Mumbai Maharashtra News Updates, 04 September 2024 : महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रचारानिमित्त महायुती सरकारमधील नेते राज्यव्यापी दौरे करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी देखील वेगवेगळ्या यात्रा सुरू केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रमुख व ज्येष्ठ नेते शरद पवार हे सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. कोल्हापुरातून त्यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. दुसऱ्या बाजूला सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर राज्यातील विरोधक सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. त्याचबरोर बदलापूरमधील घटनेनंतर राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावरून विरोधक सरकारला धारेवर धरत आहेत. यासंबंधीच्या सर्व राजकीय घडामोडींवर आपलं या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून लक्ष असेल. राज्यासह देशभरातील राजकीय व सामाजिक घडामोडी तुम्हाला येथे पाहायला मिळतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Maharashtra News Today, 04 September 2024 : राज्यसह देशभरातील बातम्यांचा आढावा.

15:18 (IST) 4 Sep 2024
पुतळ्यांवरून वाद ! बुलढाण्यात शिवसेना-काँग्रेस नेत्यांमध्ये जुंपली…

बुलढाणा : कोकणातील मालवण येथे दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला. यामुळे सत्ताधारी महायुती आणि विरोधक असलेली महाविकास आघाडी यांच्यात जुंपली असून राज्यव्यापी संघर्ष उभा राहिला आहे. पंतप्रधान मोदी, राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सशर्त माफी मागितली असली तरी विरोधक आणि सत्ताधारी पक्ष यांच्यातील वाद शमत नसल्याचे चित्र आहे.

वाचा सविस्तर…

15:00 (IST) 4 Sep 2024
पुणे: मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांचे काँग्रेस भवनात आंदोलन, नाना पटोले यांना आंदोलनकर्त्यांचा घेराव

काँग्रेस भवन येथे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील प्रमुख नेतेमंडळी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

सविस्तर वाचा…

14:56 (IST) 4 Sep 2024
पुणे: गुलटेकडीमध्ये मध्यरात्री तरुणावर वार करुन निर्घुण खुन,भावाला वाचवायला गेला आणि जीव गमावला, पाच जणांना अटक

पुणे : पुणे शहरात गेल्या तीन दिवसात तीन खून झाले सत्र आहेत. मध्यरात्री गुलटेकडीतील डायस प्लॉट परिसरात मोक्कातून जामीनावर बाहेर आलेल्या गुंडांनी तरुणावर चाकूने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

सविस्तर वाचा…

14:39 (IST) 4 Sep 2024
चिंचवड विधासभेवरून अश्विनी जगताप आणि शंकर जगताप यांच्यात समझोता; शंकर जगताप निवडणूक लढवणार?

चिंचवडच्या विधानसभा मतदारसंघात जगताप कुटुंबातील कुठला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार यावरून दीर आणि भावजय मध्ये रस्सीखेच सुरू होती.

सविस्तर वाचा…

14:25 (IST) 4 Sep 2024
नालासोपार्‍यातील विद्यार्थीनीवर बलात्कार प्रकरण: आरोपींच्या कलमांत वाढ, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश

९ वीत शिकणार्‍या १४ वर्षीय विद्यार्थीनीवर शाळेतील शिक्षक अमित दुबे हा मागील ५ महिन्यांपासून धमकावून बलात्कार करत होता.

सविस्तर वाचा…

14:24 (IST) 4 Sep 2024
शहरबात: समित्या आहेत, सुसंवादाचं काय?

मुलांना आपल्या पालकांशिवाय अगदी मोकळेपणाने शिक्षकांकडे व्यक्त होता येतं किंवा शिक्षकांना मुलांमधील बदल टिपता येत असतात.

सविस्तर वाचा…

14:23 (IST) 4 Sep 2024
पुणे : धक्कादायक एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ महिलेच्या घरात शिरून जीवे मारण्याचा प्रयत्न, गजबलेल्या गणेश पेठेतील घटना; आरोपी अटकेत

पुणे : ज्येष्ठ महिलेच्या घरात शिरून तिला जीवे मारण्याच्या प्रयत्न करणाऱ्या एकाला फरासखाना पोलिसांनी अटक केली.

सविस्तर वाचा…

14:17 (IST) 4 Sep 2024
केंद्रात, राज्यात भाजप सत्तेत, पण नागपुरात ‘इनकमिंग’ काँग्रेसमध्ये!

नागपूर : सर्व साधारणपणे सतेत असलेल्या पक्षात इतर पक्षाचे नेते प्रवेश करतात. दोन वर्षाचा अपवाद सोडला तर २०१४ पासून भाजप सत्तेत आहे. २०१४ ते २०१९ या दरम्यान भाजपमध्ये इनकमिंग सुरू होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा महाराष्ट्रात पराभव झाला. नागपुरात मात्र भाजपचा उमेदवार जिंकला. मात्र इतर पक्षातून काँग्रेसमध्ये येणऱ्यांची संख्या वाढली आहे. विशेषत: पश्चिम नागपूरमध्ये हे चित्र आहे.

वाचा सविस्तर…

14:16 (IST) 4 Sep 2024
पीओपी मूर्तींच्या पर्यायाचा प्रश्न अनुत्तरितच

मुंबई : प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तींवर बंदी असली तरी त्याला परवडणारा पर्याय अद्याप समोर आलेला नाही. पीओपीला पर्याय सुचवण्यासाठी राज्य सरकारने मे २०२३ मध्ये नेमलेल्या समितीने आपला अहवाल सादर केलेला नाही. तीन महिन्यांत अहवाल सादर करण्याबाबत शासन निर्णय आलेला असताना दीड वर्ष झाले तरी हा अहवाल आलेला नाही. त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिस नको तर मग दुसरे काय हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

वाचा सविस्तर…

13:54 (IST) 4 Sep 2024
नाशिक: लाचखोर अधिकाऱ्याला सीबीआय कोठडी

तक्रारदाराकडून एक लाख रुपयांची लाच मागताना व स्वीकारताना वरिष्ठ विपणन व्यवस्थापक विशाल तळवडकरला रंगेहात पकडण्यात आले.

सविस्तर वाचा…

13:40 (IST) 4 Sep 2024
ठाणे :आमदार नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

ठाणे : मुस्लिम धर्मियांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांच्याविरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा…

13:38 (IST) 4 Sep 2024
मुंबई : डॉ. आंबेडकर यांचे छायाचित्र फाडल्याचे प्रकरण, सगळे गुन्हे एकत्रित करण्याच्या मागणीसाठी आव्हाड उच्च न्यायालयात

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडल्याच्या आरोपाप्रकरणी विविध ठिकाणी दाखल केलेले गुन्हे एकत्र करण्याच्या मागणीसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

सविस्तर वाचा…

13:36 (IST) 4 Sep 2024
वसईत गणेशोत्सव की फलकोत्सव? फलकांमुळे शहर विद्रूप, रस्ता अडवून मंडप उभारणी

सध्या जागाजोगी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडपे उभारली आहेत. त्या परिसरात जाहिरातदार आणि राजकीय पक्षांचे फलक लावण्यात आले आहेत.

सविस्तर वाचा…

13:35 (IST) 4 Sep 2024
नाशिक: खड्ड्यांसह नागरी समस्यांविषयी भाजप आमदारांचा मनपा आयुक्तांना इशारा

भाजप आमदार देवयानी फरांदे आणि राहुल ढिकले यांनी आयुक्तांची भेट घेत प्रशासनाच्या अनागोंदी कारभारावर संताप व्यक्त केला.

सविस्तर वाचा…

12:48 (IST) 4 Sep 2024
Video : गौतमी पाटीलसोबत आमदार संदीप धुर्वे थिरकले; जिल्ह्यात पूरस्थिती अन्…

यवतमाळ : जिल्ह्यात सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली असताना भाजपचे नेते आणि पदाधिकारी गौतमी पाटीलच्या नाच गाण्यात दंग असल्याचे चित्र उमरखेडकरांनी अनुभवले. आपल्या पिळदार मिश्यावर ताव मारण्यासाठी चर्चेत राहणारे आर्णी- केळापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलसोबत ठेका धरल्याने भाजपला जनतेच्या अडचणीशी देणे घेणे नसल्याची टीका विरोधकांनी केली आहे.

वाचा सविस्तर…

12:17 (IST) 4 Sep 2024
पिंपरी पोलिसांनी तीन पिस्तुल आणि चार जिवंत काडतुसे केली जप्त; तडीपार गुंड जेरबंद

पिंपरी : पिंपरी पोलिसांनी पिस्तूल बाळगणाऱ्या तिघांना अटक केली आहे. यात तडीपार गुंडाचा देखील समावेश आहे. जुनेद जमील शेख याच्याकडून दोन पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. तर दुसऱ्या कारवाईत तडीपार गुंड गणेश उर्फ मॅड कांबळे कडून एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे पिंपरी पोलिसांनी जप्त केली आहेत. दोघांकडून एकूण तीन पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे मिळाली आहेत.

वाचा सविस्तर…

12:16 (IST) 4 Sep 2024
पुण्यात डेंग्यूसोबत चिकुनगुन्याचा ‘ताप’! रुग्णसंख्येत दुपटीने वाढ; आरोग्य विभाग धास्तावला

पुणे : शहरात डासांपासून पसरणाऱ्या आजारांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. गेल्या महिन्यात डेंग्यूचे दररोज सरासरी ३८ रुग्ण आढळले असून, एकूण १ हजार १५० संशयित रुग्ण आढळून आले आहेत. याचबरोबर चिकुनगुन्याचे ऑगस्टमध्ये ५२ रुग्ण आढळले आहे. एकाच वेळी डेंग्यू आणि चिकुनगुन्याचे रुग्ण वाढू लागल्याने आरोग्ययंत्रणांची चिंता वाढली आहे. यामुळे डास प्रतिबंधक उपाययोजनांवर भर दिला जात आहे.

वाचा सविस्तर…

12:15 (IST) 4 Sep 2024
ठाणे : अवघ्या सहा महिन्यांत अपघातांत १३५ जणांचा मृत्यू

ठाणे : अवजड वाहनांचा भार, ठिकठिकाणी करण्यात आलेले वाहतुक बदल यामुळे मागील काही महिन्यांपासून ठाणेकर कोंडीच्या विळख्यात अडकले आहे. वाहतुक कोंडी झाल्यास शहरात अपघाताचे प्रमाण कमी होते असा तर्क पोलिसांचा असतो. परंतु जानेवारी ते जून या अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत ठाणे आयुक्ताल क्षेत्रात १३५ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. १३५ पैकी २८ मृत्यू हे भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. त्यामुळे भिवंडी शहरातील नारपोली भाग हा जिल्ह्यातील अपघाताचे केंद्र ठरत असल्याचे चित्र आहे.

वाचा सविस्तर…

12:14 (IST) 4 Sep 2024
एमबीबीसच्या विद्यार्थ्यांना आता ‘याचा’ही अभ्यास करावा लागणार, मिळणार विशेष गुण

वर्धा : शिक्षणाचे विविध पैलू असतात. त्यात विज्ञान, तांत्रिक, वैद्यकीय व तत्सम व्यावसायिक शाखा केवळ विषयाशी तर अन्य पारंपरिक शाखा मूल्य शिक्षणाशी पण जुळल्या असतात. आता यापैकी वैद्यकीय शिक्षणात नैतिक मूल्य शिक्षण पण अनिवार्य करण्यात आले आहे. या पण शाखेत हा विषय वाचनपुरता होता. आता तो प्रश्नपत्रिकेत राहणार. म्हणजे त्यावर गुण मिळणार.

वाचा सविस्तर…

11:39 (IST) 4 Sep 2024
मोठ्या गृहप्रकल्पांना पाणीपुरवठ्याची जबाबदारी महापालिकांची?

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) कार्यक्षेत्रातील बांधकाम आणि समूह गृहबांधणी प्रकल्पांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका तसेच नगरपालिकांनी घेतली आहे. त्यामुळे संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ दिल्यानंतरच बांधकाम प्रस्ताव आणि भोगवटा प्रमाणपत्र यापुढे मंजूर केले जाणार आहेत.

वाचा सविस्तर…

11:36 (IST) 4 Sep 2024
पुणे : पालिकेने नऊ दिवसांत बुजविले ४९९ खड्डे, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची मलमपट्टी

पुणे : शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविले जात नसल्याबाबत पालिका प्रशासनावर टीकेची झोड उठल्यानंतर पथ विभागाने रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे.

सविस्तर वाचा…

11:34 (IST) 4 Sep 2024
ठाणे: घोडबंदर भागात अवजड वाहने उलटल्याने कोंडी, वाहनांच्या रांगा

ठाणे : घोडबंदर येथील पातलीपाडा उड्डाणपूलाजवळ दोन अवजड वाहने उलटल्याने घोडबंदर मार्गावरील वाहतुक ठप्प झाली आहे.

सविस्तर वाचा…

11:09 (IST) 4 Sep 2024
मविआचं मुख्यमंत्रिपदाचं घोडं कुठे अडलंय? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

शरद पवार यांनी काही वेळापूर्वी कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांना विचारण्यत आलं की विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. मात्र, महाविकास आघाडीने अद्याप त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर केलेला नाही. मविआचं मुख्यमंत्रिपदाचं घोडं कुठे अडलंय? त्यावर शरद पवार म्हणाले, आमचं घोडं अजिबात अडलेलं नाही. सध्या मुख्यमंत्रिपदाबाबतचा विचार करण्याची आवश्यकता नाही. अनेकदा असं घडलंय की निवडणुका झाल्यानंतर, बहुमत मिळाल्यावर नेतृत्व कोणी करायचा याबाबतचा निर्णय झाला आहे. आम्ही देखील तसंच करू शकतो.

राज ठाकरेंची पोस्ट (संग्रहित छायाचित्र)

शेतकऱ्यालाही ‘लाडकं’ म्हणा; राज ठाकरेंचं सरकारला आवाहन

राज्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे १.७० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचा सर्वाधिक फटका विदर्भ आणि मराठवाड्याला बसला आहे. एक आणि दोन सप्टेंबर रोजी मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती संकलित करण्याचे काम कृषी विभागाकडून अद्याप सुरू आहे. दरम्यान, यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. गणपतीच्या सणांत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे.

राज ठाकरे म्हणाले, “गेल्या काही दिवसांत मराठवाड्यात झालेल्या पावसाने, तिथल्या अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचं अमाप नुकसान झालं आहे. कित्येक पिकं अगदी काढणीला आलेली असताना वाहून गेली आहेत. डोळ्यासमोर उभं झालेलं पीक नष्ट होणं आणि ते देखील सणासुदीच्या तोंडावर, हे सहन करणं कठीण आहे. राज्यसरकारने तातडीने या नुकसानीचे पंचनामे करून, जितक्या लवकर नुकसान भरपाईची रक्कम देता येईल ते पहावं.”

“शेतकरी पण लाडका आहे हे दाखवून द्यावं. तसंच मराठवाड्यातील महाराष्ट्र सैनिकांनी देखील प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे झटपट होत आहेत ना, नसल्यास ते करायला लावून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल हे पहावं. यात अजून एक गोष्ट म्हणजे पावसाच्या पाण्याने जमीन ओली झालेली असते, आणि ती सुकायला वेळ लागतो, यामुळे लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वच जण आजारी पडतात. त्यामुळे ज्या घरांत पाणी शिरलं आहे अशा ठिकाणी प्लॅस्टिकच्या शीट्स पोहचतील किंवा जुने फ्लेक्स तरी पोहचतील हे बघावे! किमान त्या निमित्ताने तरी पुढारी जनतेच्या घरात पोहोचतील आणि आजपर्यंत आपलं वाटोळ कोणी केलं तेही जनतेला समजेल!”, असे आदेश राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिले आहेत.