणि देशात बिंधास्त फिरते तसं प्रत्येक महिला फिरली पाहिजे – सुप्रिया सुळे</p>

10:38 (IST) 18 Feb 2025
पिंपरी : महापालिका २०० कोटींचे हरित कर्जरोखे उभारणार

शहराच्या विकासाच्या अनुषंगाने पर्यावरण तसेच हवामान बदल यामध्ये सकारात्मक योगदान देणाऱ्या प्रकल्पांसाठी हरितकर्ज रोखे उभारण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा…

10:38 (IST) 18 Feb 2025

शहरबात : ‘डेटिंग ॲप’चे मोहजाल

आपल्या एकटेपणावर मात करण्यासाठी अनेक जण डेटिंग ॲपच्या माध्यमातून नवीन मित्र-मैत्रिणी शोधतात. या ॲपच्या माध्यमातून विवाहास अनुरूप जोडीदाराचीही निवड केली जाते. मात्र, अशा प्रकारच्या ॲपमधून मैत्रीच्या नावाखाली गैरप्रकार सुरू झाल्याचे उघडकीस आले आहे.

सविस्तर वाचा…

10:36 (IST) 18 Feb 2025

महावितरणचा प्रधानमंत्री सूर्यघर योजनेला ‘झटका’?

केंद्र सरकारने पंतप्रधान सूर्यघर योजनेंतर्गत देशातील एक कोटी घरांवर सौरयंत्रणा बसवून त्यांचे वीजबिल शून्यावर आणण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे.

सविस्तर वाचा…

10:36 (IST) 18 Feb 2025

तपन सिन्हा यांच्या चित्रपटांतून मानवतेचे दर्शन, स्वपन मलिक यांचे मत

‘तपन सिन्हा आणि त्यांचे चित्रपट’ या विषयावर २३ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पीफ) सोमवारी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

सविस्तर वाचा…

10:35 (IST) 18 Feb 2025

शिवसृष्टीतील तुळजाभवानी मातेच्या मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा

शिवसृष्टीत प्रतापगडावरील भवानी मातेच्या मंदिराची तंतोतंत प्रतिकृती साकारण्यात आली आहे.

सविस्तर वाचा…

10:34 (IST) 18 Feb 2025

अमरावती : अत्याचारातून गर्भधारणा; अल्पवयीन मुलीची आत्महत्या

जिल्ह्यात गेल्या वर्षभरात १३२ बलात्काराच्या घटना समोर आल्या. चिंताजनक बाब म्हणजे यातील ९८ प्रकरणे ही अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराची होती.

सविस्तर वाचा…

10:33 (IST) 18 Feb 2025

गणेश नाईक यांच्या आमदाराकीला आव्हान, मतदार यादीत घोळ केल्याचा आरोप

न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या एकलपीठाने नाईक यांना नोटीस बजावून त्यांना याचिकेत उपस्थित आरोपांबाबत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले.

सविस्तर वाचा…

10:33 (IST) 18 Feb 2025

उच्च न्यायालयाचा महसूल विभागाला तडाखा, सोलापूर येथील अनगरस्थित अतिरिक्त तहसिल कार्यालयाबाबतचा शासनादेश रद्द

योग्य त्या प्रक्रियेचे पालन न करता अनगर येथे अतिरिक्त तहसिलदार कार्यालय सुरू करण्यात आल्याचा याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद न्यायालयाने हा निर्णय देताना योग्य मानला.

सविस्तर वाचा…

10:32 (IST) 18 Feb 2025

म्हाडा भवनातील पैसे उधळण प्रकरण: संक्रमण शिबिरातील गाळेवाटपाच्या चौकशीसाठी समिती

महिलेने संबंधित सहमुख्य अधिकाऱ्यांवर संक्रमण शिबिरातील गाळेवाटपांसंबंधी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.

सविस्तर वाचा…

10:18 (IST) 18 Feb 2025

Maharashtra Live Blog : मी त्या रात्री स्वतः विष्णू चाटेबरोबर बोललो- धनंजय देशमुख

स्थानिक पोलीस आमची केस घेत नव्हते – धनंजय देशमुख

२५ तारखेला आम्ही अन्नत्याग आंदोलन करू – धनंजय देशमुख

आंदोलन केल्यावरच आरोपी सापडले- धनंजय देशमुख

६ डिसेंबरला आरोपींकडून वॉचमनला माहराण- धनंजय देशमुख

६ जिसेंबरला संतोष देशमुखांनाही मारहाण झाली- धनंजय देशमुख

भावाच्या मृत्यूच्या ३ तासांनंतर गुन्हा दाखल केला- धनंजय देशमुख

मी त्या रात्री स्वतः विष्णू चाटेबरोबर बोललो – धनंजय देशमुख

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२५ लाइव्ह

ॉMaharashtra News Live Update Today, 18 February 2025 :  राज्यातील ताज्या घडामोडी जाणून घ्या