Mumbai Maharashtra News Updates, 04 September 2024 : महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रचारानिमित्त महायुती सरकारमधील नेते राज्यव्यापी दौरे करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी देखील वेगवेगळ्या यात्रा सुरू केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रमुख व ज्येष्ठ नेते शरद पवार हे सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. कोल्हापुरातून त्यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. दुसऱ्या बाजूला सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर राज्यातील विरोधक सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. त्याचबरोर बदलापूरमधील घटनेनंतर राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावरून विरोधक सरकारला धारेवर धरत आहेत. यासंबंधीच्या सर्व राजकीय घडामोडींवर आपलं या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून लक्ष असेल. राज्यासह देशभरातील राजकीय व सामाजिक घडामोडी तुम्हाला येथे पाहायला मिळतील.

Live Updates

Maharashtra News Today, 04 September 2024 : राज्यसह देशभरातील बातम्यांचा आढावा.

21:46 (IST) 4 Sep 2024
गडचिरोली : चिमुकल्या मुलांचा मृतदेह खांद्यावर घेऊन आई-वडिलांची १५ किमी पायपीट…

वेळेवर शववाहीका उपलब्ध नसल्याने मृतदेह खांद्यावर घेऊन जड पावलांनी १५ किलोमीटर पायपीट करत त्यांनी घर गाठले.

सविस्तर वाचा...

20:57 (IST) 4 Sep 2024
वसई: वकील संघटनांचे आंदोलन स्थगित; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे आश्वासन

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी गणेशोत्सवानंतर जागा नावावर करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

सविस्तर वाचा...

20:46 (IST) 4 Sep 2024
व्हेल माशाच्या उलटीची तस्करी प्रकरणी वन विभागाची मोठी कारवाई; चौघांना घेतले ताब्यात

या कारवाईत दोन वाहनांसह संशयित आरोपींना वनविभागाने ताब्यात घेतले.

सविस्तर वाचा...

20:36 (IST) 4 Sep 2024
वसई: भाजप कार्यकर्त्याला मारहाण, बविआच्या दोघांना अटक

समाजमाध्यमावर बदनामी केली म्हणून भाजप कार्यकर्ते प्रतीक चौधरी यांना बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यात गाठून मारहाण केली.

सविस्तर वाचा...

19:18 (IST) 4 Sep 2024
कल्याण: बलात्काराचा गुन्हा दाखल साईनाथ तारे यांना ठाकरे गटात प्रवेश दिल्याने तीव्र नाराजी

बलात्काराचा गुन्हा असलेल्या साईनाथ तारे यांना पक्षात प्रवेश दिल्याने शिवसेनेसह विरोधी पक्षातील पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सविस्तर वाचा...

18:40 (IST) 4 Sep 2024
अहमदनगर: देशासाठी शहीद झालेल्या व देश सेवा केलेल्या जवानांची स्मरण यात्रा

अहमदनगर: जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे अनुराधाताई नागवडे यांच्या अनुराज फाउंडेशन व श्री. छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा यांच्या संयुक्त विद्यमाने शहिद स्मरण यात्रा काढून तालुक्यातील शहीद जवानांच्या वीर माता वीर पत्नी तसेच आई-वडील व धर्मपत्नीचा यथोचित सन्मान करून शहीद जवानांप्रति आगळीवेगळे कृतज्ञता व्यक्त करण्यात आल्यामुळे आजी-माजी सैनिकांचे सर्व कुटुंबीय भारावून गेले होते. सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांच्या संकल्पनेतून व प्राचार्य डॉ.सतिषचंद्र सूर्यवंशी यांच्या पुढाकाराने या शहीद स्मरण यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय सैन्य दलात सेवा बजावत असताना शहीद झालेल्या हुतात्म्यांच्या प्रति आदरभाव व्यक्त करण्यासाठी व त्यांच्या कुटुंबियांचा यथोचित सन्मान करण्यासाठी सौ.अनुराधाताई नागवडे विचार मंच व श्री. छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा यांच्या संयुक्त विद्यमाने स्मरण यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील शहीद जवानांच्या गावी जाऊन त्यांच्या स्मारकाचे पूजन करून एनसीसी कॅडेट्स व सौ.अनुराधाताई नागवडे यांनी शहिदांच्या कुटुंबियांचा यथोचित सन्मान केला.

18:11 (IST) 4 Sep 2024
चंद्रपूर: ताडोबात रिसोर्टच्या नावावर फसवणूक

सदर आरोपी गुन्हा दाखल झाल्याच्या दिनांकापासून फरार असून कोणत्याही नागरिकाला याबाबत माहिती असल्यास किंवा आरोपी आढळून आल्यास त्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेला द्यावी, असे आवाहन पोलिस विभागाकडून करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा...

17:49 (IST) 4 Sep 2024
दसऱ्याच्या मुहूर्तावर तुळजाभवानी मंदिराचा जीर्णोद्धार; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येणार, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या मंदिर आणि मंदिराबाहेरील महत्वाची कामे हाती घेण्यात आली आहेत.

सविस्तर वाचा...

17:25 (IST) 4 Sep 2024
Job Vacancies In Mental Hospital : राज्यातील मनोरुग्णालयांमध्ये ५०० रिक्त पदे

मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्या रुग्णांवर उपचारासाठी राज्य सरकारने ठाणे, पुणे, नागपूर रत्नागिरी येथे मनोरुग्णालये सुरू केली आहेत. या मनोरुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी या रुग्णालयांमधील विविध प्रवर्गांतील ५०० पदे मागील अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत. सविस्तर वाचा…

17:11 (IST) 4 Sep 2024
छत्तीसगडमधील चकमकीत एका जहाल नेत्यासह ९ नक्षलावादी ठार

गडचिरोली : छत्तीसगड राज्यातील दंतेवाडा आणि बिजापूर जिल्ह्याच्या सीमेवर झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीत एका जहाल नेत्यासह नऊ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलीस जवानांना यश आले आहे.

सविस्तर...

17:09 (IST) 4 Sep 2024
नाशिकमध्ये खड्ड्यांविरोधातील आंदोलनात बैलगाडी, घोडेही रस्त्यावर

नाशिक : सहा महिन्यांपूर्वी डांबरीकरण झालेल्या शहरातील जेलरोडवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून वाहनधारकांना मार्गक्रमण करणे कठीण झाले आहे. अशा खड्डेमय रस्त्याने केवळ बैलगाडी, घोड्यांद्वारे मार्गस्थ होता येईल, हे दर्शविण्यासाठी शिवसेना ठाकरे गट बुधवारी थेट बैलगाड्या व घोडे घेऊन रस्त्यावर उतरला.

वाचा सविस्तर...

17:05 (IST) 4 Sep 2024
भाईंदर: वादात सापडलेल्या ‘महावीर भवनाचा’ कार्यक्रम जैन आचार्यांच्या उपस्थितीत संपन्न

अद्यापही या वास्तूला महावीर भवनाचे नाव देण्यात आलेले नसून ही भविष्यात सर्वांसाठी खुली राहणार असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला.

सविस्तर वाचा...

17:05 (IST) 4 Sep 2024
नवी मुंबई : कोपरखैरणे विभाग कार्यालय परिसरातही खड्डे, डासांचा प्रादुर्भाव; नागरिक, कर्मचाऱ्यांना पाठदुखीचा त्रास

पावसाच्या पाण्याचा निचरा व्यवस्थित न झाल्याने पाऊस पडून थांबला तरी दिवसभर आवारात तळे साचलेले असते.

सविस्तर वाचा...

16:51 (IST) 4 Sep 2024
डोंबिवलीतील केश कर्तनालयाचा नियमबाह्य ताबा घेणाऱ्या गाळे मालकाविरुध्द गुन्हा

डोंबिवलीतील घरडा सर्कल येथील सोनल बिझनेस पार्कमधील एका महिलेकडून चालविल्या जात असलेल्या केश कर्तनालयाचा नियमबाह्य ताबा घेणाऱ्या, या केश कर्तनालयाच्या गाळ्याची बनावट कागदपत्रे तयार करून महिलेची फसवणूक करून तिला गाळा रिकामा करण्यासाठी धमकावणाऱ्या गाळे मालका विरुध्द केश कर्तनालय चालक महिलेच्या तक्रारीवरून रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा…

16:50 (IST) 4 Sep 2024
कल्याण-डोंबिवलीत गणेशोत्सव मंडळांच्या मनमानीने प्रवासी हैराण

कल्याण, डोंबिवलीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे संध्याकाळी नोकरदार वर्ग घरी परतण्याच्या वेळी गणपती आगमन मिरवणुका ढोल ताशांच्या गजरात काढत असल्याने या संथगती मिरवणुकांमुळे काही दिवसांपासून कल्याण, डोंबिवली शहरे सकाळ, संध्याकाळ कोंडीत अडकत आहेत. सविस्तर वाचा…

16:49 (IST) 4 Sep 2024
महारेराचे ‘महाकृती’ संकेतस्थळ कार्यान्वित; संकेतस्थळाच्या वापराबाबत प्रशिक्षण सुरू

महारेराचे नवे ‘महाकृती’ संकेतस्थळ १ सप्टेंबरपासून कार्यान्वित झाले असून या संकेतस्थळाचा वापर प्रभावीपणे विकासक, तक्रारदार, ग्राहक, वकील आणि अन्य नागरिकांना करता यावा यासाठी महारेराकडून प्रशिक्षण दिले जात आहे. सविस्तर वाचा…

16:47 (IST) 4 Sep 2024
झोपडपट्टीमुक्त मुंबई हेच आमचे स्वप्न : मुख्यमंत्री, रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास अंतर्गत रहिवाशांना धनादेशाचे वाटप

आंतरराष्ट्रीय शहर म्हणून मुंबईचा विकास केला जात आहे. मुंबईला जगातील पहिल्या क्रमांकाचे शहर करण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारचे आहे. हे उद्दिष्ट साधण्यासाठी झोपडपट्टीमुक्त मुंबई करणे आवश्यक आहे. सविस्तर वाचा…

16:46 (IST) 4 Sep 2024
अपात्र ‘धारावी’करांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा; मिठागराची २५६ एकर जागा हस्तांतरित करण्यास केंद्राची परवानगी

धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत अपात्र रहिवाशांचे पुनर्वसन करण्यासाठी शहरातील मिठागरांची २५६ एकर जागा राज्य सरकारला हस्तांतरित करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे अपात्र रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता असून धारावी प्रकल्पाचे कामही प्रगतिपथावर जाणार आहे. सविस्तर वाचा…

16:45 (IST) 4 Sep 2024
ST Bus Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या धरणे आंदोलनाला व्यापक स्वरुप, गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांची गैरसोय!

Maharashtra ST Employee Strike राज्य परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांची पूर्तता न झाल्याने एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली गणेशोत्सव जवळ आलेला असताना मंगळवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. सविस्तर वाचा…

16:34 (IST) 4 Sep 2024
पुणे : गणेशोत्सवात जड वाहनांना मध्यभाागात बंदी

पुणे : गणेशोत्सवात मध्यभागातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

सविस्तर वाचा...

16:33 (IST) 4 Sep 2024
लोहमार्ग पोलीस मुख्यालयासमोर दुचाकीस्वार तरुणाची लूट, संगम पूल परिसरातील घटना

पुणे : दुचाकीस्वार तरुणाला धमकावून चोरट्यांनी त्याच्याकडील रोकड लुटल्याची घटना संगम पूल परिसरातील लोहमार्ग पोलीस मुख्यालयासमोर घडली.

वाचा सविस्तर...

16:18 (IST) 4 Sep 2024
पर्यावरणपूरक कागदी लगद्याच्या मूर्तींना मागणी

प्लास्टर ऑफ पॅरिस व शाडू मातीच्या गणेशमूर्तीपेक्षा महाग असून गणेशभक्तांकडून पर्यावरणस्नेही असलेल्या कागदी लगद्याच्या मूर्तींना अधिकची मागणी वाढली आहे.

सविस्तर वाचा...

16:08 (IST) 4 Sep 2024
३० पोपट, तीन कापशी घारी जप्त; भिवंडीजवळ पडघा येथील कारवाईत बसचालक, सहाय्यक अटकेत

मुंबई : काही दिवसांपूर्वी भिवंडीतील पडघा येथे मालेगावमधून क्रॉफर्ड मार्केटमध्ये नेण्यात येणारे ३० पोपट (रोझ-रिंग केलेले पॅराकीट्स) आणि तीन कापशी घारींची तस्करी करणारी पर्यटक बस ठाणे वनविभागाने पकडली. बसमधील पोपट आणि कापशी घारी जप्त केल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली असून, यामध्ये एक चालक आणि एक सहाय्यकाचा समावेश आहे.

वाचा सविस्तर...

16:07 (IST) 4 Sep 2024
अतिवृष्टीचे थैमान… बुलढाणा जिल्ह्यात पिकांची अतोनात नासाडी; सुपीक शेती खरडून गेली

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तीन तालुक्यासह जिल्ह्यातील तेरा महसूल मंडळातील लाखो ग्रामस्थांना अतिवृष्टीचे थैमान अनुभवयास मिळाले. २ सप्टेंबर रोजी झालेल्या कोसळधार पावसाने हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून सुपीक शेत जमीन खरडून वा वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे जन्मभराचे नुकसान झाले आहे.

वाचा सविस्तर...

15:56 (IST) 4 Sep 2024
नवी मुंबई: उद्याने, पदपथ, निवारा शेडमधील लोखंडी आसने चोरीला, गजबजलेल्या वाशीतील घटनेमुळे सीसीटीव्ही यंत्रणेबाबत साशंकता

पोलीस विभाग व नवी मुंबई महापालिका यांची व्यवस्था फक्त नावापुरती उरली की काय असा संताप नागरिक व्यक्त करू लागले आहेत.

सविस्तर वाचा...

15:53 (IST) 4 Sep 2024
जंगली महाराज रस्त्यावरील मेट्रोच्या पादचारी पुलामुळे नवा वाद? पुलाची उंची कमी असल्याबाबत गणेश मंडळांची नाराजी

पुणे : जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज उद्यान मेट्रो स्थानकाला जोडणारा पादचारी पूल बांधण्यात आला आहे. या पादचारी पुलाची उंची कमी असल्याने या पुलामुळे विसर्जन मिरवणुकीत अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याचे सांगत मंडळांनी नाराजी व्यक्त केली आहे.

वाचा सविस्तर...

15:46 (IST) 4 Sep 2024
पुण्याच्या खासदारांनी टोचले कान, म्हणाल्या, ‘आवाज कमी करा… ‘

पुणे : गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषण होणार नाही आणि श्री गणेशासमोर बीभत्स गाणी लावली जाणार नाहीत, याची काळजी घेण्याचे आवाहन भाजपच्या राज्यसभेच्या खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केले आहे.

सविस्तर वाचा...

15:41 (IST) 4 Sep 2024
‘सेझ’च्या जमिनी मूळ शेतकऱ्यांना परत द्या, सुनावणी करण्याचे उच्च न्यायालयाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ४ सप्टेंबरला होणार आहे. त्यामुळे सर्व सेझग्रस्त शेतकऱ्यांचे लक्ष आता या निकालाकडे लागले आहे.

सविस्तर वाचा...

15:26 (IST) 4 Sep 2024
नवी मुंबई: डिसेंबरमध्ये विमानतळावरून पहिले उड्डाण ‘सुखोई’चे, तीन दिवसांपासून धावपट्टीच्या विविध चाचण्या

विमानतळावरून तीन महिन्यांत सुखोई या हवाई दलाच्या लढाऊ विमानाचे उड्डाण होणार असल्याच्या बातमीमुळे नवी मुंबईच्या बांधकाम व्यवसायाला चालना मिळणार आहे.

सविस्तर वाचा...

15:19 (IST) 4 Sep 2024
‘लालपरी’ थांबलेलीच… एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच; लाखावर प्रवाशांचे हाल

बुलढाणा : महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने मंगळवार, ३ सप्टेंबर पासून पुकारण्यात आलेले आंदोलन दुसऱ्या दिवशीही कायम आहे. जिल्ह्यातील एसटी कामगार आणि कर्मचारी बहुसंख्येने सहभागी झाले. यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील एसटी बस वाहतूक जवळपास ठप्प झाली आहे. यापरिणामी ऐन सणासुदीच्या काळात जिल्ह्यातील लाखावर प्रावाश्यांची प्रचंड गैरसोय आणि हाल होत आहे.

वाचा सविस्तर...

Raj Thackeray post

राज ठाकरेंची पोस्ट (संग्रहित छायाचित्र)

शेतकऱ्यालाही ‘लाडकं’ म्हणा; राज ठाकरेंचं सरकारला आवाहन

राज्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे १.७० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचा सर्वाधिक फटका विदर्भ आणि मराठवाड्याला बसला आहे. एक आणि दोन सप्टेंबर रोजी मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती संकलित करण्याचे काम कृषी विभागाकडून अद्याप सुरू आहे. दरम्यान, यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. गणपतीच्या सणांत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे.

राज ठाकरे म्हणाले, “गेल्या काही दिवसांत मराठवाड्यात झालेल्या पावसाने, तिथल्या अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचं अमाप नुकसान झालं आहे. कित्येक पिकं अगदी काढणीला आलेली असताना वाहून गेली आहेत. डोळ्यासमोर उभं झालेलं पीक नष्ट होणं आणि ते देखील सणासुदीच्या तोंडावर, हे सहन करणं कठीण आहे. राज्यसरकारने तातडीने या नुकसानीचे पंचनामे करून, जितक्या लवकर नुकसान भरपाईची रक्कम देता येईल ते पहावं.”

“शेतकरी पण लाडका आहे हे दाखवून द्यावं. तसंच मराठवाड्यातील महाराष्ट्र सैनिकांनी देखील प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे झटपट होत आहेत ना, नसल्यास ते करायला लावून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल हे पहावं. यात अजून एक गोष्ट म्हणजे पावसाच्या पाण्याने जमीन ओली झालेली असते, आणि ती सुकायला वेळ लागतो, यामुळे लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वच जण आजारी पडतात. त्यामुळे ज्या घरांत पाणी शिरलं आहे अशा ठिकाणी प्लॅस्टिकच्या शीट्स पोहचतील किंवा जुने फ्लेक्स तरी पोहचतील हे बघावे! किमान त्या निमित्ताने तरी पुढारी जनतेच्या घरात पोहोचतील आणि आजपर्यंत आपलं वाटोळ कोणी केलं तेही जनतेला समजेल!”, असे आदेश राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिले आहेत.

Story img Loader