Mumbai News Updates, 20 September 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकांचे वेध लागल्यापासून विविध प्रकल्पांच्या उद्घाटनाचा धडाका सुरू आहे. तसंच, सरकारकडून अनेक लोकोपयोगी कार्यक्रमही आयोजित केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पंतप्रधान विश्वकर्मा योजनेच्या वर्षापूर्ती कार्यक्रमानिमित्त ते येणार आहेत. तर, दुसरीकडे महाविकास आघाडी आणि महायुतीतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. जागावाटप, मुख्यमंत्री पदाचा चेहरा यावरून रस्सीखेच सुरू आहे. कोणाला किती जागा मिळणार, कोण कुठून उभं राहणार याकडे सर्वाचंं लक्ष लागलं आहे. यासह राज्यातील विविध घडामोडी जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Maharashtra News Live Today, 20 September 2024 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा

12:49 (IST) 20 Sep 2024
सीबीडी पोलीस ठाण्यात अभ्यासिका

नवी मुंबई : कुठल्याही पोलीस ठाण्यात गेल्यावर त्या पोलीस ठाण्याचे बहुतांश आवार हे गुन्ह्यातील जप्त वाहने, अपघाती वाहने आणि संशयित वाहनांनी भरून गेलेले असते. मात्र नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात अशा वाहनांसाठी वेगळी जागा करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा

12:49 (IST) 20 Sep 2024
डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाटांवरील वर्दळीच्या ठिकाणची उपहारगृहे हटवली

‘गेली दोन वर्षे महाराष्ट्रातील भाजप – शिंदे राजवटीने मुंबई विद्यापीठाची नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक रोखण्याचे प्रयत्न केले. त्यांना जितकी पराभवाची भीती, तितकीच शिक्षणाचीही भीती वाटते. त्यांची बहुतेक मुले परदेशात शिकतात किंवा परदेशात व्यवसाय करतात, मात्र हे आम्हाला व्हॉट्सॲपद्वारे भीती दाखवून लढण्यात व्यस्त ठेवतात.

सविस्तर वाचा…

12:44 (IST) 20 Sep 2024
सिडको अध्यक्षांच्या स्वागत फलकांनी बेलापूर विद्रूप; महापालिकेचे अतिक्रमणविरोधी पथक गप्प

नवी मुंबई : सिडको मंडळाच्या अध्यक्षपदी शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ता संजय शिरसाट यांची नियुक्ती केल्यानंतर गुरुवारी शिरसाट हे पदभार स्वीकारण्यासाठी येणार असल्याचे समजल्यावर त्यांच्या समर्थकांनी बेलापूर येथील सिडको भवनासमोरील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बेकायदा फलकबाजी केली.

सविस्तर वाचा

12:38 (IST) 20 Sep 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आधुनिक भारताचे निर्माते – देवेंद्र फडणवीस

हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. कारण, एकीकाळी अमरावतीच्या मित्रा टेक्स्टाईल पार्कचं उद्घाटन, चाणाक्य प्रशिक्षणाचं सुरुवात, अहिल्याबाई होळकर सुरुवात होतेय, पी एम विश्वकर्मा योजनेतून दोन लाख लोकांना मदत होतेय. एका कार्यक्रमात साडेसहा लाख कुटुंबाचं चित्र बदलणार आहे. त्यांच्यापर्यंत रोजगारपोहोचणार आहे. ज्याला ज्याला आपल्या आयुष्यात बदल घडवायचे आहेत त्या प्रत्येकाक्षा मोदींनी संधी निर्माण केली. सुतार, लोहार, सोनार, मूर्तीकार, मेस्त्री, नाव्ही, टेलर या सर्व घटकांचा विचार कोणत्याच सरकारने केला होता. पण मोदींनी त्यांचा विचार केला. या १२ बलुतेदारांना या मायक्रो ओबीसींना प्रशिक्षण दिलं, रोजगार वाढवण्याकरता सहाय्य केलं. टेक्स्टाइल पार्क ही अशी संकल्पना आहे, अमरावतीला जगाच्या नकाशावर आणण्याचं काम मित्रा टेक्स्टाईलने करा – देवेंद्र फडणवीस</p>

यावेळी देवेंद्र फडणवीस यानी नरेंद्र मोदी यांचा आधुनिक भारताचे निर्माते असा उल्लेख केला.

11:48 (IST) 20 Sep 2024
Jalna Accident : जालन्यात बस-टेम्पोचा भीषण अपघात; सहा ठार, १८ जण जखमी

मोसंबीची वाहतूक करणारा आयशर टेम्पो व राज्य परिवहन महामंडळाच्या  बसमध्ये झालेल्या अपघातात ६ जण ठार तर १८ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी ६ जणांची प्रकृती गंभीर आहे. जिल्ह्यातील जालना वडीगोद्री रोडवरील शहापूर गावाजवळ शुक्रवारी सकाळी ८ च्या सुमारास ही घटना घडली. सविस्तर वाचा…

11:30 (IST) 20 Sep 2024
कोल्हापुरातील तिन्ही अपक्ष आमदारांनी महायुतीची डोकेदुखी वाढवली

आधीच कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या चौघा बड्या नेत्यांनी महाविकास आघाडीचा रस्ता पकडला असताना आता महायुतीशी संलग्न जिल्ह्यातील तिन्ही आमदारांनी स्वतःची ताकद दाखवायला सुरुवात केल्याने महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. सविस्तर वाचा…

11:29 (IST) 20 Sep 2024
बॉस… तुम्ही इतकं कराच!

पुण्यातल्या ॲना या सीए असलेल्या मुलीचा कामाच्या अति ताणाानं जीव गेला. त्यानिमित्तानं नवीनच नोकरीत जॉईन झालेल्या मुलीच्या आईनं आपल्या लेकीच्या काळजीपोटी तिच्या बॉसला लिहिलेलं हे अनावृत पत्र… सविस्तर वाचा…

11:28 (IST) 20 Sep 2024
Nashik Rain : नाशिकमध्ये सरासरीच्या ९२.०४ टक्के पाऊस

एक जून ते १९ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात सरासरीच्या ८०० मिलिमीटर म्हणजेच ९२.०४ टक्के पाऊस झाला आहे. या काळात जिल्ह्यात सरासरी ८६६ मिलिमीटर पाऊस पडतो. १२ तालुक्यांत त्याने सरासरी ओलांडली, मात्र तीन तालुक्यात आणि त्यातील इगतपुरीत त्याचे प्रमाण लक्षणीय घटले. सविस्तर वाचा…

11:25 (IST) 20 Sep 2024
“काँग्रेसच्या जागा वाढण्यात शिवसेनेचं योगदान”, संजय राऊतांचं प्रत्युत्तर

महाविकास आघाडीत तीन प्रमुख पक्ष आहेत, आम्ही एकत्र निवडणुका लढू. कोणाला खुमखुमी असेल की लहान भाऊ, मोठा भाऊ, लाडका भाऊ तर महाराष्ट्रात काय चित्र आहे हे भविष्यात कळेल. काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेत्यांच्या भूमिका स्पष्ट आहेत. काँग्रेसला लोकसभेत तिनही जागा जास्त मिळाल्या. पण त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की त्यांच्या जागा वाढण्यात शिवसेनेचं योगदान किती आहे.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशाप्रकारची भूमिका घेणार नाहीत. आत्मविश्वास सर्वांचाच वाढलेला आहे. विधानसभेच्या आत्मविश्वासासाठी काम करावं लागेल. आत्मविश्वास वाढला म्हणून ते एकटे लढणार नाहीत ना – संजय राऊत

11:04 (IST) 20 Sep 2024
पंतप्रधानांचा दौरा आणि सुरक्षेचा फास, शाळांना सुट्टी व नागरिक घरात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर्धा दौऱ्यानिमित्त अभूतपूर्व सुरक्षा तयारी करण्यात आली आहे. २० सप्टेंबर, शुक्रवारी पंतप्रधान मोदी हे विश्वकर्मा मेळाव्यास संबोधित करणार आहेत. येथील स्वावलंबी मैदानावर त्यांचा कार्यक्रम होत असून याठिकाणी जाणारे मार्ग २०० मिटर अंतरावर बंद करण्यात आले आहे. तसेच पार्किंग, वाहतूक, नो हाकर्स झोन या माध्यमातून शहरी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र आहे. याचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे.

सविस्तर वृत्त वाचा

महाराष्ट्र न्यूज लाइव्हMarathi News Live Updates