Maharashtra Breaking News Updates, 18 February 2025 : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी अद्यापही कृष्णा आंधळे हा सातवा आरोपी फरार आहे. त्याला अटक केली जात नसल्याने देशमुख कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे. तसंच, आमचा पोलिसांवर विश्वास राहिला नसून आम्हाला सुरक्षाही पुरवली नसल्याची तक्रार देशमुख कुटुंबीयांनी सुप्रिया सुळेंकडे केली आहे. सुप्रिया सुळेंनी आज देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली असून त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. तसंच, त्यांनी परभणी येथे जाऊन व्यापारी महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. तर दुसरीकडे आज राज्यमंत्रिमंडळाची बैठक झाली असून सहा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यासह राज्यातील इतर घडामोडी जाणून घेऊयात.
Maharashtra News Live Update Today, 18 February 2025 : राज्यातील ताज्या घडामोडी जाणून घ्या
Maharashtra Live News : सुप्रिया सुळे यांचा संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांशी संवाद
लाईव्ह |?बीड | पत्रकारांशी संवाद ?️18-02-2025
— Supriya Sule (@supriya_sule) February 18, 2025
https://t.co/WT6jiZt5a0
आम्हाला सुरक्षा पुरविली गेली नाही. आमचा आता पोलिसांवरच विश्वास राहिला नाही. त्या दिवशी कार्यरत असलेल्या सर्व पोलिसांना फाशीची शिक्षा द्या. त्यांची बदली करून उपयोग नाही. ६९ दिवस उलटूनही आम्हाला न्याय मिळाला नाही. आम्हाला फक्त न्यायाची अपेक्षा आहे. संतोष देशमुख यांचा पोलिसांवर खूप विश्वास होता. मला काहीही झालं तरीही पोलीस येऊन मदत करतील अशी त्यांची अपेक्षा होती. पण पोलीस तक्रार केल्यानंतरही पोलिसांनी सहकार्य केलं नाही. त्यामुळे आमचा पोलिसांवर विश्वास राहिला नाही”, अशी प्रतिक्रिया संतोष देशमुख यांच्या आई आणि पत्नीने दिली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आज देशमुख कुटुंबीयांना भेटायला गेल्या होत्या. त्यांच्याशी चर्चा करताना देशमुख कुटुंबीयांनी टाहो फोडला.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२५ लाइव्ह
ॉMaharashtra News Live Update Today, 18 February 2025 : राज्यातील ताज्या घडामोडी जाणून घ्या