Maharashtra- Mumbai News : देशभरात गणेशोत्सवाचं वातावरण आहे. गणपती बाप्पांच्या आगमनानंतर विविध मानाच्या गणपतींच्या ठिकाणी गणेश भक्तांची रिघ लागली आहे. अनेक राजकीय नेते या मानाच्या गणपतींना भेट देऊन दर्शन घेत आहे. विशेष म्हणजे गणेशोत्सवाच्या काळात विविध पक्षाचे नेते इतर नेत्यांच्या घरी जाऊन गणपती दर्शन घेत आहेत. यावेळी राजकीय चर्चांबाबतही तर्क लावले जात आहेत. दुसरीकडे गणपती आगमनासह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. नाशिकमध्ये तर ढगफुटी सदृश स्थिती पाहायला मिळाली. एकूणच पावसासह राज्यातील इतर सर्व राजकीय घडामोडींचा आढावा एकाच ठिकाणी…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Mumbai- Maharashtra Live News Today, 02 September 2022 : गणेशोत्सव आणि पावसासह राज्यातील सर्व राजकीय घडामोडींचा आढावा एकाच ठिकाणी…

17:42 (IST) 2 Sep 2022
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चेंबूर येथील झोपडपट्टीधारकांना न्यायालयाचा दिलासा

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चेंबूर येथील सिद्धार्थनगरमधील झोपडपट्टीवासियांना उच्च न्यायालयाने झोपड्यांवरील पाडकाम कारवाईपासून नुकताच अंतरिम दिलासा दिला. याचिकाकर्त्यांच्या झोपड्यांवर २४ सप्टेंबरपर्यंत कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयाने झोपडपट्टी पुनवर्सन प्राधिकरणाच्या अधिकाऱयांना दिले आहेत. बातमी वाचा सविस्तर…

17:14 (IST) 2 Sep 2022
पुण्याचे पालकमंत्री होणार का ? देवेंद्र फडणवीस म्हणाले…

पुण्याचे पालकमंत्री होणार का ? आणि पुण्यातून निवडणूक लढविणार का, या दोन्ही प्रश्नांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी थेट आणि स्पष्ट शब्दात उत्तर दिले.

सविस्तर वाचा…

16:49 (IST) 2 Sep 2022
वर्धा : कारंजा घाडगेजवळ पोलिसांकडून २६ लाखांचा गांजा जप्त

महामार्गावर गांजाची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी एका कारमधून २६ लाख रुपये किंमतीचा २६५ किलो गांजा जप्त केला. बातमी वाचा सविस्तर…

16:18 (IST) 2 Sep 2022
डोंबिवली : एकाच घरात राहत असलेल्या नोकरदार मैत्रिणीकडून मैत्रिणीच्या पैशाची ऑनलाईन चोरी

नोकरी निमित्त भागीदारी पध्दतीने एक सदनिका भाड्याने घेऊन डोंबिवलीत दोन मैत्रिणी एकत्र राहत होत्या. एका मैत्रिणीने दुसऱीला काही कळू न देता रात्री तीन वाजता मैत्रिणीच्या मोबाईल फोन उपयोजनाचा वापर करुन २८ हजार रुपये बँकेतून परस्पर वळते केले. बातमी वाचा सविस्तर…

16:03 (IST) 2 Sep 2022
गणेशोत्सव देखाव्यातून ‘ टाटा कर्करोग रुग्णालयाला’ मानवंदना

ठाणे : कर्करोग रुग्णांचा आधार असलेल्या मुंबईतील टाटा मेमोरिअल रुग्णालयाची प्रतिकृती गणेशोत्सवाचा देखावा म्हणून डोंबिवलीतील बालाजी आंगन मंडळाने यंदा साकारली आहे. देशभरातील कर्करोग रुग्णांना जीवनदान देणाऱ्या या रुग्णालयाला मानवंदना देण्यासाठी ही प्रतिकृती साकारल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे. बातमी वाचा सविस्तर…

15:22 (IST) 2 Sep 2022
कामावर असणारा सीआयएसएफ जवान रायफल व जिवंत काडतुसे घेऊन फरार

देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अति महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या तारापूर अणुऊर्जा केंद्र तसेच भाभा अनुशक्ती केंद्राच्या सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा एक जवान रायफल व 30 जिवंत काडतुसे घेऊन काल दुपारपासून फरार झाला आहे. बातमी वाचा सविस्तर…

13:57 (IST) 2 Sep 2022
पुणे : अंत्यविधी पाससाठी नातेवाईकांना यातना

पुणे : ‘इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते,’ असा अनुभव शायरीतून व्यक्त होत असला, तरी महापालिकेच्या उदासीन कारभारामुळे मृतांच्या नातेवाईकांना त्या उलट अनुभवाला सामोरे जावे लागत आहे. अंत्यविधीचा पास देण्याची आतापर्यंत सुविधा असलेली विश्रामबाग वाडा आणि वैकुंठ स्मशानभूमीतील पास सुविधा महापालिकेने बंद केली आहे. बातमी वाचा सविस्तर…

13:30 (IST) 2 Sep 2022
व्याजाच्या पैशांसाठी महिलेला डांबून ठेवले ; बेकायदा सावकारी प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा

पुणे : महिलेला डांबून पैसे उकळणाऱ्या सावकारांच्या विरोधात चंदननगर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला.शुभम धनंजय जाधव (वय २३, रा. आंबेडकर वसाहत, बारामती), आशिष अशोक गायकवाड (रा. मुंढवा) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. बातमी वाचा सविस्तर…

13:24 (IST) 2 Sep 2022
“५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त मी स्वत: …” – आमदार प्रशांत बंब यांचं माध्यमांसमोर विधान!

राज्यभरातील शिक्षकांसंदर्भात केलेल्या वक्तव्यांमुळे मागील काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले भाजपाचे आमदार प्रशांत बंब यांनी आज पत्रकारपरिषद घेत, पुन्हा एकदा आपली भूमिका माध्यमांसमोर स्पष्ट केली. वाचा सविस्तर बातमी…

13:20 (IST) 2 Sep 2022
चांदणी चौकातील वाहतूक कोंडीवर वर्तुळाकार मार्ग उपयुक्त ठरेल ; नितीन गडकरी

चांदणी चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वर्तुळाकार मार्ग उपयुक्त ठरेल. त्यासाठी १३०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. केंद्र सरकारकडून काही मार्गांवर काम सुरू असून, निधीसाठी राज्य शासनाबरोबर चर्चा करण्यात येईल, असे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. बातमी वाचा सविस्तर…

13:08 (IST) 2 Sep 2022
साडेदहा लाखांचा गुटखा जप्त ; खंडणीविरोधी पथकाची कारवाई

बंदी घातलेल्या गुटख्याची विक्री केल्या प्रकरणी गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने गंज पेठेत कारवाई केली. गंज पेठेतील नूर केटरर्सजवळ असलेल्या खोलीत गुटख्याची साठवणूक करण्यात आला होता. बातमी वाचा सविस्तर…

12:57 (IST) 2 Sep 2022
पुणे : उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नोंदणी व मुद्रांक भवनाचे आज भूमिपूजन

विधान भवनासमोरील नवीन प्रशासकीय इमारतीच्या परिसरात उभारण्यात येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक भवनाचे भूमिपूजन आणि मोबाइल उपयोजन (ॲप), नवीन संकेतस्थळ यासह इतर ई-सुविधांचा प्रारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी (२ सप्टेंबर) दुपारी ३.१५ वाजता होणार आहे. बातमी वाचा सविस्तर…

12:44 (IST) 2 Sep 2022
पुणे : महिलांसाठी चाळीस टक्केच स्वच्छतागृहे

गर्दीच्या ठिकाणी, रस्त्याच्या दुतर्फा, बस-रेल्वे स्थानकांवर, सरकारी तसेच महापालिका कार्यालये यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी सुरक्षित आणि स्वच्छ स्वच्छतागृह असणे हा महिलांचा मूलभूत अधिकार असतानाही नोकरीनिमित्त घराबाहेर पडणाऱ्या महिलांसाठी शहरातील स्वच्छतागृहांची संख्या अपुरी असल्याची वस्तुस्थिती आहे. बातमी वाचा सविस्तर…

12:28 (IST) 2 Sep 2022
कल्याणमधील शिवसैनिकाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खुले पत्र

कल्याण : कल्याण मधील विजय तरुण मित्र मंडळाच्या शिवसेनेतील बंडखोरीवर उभारलेल्या गणेशोत्सव मंडळाच्या देखाव्यावर पोलिसांनी बु‌धवारी पहाटे वरिष्ठांच्या दबावाने कारवाई केल्याने कल्याण, डोंबिवलीतील शिवसैनिक संतप्त झाला आहे. बातमी वाचा सविस्तर…

11:38 (IST) 2 Sep 2022
पुणे शहराचं विभाजन करण्याची आवश्यकता; चंद्रकांत पाटलांनी सांगितलं ‘हे’ कारण

पुणे : शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्येचा विचार करता पुण्याचे विभाजन करून दोन महापालिकांची आवश्यकता आहे, अशी भूमिका राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री, कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी येथे मांडली.

सविस्तर बातमी…

11:37 (IST) 2 Sep 2022
Maharashtra SSC, HSC Supplementary Results 2022: १० वी, १२ वी पुरवणी परीक्षेचा निकाल आज दुपारी; कुठे पाहाल निकाल जाणून घ्या

Maharashtra SSC, HSC Supplementary Results 2022: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (SSC) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC) पुरवणी परीक्षेचा निकाल आज जाहीर केला जाणार आहे. १० वी, १२ वी पुरवणी परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज दुपारी १ वाजता जाहीर केला जाणार आहे. यंदा १० वी ची परीक्षा २७ जुलै ते १२ ऑगस्ट दरम्यान झाली तर १२वी ची परीक्षा २१ जुलै ते २४ ऑगस्ट दरम्यान घेण्यात आली होती. महाराष्ट्र बोर्डाचा पुरवणी निकाल mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होईल.

सविस्तर बातमी…

11:35 (IST) 2 Sep 2022
गडचिरोली : प्रखर विरोधानंतरही वन विभागाने पातानीलमधील तीन हत्ती मध्यरात्रीच गुजरातकडे केले रवाना

जिल्ह्यातील आलापल्ली जवळ असलेल्या पातानील हत्तीकॅम्प येथील वन विभागाचे तीन हत्ती मध्यरात्री जामनगरच्या दिशेने रवाना करण्यात आले. विरोधानंतरही अखेर हे हत्ती गुजरातला पाठविल्याने या भागातील नागरिकांसह पर्यटकांनी संताप व्यक्त केला आहे. गेल्या वर्षभरापासून येथील हत्ती गुजरातला हलविण्यावरून वाद सुरू होता.

सविस्तर बातमी…

11:34 (IST) 2 Sep 2022
नागपूर : रेल्वेच्या ‘लोको पायलट’ने हॉर्न वाजवला परंतु प्रेमी युगुल रुळावरून बाजूला झाले नाही अन क्षणार्धात…

एका प्रेमी युगुलाने हिंगणा परिसरातील गुमगाव रेल्वेस्थानकापासून एक किमी अंतरावर धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी आठ वाजता उघडकीस आली. वृत्त लिहिस्तोवर या प्रेमी युगुलाची ओळख पटली नव्हती.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ वर्षीय तरुण आणि २२ वर्षे वयोगटातील तरुणी हे दोघेही गुमगाव रेल्वेस्थानकापासून एक किमी अंतरावर रेल्वे रुळावर उभे होते.

सविस्तर बातमी…

गणेशोत्सव आणि पावसासह राज्यातील सर्व राजकीय घडामोडींचा आढावा एकाच ठिकाणी…