Mumbai Maharashtra News Updates, 03 September 2024 : राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू झालेली असताना एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने शहरात राहणारी नोकरदार मंडळी गावाकडे जातात. त्यासाठी एसटीची पूर्ण क्षमतेने बुकिंग झालेली असताना कर्मचारी संपावर गेल्याने प्रवाशांचे हाल होणार आहेत. आज एकूण ३५ आगारांमध्ये संप पुकारण्यात आल्याने पुणे, कोकणसह अनेक आगारातील प्रवाशांना संपाचा सामना करावा लागत आहे. तर, दुसरीकडे भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे आज शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. आज कोल्हापूरच्या कागलमध्ये शरद पवार मेळावा घेणार आहेत. याच मेळाव्यात समरजित घाटगे यांचा पक्षप्रवेश होणार आहे. तसंच, राज्यातील विधानसभेच्या निवडणुका पुढे ढकलल्या असल्या तरीही जागावाटप, पक्षबांधणीला जोर आला आहे. यासह राज्यातील राजकारण, समाजकारण, हवामान अपडेट्स जाणून घेऊयात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra News Today, 03 September 2024 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज हे भरकटलेला देशभक्त व दगाबाज लुटारू होते असे म्हणत महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान करणाऱ्या जवाहरलाल नेहरू यांच्या वक्तव्याचे काँग्रेस कोणते प्रायश्चित्त घेणार?, असा सवाल भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मंगळवारी राहुल गांधी यांना केला. शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणण्याची गरज नाही असे म्हणणारे शरद पवार आणि मध्य प्रदेशात शिवरायांचे स्मारक उद्ध्वस्त होत असताना काँग्रेसच्या कारवाईविरोधात मूग गिळून स्वस्थ बसणारे उद्धव ठाकरे यांनी शिवरायांच्या अस्मितेचे राजकारण करून महाराष्ट्रात अस्वस्थता माजविण्याचा कट शिजविला आहे, असा आरोप त्यांनी केला.
एसटी कर्मचाऱ्यांनी संप करू नये. मोठ मोठ्या प्रकरणात आपण चर्चा करून सकारात्मक तोडगा काढलेला आहे. त्यामुळे आपलाही प्रश्न चर्चेतून सुटेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे</p>
पुणे : किशोरवयीन मुलांमध्ये असुरक्षित शारीरिक संबंधांचे वाढते प्रमाण चिंताजनक बनले आहे. अशा मुलांकडून कंडोमचा वापर २०१४ पासून २०२२ पर्यंत लक्षणीयरीत्या कमी झाला आहे.
डोंबिवली : दुबईतील दिनार चलन स्वस्तात मिळते म्हणून डोंबिवली एमआयडीसीत राहणाऱ्या एका घाऊक औषध विक्रेत्याने तीन भामट्यांकडून हे चलन आपल्या मित्रांच्या ओळखीने चार लाख रूपयांच्या भारतीय चलनात अदलाबदलीने एका बंद पिशवीतून ताब्यात घेतले. या व्यवहारानंतर औषध विक्रेत्याने पिशवीत पाहिले तर नोटांच्या आकाराची दिनार चलनाची पेपर रद्दीची कागदी पुडकी आढळून आली.
मुंबई : कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने एसटी कामगार संयुक्त कृती समितीने मंगळवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे राज्यातील २५१ आगारापैकी ३५ आगारे पूर्णतः बंद झाली आहेत. तर, इतर भागातील एसटीची सेवा विस्कळीत झाली आहे.
अलिबाग : रायगड जिल्ह्यात पावसाने यंदा वार्षिक सरासरी ओलांडली आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत सरासरी ३ हजार २९५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
ऐन गणेशोत्सवात राज्य परिवहन (एसटी) कर्मचारी संघटनेने प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संपाची हाक दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्याचे पडसाद उमटले आहेत.
नवी मुंबईतील जमीन सिडकोमुक्त करण्याचा प्रश्न गेली अनेक वर्ष चर्चेत आहे. नवी मुंबई, पनवेल परिसरातील लोकप्रतिनिधींनी अनेकदा या मुद्द्यावर त्या त्या वेळच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शहरवासीयांना मोठी आश्वासने दिली आहेत. प्रत्यक्षात राज्य सरकार या प्रश्नावर कोणताही निर्णय घेत नाही असा अनुभव आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर या प्रश्नाला पुन्हा एकदा वाचा फोडण्याचा प्रयत्न केला जात असून गेले काही महिने ५०० गृहनिर्माण संस्थांच्या प्रतिनिधींना एकत्र करत याविषयी आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली आहे, अशी माहिती नवी मुंबई सिटिझन फाऊंडेशनचे अध्यक्ष सतीश निकम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सांगली : सांगली विधानसभा मतदार संघामध्ये काँग्रेसअंतर्गत फूट पाडण्याचा भाजपचा डाव असून तो कधीही यशस्वी होणार नाही, असे मत काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत सांगितले. काँग्रेसच्या नेत्या तथा जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांनी काँग्रेसची उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष निवडणूक लढविण्याची तयारी असल्याचे जाहीर केले आहे. यावर पाटील यांनी भाष्य केले.
पाटील म्हणाले, गेली दहा वर्षे काँग्रेसचा शहर जिल्हाध्यक्ष म्हणून पक्षाने जबाबदारी सोपवली असून आजअखेर सांगली मतदार संघामध्ये विविध प्रश्नी ३०० हून अधिक आंदोलने काँग्रेसच्या झेंड्याखाली केली आहेत. गत निवडणुकीत निसटता पराभव झाला असून सांगली मतदार संघात कधीही मिळाली नव्हती इतके मतदान विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला झाले. यामुळे यावेळीही मला उमेदवारीची संधी पक्षाकडून मिळेल असा विश्वास वाटतो.
सोलापूर : बार्शी तालुक्यातील एका वयोवृद्ध नेत्याला धमकावत १५ लाखांची खंडणी मागण्याचा प्रकार सोलापुरात घडला. याप्रकरणी संबंधित नेत्याच्या मुलाने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार एका महिलेसह तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यात बार्शी तालुक्यातील एका उद्योजकाचाही समावेश आहे.
नाशिक : १ जून ते २ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात सरासरीच्या ७४८ मिलिमीटर म्हणजेच ९८.१ टक्के पाऊस झाला आहे. १२ तालुक्यांत सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद असताना घाटमाध्यावरील मुसळधार पावसाचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरीत मात्र हे प्रमाण १०७८ मिलिमीटरने घटले आहे. पेठ आणि नाशिकमध्ये सरासरीपेक्षा काही प्रमाणात कमी पाऊस झाला आहे.
ठाणे : राज्य शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गाच्या निर्मितीसाठी दररोज तीनशे ट्रक इतकी माती खणली जाणार असून हि माती खारेगाव ते गायमुख खाडीकिनारी मार्ग, भिवंडी येथील आतकोली कचरा भुमी आणि वनविभागाची जागेत भरावासाठी वापरण्याच्या तीन पर्यांवर मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाकडून विचार सुरू आहे.
नाशिक : राज्य सरकार लाडकी बहीण, लाडका भाऊ यांसारख्या योजना राबवित असताना राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीकडे दुर्लक्ष केल्याची तक्रार करीत विभागातील सुमारे पाच हजार कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केल्यामुळे एसटी बससेवा पूर्णत विस्कळीत झाली.
महिला सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण शक्ती कायदा मागणीसाठी मूक आंदोलन – लाईव्ह
— Supriya Sule (@supriya_sule) September 3, 2024
📍नरिमन पॉइंट, मुंबई ⏭️ 03-09-2024
https://t.co/iaNyj8Oauf
राज्यातील एसटी कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी आज आंदोलन करीत आहेत. सर्वसामान्य जनतेला परवडणारे हक्काचे प्रवासाचे साधन म्हणून एसटीला आजही प्राधान्य दिले जाते. परंतु एसटी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत. शासनाने या मागण्यांवर तातडीने विचार करुन त्याबाबत…
— Supriya Sule (@supriya_sule) September 3, 2024
महिला सक्षमीकरणाकरता राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली आहे. या योजनेसाठी कोट्यवधि महिला पात्र ठरल्या असून त्यांच्या खात्यात प्रत्येकी दीड हजार रुपये दिले जाणार आहेत. दरम्यान, आता महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी राज्यातील महिलांना आणखी दिलासा दिला आहे. त्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. एक्स पोस्टद्वारे त्यांनी ही बातमी दिली. राज्य सरकारचा जीआरच त्यांनी शेअर केला आहे.
गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरलेले असताना महाराष्ट्रात एसटीची सेवा विस्कळीत झाली आहे. एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने आजपासून (३ सप्टेंबर) बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दिला. त्यानुसार राज्यातील विविध आगारांमध्ये कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.
“रडीचा डाव कुणीही खेळत नाही. जे आपल्या काकांचा पक्ष आणि चिन्ह स्वत:चं कर्तृत्व नसताना फक्त मोदी आणि शाहांच्या ताकदीचा वापर करून पळवून नेतात, त्यांनी अशी भाषा वापरु नये. त्यांच्यात कर्तृत्व असेल तर त्यांनी स्वत:चा पक्ष स्थापन करावा, निवडणुका लढवाव्यात. जे चोरी करून राजकारणात आले आहेत मग ते मिंधे असतील नाहीतर अजित दादा असतील, त्यांच्या तोंडात अशी मर्दांनगीची भाषा शोभत नाही”, असं संजय राऊत म्हणाले.
Maharashtra News Live Today, 03 September 2024 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर