Maharashtra Breaking News Today, 09 August 2023: भाजपा खासदार नारायण राणेंनी मंगळवारी संसदेत केलेल्या भाषणावरून सध्या राजकीय चर्चा सुरू झाली असून राणेंच्या भाषेवर विरोधकांकडून तीव्र आक्षेप घेतला जात आहे. दुसरीकडे संजय राऊतांनी शरद पवारांना पंतप्रधानपद न मिळण्यामध्ये काँग्रेस आल्याचा दावा केल्यामुळे त्यावरून आता राजकीय दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत.

Live Updates

Maharashtra Breaking News Today: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर!

19:50 (IST) 9 Aug 2023
आलमट्टी धरणावर पूर्ण लक्ष; कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे मेधा पाटकर यांना उत्तर

कर्नाटक सरकार आलमट्टी धरणातील संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. संबंधित विभागाला सक्त सूचना दिल्या आहेत. केंद्रीय जल आयोगाच्या नियमांना आम्ही बांधील आहोत. या विषयावर दोन्ही राज्य शासनांकडून कोणतेही आरोप-प्रत्यारोप होणार नाहीत.

सविस्तर वाचा

19:32 (IST) 9 Aug 2023
छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने साताऱ्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ओळखले जाणार

कोल्हापूर: सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सातारा या संस्थेचे “छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सातारा” असे नामाधिकरण करण्यात आले आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी बुधवारी दिली.

सविस्तर वाचा...

18:48 (IST) 9 Aug 2023
के. चंद्रशेखर राव यांच्या अनुपस्थितीत इस्लामपुरात मेळावा संपन्न

तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या अनुपस्थितीत इस्लामपूर येथे भारत राष्ट्र समितीचा मेळावा पार पडला. के. चंद्रशेखर राव यांनी शेतकर्‍यासाठी सकारात्मक निर्णय घेउन विविध योजना राबविल्याबद्दल इस्लामपूरमध्ये त्यांचा सन्मान आयोजित करण्यात आला होता.

सविस्तर वाचा

18:34 (IST) 9 Aug 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गोरगरीबांची फसवणूक; आमदार नितीन देशमुखांचा आरोप; घरकुलासाठी मोर्चा

केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ‘सर्वांसाठी घरे- २०२२’ ही योजना सपशेल अपयशी ठरली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वसामान्य व गरीब लाभार्थ्यांना घरकुल बांधून देण्याचे आश्वासन देत त्यांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे आमदार तथा जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी केला.

सविस्तर वाचा

18:10 (IST) 9 Aug 2023
आव्हाड यांनी मारहाण केल्यानंतर चर्चेत आलेले अनंत करमुसे यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा

घोडबंदर भागात अनंत करमुसे हे राहतात. त्यांच्या समोरील सदनिकेत सुनील मिल्ल हे राहतात. मंगळवारी अनंत आणि सुनील यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाले. या वादाचे रूपांतर हाणामारी झाले. त्यानंतर दोघेही कासारवडवली पोलीस ठाण्यात आले.

सविस्तर वाचा

18:09 (IST) 9 Aug 2023
दिव्यात पाणी टंचाईच्या मुद्द्यावरून भाजप आक्रमक; महापालिकेच्या निषेधार्थ मडके फोडो आंदोलनाचा इशारा

ठाणे: दिवा भागातील पाणी पुरवठ्यात वाढ करत नवीन जलवाहिन्या टाकण्यात आल्या असल्या तरी या भागात पाणी टंचाईची समस्या कायम असल्याची बाब समोर आली आहे.

सविस्तर वाचा...

17:39 (IST) 9 Aug 2023
प्रेमविवाहास अडथळा ठरणा-या पित्याला मारण्यासाठी मुलीनेच दिली सुपारी

सोलापूर: प्रेमविवाहाला विरोध करणा-या जन्मदात्या वडिलांचे हातपाय तोडण्याची सुपारी मुलीनेच आपला प्रियकर आणि त्याच्या साथीदारांना दिली.

सविस्तर वाचा...

17:22 (IST) 9 Aug 2023
Maharashtra Live News Update: सुषमा अंधारेंचं खोचक ट्वीट!

स्मृती इराणी या बाई देशाच्या विकासावर, त्यांच्या खात्याशी संबंधित ध्येयधोरणावर कमी आणि गांधी घराण्यावर गरळ ओकल्यामुळे जास्त प्रसिद्ध झोतात आल्या. प्रसिध्दी झोतात राहण्यासाठी आणि मणिपूरच्या चर्चा टाळण्यासाठी भाजपकडून चाललेला हा सगळा किळसवाणा प्रकार आहे

https://twitter.com/andharesushama/status/1689194310368112640

17:19 (IST) 9 Aug 2023
महावितरण कंपनीतील प्रकारावर जितेंद्र आव्हाडांचं ट्वीट

ठाण्यातील वागळे ईस्टेट विभागामध्ये MSEDCL च्या अधिकाऱ्यांचा धुमाकूळ. 5-5 लाख रुपये बिले लावायची आणि दिड-दोन लाख रुपयांमध्ये तडजोड करून केस संपवायची; असे प्रकार स्थानिकांनी माझ्या निदर्शनास आणून दिले आहेत. त्यांच्या कॅप्टनचे नाव चंद्रकांत मेश्राम (कार्यकारी अभियंता, ठाणे 1)

https://twitter.com/Awhadspeaks/status/1688964479739199488

17:18 (IST) 9 Aug 2023
Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या पॉडकास्टमध्ये संजय राऊतांची मुलाखत

"आवाज कुणाचा, पॉडकास्ट शिवसेनेचा"मध्ये होणार संजय राऊतांची मुलाखत

https://twitter.com/ShivSenaUBT_/status/1689231506785673216

17:06 (IST) 9 Aug 2023
‘भाजपा सरकार चले जाव, मोदी सरकार…’, गोंदियात ‘आयटक’चा मोर्चा

गोंदिया : देशातील सर्व कामगार कर्मचारी श्रमीक संगठनेच्या वतिने आज ९ ऑगस्टला कामगार, कर्मचारी, शेतकरी, शेतमजूर विरोधी भाजपाच्या मोदी सरकारला चले जाव या घोषणेसह विभिन्न मांगण्याना घेवून दुपारी गोंदियातील नेहरू चौकपासून ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या (आयटक) महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष कॉ. हौसलाल रहांगडाले, राज्य सचिव कॉ. मिलिंद गणवीर, जिल्हा सचिव कॉ. रामचंद्र पाटील, राज्य कार्यकारिणी सदस्य कॉ. शालु कुथे यांच्या नेतृत्वात शहरात प्रचंड मोर्चा काढण्यात आला.

सविस्तर वाचा...

16:50 (IST) 9 Aug 2023
निलंग्यात काँग्रेसचे राजकीय ‘धोंडे’ जेवण, जावई कोण याचीच रंगली चर्चा

लातूर : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने येत्या शुक्रवारी (११ ऑगस्ट) निलंगा येथे वृंदावन मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांचा मेळावा व ‘धोंडे जेवणा’चे आयोजन करण्यात आले आहे. समाज माध्यमावरून याची प्रसिद्धी करण्यात येत आहे. अधिकमासात जावायाला दान करून त्याला पुरणाचे जेवण दिले जाते. त्याला धोंडे असे म्हणतात. काँग्रेसचे जेवण मिळेल पण जावई कोण, ही चर्चा आता रंगू लागली आहे.

सविस्तर वाचा...

16:42 (IST) 9 Aug 2023
विदर्भवादी आक्रमक! आंदोलकांना पोलिसांनी रोखल्याने तणाव, ‘या’ आहेत मागण्या…

विदर्भ वाद्यांनी स्वतंत्र विदर्भ राज्य, वीज दरवाढ रद्द करासह इतर मागण्यांसाठी बुधवारी नागपूरात लाँग मार्च काढला. आंदोलकांना ऊर्जामंत्र्यांच्या निवासस्थानाकडे जाण्यापासून अमरावती मार्गावर पोलिसांनी थांबवल्याने ते आक्रमक झाले. यावेळी आंदोलक- पोलिसांत रेटारेटी झाल्याने तणाव निर्माण झाला होता.

सविस्तर वाचा

16:13 (IST) 9 Aug 2023
बुलढाणेकरांनो सावधान! येळगाव धरणात एक महिन्यापुरताच जलसाठा; लाखावर नागरिकांचा…

बुलढाणा: लाखावर बुलढाणा परिसरवासियांसह प्रशासनाचीही चिंता वाढविणारी ही बातमी आहे. याचे कारण बुलढाणा शहरासह परिसरातील खेड्यांना पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या येळगाव धरणात सध्या अत्यल्प जलसाठा उपलब्ध आहे. हा साठा एक महिना पुरेल एवढाच असल्याने सर्वांची चिंता वाढणे स्वाभाविक आहे.

सविस्तर वाचा...

16:11 (IST) 9 Aug 2023
नाशिक : लाचखोर तहसीलदार बहिरमच्या पोलीस कोठडीत वाढ; दोन यंत्रणांकडून चौकशी

तालुक्यातील राजूर बहुला येथील जमीन उत्खनन प्रकरणात पाचपट दंड आकारणीच्या फेरचौकशीवेळी १५ लाखांची लाच स्वीकारताना पकडला गेलेला नाशिकचा तहसीलदार नरेशकुमार बहिरम याच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने दोन दिवसांची वाढ केली.

सविस्तर वाचा

16:08 (IST) 9 Aug 2023
सत्ताधारी आमदाराचा सरकारविरोधात एल्‍गार; आमदार बच्‍चू कडू शेतकऱ्यांच्‍या मागण्‍यांसाठी आक्रमक

अमरावती: शेतकरी, शेतमजूर, वंचित घटकांच्‍या विविध मागण्‍यांसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्‍वात बुधवारी येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

सविस्तर वाचा...

15:42 (IST) 9 Aug 2023
नागपूर : काटोल-नरखेडमध्ये असं काय घडलं की, एक हजार मुलींना द्यावी लागली ‘एचपीव्ही’ची लस

नागपूर : सिरम इन्स्टिट्यूट पुणे यांनी ‘एचपीव्ही’ लस तयार केली आहे. काटोल-नरखेडच्या एक हजार मुलींना नागपूर येथील विवेका हॉस्पिटलमध्ये लस देण्यात आली. स्वास्थ्य वृक्ष फाऊंडेशन व विवेका हॉस्पिटलच्या माध्यमातून ही लस मोफत देण्यात आली हे विशेष.

सविस्तर वाचा...

15:39 (IST) 9 Aug 2023
बेमुदत लाक्षणिक उपोषण: ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या वेतनासह अन्य समस्या सोडवा मुख्य मागणी – इंटक

नवी मुंबई:  ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या समस्या न सुटल्यास  ९ ऑगस्टपासून महापालिका मुख्यालयासमोर बेमुदत लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा काही दिवसापूर्वी कामगार नेते व नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांना दिला होता.

सविस्तर वाचा...

15:34 (IST) 9 Aug 2023
चोर समजून मारहाण केल्याने एकाचा मृत्यू, खारघरमधील घटना

चोरी केल्याची बातमी समजताच आपल्या कामगारांच्या मदतीने संशयीत चोराला गाळ्यात आणून त्याला मारहाण केली याच मारहाणीत एकाला प्राण गमवावे लागले. खारघर पोलीसांनी या प्रकरणी तीघांना अटक केली आहे. खारघर वसाहतीमध्ये दोन दिवसांपूर्वी सेक्टर १२ मधील एका गाळ्यामध्ये लोखंडी वस्तू चोरी झाली होती.

सविस्तर वाचा

15:30 (IST) 9 Aug 2023
मणिपूर, मध्यप्रदेशातील आदिवासींवरील अत्याचाराविरोधात धुळ्यात मोर्चा

मणिपूर आणि मध्यप्रदेशात आदिवासींवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करीत बुधवारी येथे सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेने आरोपींवर कठोर कारवाई करण्याची आणि वनहक्क कायदा २००६ च्या अंमलबजावणीची मागणी केली.

सविस्तर वाचा

15:27 (IST) 9 Aug 2023
Maharashtra Live News Update: हा आमचाच करंटेपणा - मिटकरी

मागील चार वर्षात अकोला जिल्ह्यातील एकही प्रश्न लोकसभेमध्ये नाही ही आमच्या जिल्ह्याची शोकांतिका म्हणावी की आमचाच करंटेपणा?ोला लोकसभा - अमोल मिटकरी

https://twitter.com/amolmitkari22/status/1689159771683991552

15:26 (IST) 9 Aug 2023
Maharashtra Live News Update: जितेंद्र आव्हाडांची पोलिसांवर टीका

महाराष्ट्रातील पुरोगामी विचार व्यक्त करणा-या मुलांच्या पोटावर लाथ मारण्याचं काम सुरु झालं आहे. ही मुले नोकरीला आहेत; पण, विचारधारेसाठी मजबुतीने उभी राहत आहेत. त्यांच्याविरुद्ध तो जर पुण्यात राहत असला तर गडचिरोलीला, तो जर नाशिकला राहत असला तर नांदेडला, मुंबईत राहत असला तर नागपूरला अशा पद्धतीने पोलीस खोटे गुन्हे दाखल करीत आहेत आणि विनाकारण या मुलांना त्रास देत आहेत. खरतरं, मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे सुरक्षित राखलं पाहिजे तसेच सोशल मिडीयावर लिखाण केल्यास त्याला संरक्षण दिले पाहीजे. असा निकाल असतानाही महाराष्ट्र राज्य सरकारने कुठलाही कायदा न पाळता पोलिसांकरवी ह्या विचारधारेलाच अटकाव करण्याची मोहीम सुरु केली आहे. हे इतकं सोपं नाही. ही लढाई मोठी आहे. तुम्ही घाबरवत रहा, आम्ही ही लढाई लढतं राहू. पण, इतकेही घाबरवू नका की, नंतर तुमच्याच लोकांना पळ काढावा लागेल. Anticipatory Bail साठी गेलेल्या इसमाला पोलीसांकडे मागणी करुन सुद्धा पोलीस FIR ची कॉपी देत नाहीत. महाराष्ट्रामध्ये असे अनेकजण आहेत; ज्यांच्यावर अशा खोट्या तक्रारींवर केसेस चालू आहेत आणि त्याची FIR कॉपी देखिल त्या मुलांच्या हातात नाही. महाराष्ट्रामध्ये हे कुठलं नवीन पोलीसी राज्य सुरु झालं आहे. राज्य गुप्तचर विभाग (SID), महाराष्ट्र हे आता ट्विटरला पत्र पाठवत आहेत, इमेल करीत आहेत आणि काही सोशल मिडिया अकाऊंट्स बंद करण्याची मागणी करीत आहेत. आता राज्य गुप्तचर विभाग (SID), महाराष्ट्र ला एवढेच काम उरले आहे का?

https://twitter.com/Awhadspeaks/status/1689207989587046400

15:23 (IST) 9 Aug 2023
पुण्याचे पालकमंत्री नक्की कोण?

राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर राजकीय समीकरणे बदलली असताना, पुण्याचे पालकमंत्री नक्की कोण? असा संदिग्ध प्रश्न उभा राहिला आहे. चंद्रकांत पाटील हे पालकमंत्री असले, तरी सत्तांतरानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे, पिंपरी-चिंचवड या शहरांबरोबरच जिल्ह्याचा कारभार हाती घेत या पदावर कब्जा केला आहे. त्यामुळे अल्पावधीतच पाटील हे नाममात्र पालकमंत्री असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

सविस्तर वाचा...

15:16 (IST) 9 Aug 2023
मध्य रेल्वेच्या ९ ते २३ ऑगस्टदरम्यान वेगवेगळ्या तारखांना १९ गाड्या रद्द; वाचा कारण काय ते….

मुंबई-हावडा मध्य रेल्वेच्या चौथ्या मार्गाला सक्ती रेल्वे स्थानकाशी जोडण्याचा आणि या स्थानकाच्या ‘यार्ड रिमॉडेलिंग’चे काम करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. हे पूर्ण करण्यासाठी गाड्यांचे संचालन थांबवावे लागणार आहे. ९ ते २३ ऑगस्टपर्यंत वेगवेगळ्या तारखांना १९ गाड्या रद्द राहतील. रेल्वेने प्रभावित गाड्यांसंबंधी माहिती प्रसिद्ध केली आहे.

सविस्तर वाचा

15:01 (IST) 9 Aug 2023
नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी अजिवली गावाजवळ फुटली

बेलापूर येथे मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी  मंगळवारी संध्याकाळी पाणीपुरवठा बंद  होता तर  आज सकाळी शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात आला. परंतु बुधवारी अजीवली येथे मोरबे धरणावरून येणारी मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे  आज शहरात संध्याकाळी पाणीपुरवठा बंद राहणार असून गुरुवारी सकाळी ही कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

सविस्तर वाचा

15:01 (IST) 9 Aug 2023
नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी अजिवली गावाजवळ फुटली

बेलापूर येथे मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी  मंगळवारी संध्याकाळी पाणीपुरवठा बंद  होता तर  आज सकाळी शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात आला. परंतु बुधवारी अजीवली येथे मोरबे धरणावरून येणारी मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे  आज शहरात संध्याकाळी पाणीपुरवठा बंद राहणार असून गुरुवारी सकाळी ही कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

सविस्तर वाचा

14:57 (IST) 9 Aug 2023
मुंबई गोवा महामार्गासाठी पत्रकारांचे आंदोलन

मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेकडे प्रशासनाचे आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रायगड प्रेस क्लबच्या वतीने आंदोलन करण्यात आले. सकाळी अकरा वाजता महामार्गावर वाकण फाटा येथे हे आंदोलन करण्यात आले. स्थानिक लोप्रतिनिधींनी विरोधात बोंबाबोंब करण्यात आली.

सविस्तर वाचा

14:53 (IST) 9 Aug 2023
चंद्रपूर की ‘प्रदूषण’पूर? प्रदूषण नियंत्रणासाठी मास्टर प्लान तयार करा; वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले…

चंद्रपूर : जिल्ह्यात विविध प्रकारचे उद्योग आहेत. त्याचप्रमाणे शहराच्या परिसरातही उद्योग आहेत. या उद्योगांमध्ये स्टील, कागद, सिमेंट, औष्णिक वीज उद्योगांचा समावेश आहे. शहर परिसरात उद्योगांमुळे वायू, जल प्रदूषणासह आरोग्यावर परिणाम होत आहे. जिल्ह्यातील विविध उद्योगांमधील प्रदूषण नियंत्रणासाठी जगात असलेल्या चांगल्यात चांगल्या कार्यपद्धती अंमलात आणाव्यात, असे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. तसेच जिल्हा प्रदूषण नियंत्रणाचा मास्टर प्लान तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

सविस्तर वाचा...

14:35 (IST) 9 Aug 2023
इंद्रायणी वाहते दूषित पाण्याने

पुणे: इंद्रायणी नदीत दररोज ६० ते ६५ दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) दूषित पाणी नदीत सोडले जात असल्याची माहिती समोर आली आहे.

सविस्तर वाचा...

14:15 (IST) 9 Aug 2023
विक्रमी उत्पादन तरीही गहू ‘खायला महाग’

पुणे: यंदा देशात विक्रमी गहू उत्पादन झाले आहे. केंद्र सरकारने गहू, रवा, मैद्याच्या निर्यातीवर निर्बंध घातले आहेत. गव्हाचा अतिरेकी साठा करण्यावर बंधने आहेत.

सविस्तर वाचा...

Maharashtra Political Live Update Today

महाराष्ट्र पॉलिटिक्स

Maharashtra Breaking News Today: महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक व इतर क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी...