Maharashtra Latest News in Marathi महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आणि शिवसेना पक्षात पडलेल्या फुटीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. सोमवारी २२ ऑगस्ट रोजी यावर सुनावणी होणार होती. मात्र, न्यायाधीशांच्या खंडपीठातील एक न्यायाधीश उपलब्ध नसल्यामुळे ही सुनावणी मंगळवारी २३ ऑगस्टला होणार असल्याचं बोललं जात होतं. पण आजही या सुनावणीबाबत अनिश्चितता कायम आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पत्राचाळ घोटळा प्रकरणी स्वप्ना पाटकर यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ने आज ( मंगळवार २३ ऑगस्ट) चौकशीसाठी बोलावले आहे. स्वप्ना पाटकर या पत्राचाळ घोटाळा प्रकरणातील एकमेव साक्षीदार आहेत. याच प्रकरणात संजय राऊत यांना विशेष न्यायालयाने ५ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
मुंबईतील प्रसिद्ध पंचतारांकित ललीत हॉटेलला बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली आहे. अज्ञात व्यक्तीने हॉटेलमध्ये फोन करून ही धमकी दिली. हे बॉम्ब निकामी करण्यासाठी पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. एवढचं नाही तर हॉटेलच्या महाव्यवस्थापकाच्या कुटुंबीयांनाही धमकावण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि कलाविषयक घडामोडींचा आढावा एकाच ठिकाणी…
Maharashtra Political Crisis Updates: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर!
शिंदे फडणवीस सरकारच्या स्थापनेच्या महिनाभरानंतर मंत्रीमंडळ विस्तार झाला. विस्तारानंतर खातेवाटप करण्यात आलं. खातेवाटपाला होणाऱ्या विलंबामुळे विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत होती. मात्र, आता खातेवाटपानंतर आज राज्यातील नवनियुक्त मंत्र्यांना शासकीय बंगले / निवासस्थानाचे वाटप करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर नेमका काय निर्णय होणार? यासंदर्भातल्या सुनावणीवर आज सकाळपर्यंत अनिश्चितता होती. अखेर हा विषय आजच्या वेळापत्रकात समाविष्ट करण्यात आल्यानंतर अपेक्षेप्रमाणे या प्रकरणाची सुनावणी ५ सदस्यांच्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात आलं आहे. या प्रकरणाची सुनावणी आता २५ ऑगस्ट रोजी होणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून यावेळी नमूद करण्यात आलं आहे. याशिवाय, धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह नेमकं कुणाचं? या मुद्द्यावर आज दुपारी ३ वाजता नियोजित असलेली सुनावणी देखील दोन दिवसांसाठी पुढे ढकलण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या आरोप-प्रत्यारोपांसोबतच एकमेकांना चिमटे काढणे, खोचक टोलेबाजी करणे अशा गोष्टी देखील अधिवेशनात पाहायला मिळत आहेत. एरवी नेतेमंडळींनी सभागृहात लगावलेल्या टोल्यांमुळे हशा पिकत असताना खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत एका मुद्द्यावरील चर्चेत बोलताना केलेल्या विधानामुळे आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आणि शिवसेना पक्षात पडलेल्या फुटीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. सोमवारी २२ ऑगस्ट रोजी यावर सुनावणी होणार होती. मात्र, न्यायाधीशांच्या खंडपीठातील एक न्यायाधीश उपलब्ध नसल्यामुळे ही सुनावणी मंगळवारी २३ ऑगस्टला होणार असल्याचं बोललं जात होतं. पण आजही या सुनावणीबाबत अनिश्चितता कायम आहे. सविस्तर बातमी
औरंगाबाद महानगर पालिकेत शिवसेनेनं कुत्रे पकडण्याच्या मोहिमेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचे गंभीर आरोप औरंगाबादचे माजी महापौर प्रमोद राठोड यांनी केले आहेत. त्यांनी माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या माहितीच्या आधारे हे गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी एक व्हिडीओ जारी करत याबाबतची माहिती दिली. कुत्रे पकडण्याच्या मोहिमेत शिवसेनेनं मोठ्या प्रमाणात घोटाळा केल्याचा आपल्याला दाट संशय आहे, त्यामुळे या प्रकरणाची कसून चौकशी व्हायला हवी, अशी मागणी राठोड यांनी केली आहे. सविस्तर बातमी
राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार अस्तित्वात आल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमधला कलगीतुरा संपण्याचं नाव घेत नाहीये. आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू असतानाच विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने राजकारण चांगलंच तापलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतला मोठा गट फुटल्यानंतर एकीकडे उद्धव ठाकरेंकडून पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी प्रयत्न केले जात असताना भाजपाकडून त्यांना लक्ष्य केलं जात आहे. आता तर भाजपानं उद्धव ठाकरेंना थेट विधिमंडळात येण्याचं आव्हान दिलं आहे.
मुंबईतील प्रसिद्ध पंचतारांकित ललीत हॉटेलला बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली आहे. अज्ञात व्यक्तीने हॉटेलमध्ये फोन करून ही धमकी दिली. या धमकीनंतर हॉटेलची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पोलिसांनी फोन करणाऱ्या आरोपीचा शोध सुरु केला असून या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातल्या महत्त्वाच्या घडामोडी वाचा एकाच क्लिकवर!