Maharashtra News Today, 23 October 2023 : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचा उद्या (२४ ऑक्टोबर) शेवटचा दिवस आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण तापलं आहे. सरकार मराठा समाजाला आरक्षण देईल की आणखी मुदत वाढवून मागेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलंं आहे. तसंच, आतापर्यंत मराठा समाजातील तिघांनी आत्महत्या केली आहे. तर, आज धनगर समाजातील एका तरुणाने आरक्षणासाठी आत्महत्या केली आहे. यावरूनही सरकारवरील रोष वाढत जात आहे. दुसरीकडे, ललित पाटील प्रकरणामुळे राज्यातील ड्रग्स प्रकरणही जोरदार गाजतंय. पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात ड्रग्सचा मोठा साठा उद्ध्वस्त करण्यात आला आहे. तसंच, राज्यातील उष्म्यात दिवसेंदिवस वाढ होतेय. त्यामुळे उकाडा सहन होत नसून ऑक्टोबर हिटचे चटके जाणवू लागले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय, सामाजिक, हवामान आणि इतर सर्व बातम्यांचे अपडेट्स जाणून घेऊयात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Mumbai News Live in Marathi : राज्यातील राजकीय, हवामान, गुन्हे, अपघातांच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर
पिंपरी: पेन ड्राइव्हमधील खासगी छायाचित्रे, चित्रफित प्रसारित करण्याची धमकी देऊन खंडणी उकळणा-या जीम प्रशिक्षकाला पोलिसांनी अटक केली.
मालेगाव: दैनिकात १७८ कोटीच्या घोटाळ्याची बातमी प्रसिध्द केल्यावरुन पालकमंत्री दादा भुसे यांनी दाखल केलेल्या बदनामीच्या खटल्यात उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत हे येथील न्यायालयात सोमवारी गैरहजर राहिले.
डोंंबिवली: येथील गोळवली भागातील रिगल लेडिज बारमध्ये शनिवारी रात्री दोन ग्राहकांना या बारमधील कर्मचाऱ्यांनी धक्काबुक्की करत काठीने बेदम मारहाण केली.
नवी मुंबई: मंगळवारी दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. देवी विसर्जन दरम्यान होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मंगळवारी सकाळी सात ते बुधवारी सकाळी सात पर्यंत जड अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
नागपूर: मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या इमारतीत सोमवारी अजबच प्रकार बघायला मिळाला. न्यायालयाच्या पहिल्या माळ्यावर चक्क खासगी कार गाडी विक्री केंद्र सुरू करण्यात आले होते.
अशोक कोळी हे कपीलगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार असून गोटाळ पांझरी येथे बंदोबस्तावर होते.
अकोला जिल्ह्यातील सांगोळा नावाच्या गावी रावणाची सद्गुणांमुळे पूजा केली जाते. या प्रथेला तब्बल २१० वर्षांची प्राचीन परंपरा लाभली आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे व नेमबाज अजय मराठे यांच्या चमूने ही कामगिरी केली.
मराठा समाजाला आरक्षण देण्यावर सरकार ठाम आहे, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. मात्र हा प्रश्न गंभीर आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत अवकाळी पावसाचीही शक्यता नाही, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
मुंबई: गिरण्यांच्या जमिनीवरील घरांच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी म्हाडाकडे जमा झालेल्या १ लाख ५० हजार ४८४ अर्जदारांच्या अर्जांची छाननी करत पात्रता निश्चिती करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे.
दीक्षाभूमीवर ‘एक वही, एक पेन’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. आंबेडकरी चळवळीतील विविध संघटनांच्यावतीने संयुक्तपणे हा उपक्रम राबविला जात आहे.
उद्या होणाऱ्या कार्यक्रमात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत स्वयंसेवकांना काय मार्गदर्शन करणार आहे, याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे.
शासन प्रशासनाला पाठविलेल्या निवेदनात त्यांनी हा निर्णय खपवून घेतल्या जाणार नाही, शिवप्रेमी याला विरोध करतील, असा इशारा दिला आहे.
शेतकऱ्यांचा हरभरा व गहू पिकाकडे कल असून, हरभरा व गहू लागवड क्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पिंपरी : पिंपरी ते निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत मेट्रो धावण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. निगडीपर्यंतच्या प्रस्तावाला केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कामकाज मंत्रालयाने सोमवारी २३ ऑक्टोबर मान्यता दिली. त्यामुळे शहरवासीयांचे निगडीपर्यंत मेट्रोचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
बुलढाणा : सियाचिन ग्लेशियरमध्ये कर्तव्यावर असताना ह्रदयविकाराने निधन झालेल्या अक्षय लक्ष्मण गवते यांच्या पार्थिवावर आज पिंपळगाव सराई (ता. बुलढाणा) येथे शासकीय इतमामात व शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थित लष्करी जवान व पोलिसांनी त्यांना मानवंदना दिली. शोकग्रस्त आप्तगण व देशप्रेमी ग्रामस्थांनी त्यांना अखेरचा निरोप दिला.
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा ग्रहण केली होती. बाबासाहेबांनी स्थापना केलेला समता सैनिक दल तेव्हापासून दीक्षाभूमीवर सुरक्षा आणि सेवेच्या कार्यात तैनात आहे. दीक्षाभूमीच्या मध्यवर्ती स्तुपाच्या सुरक्षेची जबाबदारी संपूर्णपणे समता सैनिक दलावर असते. यंदाही दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांच्या सुरक्षेसाठी समता सैनिक दल सज्ज झाला आहे.
नागपूर : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असला तरी राज्यात उन्हाच्या झळा कायम आहे. तर कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे राज्यात काही भागांत उन तर काही भागांत हलक्या पावसाची हजेरी आणि काही ठिकाणी ढगाळ हवामान राहणार आहे.
मुंबई: राज्यातील किरकोळ व होलसेल औषध विक्रेते हे मोठ्या प्रमाणात परराज्यातून औषध खरेदी करतात. यामुळे राज्यामध्ये बनावट औषधांचा शिरकाव होण्याची शक्यता अधिक असते.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण देण्यास नकार दिल्यानंतर राज्य सरकारकडून पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालायने सहमती दर्शवली आहे. यावरून मराठा क्रांती मोर्चाने मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. मराठा मोर्चाने आज पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे.
गोंदिया: येत्या २४ ऑक्टोबर रोजी नागपुरात विजया दशमी उत्सव आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोंटूची पत्नी गरीमा जैन, भाऊ धीरज ऊर्फ मोंटू जैन, आई कुसुमदेवी जैन यांच्या मदतीने घरातील ८ कोटी रुपये रोख आणि काही सोने असलेली बॅग बंटीने घेतली आणि स्वतःच्या घरात लपवून ठेवली.
देशातील कापसाचे भाव पडले आणि परिणामी कापूस उत्पादक यवतमाळ जिल्ह्यात ४६० आत्महत्या झाल्या, असा आरोप देशमुख यांनी केला.
पुणे: मी चळवळीतून आलेला कार्यकर्ता आहे. त्यामुळे राज्यकर्ता असूनही सांगतो, की काही विषय लवकर मार्गी लागावेत असे वाटत असेल तर मोर्चे काढा.
२३ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत दीक्षाभूमी ते ड्रॅगन पॅलेसदरम्यान १५९ विशेष ‘आपली बस’ सेवा चालवली जाईल.
पुणे: वडिलांच्या अपघाती मृत्यूनंतर नुकसान भरपाई दाव्यासाठी कागदपत्रांची मागणी करणाऱ्या भिगवण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकासह वकिलाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. भिगवण पोलीस ठाण्यात ही कारवाई करण्यात आली.
बीड : पावसाने ओढ दिल्याने यंदा बीड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असली तरी नवरात्रौत्सवात दांडिया उत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी नेतेमंडळींमध्ये चढाओढच लागली होती. नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून नेते, पदाधिकाऱ्यांकडून दांडिया उत्सवाचे आयोजन केले जात आहेत. गटातटात विखुरलेल्या राजकारणात दांडिया उत्सवाने मात्र चांगलेच रंग भरले असून जास्तीत जास्त गर्दी खेचण्यासाठी चढाओढ लागली होती.
पुणे: पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
दीक्षाभूमीवर ‘मिनी कंट्रोल रुम’ तयार करण्यात आले असून साध्या वेशातील पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे.