Mumbai News Updates, 20 September 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकांचे वेध लागल्यापासून विविध प्रकल्पांच्या उद्घाटनाचा धडाका सुरू आहे. तसंच, सरकारकडून अनेक लोकोपयोगी कार्यक्रमही आयोजित केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पंतप्रधान विश्वकर्मा योजनेच्या वर्षापूर्ती कार्यक्रमानिमित्त ते येणार आहेत. तर, दुसरीकडे महाविकास आघाडी आणि महायुतीतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. जागावाटप, मुख्यमंत्री पदाचा चेहरा यावरून रस्सीखेच सुरू आहे. कोणाला किती जागा मिळणार, कोण कुठून उभं राहणार याकडे सर्वाचंं लक्ष लागलं आहे. यासह राज्यातील विविध घडामोडी जाणून घेऊयात.
Maharashtra News Live Today, 20 September 2024 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा
पुणे : अंदमान बेटाच्या उत्तर भागात हवेची चक्रीय स्थिती निर्माण होऊन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचा अंदाज आहे
गडचिरोली: गडचिरोलीत दहा वर्षे सेवा करणाऱ्या वनपरिक्षेत्राधिकाऱ्यास सहकारी महिला कर्मचाऱ्याकडून पावणे दोन लाखांची लाच स्वीकारताना अटक केली होती.
पुणे : मा. दीनानाथ प्रतिष्ठानच्या वतीने प्रसिद्ध पार्श्वगायिका संजीवनी भेलांडे यांना यंदाचा दीदी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
नागपूर : गेल्या काही वर्षांत विमानाने देशाअंतर्गंत प्रवास करणाऱ्यांची संख्या कैक पटीने वाढली आहे. सोबत या विमानतळावरून ऐनवेळी उड्डाण रद्द होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे.
नाशिक :अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करणे आणि अनुसूचित जाती, जमातींना क्रिमिलेअर नियम लागू करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द करण्यासाठी सरकारने संसदेच्या माध्यमातून कार्यवाही करावी
यावेळी खडकवासला येथून इच्छूक आहे. मनसेत असताना २०१४ लाही इच्छूक होतो. तयारीही केली होती. परंतु, पक्षातील अंतर्गत कुरघोडीला मी पहिल्यांदा तिथे बळी पडलो. २०१४ ला जी तयारी केली होती या भागात बऱ्यापैकी स्वखर्चाने कामे केली होती. बांधणीही चांगली झाली होती. २०१९ मध्ये राज ठाकरेंनी परत एकदा हडपसरची तयारी करायला सांगितली होती. आता मला २०१४ च्या पार्श्वभूमीवर खडकवासला येथून निवडणूक लढवायची आहे. कारण २०१७ ते २०२२ या पंचवार्षिकमध्ये मी या भागात कामं केली असून खडकावसलातील ७० टक्के भाग माझ्या नगरसेवक मतदारसंघातील आहे. आताचे आमदारांना याच भागातून लीड मिळालं नव्हतं. विरोधात कोणीही न आल्याने त्यांना वन साईडेड मतदान होतं. या भागात माझं काम आहे, असं वसंत मोरे म्हणाले. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.
पनवेल ः पनवेल शहरातील पटेल व कच्छी मोहल्ला परिसरातील झोपडपट्टी पुनर्वसनातील महागृहनिर्माण प्रकल्प गाढी नदीपात्रापासून शंभर मीटर अंतरावर उभारण्यास अखेर नगरविकास विभागाने परवानगी दिली.
नागपूर: या देशांमध्ये राहून काही मुस्लिम पाकिस्तान आणि बांगलादेशची भाषा बोलत आहे. जे मुस्लिम भारतात प्रेमाने राहतात त्यांच्याबद्दल नितेश राणे बोलले नाहीत तर भारताबद्दल जे विरोधी मत व्यक्त करतात त्यांच्याबद्दल राणे बोलले, असे सांगत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राणे यांची पाठराखण केली.
अमरावती : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून भाजपतर्फे ठिकठिकाणी आंदोलन केले जात असताना आता वंचित बहुजन आघाडीने राहुल गांधी यांच्या विरोधात मोहीम उघडली आहे.
सविस्तर वाचा
नाशिक - जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या कळवण येथील सप्तश्रृंगी महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या कर्जदाराचा धनादेश न वटल्याने धनादेश धारकास वर्षभर कारावास सुनावण्यात आला. तसेच कर्ज प्रकरण रक्कम जमा करण्याचे आदेश देण्यात आले.
शाखेचे कर्जदार विमलबाई वरखेडे (रा. राजुरबहुला, नाशिक) यांनी वेळेवर कर्जफेड न केल्याने कर्जापोटी त्यांचा मुलगा दीपक वरखेडे यांनी दिलेला धनादेश न वटता परत आल्याने त्यांचेविरुध्द कळवण न्यायालयात प्रकरण दाखल केले होते. सदर प्रकरणाचा निकाल लागला असून न्यायालयाने त्यांना एक वर्षे कारावास आणि पाच लाख, ५० हजार ५०० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. पतसंस्थेच्या घोटी शाखेतून विमलबाई वरखेडे यांनी कर्ज घेतले होते. सदरचे कर्ज थकबाकीत गेल्याने कजेफेडीसाठी त्यांचा मुलगा दीपक वरखेडे यांनी गणेश को-ऑपरेटिव्ह बँक लि. नाशिक शाखा अशोकस्तंभ या बँकेचा स्वतःच्या खात्याचा धनादेश दिला होता. परंतु, तो वटला नाही. त्यामुळे संस्थेने कलम १३८ अन्वये धनादेशधारकाला न्यायालयीन प्रक्रियेद्वारे नोटीस दिली होती. न्यायालयाने संशयिताला शिक्षा सुनावली. कळवण न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश डी. एम. गिते यांनी निकाल दिला.
ठाणे : भिवंडी महापालिकेतील लिपीकाला १० हजार रुपयांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. अजय गायकवाड (४२) असे लाचखोर लिपीकाचे नाव असून घरपट्टी नावावर करण्यासाठी त्याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले आहे.
तक्रारदार हे भिवंडीत वास्तव्यास असून घरपट्टीचे देयक त्यांच्या आईच्या नावावर आहे. ही घरपट्टी तक्रारदार यांना त्यांच्या नावावर करायची होती. त्यासाठी त्यांनी भिवंडी महापालिकेच्या प्रभाग समिती चार येथे अर्ज केला होता. त्यावेळी महापालिकेतील लिपीक अजय गायकवाड याने तक्रारदार यांच्याकडून २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदार यांनी १९ सप्टेंबरला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीची पडताळणी केली असता, प्रथम १० हजार रुपये आणि घरपट्टी नावावर झाल्यानंतर १० हजार रुपये असे एकूण २० हजार रुपये अजय याने तक्रारदार यांच्याकडून मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, पोलीस पथकाने सापळा रचून अजय याला १० हजार रुपयांची लाच घेताना ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिन्नर तालुक्यात विहिरीत तीन शाळकरी विद्यार्थ्यांना फेकून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. यातील एकाने हुशारीने विहिरीत लटकलेला दोर पकडून आपल्यासह अन्य दोन साथीदारांनाही सुखरूप बाहेर काढले. सविस्तर वाचा
शहरातील क. का. वाघ शिक्षण संस्थेच्या वसतिगृहात १८ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीने पंख्याला गळफास घेतला. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. अस्मिता संजय पाटील (१८, ताहाराबाद रस्ता, सटाणा) असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. सविस्तर वाचा
मुंबईः धारावी येथे बेस्ट बसमध्ये शिरून पैसांची बॅग चोरण्यासाठी बस वाहकावर चाकूने हल्ला करणाऱ्या आरोपीला धारावी पोलिसांनी चार तासांत अटक केली.
पुणे : नात्यातील एका मुलीला गुंगीचे ओैषध असलेले इंजेक्शन देऊन तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी एका तरुणाला अटक केली असून आरोपी मुलीच्या नात्यातील आहे. सविस्तर वाचा…
नागपूर : राज्यातील नामंकित महाविद्यालयामध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापन करून विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीने प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान योजनेच्या धर्तीवर आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राची स्थापन करण्यात आली आहे.
महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा मी असेन असं बाळासाहेब थोरात म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीतील वाद चव्हाट्यावर आला. यावरून काँग्रेसला जास्त जागा मिळाल्या यात शिवसेनेचेही योगदान आहे अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. त्यांच्या या वक्तव्याबाबत नाना पटोले यांना विचारले असता संजय राऊतांचं फार ऐकत जाऊ नका, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
पुणे : अर्न्स्ट अँड यंग (ईवाय) या बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या सनदी लेखाकार (सीए) तरुणीचा कामाच्या अतिताणामुळे मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
सविस्तर वाचा...
नागपूर : अलिकडे देशात विविध ठिकाणी रेल्वेगाड्यांवर दगडफेकीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडताना दिसत आहेत. वंदे भारत एक्सप्रेस सारख्या प्रिमियम गाडीवरही दगडफेक झाली होती. शुक्रवारी नागपूरजवळील कामठी रेल्वे स्थानकाबाहेर हावडा एक्सप्रेसवर दगडफेक झाली.
नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) वतीने मार्च २०२४ मध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२च्या उमेदवारांची अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आली. मात्र, काही उमेदवार याविरोधात न्यायालयात गेल्यामुळे त्यावर स्थगिती येऊन नियुक्त्या रखडल्या होत्या.
कल्याण : अनेक वर्षाच्या आपल्या प्रलंबित विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे ६६ वर्ष नेतृत्व करणाऱ्या मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेने मंगळवारपासून (ता.२४) बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे : शहरात चंदन चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, घोरपडी भागातील एका लष्करी अधिकाऱ्याच्या बंगल्यात शिरलेल्या चोरट्यांनी चंदनाचे झाड कापून नेले.
नागपूर : राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना कार्यान्वित झाल्यावर कृषी पंपावरील दीड ते दोन रुपयांच्या क्रॉस सबसिडीचा भार कमी होईल.
महाराष्ट्रातील, विदर्भातील शेतकरी सुखी असेल तर आपला देश सुखी राहील- नरेंद्र मोदी</p>
नव्या औद्योगिक क्रांतीसाठी महाराष्ट्राने कंबर कसली आहे
काँग्रेसने एससी, एसटी ओबीसींना पुढे जाऊ दिलं नाही
नागपूर: उपराजधानीतील वीज वितरण यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी महावितरणने २३८ कोटींच्या कामांचे कार्यादेश दिले, तर ७५ कोटी रुपयांच्या कामाच्या निविदा लवकरच निघेल. दक्षिण पश्चिम नागपुरातील वीज यंत्रणाही भूमिगत होईल, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.
नागपूर : नागपूर शहरातील विधानसभेच्या सहाही जागा काँग्रेस लढवणार आहे. परंतु याबाबत माझे बोलणे योग्य नाही. हायकमांडच याबाबत स्पष्ट बोलू व सांगू शकतील, असेही विकास ठाकरे म्हणाले. परंतु शहरातील सहाही जागेबाबतच्या ठाकरेंच्या वक्तव्याने महाविकास आघाडीतील इतर पक्षांचे टेंशन वाढणार आहे.
सविस्तर वाचा
लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यांतर्गत (पोक्सो) दाखल गुन्ह्यातील अल्पवयीन पीडितांना आर्थिक आणि वैद्यकीय सहाय्य देण्यासह त्यांना या मानसिक धक्क्यातून बाहरे काढण्यासाठी त्यांचे समुपदेशन करणे हे राज्य सरकारचे कर्तव्य आहे, असे उच्च न्यायालयाने गुरूवारी स्पष्ट केले. सविस्तर वाचा…
उरण : उरण शहरातील स्वामी विवेकानंद चौक ते वैष्णवी हॉटेल दरम्याच्या वाहतूक कोंडीमुळे गुरुवारी पुन्हा एकदा तासभर शेकडो विद्यार्थी कोंडीत अडकल्याने पालकांकडून संताप व्यक्त करण्यात आला. या वाहतूक कोंडीवर उपाय करण्याची मागणी वारंवार करूनही अंमलबजावणी होत नाही.
‘गेली दोन वर्षे महाराष्ट्रातील भाजप - शिंदे राजवटीने मुंबई विद्यापीठाची नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक रोखण्याचे प्रयत्न केले. त्यांना जितकी पराभवाची भीती, तितकीच शिक्षणाचीही भीती वाटते. सविस्तर वाचा…
Maharashtra News Live Today, 20 September 2024 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा