Mumbai Maharashtra News Updates, 03 September 2024 : राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू झालेली असताना एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने शहरात राहणारी नोकरदार मंडळी गावाकडे जातात. त्यासाठी एसटीची पूर्ण क्षमतेने बुकिंग झालेली असताना कर्मचारी संपावर गेल्याने प्रवाशांचे हाल होणार आहेत. आज एकूण ३५ आगारांमध्ये संप पुकारण्यात आल्याने पुणे, कोकणसह अनेक आगारातील प्रवाशांना संपाचा सामना करावा लागत आहे. तर, दुसरीकडे  भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे आज शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. आज कोल्हापूरच्या कागलमध्ये शरद पवार मेळावा घेणार आहेत. याच मेळाव्यात समरजित घाटगे यांचा पक्षप्रवेश होणार आहे. तसंच, राज्यातील विधानसभेच्या निवडणुका पुढे ढकलल्या असल्या तरीही जागावाटप, पक्षबांधणीला जोर आला आहे. यासह राज्यातील राजकारण, समाजकारण, हवामान अपडेट्स जाणून घेऊयात.

Live Updates

Maharashtra News Today, 03 September 2024 :  महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

20:27 (IST) 3 Sep 2024
अनुंकपा तत्त्वावरील शिक्षकांना टीईटी अनिवार्यतेबाबत मोठा निर्णय… आता काय होणार?

२० जानेवारी २०१६च्या शासन निर्णयानुसार अनुंकपा तत्त्वावर नियुक्त शिक्षण सेवकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्याबाबत घेतलेला निर्णय एनसीटीईच्या निर्णयाशी विसंगत आहे.

सविस्तर वाचा...

20:26 (IST) 3 Sep 2024
नाशिक: दोन महिन्यांपासून फरार संशयित ताब्यात

जीवे मारण्याचा प्रयत्न करून दोन महिन्यांपासून फरार असलेल्या संशयिताला गुंडा विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे.

सविस्तर वाचा...

20:25 (IST) 3 Sep 2024
नारीशक्ती विकासावर राष्ट्रपतींचे भाष्य; म्हणाल्या, “हा देशाच्या विकासाचा मापदंड…”

विविध क्षेत्रात मुली प्रगती करत आहेत. नारीशक्तीचा विचार देशवासियांसाठी अभिमानाची बाब आहे.

सविस्तर वाचा...

20:25 (IST) 3 Sep 2024
नागपूरच्या प्रसिद्ध मारबत मिरवणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद, महिला अत्याचाराचा निषेध करणारे बडगे

विदर्भाचे वैभव असलेली आणि पौराणिक, ऐतिहासिक व सामाजिक महत्त्व असलेल्या मारबत- बडग्या मिरवणुकीला नागपूरकरांच्या अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

सविस्तर वाचा...

17:52 (IST) 3 Sep 2024
पुणे: गादी कारखान्यातील यंत्रात अडकून कामगाराचा मृत्यू, दुर्घटनेत एक कामगार जखमी; यंत्रचालकाविरुद्ध गुन्हा

गादी कारखान्यातील यंत्रात अडकून (फोम मिक्सर मशीन) कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना सासवड रस्त्यावरील वडकी नाला भागात घडली.

सविस्तर वाचा...

17:52 (IST) 3 Sep 2024
कालबाह्य सौंदर्य प्रसाधनांची भिवंडीत विक्री

कालबाह्य सौंदर्य प्रसाधनांच्या वस्तूंची साठवणूक करून त्यावर नव्याने स्टीकर चिटकवून त्याची विक्री करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सविस्तर वाचा...

17:51 (IST) 3 Sep 2024
नवी मुंबई: गणेशोत्सवापूर्वी खड्डेदुरुस्तीला वेग, ९५ टक्के खड्डेदुरुस्तीचा पालिकेचा दावा

खड्डे दुरुस्ती करताना शास्त्रीय पद्धतीने खड्ड्यांच्या आकारमानानुसार छोट्या खड्ड्यांसाठी कोल्डमिक्स तसेच मोठा पॅच असल्यास त्याच्या दुरुस्तीसाठी डांबरीकरण किंवा मास्टिकचा वापर केला जात आहे.

सविस्तर वाचा...

17:16 (IST) 3 Sep 2024
VIDEO : "जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा", राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची विधानसभेत गर्जना!

https://www.youtube.com/live/PZffJajGr4M

16:21 (IST) 3 Sep 2024
बुलेट ट्रेन प्रकल्पातील स्थानकांना गती, महाराष्ट्रातील स्थानकांची कामे हाती

मुंबई : मुंबई-अहमदाबाद या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुरू असून आता प्रकल्पातील स्थानकांचे काम वेगाने केले जात आहे. गुजरातमधील पाच स्थानकांची कामे अंतिम टप्प्यात असून महाराष्ट्रातील तीन स्थानकांच्या कामाला सुरुवात झाली आहे. बोईसर, विरार स्थानकांची पायाभरणी सुरू आहे.

वाचा सविस्तर...

16:21 (IST) 3 Sep 2024
“भ्रष्टाचारी महायुती सरकारला घेऊन जा गे मारबत…” गोंदिया युवक काँग्रेसकडून निषेध

गोंदिया : भ्रष्टाचारी महायुती सरकारला घेऊन जा..गे.. मारबत…. महाराजांचा अनादर करणाऱ्या सरकारला घेऊन जा..गे.. मारबत. बदलापूर, आकोलातील चिमुकल्या विद्यार्थिनीची रक्षा न करू शकणाऱ्या खोके सरकारला घेऊन जा.. गे.. मारबत.. अश्या आगळ्या वेगळ्या राजकीय घोषणा देत आज मंगळवार ०३ सप्टेंबर रोजी गोंदिया जिल्हा काँग्रेस, युवक काँग्रेस तसेच एन.एस. यू.आय.च्या कार्यकर्त्यांनी मारबतच्या दिवशी गोंदिया जिल्हा काँग्रेस सरचिटणीस निलम हलमारे मित्र परिवाराने गोंदिया शहरातील सिविल लाइन, मामा चौक, शास्त्रीवॉर्ड,गांधी वार्ड येथे मारबत ची मिरवणूक काढली.

वाचा सविस्तर...

16:20 (IST) 3 Sep 2024
बुलढाणा: मराठवाड्यात कोसळधार, खडकपूर्णा ‘ओव्हरफलो’; ३७ गावांना धोका…

बुलढाणा: ऑगस्ट महिना अखेर कोरडेच असलेले खडकपूर्णा धरण मराठवाड्यात झालेल्या संततधार दमदार पावसाने अखेर तुडुंब भरले! हे धरण ओव्हर फ्लो झाले असून संत चोखासागर असे नाव असलेल्या या प्रकल्पाचे तब्बल १९ दरवाजे उघडण्यात आले आहे. यामुळे नदीकाठच्या तब्बल ३१ गाव खेड्यांना पुराचा धोका निर्माण झाला असून गावांत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

वाचा सविस्तर...

16:19 (IST) 3 Sep 2024
नागपूरच्या माऊंट कार्मेल शाळेतील विद्यार्थिनींची धोकादायक पायपीट; विस्कळीत वाहतुकीमुळे…

नागपूर : शहरातील सर्वाधिक वर्दळीचा चौक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजनी चौकातील माऊंट कार्मेल शाळेतील विद्यार्थिनींची धोकादायक पायपीट सुरू आहे. शाळेला लागून असलेल्या गजबजलेल्या चौकातून मुलींना शाळेची वाट काढावी लागते. त्यामुळे पालकांचा जीव सतत टांगणीला लागलेला असतो.

वाचा सविस्तर...

16:19 (IST) 3 Sep 2024
रायगड जिल्हा परिषदेच्या धोकादायक शाळा सुरूच

पनवेल : नऊ महिन्यांपूर्वी राज्याच्या ग्रामविकास मंत्र्यांनी पनवेल महापालिका क्षेत्रातील रायगड जिल्हा परिषदेच्या ५१ शाळांच्या हस्तांतरणासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश रायगड जिल्हा परिषद आणि पनवेल महापालिकेला दिले. परंतु ९ महिन्यांनंतरही याबाबतचा शासन निर्णयाचा आदेश न झाल्याने हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही.

वाचा सविस्तर...

16:19 (IST) 3 Sep 2024
२१४ गुंतवणूकदारांची ३५ कोटींची फसवणूक; चार कंपन्यासह २५ जणांविरोधात गुन्हा

गुंतवणूकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून २१४ गुंतवणूकदारांची ३५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली चार कंपन्या, संचालक व दलाल अशा २५ जणांविरोधात अंधेरी येथील अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा…

16:18 (IST) 3 Sep 2024
ज्येष्ठ नागरिकांच्या गृहनिर्माणासाठी विकासकांना चटईक्षेत्रफळात सवलत! राज्याकडून मसुदा जाहीर; हरकती-सूचनांसाठी २१ सप्टेंबरपर्यंत मुदत

केंद्र शासनाने सेवानिवृत्त आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी गृहनिर्माण धोरण जाहीर केल्यानंतर महाराष्ट्र गृहनिर्माण स्थावर संपदा प्राधिकरणाने (महारेरा)  आदर्श मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. आता राज्य शासनाने याबाबत पुढाकार घेत ज्येष्ठ नागरिकांसाठी  धोरणाचा मसुदा जारी केला आहे. सविस्तर वाचा…

16:16 (IST) 3 Sep 2024
दोषमुक्त करून प्रकरण निकाली काढावे; नाट्यनिर्मात्याची फसवणूक प्रकरण, जरांगेंच्या वकिलांचा युक्तिवाद

नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातून आम्हाला दोषमुक्त करून प्रकरण निकाली काढावे, असा अर्ज मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी मंगळवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात केला आहे. सविस्तर वाचा…

16:15 (IST) 3 Sep 2024
पावसाचे संकट आणखी गडद होणार!; वादळी वारा अन् विजांच्या कडकडाटासह…

राज्यात पावसाने गेल्या तीन दिवसांपासून जोर धरला असतानाच आता हवामान खात्याने आणखी दोन दिवस विदर्भ तसेच मराठवाड्याला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सविस्तर वाचा…

16:09 (IST) 3 Sep 2024
सोलापूर रस्त्यावर डंपरची मोटारीला धडक; पिता-पुत्राचा मृत्यू, एकाच कुटुंबातील तिघे गंभीर जखमी

पुणे : भरधाव डंपरच्या धडकेत मोटारीतील पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावरील थेऊर फाटा परिसरात घडली.

सविस्तर वाचा...

15:51 (IST) 3 Sep 2024
कल्याण-डोंबिवलीत दोन महिन्यांत डेंग्यू, मलेरियाचे ३८७ रूग्ण; संशयित २० हजार नागरिकांच्या रक्ताची तपासणी

मागील दोन महिन्याच्या जुलै, ऑगस्टमध्ये कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत डेंग्यूचे २८८, मलेरियाचे ९९ रूग्ण आढळून आले.

सविस्तर वाचा...

15:04 (IST) 3 Sep 2024
उरण: पिरवाडी किनारा पुन्हा निखळत असल्याने अपघाताच्या शक्यतेत वाढ

पिरवाडी समुद्र किनाऱ्यावरील बंधाऱ्याचे मोठं मोठे दगड पुन्हा एकदा निखळू लागले आहेत.

सविस्तर वाचा...

15:00 (IST) 3 Sep 2024
मुंबई : महापालिकेचा ‘रेबीजमुक्त मुंबई’ संकल्प, २८ सप्टेंबरपासून लसीकरण मोहीम

मुंबई : श्वानाच्या चाव्यामुळे नागरिकांना होणाऱ्या रेबीज या प्राणघातक रोगापासून बचाव करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने ‘रेबीजमुक्त मुंबई’संकल्प सोडला असून येत्या २८ सप्टेंबरपासून मुंबईमध्ये व्यापक प्रमाणावर लसीकरण मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा...

14:28 (IST) 3 Sep 2024
मुंबई :आयआयटी मुंबईमध्ये ७५ टक्के विद्यार्थ्यांना नोकऱ्या

मुंबई :आयआयटी मुंबईतील 75 टक्के विद्यार्थ्यांना गेल्या शैक्षणिक वर्षात नोकरी मेळाव्यातून (कॅम्पस प्लेसमेंट) राष्ट्रीय, बहुराष्ट्रीय कंपन्यात नोकरी मिळाली आहे.

सविस्तर वाचा...

14:03 (IST) 3 Sep 2024
कल्याण रेल्वे स्थानक भागातील फेरीवाल्यांची, पाठराखण करणारा पथक प्रमुख निलंबित

कल्याण : कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागातील फेरीवाले हटविण्यात टाळाटाळ करून त्यांची पाठराखण करणारा कल्याण डोंबिवली पालिकेच्या क प्रभागातील फेरीवाला हटाव पथकाचा प्रमुख अरूण म्हात्रे यांना आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी मंगळवारी तडकाफडकी निलंबित केले.

सविस्तर वाचा...

13:59 (IST) 3 Sep 2024
‘शिवसंग्राम’मध्ये उभी फूट; ‘स्वराज्य संग्राम’ची घोषणा

‘शिवसंग्राम’चे प्रदेशाध्यक्ष तथा वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष तानाजी शिंदे यांनी त्यांच्या ‘स्वराज्य संग्राम’ या नव्या संघटनेची घोषणा केली.

सविस्तर वाचा...

13:40 (IST) 3 Sep 2024
पुनर्विकास प्रकल्पात राजकीय झुंडशाही? ठरावीक बिल्डर, कंत्राटदारांसाठी दबावाचा आरोप

नवी मुंबईतील वेगवेगळ्या उपनगरांमध्ये सुरू असलेल्या पुनर्विकास प्रकल्पांचा मुद्दा येत्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा एकदा तापू लागला आहे.

सविस्तर वाचा...

13:27 (IST) 3 Sep 2024
"लाडकी बहीण योजना आली, पण एसटी कर्मचारी राज्य सरकारचा लाडका का नाही?" संपकऱ्यांचा प्रश्न

२०१६ पासून एसटी कामगारांच्या वेतनाचा प्रश्न प्रलंबित आहे. महागाई भत्ता, पगारवाढीचे २ हजार कोटी राज्य सरकारकडून येणं बाकी आहे. अशातच ७ ऑगस्टला बैठक घेतली होती. एसटी कामगारांच्या वेतनावर २० तारखेला बैठक घेतो असं लेखी आश्वासन दिलं होतं. परंतु, आता ३ तारीख आली तरीही बैठक घेतली नाही. त्यामुळे कामगारांचा राज्य सरकारवर रोष आहे. महिलांसाठी अर्धतिकिट सुविधा, लाडकी बहीण योजना झाली, लाडका भाऊ योजना झाली. एसटी कामगारच राज्य सरकारचा लाडका का नाही. माझी राज्य सरकारला विनंती आहे या वेतनाबाबत बैठक लावून कायमचा प्रश्न निकाली लावा. ९०० एसटी बसेसपैकी सकाळपासून

13:22 (IST) 3 Sep 2024
नागपूर : मंकीपॉक्स वाढतोय.. पण राज्यात आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी प्रतिबंधात्मक लस नाही…

नागपूर : जगभरात मंकीपॉक्स रुग्ण वाढत असल्याने काही प्रगत देशात आरोग्य कर्मचाऱ्यांना मंकीपाॅक्स प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे. परंतु, भारतात अद्याप आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी अशी लस उपलब्ध नाही.

सविस्तर...

13:20 (IST) 3 Sep 2024
बुलेट ट्रेन प्रकल्पातील स्थानकांना गती, महाराष्ट्रातील स्थानकांची कामे हाती

मुंबई : मुंबई-अहमदाबाद या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुरू असून आता प्रकल्पातील स्थानकांचे काम वेगाने केले जात आहे. गुजरातमधील पाच स्थानकांची कामे अंतिम टप्प्यात असून महाराष्ट्रातील तीन स्थानकांच्या कामाला सुरुवात झाली आहे. बोईसर, विरार स्थानकांची पायाभरणी सुरू आहे.

वाचा सविस्तर...

13:20 (IST) 3 Sep 2024
यवतमाळ : बाबाजी दाते कला, वाणिज्य महाविद्यालयावर शासनाची कृपादृष्टी! गुणांकन कमी असतानाही…

यवतमाळ : राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रूसा) मार्फत उच्च शिक्षणात आमुलाग्र बदल व्हावा या उद्देशाने गुणवत्ताप्राप्त महाविद्यालयांना पाच कोटी रूपयांचे अनुदान दिले जाते. यवतमाळ जिल्ह्यातून एकमेव बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयास हे अनुदान मंजूर झाले. मात्र या महाविद्यालयाचे गुणांकन कमी असुनही अनुदान देण्यात आल्याची बाब उजेडात आल्याने उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या आदेशानंतर ‘रूसा’ने महाविद्यालयाची चौकशी सुरू केली आहे.

वाचा सविस्तर...

Maharashtra News Live Today, 03 September 2024 :  महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर