Mumbai News Update : बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा आज ५७ वा वर्धापन दिन आहे. परंतु, गेल्यावर्षी २१ जून २०२२ रोजी शिवसेनेत बंडखोरी झाल्याने शिवसेनेचे दोन गट पडले. निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह आणि पक्षनाव शिंदे गटाला दिले असले तरीही ठाकरे गटाने शिवसेनेवरील दावा सोडलेला नाही. त्यामुळे आज पहिल्यांदाच शिवसेनेचा वर्धापन दिन शिवसेनेच्या दोन गटाकडून साजरा करण्यात येत आहे. ठाकरे गटाचा वर्धापन दिन कार्यक्रम माटुंग्याच्या षण्मुखानंद सभागृहात होणार आहे. तर, शिंदे गटाचा वर्धापन दिन कार्यक्रम मुंबईतील नेस्को सेंटर येथे होणार आहे. दोन्ही गटांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात यानिमित्ताने मुंबईत येणार आहेत. ठाकरे गटाच्या काल (१८ जून) झालेल्या पदाधिकारी मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय प्रत्युत्तर देतात याकडे आज सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

Live Updates

Mumbai Maharashtra News Update राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा

18:24 (IST) 19 Jun 2023
पुणे: झोका खेळताना गळफास बसून बालिकेचा मृत्यू

पुणे: घराबाहेर खिडकीला दोरी आणि टॉवेल बांधून झोका घेत असताना गळफास बसून सात वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना कात्रज भागातील आंबेगाव परिसरात घडली.

सविस्तर वाचा...

18:19 (IST) 19 Jun 2023
जीडीपीच्या २० टक्के खर्च शिक्षणावर होणे आवश्यक; विख्यात गणितज्ज्ञ प्रा. मंजुल भार्गव यांचे मत

भारताने सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपी) २० टक्के खर्च शिक्षणावर करण्याचे लक्ष्य ठेवले पाहिजे. तसेच पूर्वप्राथमिक शिक्षणावरील खर्च वाढवण्याची गरज आहे, असे मत विख्यात गणितज्ज्ञ आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा सुकाणू समितीचे सदस्य प्रा. मंजुल भार्गव यांनी मांडले. सविस्तर वाचा…

18:17 (IST) 19 Jun 2023
बुलढाणा: हक्काच्या आरक्षणात होणारी ‘घुसखोरी’ रोखण्यासाठी गोरसेना आक्रमक; बुलडाण्यात रास्तारोको

हक्काच्या आरक्षणात होणारी ‘घुसखोरी’ रोखण्यासाठी आक्रमक असलेल्या गोरसेनेच्या वतीने आज बुलढाणा चिखली राज्य महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. यामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. रणरणत्या उन्हात पार पडलेल्या या आंदोलनात जिल्ह्यातील पदाधिकारी व समाज बांधव बहुसंख्येने सहभागी झाले.  सविस्तर वाचा…

17:38 (IST) 19 Jun 2023
पाणी द्या, अन्यथा मंत्रिपदाचा राजीनामा द्या; मन्यारखेडावासियांचा मनसेच्या नेतृत्वात जळगावात रास्ता रोको

जळगाव: गुलाबभाऊ पाणी द्या… पाणी द्या… अन्यथा मंत्रिपदाचा राजीनामा द्या, अशा घोषणा देत सोमवारी दुपारी मन्यारखेडा (ता. जि. जळगाव) येथील आदिवासी बांधवांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतृत्वात धोंडी धोंडी पाणी द्या म्हणत, हंडा मोर्चा काढत पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर रोष व्यक्त केला.

सविस्तर वाचा...

16:56 (IST) 19 Jun 2023
गॅस्ट्रोची साथ! उमरखेड तालुक्यात २०० पेक्षा जास्त रुग्ण आढळले

यवतमाळ: उमरखेड तालुक्यातील गंगनमाळ येथे अतिसाराची साथ पसरली आहे. गावात २०० च्या वर रुग्ण आढळले आहेत. यातील अनेक रुग्णांना पुढील उपचारासाठी उमरखेड येथे रवाना करण्यात आले.

सविस्तर वाचा...

16:28 (IST) 19 Jun 2023
ठाण्याच्या मनोरुग्णालयात कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन; कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून प्रशासनाचा केला निषेध

ठाणे: येथील मनोरुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला होता. परंतु पोलिसांनी परवानगी नाकारल्याने कर्मचाऱ्यांनी सोमवारी काळ्या फिती लावून प्रशासनाविरोधात निषेध आंदोलन केले.

सविस्तर वाचा...

16:28 (IST) 19 Jun 2023
बोगस जात वैधता प्रमाणपत्राच्या विरोधात बंजारा समाज आक्रमक; अकोल्यात २५ मागण्यांच्या निवेदनाची होळी, रास्ता रोको

बोगस जात वैधता प्रमाणपत्र घेणाऱ्या लाभार्थी व देणाऱ्या जात पडताळणी अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी गोरसेना व बंजारा समाजातील इतरही संघटनेनी वारंवार सरकारकडे केली. पोहरादेवी येथे बंजारा समाजाच्या २५ मागण्या मान्य करण्याचे आश्वासन शिंदे सरकारनी दिले होते; परंतु अद्याप एकही मागणी मान्य झाली नाही.

16:26 (IST) 19 Jun 2023
कळवा रुग्णालयातही आता बायोमेट्रीक हजेरी; कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याने त्याचा फटका रुग्णांना बसतो

महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील अनेक कर्मचारी ठरवून दिलेल्या वेळेत कामावर उपस्थित राहत नसल्याने त्याचा फटका रुग्णांना बसत आहे. हि बाब लक्षात घेऊन अशा लेटलतीफ कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी महापालिका प्रशासनाने आता रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी बायोमेट्रीक यंत्रे बसविण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. सविस्तर वाचा

16:10 (IST) 19 Jun 2023
नाफेडमार्फत पैसे न मिळाल्याने कांदा उत्पादकांमध्ये नाराजी

नाशिक: कांद्याचे भाव मातीमोल झाल्याने केंद्र सरकारने नाफेडमार्फत कधी नव्हे ती लाल कांद्याची अल्प खरेदी केली. आता चार महिने उलटूनही शेतकऱ्यांना कांदा विक्रीचे पैसे मिळालेले नाहीत.

सविस्तर वाचा...

16:09 (IST) 19 Jun 2023
"एकत्र बसा आणि ठरवा...", शिवसेना फुटीवरून संजय राऊतांचे भाजपावर टीकास्त्र

"शिवसेनेचे लोक का फुटले याची दंतकथा फडणवीस सांगतात. दुसरी कथा चंद्रशेखर बावनकुळे सांगतात आणि तिसरीच काहीतरी कथा अमित शाह सांगतात. राम कथा एकच पाहिजे. हे सगळे कथावाचक आहेत. एकत्र बसा तुम्ही आणि ठरवा की लोकांना कोणत्या कथेतून मुर्ख बनवायचं आहे. पण लोक मुर्ख बनणार नाहीत. समुद्र फार खवळतो, नाकातोंडात पाणी जातं आणि मग गटांगळ्या खाव्या लागतात. आम्हाला समुद्र जास्त मिळतो. विदर्भात समुद्र नाही. नद्याही सुकल्या आहेत. आग आणि पाण्याशी खेळू नका, असं संजय राऊत म्हणाले.

15:10 (IST) 19 Jun 2023
नागपूर : एसटी बँकेत गैरव्यवहार; महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचा दावा काय? वाचा सविस्तर…

एसटी बँक निवडणुकीच्या निमित्ताने अध्यापक हॉल, नागपूर येथे सोमवारी झालेल्या महारष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. बरगे पुढे म्हणाले, एसटी बँक व सभासदासमोर अनेक अडचणी असताना त्याकडे दुर्लक्ष केले जाते. सध्या मुद्दे माहिती नसलेले लोक या बँकेत घुसण्याचा प्रयत्न करीत आहे. या बँक निवडणुकीत मुख्य मुद्द्यांना बगल दिली जात आहे.

सविस्तर वाचा

15:03 (IST) 19 Jun 2023
नाशिक: घरफोडीत चार लाखाचा ऐवज लंपास

नाशिक: नाशिकरोडच्या जगताप मळा परिसरात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे चार लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोकड लंपास केली.

सविस्तर वाचा...

14:47 (IST) 19 Jun 2023
भरधाव दुचाकीच्या धडकेत बिबट्या जखमी, बिबट्याच्या हल्ल्यात बचाव पथकाचा कर्मचारी जखमी; ज्ञानगंगा अभयारण्यातील घटना

भरधाव दुचाकीच्या धडकेने रस्ता  ओलांडत असलेला बिबट्या  गंभीर जखमी  झाला आहे.  दरम्यान  आज त्याला उपचारासाठी जेरबंद करण्यासाठी गेलेल्या बचाव पथकातील वन कर्मचाऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याने तो जखमी झाला. सविस्तर वाचा…

14:47 (IST) 19 Jun 2023
वर्धा: मायलेकावर दवाखान्यात खर्च होतो म्हणून मुलास आपटले, पित्यावर गुन्हा दाखल

पत्नीवर असलेल्या संतापाचा राग पोटच्या पोरावर काढण्याची अजब तेवढीच संतापजनक घटना पंचक्रोशीत खळबळ माजवून गेली.झाले असे की आष्टी येथील खडकपुरा येथील शिवानी राजेंद्र सोनोने यांचे दुसरे लग्न अकरा महिन्याआधी गावातीलच राजेंद्र सोनोणे यांच्याशी झाले होते. सविस्तर वाचा…

14:46 (IST) 19 Jun 2023
नागपूर: तीन वर्षांपूर्वी बेपत्ता झालेली मुलगी अकोल्यात सापडली; प्रियकराशी केले लग्न

तीन वर्षांपूर्वी कपिलनगर हद्दीतून बेपत्ता झालेल्या बालिकेला शोधून काढण्यात गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाला यश आले. पथकाने तिला अकोल्यातून ताब्यात घेतले. चौकशीत तिने प्रियकराशी लग्न केल्याचे समजले. सविस्तर वाचा…

14:45 (IST) 19 Jun 2023
पत्रकारांच्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, तुम्हाला महाराष्ट्रामध्ये राहायचे आहे की नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला

मागील आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सर्व वर्तमानपत्रांत जाहिराती आली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये वाद होत असल्याची चर्चा सुरू झाली. त्याच दरम्यान एक संस्थेचा सर्व्हे आला. सविस्तर वाचा…

14:44 (IST) 19 Jun 2023
१ सप्टेंबर रोजी कपिलनगर ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. कपिलनगर पोलिसांनीही तिला शोधण्याचा प्रयत्न केला

आर्थिक व्यवहारातून कल्याण मधील एका निवृत्त तिकीट तपासणीसाची शहापूर तालुक्या तील धसई शिवनेर गावाच्या हद्दीत निर्घृण हत्या करण्यात आली आहे. शहापूर पोलिसांनी याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. तिसऱ्या आरोपीचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

सविस्तर वाचा…

14:42 (IST) 19 Jun 2023
अमरावती : लग्‍नाच्‍या पार्टीत नाचू दिले नाही म्‍हणून नवरदेवाच्या भावावरच चालवली तलवार…

तेजस सुनील तायडे (२३, रा. अमरावती) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी माहुली जहागीर पोलिसांनी नवरदेवाच्‍या बहिणीच्‍या तक्रारीवरून आरोपीविरूद्ध हत्‍येचा प्रयत्‍न, शस्‍त्र अधिनियम व अॅट्रॉसिटी कायद्यान्‍वये गुन्‍हा दाखल केला आणि त्‍याला तत्‍काळ अटक करण्‍यात आली.

सविस्तर वाचा

13:57 (IST) 19 Jun 2023
कळंबोली सिग्नलवर दानाचे व्यवहार डीजीटलमधून

शीव पनवेल महामार्गावरील कळंबोली सिग्नलवर सध्या डीजीटल व्यवहारातून दान स्विकारणे आणि विविध वस्तू खरेदी करण्याचे व्यवहार मोठ्या प्रमाणात सूरु आहेत. अत्यल्प उत्पन्न गटातील बालकांच्या हातून रोकडरहीत व्यवहारांकडे कल वाढल्याने देश लवकरच संपुर्ण डीजीटल व्यवहाराकडे वाट असल्याचे चित्र कळंबोली सिग्नलकडे पाहायला मिळते.

सविस्तर वाचा

13:56 (IST) 19 Jun 2023
भाजप प्रवेशानंतर माफी मागत आशीष देशमुखांची प्रतिक्रिया म्हणाले, “सुबह का भुला श्यामको…”

पक्ष सोडताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतरही वरिष्ठ नेत्यांवर टीका करणा-या डॉ आशीष देशमुख यांना आता भाजपमध्ये पुन्हा प्रवेश केल्यावर वरील बाबींचा पश्चात्ताप होत आहे. रविवारी देशमुख यांचा कोराडीत फडणवीस, बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश झाला.

सविस्तर वाचा

13:40 (IST) 19 Jun 2023
“राष्ट्रवादीचे पदाधिकारी उरलेल्या शिवसेनेचे…”, उदय सामंतांची खोचक टीका; म्हणाले, “ज्यांच्या संगतीत…”

शिवसेनेचा आज ५७ वा वर्धापन दिन आहे. या वर्धापन दिनाकरता दोन्ही गटांकडून जोरदार तयारी सुरू आहे. वरळीतील नेस्को मैदानात शिंदे गटाचा कार्यक्रम होणार आहे. तर, षण्मुखानंद सभागृहात ठाकरे गटाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन्ही पक्षांत आज भाषणांची जुगलबंदी रंगण्याची शक्यता आहे. दरम्यान, या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज राज्याचे उद्योगमंत्री आणि शिंदे गटाचे आमदार उदय सामतं यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंसह राष्ट्रावादीवरही जोरदार निशाणा साधला.

सविस्तर वाचा

13:40 (IST) 19 Jun 2023
‘लालपरी’ची कोट्यवधींची ‘उड्डाणे’! मे महिन्यात बुलढाणा विभागाला ‘इतक्या’ कोटींचा नफा

मागील मार्च महिन्यापासून नफ्यात असलेल्या एसटी महामंडळाच्या बुलढाणा विभागाने मे महिन्यात विक्रमी नफा मिळविला आहे. तसेच ‘रेकॉर्ड ब्रेक’ वाहतूक करून भरीव उत्पन्नाचा आकडा गाठला आहे. विभाग नियंत्रक अशोक वाडीभस्मे यांच्या मार्गदर्शनाखाली ७ आगारातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी ही जबरदस्त कामगिरी बजावली आहे.

सविस्तर वाचा

13:28 (IST) 19 Jun 2023
अकोला : ट्रक उलटला अन् मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून युवकाचा जीव गेला

माती वाहून नेणारा ट्रक उलटला आणि त्या मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून युवकाचा जीव गेल्याची घटना बाळापूर जवळ घडली. वीटभट्टीसाठी खोदून मातीची ट्रकने वाहतूक करण्यात येत होती. मार्गात ट्रक उलटल्याने मातीचा ढिगारा अंगावर पडून इफराजखान इलियासखान (२०, रा.कालेखानीपुरा, बाळापूर) याचा मृत्यू झाला.

सविस्तर वाचा

13:18 (IST) 19 Jun 2023
जिवंत महिलेला तलाठ्याने दाखवले मृत; महसूल विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर!

सरकार गतिमान आणि पारदर्शक कारभाराचा कांगावा करीत असले तरी अधिकारी, कर्मचारी किती तत्परतेने वागतात याचा प्रत्यय दररोज येतोय. प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांना विविध अडचणीचा सामना करावा लागत आहे. असाच गलथान कारभार मानोरा तहसील कार्यालयातील संजय गांधी योजनेअंतर्गत चव्हाट्यावर आला.

सविस्तर वाचा

12:50 (IST) 19 Jun 2023
...म्हणून दोन वर्धापन दिन साजरे होतायत, उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्रातील शिवदूत येथे येत आहेत. पदाधिकाऱ्यांचा हा मेळावा आहे. मुख्यमंत्र्यानी गेल्या दहा महिन्यांत काय केलं, हे जनतेसमोर आहे. अजून आम्ही भविष्यात काय करणार आहोत, हे मार्गदर्शनातून समजेल. आमच्या दृष्टीने आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा. वंदनीनय बाळासाहेबांचा विचार कशापद्धतीने विचार पुढे नेला, कशामुळे दोन वर्धापन दिन कशामुळे झाले हे सर्वांना माहितये. हा शिवसेना आणि भाजपासोबत नैसर्गिक युती झाल्यानतंर हा पहिलाच वर्धापन दिन आहे. बाकीचे वर्धापन दिन हे महाविकास आघाडीचे आहेत, अशी टीका उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली.

12:24 (IST) 19 Jun 2023
सहकार परिषदेतून आर्थिक विकासाचे प्रारुप; बोधचिन्ह अनावरणप्रसंगी डॉ. भारती पवार यांचे प्रतिपादन

नाशिक: महाराष्ट्राची सहकार परंपरा विकासात्मक असून तळागाळातील जनतेला आर्थिक सबलीकरणाचा तो मूलभूत आधार आहे.

सविस्तर वाचा...

11:56 (IST) 19 Jun 2023
"मूळ हिंदूत्त्वाची विचारधारा..."; शिंदे गटात गेल्यानंतर मनिषा कायंदे यांची प्रतिक्रिया

संघटनात्मक काम करणे माझा पिंड आहे. सभागृहाच्या आत आणि बाहेर पक्षाची भूमिका मी भक्कमपणे मांडली. काही गोष्टी पटत होत्या, काही नव्हत्या. पण पक्षप्रमुखांची साथ सोडायची नाही हा विषय नेहमी मनात आणि हृदयात होता. परंतु, विचारधारा आता भरकटतेय. ती विचारधारा, मूळ हिंदुत्त्वाची विचारधारा खूप दूर जातेय, ते मनाला पटत नव्हतं, अशी प्रतिक्रिया शिंदे गटात गेलेल्या विधानपरिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी आज दिली.

11:53 (IST) 19 Jun 2023
पुणे: कर्नाटकातील तोतया लष्करी अधिकारी पोलिसांच्या जाळ्यात

पुणे: कर्नाटकतील एका तोतया लष्करी अधिकाऱ्याला पोलिसांनी पाकडले.आहे. आरोपीने खडकी येथील एका दुकानदारकडून दोन गणवेश आणि साहित्य खरेदी करून त्यांची फसवणूक केली आहे.तसेच लष्कराच्या प्रमुख कार्यालयाचे परिसरात तो अधिकारी असल्याचे भासवत होता.

वाचा सविस्तर...

11:52 (IST) 19 Jun 2023
ठाकुर्ली रेल्वे स्थानकात चोरी करणारी महिला टिटवाळ्यातून अटक

डोंबिवली: ठाकुर्ली रेल्वे स्थानकात एका महिला प्रवाशाची सोन्याचे मंगळसूत्र असलेली पिशवी चोरणाऱ्या एका महिलेला कल्याण लोहमार्ग गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने टिटवाळा येथून गुरुवारी अटक केली. तिच्याकडून चार लाख २५ हजार रुपये किमतीचे चोरीचे सोन्याचे मंगळसूत्र पोलिसांनी हस्तगत केले.

वाचा सविस्तर...

11:47 (IST) 19 Jun 2023
ऑलिव्ह रिडले कासवाचा १२०० किलोमीटरचा प्रवास

सॅटेलाईट टॅग केलेल्या ‘बागेश्री’ या ऑलिव्ह रिडले कासवाने गुहागरपासून एका सरळ रेषेत तब्बल १२०० किलोमीटरचे अंतर कापले आहे. भारतीय वन्यजीव संस्था देहरादूनच्या सहकार्याने महाराष्ट्र वनविभागाच्या मँग्रोव्ह फाउंडेशनने सुरू केलेला हा संयुक्त संशोधन प्रकल्प आहे.

सविस्तर वाचा

Maharashtra Breaking News Live Updates

महाराष्ट् न्यूज लाइव्ह

Mumbai Maharashtra News Live Update राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा

Story img Loader