Maharashtra Breaking News Today, 09 August 2023: भाजपा खासदार नारायण राणेंनी मंगळवारी संसदेत केलेल्या भाषणावरून सध्या राजकीय चर्चा सुरू झाली असून राणेंच्या भाषेवर विरोधकांकडून तीव्र आक्षेप घेतला जात आहे. दुसरीकडे संजय राऊतांनी शरद पवारांना पंतप्रधानपद न मिळण्यामध्ये काँग्रेस आल्याचा दावा केल्यामुळे त्यावरून आता राजकीय दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत.

Live Updates

Maharashtra Breaking News Today: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर!

14:06 (IST) 9 Aug 2023
लोकसभेआधी काँग्रेसची महाराष्ट्रात ‘क्षमता चाचणी’, मतदारसंघनिहाय निरीक्षक आणि समन्वयक नियुक्त

नागपूर : काँग्रेसने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. या निवडणुकीला सामोरे जाण्याआधी सर्व ४८ लोकसभा मतदारसंघातील आपल्या क्षमतेचा अंदाज घेतला आहे.

सविस्तर वाचा…

14:00 (IST) 9 Aug 2023
धुळ्यात शरद पवार यांना धक्का; प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे राष्ट्रवादीतून बाहेर

पक्षीय गटबाजीच्या राजकारणासाठी आपण अपात्र आहोत. यामुळे अशा गटबाजीला कंटाळूनच राष्ट्रवादीतून स्वखुशीने बाहेर पडलो, असे माजी आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष (शरद पवार) अनिल गोटे यांनी म्हटले आहे.

सविस्तर वाचा

14:00 (IST) 9 Aug 2023
बापरे! सेट टॉप बॉक्समध्ये विद्युत प्रवाह, चिमुरड्याचा स्पर्श होताच…..

नागपूर: प्रत्येक घरी टीव्ही असतो आणि विविध मनोरंजनाचे कार्यक्रम दाखवणा-या वाहिन्यांसाठी सेट टॉप बॉक्स लावला जातो. तसा तो दुर्लक्षित असतो.

सविस्तर वाचा…

13:59 (IST) 9 Aug 2023
केंद्र सरकारविरोधात धुळ्यात कामगारांचा रोष; दुचाकी फेरीसह निदर्शने

राष्ट्रीय संपत्ती आणि सार्वजनिक उद्योग खासगी भांडवलदारांच्या कंपन्याना विकण्याचे धोरण राबवून लाखो कामगार देशोधडीला लावण्याचा सपाटा केंद्रातील भाजपप्रणित सरकारने सुरु केला असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा

13:53 (IST) 9 Aug 2023
पुणे : पालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता बंगिनवार यांच्या विरोधात काँग्रेस, मनसेचे निषेध आंदोलन

पुणे : पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आशिष बंगिनवार यांनी व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळवून देण्यासाठी १६ लाख रुपयांच्या लाचेची मागणी एका विद्यार्थ्याच्या पालकांकडे केली होती. त्यापैकी १० लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने आशिष बंगिनवार यांना काल रंगेहाथ पकडले. या पार्श्वभूमीवर बंगिनवार यांचा काँग्रेस आणि मनसेकडून निषेध करण्यात आला.

सविस्तर वाचा…

13:48 (IST) 9 Aug 2023
फडणवीस सहा जिल्ह्यांचे पालकमंत्री, मग स्वातंत्र्यदिन सोहळ्यात कुठे लावणार हजेरी? झेंडावंदनावरून सर्वत्र उत्सुकता

वर्धा: राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे सहा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळून आहेत.

सविस्तर वाचा…

13:32 (IST) 9 Aug 2023
राष्ट्रवादीच्या फलकावर अजितदादा-फडणवीस साथसाथ

नागपूर : सिंचन घोटाळा प्रकरणात भाजपने अजित पवार यांची सर्वाधिक बदनामी केल्यावरही बदलत्या राजकीय परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसने स्वागत फलकावर अजित पवार यांच्या बरोबरीतच देवेंद्र फडणवीस यांच्या छायाचित्राला बरोबरीचे स्थान देऊन दोन्ही नेते साथसाथ असल्याचा संदेश दिला आहे.

सविस्तर वाचा…

13:32 (IST) 9 Aug 2023
केंद्र सरकारने दिबांच्या विमानतळाच्या नावाला मंजुरी द्यावी, अन्यथा…

मंजुरीला केंद्र सरकार कडून दिरंगाई होत असल्याने भूमिपुत्रांकडून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे ९ ऑगस्ट या क्रांतीदिनी प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या तरघर, उलवे व चिंचपाडा  येथील प्रवेशद्वारावर समितीच्या वतीने नाम फलक लावण्यात आले.

सविस्तर वाचा

13:31 (IST) 9 Aug 2023
नवी मुंबई: पार्किंग वाद अन् स्क्रू ड्राइव्हर भोसकून हत्या; आरोपी अटक

दिनेश मौर्या असे यातील अटक आरोपीचे नाव आहे, तर मयत व्यक्तीचे नाव दिनेश चव्हाण आहे. आरोपी दिनेश मौर्या याचा व्यवसाय असून त्याचे दुकान शिवशक्ती नगर तुर्भे स्टोअर येथे आहे. बुधवारी सकाळी दिनेश चव्हाण यांनी आपली रिक्षा दिनेश मौर्या यांच्या दुकानासमोर लावली.

सविस्तर वाचा

13:17 (IST) 9 Aug 2023
डोंबिवलीत खचलेल्या रस्त्यामधून प्रवाशांचा प्रवास

डोंबिवली: डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील पाटकर रस्त्यावर रिक्षा वाहनतळा शेजारील रस्त्यावरील पेव्हर ब्लाॅक निघून रस्ता खचला आहे.

सविस्तर वाचा…

13:01 (IST) 9 Aug 2023
जंगलांना आग लागण्याचे प्रमाण घटले

पुणे: देशातील जंगलांना आग लागण्याचे प्रमाण घटले आहे. केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाने घटक राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या वन खात्याच्या मदतीने केलेल्या उपाययोजनांमुळे आणि आगीवर नियंत्रण आणण्यासाठी तयार केलेल्या कृती आराखड्यामुळे जंगलांना आग लागण्याच्या प्रमाणात घट झाल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.

सविस्तर वाचा…

12:45 (IST) 9 Aug 2023
धान्यात अफरातफर भोवली; आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक कोटलावार निलंबित

गडचिरोली: आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने करण्यात येणारी धान खरेदी व मिलिंग यांमध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी आदिवासी विकास महामंडळ, गडचिरोलीचे प्रादेशिक व्यवस्थापक गजानन रमेश कोटलावार यांना ८ ऑगस्ट रोजी निलंबित करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा…

12:39 (IST) 9 Aug 2023
उपराजधानीत सत्तारुढ पक्षाच्या नेत्यांचा पोलिसांवर दबाव? दादागिरी करत गुंडांना पाठीशी घालण्याचे प्रकार

नागपूर : नागपुरात सत्तारुढ पक्षाच्या नेत्यांची पोलिसांवर दादागिरी सुरू असून ते गुंडांना पाठीशी घालण्यासाठी थेट पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव टाकत आहेत. पक्षात मोठे वजन असलेल्या नेत्यांनी गुंडांसाठी पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांना दमदाटी केल्याचे प्रकरण समोर आले आहे.

सविस्तर वाचा…

12:21 (IST) 9 Aug 2023
राजशिष्टाचाराचे कारण देत उपराष्ट्रपतींकडून राष्ट्रसंतांची उपेक्षा! शताब्दी महोत्सवातील प्रकार

नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आयोजित प्रत्येक कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेतील ‘या भारतात बंधुभाव नित्य वसू दे’ हे विद्यापीठ गीत सामूहिकपणे गायले जाते.

सविस्तर वाचा…

12:18 (IST) 9 Aug 2023
पिंपरीत अल्पवयीन मुलांच्या ‘कोयता गॅंग’चा हैदोस! दोघांच्या डोक्यात कोयत्याने वार, दागिन्यांची लूट

पिंपरी-चिंचवडमधील चिखली परिसरात कोयता गॅंगने हैदोस घातला आहे. कोयता गॅंगच्या अल्पवयीन टोळीने दोघांवर कोयत्याने वार करत दिसेल त्या महिलेचे सोन्याचे दागिने लुटले. त्याचबरोबर दुचाकीवरून येणाऱ्या वाहन चालकांचे मोबाईलदेखील हिसकावून पळ काढल्याची घटना चिखली परिसरात घडली आहे.

सविस्तर वाचा…

12:08 (IST) 9 Aug 2023
Maharashtra Live News Update: नाना पटोलेंची मोदी सरकारवर टीका

मोदी सरकार आल्यापासून संविधानाशी छेडछाड सुरू झाली. आदिवासींच्या अधिकारावर घाला घालण्याचं काम भाजपा सरकार करतंय – नाना पटोले

12:03 (IST) 9 Aug 2023
Maharashtra Live News Update: विजय वडेट्टीवारांचा भाजपा आघाडीवर हल्लाबोल

तुम्हाला जनतेला दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला. म्हणून जनता तुम्हाला नाकारतेय. २६ पक्षांच्या टेकूवरून हेच सिद्ध होतंय – विजय वडेट्टीवार, विधानसभा विरोधी पक्षनेते

11:52 (IST) 9 Aug 2023
वर्धा : भाजपाच्या नगराध्यक्षांच्या कामाची बोंब अन् आता दुरुस्ती करणार भाजपाचेच आमदार!

वर्धा : गत दोन वर्षांपासून आमदार डॉ. पंकज भोयर यांनी विविध कामांच्या निधीसाठी पाठपुरावा सुरू केला होता. त्यास अखेर यश आले असून ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. भाजपची सत्ता वर्धा नगर परिषदेत गत पाच वर्षांत होती. यावेळी भूमिगत गटरची योजना मंजूर झाली. धडाक्यात कामे काढण्यात आली. शहरातील अंतर्गत रस्ते मोठ्या प्रमाणात फोडण्यात आले होते. खुद्द भाजपा आमदार डॉ. पंकज भोयर यांनी ठिकठिकाणी पाहणी करीत वरिष्ठ अधिकारी तसेच पक्षाच्या नेत्यांना हे प्रकरण अंगलट येवू शकते म्हणून अवगत केले होते.

सविस्तर वाचा…

11:41 (IST) 9 Aug 2023
नागपूर: मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्याने केली वाहतूक कर्मचाऱ्याला मारहाण

नागपूर: शहरात गुन्हेगारी वाढत असतानाच पोलीस कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तनामुळे नागपूर पोलीस विभागाची प्रतिमा मलीन होत आहे.

सविस्तर वाचा…

11:40 (IST) 9 Aug 2023
महिलाराज! नवीन अमरावती रेल्‍वे स्‍थानक बनले भुसावळ विभागातील पहिले ‘पिंक स्‍टेशन’ !

अमरावती: संपूर्ण महिला कर्मचारी संचलित असलेल्या नवीन अमरावती रेल्वे स्थानकाला ‘पिंक स्‍टेशन’ म्‍हणून घोषित करण्‍यात आले आहे. नवीन अमरावती रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वेच्‍या भुसावळ विभागातील पहिले ‘महिला राज’ स्थानक आहे.

सविस्तर वाचा…

11:40 (IST) 9 Aug 2023
‘हिंदी अल्पसंख्यांक’ कोट्यावरून अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेत सुरू आहे गोंधळ…

नागपूर: महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत अभियांत्रिकी प्रवेशासाठी ‘कॅप राऊंड’द्वारे प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. अभियांत्रिकी प्रवेशासाठी ‘हिंदी अल्पसंख्याक’ कोटा आहे.

सविस्तर वाचा…

11:39 (IST) 9 Aug 2023
सायबर गुन्हेगाराकडून काँग्रेस नेत्याची फसवणूक; पोलिस निरीक्षकाच्या नावाने फेसबूकवर बनावट खाते

नागपूर: फेसबूकवर पोलीस निरीक्षकाच्या नावाने बनावट खाते उघडून सायबर गुन्हेगाराने काँग्रेस नेत्याची फसवणूक केली. बदली झाल्याने घरचे साहित्य विक्रीसाठी काढल्याचे सांगून आरोपीने नेत्याची १.१२ लाख रुपयांनी फसवणूक केली.

सविस्तर वाचा…

11:37 (IST) 9 Aug 2023
नागपूर : एसटी डेपोतील डिझेल संपले म्हणून व्यवस्थापकावर निलंबनाची कारवाई, वाचा नेमकं काय घडलं ते

नागपूर : एसटी महामंडळाच्या काटोल डेपोमध्ये डिझेल संपल्याने एसटीच्या बसेस उभ्या ठेवण्याची पाळी आली. त्यामुळे निष्काळजीपणाचा ठपका ठेवत महामंडळाने मंगळवारी येथील डेपो व्यवस्थापकांना निलंबित केले.

सविस्तर वाचा…

11:36 (IST) 9 Aug 2023
हवामान बदलाने नवी मुंबईत साथीचे आजार बळावले, जुलैमध्ये मलेरियाचे १५, तर डेंग्यूचे १८५ संशयित रुग्ण

नवी मुंबई – गेल्या महिन्यापासून वातावरणातील उष्ण-दमट हवामानाने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम जाणवत आहे. नवी मुंबई शहरात आता साथीच्या विशेषतः डेंग्यू, मलेरिया आजारांनी डोके वर काढले असून जून महिन्यापेक्षा जुलैमध्ये साथीचे आजार बळावले आहेत.

सविस्तर वाचा…

11:35 (IST) 9 Aug 2023
‘भारत छोडो’ आंदोलनाची आठवण; ते म्हणाले, ”भारत माता की जय म्हणताच…”

नागपूर : १९४२ च्या ‘भारत छोडो’ आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी झालेले व त्यासाठी एक वर्ष कारावास भोगलेले जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक डॉ. पुंडलिकराव गेडाम यांनी वयाचे शतक पूर्ण केले असले तरी त्यांची उमेद, उत्साह व स्मरणशक्ती अजूनही दांडगी आहे.

सविस्तर वाचा..

10:56 (IST) 9 Aug 2023
Maharashtra Live News Update: सुप्रिया सुळेंची लोकसभेतील भाषणावर सविस्तर पोस्ट

सुप्रिया सुळेंनी त्यांच्या लोकसभेतील भाषणाचा व्हिडीओ पोस्ट करताना त्यासंदर्भातील सविस्तर पोस्ट ट्वीट केली आहे.

10:52 (IST) 9 Aug 2023
Maharashtra Live News Update: ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांचं निधन

समता परिषदेचे उपाध्यक्ष हरी नरके यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. मुंबईच्या एशियन हार्ट रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते. ते ६० वर्षांचे होते. महात्मा फुले यांच्या साहित्याचा अभ्यास आणि संशोधन, व्याख्याते म्हणून ते सुपरिचित होते.

तत्कालीन पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते प्रमुख होते. महात्मा फुले साहित्य समितीवर त्यांनी काम केले. त्या माध्यमातून महात्मा फुले यांचे साहित्य प्रकाशित करण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले होते. महात्मा फुले-शोधाच्या नव्या वाटा अशा अनेक पुस्तकांचे त्यांनी लेखन केले. त्यांच्या निधनामुळे संशोधन, सामाजिक क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

10:51 (IST) 9 Aug 2023
Maharashtra Live News Update: इक्बालसिंह यांना एवढंच सांगेन… – फडणवीस

रस्त्यांची कामं चालू आहेत, इतर कामं चालू आहेत. अर्थात, चांगली कामं चालू असताना काही लोकांच्या पोटात दुखतं. मग ते रोज एक पत्र लिहितात. असंच एक पत्र त्यांनी स्वत:ला २५ वर्षं लिहिलं असतं, तर कदाचित मुंबई अधिक चांगली झाली असती. मी चहल यांना एवढंच सांगेन, तुम्ही चांगलं काम करत आहात. एकच लक्षात ठेवा, निंदकाचे घर असावे शेजारी, तसं आपल्या शेजारी ते बसले आहेत. रोज तुमच्यावर आरोप करतील. पण त्याची संधी त्यांना देऊ नका. पारदर्शी, प्रामाणिकतेनं एकेक काम तुम्ही करा. मुंबई बदलतेय. अशाच रीतीने तुम्ही मुंबई बदलली, तर येत्या काळात मुख्यमंत्र्यांचं खड्डेमुक्त मुंबईचं स्वप्नं तुम्ही पूर्ण करू शकाल – देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र पॉलिटिक्स

Maharashtra Breaking News Today: महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक व इतर क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी…